चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?

रोमना's picture
रोमना in काथ्याकूट
9 Dec 2010 - 3:01 pm
गाभा: 

हल्ली महा-गाई (गायीचा चाराही रु. २/- झाला आहे ) एवढि वाढली आहे की जिभेचे चोचले पुरवायचे म्हंटले, तर नाकी नऊ आणि १ कींवा १/२ नोट संपते. त्यातही जर नवीन पदार्थ चाखायला गेलो, तर पैसेवसूल झाले पाहिजेत अशी चव मिळणे कठीण. तेव्हा अशा मोक्याच्या जागांची यादी जर मिळाली तर अन्नदेवता व लक्ष्मीमातेची कृपाच होईल.

मी गिरगांव (गिरणगाव नव्हे) येथे रहात असल्याने, आमच्या जवळची खाद्यभ्रमंती म्हणजे जवाहर मेंशनच्या लगतचा विनय (पूर्वीचे टेंभे) मिसळसाठी प्रसिध्द. रु. २८/- कि ३०/-. गोडट चव, मस्त फरसाण (पण हल्ली डिंमांडमुळे पैसे जास्त व सप्लाय म्हणजे क्वांटीटी कमी झालेली दिसते), वडा ठिक (थोडा गोडट) असतो. इतर मराठी पदार्थहि छान असतात.

प्रतिक्रिया

स्पा's picture

9 Dec 2010 - 3:43 pm | स्पा

कल्याण ला आलात तर "खिडकी वडा" जरूर खा........
आणि डोंबिवली ची "मुनमुन मिसळ"

^^^^^ठाकुर्लीला आलात तर आग्र्यांचे " पोकळ बाम्बुंचे" फटके खावे लागतील ^^^^ (ह.घे)

रोमना's picture

9 Dec 2010 - 5:09 pm | रोमना

पार्सल मिळत नाही अस ऐकलयं.

स्पा's picture

9 Dec 2010 - 6:27 pm | स्पा

होय.

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:15 pm | पर्नल नेने मराठे

दादरला गेलात तर 'उभा वडा' जरुन खा ;) छबिलदास्च्या गल्लीत

"श्रीकृष्ण"च ना?

तो वडा गरम असताना झकासच लागतो. पण पाव देणे श्रीकृष्ण बटाटवडावाल्यांच्या तत्वात बसत नाही.

शिवाय दोन वडे एका प्लेटमधे असतात, त्या ऐवजी एक साबुदाणा आणि एक बटाटावडा द्या म्हटलं (फार महाग असल्याने आणि दोन्हीची एकत्र चटक लागल्याने) तर देत नाहीत.

त्यात खडेमीठ घालतात.

किर्ती कॉलेजसमोरचा अशोकचा वडापाव (पावात अनेक चटण्या आणि फिलिंगसाठी भज्याचे उर्वरित तुकडे घालून) ज्यास्ती टेस्दार आणि अ‍ॅडिक्टिव्ह आहे.. म्हणजे होता..आता आहे का ठावूक नाही.

बेसनलाडू's picture

10 Dec 2010 - 12:16 pm | बेसनलाडू

आधी सुप्रसिद्ध असलेल्या श्रीकृष्णच्या वड्याचा आकार आणि किंमत यात गेली काही वर्षे व्यस्त प्रमाण अवतरले आहे. क्रिकेटच्या चेंडूपेक्षा काहीशा कमी आकाराच्या वड्यासाठी जरा जास्तच किंमत मोजावी लागते, असा अनुभव आहे. बाकी वड्याबरोबर पाव न देण्याचे पुणेरी तत्त्व हा मनुष्य दादरमध्ये कसे राबवतो, याचे राहून राहून आश्चर्य वाटते. अर्थात सार्‍या तत्त्वांना योग्य जागी मारून गणपती विसर्जनानंतर परत येताना श्रीकृष्णचा वडा हाणला नाही, तर बाप्पा रागवेल आणि चौपाटीवरूनच परत येईल, अशी भीती वाटत असल्याने न चुकता भक्तीभावे बाप्पाचा प्रसाद समजून वडा खातोच!
(दादरकर)बेसनलाडू

अमोल केळकर's picture

11 Dec 2010 - 2:40 pm | अमोल केळकर

प्रतिसाद आवडला. सहमत . :)

अमोल

विलासराव's picture

10 Dec 2010 - 7:05 pm | विलासराव

किर्ती कॉलेजसमोरचा अशोकचा वडापाव (पावात अनेक चटण्या आणि फिलिंगसाठी भज्याचे उर्वरित तुकडे घालून) ज्यास्ती टेस्दार आणि अ‍ॅडिक्टिव्ह आहे.. म्हणजे होता..आता आहे का ठावूक नाही

अजुनही आहे . ते भज्याचे तुकडे नसावेत. खास करुन ते बेसणाची धार सोडतात तेलात, नुडल्स सारखं बनवतात . तेच वड्याबरोबर टाकुन देतात. बहुतेक चुरा असं म्हणतात त्याला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Dec 2010 - 9:05 pm | निनाद मुक्काम प...

मून मून ची मिसळ आजीच्या प्रेमामुळे चविष्ट लागते .सुटते पैसे नसले तर लिमलेटची गोळी देण्याची कल्पना मस्तच बाकी त्यांचे बंधू ठाण्यातील प्रसिध्द मामलेदार मिसळ वाले .
त्यामुळे त्यांचा स्टाफ डोंबिवली ते ठाणा फिरत असतो .

