धार्मिक स्थळं आणि.........
अगदी मुद्दामच शीर्षकात टिंब टिंब टिंब केलं आहे. माझ्या कडुन या विषयावर काहीही गंभीर लिखाणाची अपेक्षा करु नका, धर्म या बाबतीत मी खुप मोठा ढ आहे.
मला लिहियाचं आहे, विविध धार्मिक स्थळं, ती असेनात का विविध धर्माची, तिथल्या खाण्याबद्दल. मग ते अन्नछत्रातलं असो नाही तर एच्छिक देणगी नाही तर सक्तीची वर्गणी देउन मिळालेलं असेल. ब-याचदा हे जाणवते की सत्यनारायणाचा शिरा हा नेहमीच्या शि-यापेक्षा जास्त वेगळा लागतो. घरी मधुमेह असण्यानं चमचाभर साखर खायला घाबरणारी माणसं देवळांत ३-३ वाट्या प्रसाद काही न वाटता खातात आणि जास्ती गोळ्या न घेता पचवतात सुद्धा.
तर मला चर्चा करायची आहे ती याबद्दलच, आपले अनुभव, आपली मते, आपले विचार आणि महत्वाचे म्हणजे कुठे काय छान मिळते ते पण. मी सुरुवात करतो आहे,
१. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्र - छान जेवण, महाराष्ट्रियन पण कर्नाटकी जेवणाची छाप असलेलं. इथे ताटात अजिबात टाकता येत नाही, हा सगळ्यांत चांगला नियम.
२. गोंदवलेकर मठ, गोंदवले, सातारा - जेवणाची चव साधारणच, म्हणजे अगदीच घरगुती पण व्यसथा अतिशय छान, आटोपशीर.
३. जत जवळ गुड्डापूर येथे धान्नम्मा देवीचं मंदिर आहे - इथे फक्त गव्हाची खिर , भात व शेंगाची आमटी एवढेच असते, आणि ते ही फक्त ताटांत - वाटी,चमचा असली नसती नाटकं नाहीत. खास कर्नाटकी खिरीसाठी जरुर जा.
४. सज्जनगढ - फक्त भात,आमटी, भाजी व गव्हाची खिर, एकदा या जेवणासाठी पुणे ते सज्जनगड हा प्रवास २ तासांत केला आहे.
ही यादी पुढे नेण्याची जबाबदारी आता तुमची..
धन्यवाद
हर्षद.
वाचन
8257
प्रतिक्रिया
0