विलासराव's picture

9 Dec 2010 - 9:44 pm | विलासराव

मून मून ची मिसळ आजीच्या प्रेमामुळे चविष्ट लागते .सुटते पैसे नसले तर लिमलेटची गोळी देण्याची कल्पना मस्तच
खरय. बर्याचदा जाणं झालय तिकडे आन मामलेदारांकडेही.

गायवाडीतलं 'कोना'? पण स्वस्त आहे का नाही याची कल्पना नाही.

बाकी अस्सल वडे खायचे तर खाली कोतवाल सांगतात त्याप्रमाणे श्रीकृष्ण वडा आहेच. भांडुप पश्चिमेला शिवाजी तलावाजवळ 'भाऊ वडापाव सेंटर' आहे. त्याच्याकडचा वडा म्हणजे केवळ अ प्र ति म!! ठाण्याचं कुंजविहारही आहेच. तसंच आमच्या गोरेगावात आलात कधी तर पश्चिमेला एमजी रोडच्या शेवटाला, 'तृप्ती' नावाचं लहानसं वडापाव सेंटर आहे. तेही भारीच! तसंच पार्ल्यात पूर्वेला भोगले चौकात प्रभू का कुणाचं तरी दुकान आहे (नाव नक्की आठवत नाही. कुणी पार्लेकर असतील तर सांगावे त्यांनी) वड्यांसाठीच फेमस आहेत ते!

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 3:35 pm | विजुभाऊ

पार्ल्यात पूर्वेला भोगले चौकात प्रभू का कुणाचं तरी दुकान आहे (नाव नक्की आठवत नाही. कुणी पार्लेकर असतील तर सांगावे त्यांनी) वड्यांसाठीच फेमस आहेत ते!

ते प्रभुकृपा ..... तेथे वडे नाहीत पण पुरणपोळी गुळाची पोळी मोदक वगैरे मिळतात
मिसळीसाठी पार्ले स्टेशनसमोर जीवन हॉटेल आहे.
बाकी मराठी पदार्थासाठी हनुमान रोडवरचे गोडबोले देखील आहेत.
यातले जीवन सोडले तर स्वस्त कोणीच नाही. किमान एक नोट मोडतेच आणि शिल्लक नाणी रहातात

तिमा's picture

9 Dec 2010 - 6:23 pm | तिमा

अहो विजुभाऊ,

पार्ल्याच्या 'प्रभुकृपा' मधे बटाटेवडा पण मिळतो आणि तो उत्कृष्ट चवीचा असतो. उशीरा संध्याकाळी बरेचदा संपलेला असतो.

ठाण्याचं कुंजविहारही आहेच.

>>>

मेवे..
मीही कुंजविहारात बकाबका जंबो वडापाव खात असे. मधे तिथे सडक्या बटाट्याचा ट्रक पकडला गेला आणि अत्यंत खराब बटाटे वापरले जातात असं निष्पन्न होऊन दंड वगैरे झाला होता. काही (दश) हजारात वडे रोज विकले जायचे असं काउंटरवर कोण्या जाणत्याने मला सांगितलं होतं.

ठाण्यात राजमाता वडापाव वगैरे आहेत पण "दि बेस्टेस्ट" असा अजून मिळाला नाही.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Dec 2010 - 3:09 pm | घाशीराम कोतवाल १.२

श्री क्रुष्ण वडा
आयडियल बूक डेपो शेजारी दादर ( पश्चिम)

हॉटेल आनंद भुवन
रंगारी बदक चाळी जवळ लालबाग
मिसळीचे दहा ते बारा प्रकार मिळतात

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Dec 2010 - 3:16 pm | llपुण्याचे पेशवेll

कोल्हापूरची मिसळ अत्यंत पाण्चट आणि बेचव असते. त्यामुळे वरील पदार्थ कोल्हापूराबाहेर शोधावेत. कदाचित चांगले मिळतील.

टारझन's picture

9 Dec 2010 - 3:20 pm | टारझन

:)

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 3:37 pm | विजुभाऊ

कोल्हापूरची मिसळ अत्यंत पाण्चट आणि बेचव असते. त्यामुळे वरील पदार्थ कोल्हापूराबाहेर शोधावेत. कदाचित चांगले मिळतील.

हे पुण्यातल्या कोल्हापूरबद्दल बोलताय की कोल्हापूर गावातल्या?
तुम्हाला बघून बहुधा देणाराने त्यात पाणी मिसळून दिले असावे असा कयास आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Dec 2010 - 4:11 pm | llपुण्याचे पेशवेll

हे पुण्यातल्या कोल्हापूरबद्दल बोलताय की कोल्हापूर गावातल्या?

वाहवा. पुण्यातले कोल्हापूर हा विजुभाऊंचे नवीन शोध दिसतो आहे. अर्थात असे अनेक शोध त्यांनी यापूर्वीही लावले आहेत. असो. मुख्य प्रश्नाचे उत्तर - कोल्हापूर म्हणजे अंबाबाईचे कोल्हापूर जिथे महाद्वार रोडवर चोरगे, तसेच अन्यत्र फडतरे, कसबाबावड्यातली मिसळ अशी एकाहून एक टुकार मिसळ विकणारी हॉटेले आहेत.

तुम्हाला बघून बहुधा
अहो येवढी कुठली त्यांची नजर तयार असायला. म्हणजे कोल्हापूरातल्या इतरांची असेलही पण पण आता तुम्ही सातारचे आणि अर्धवट मग त्या हिशोबाने कोल्हापूरात पूर्ण निर्बुद्ध असायला हरकत नाही.

अर्धवट's picture

12 Dec 2010 - 9:17 am | अर्धवट

का बे पुप्या.. तुला कोल्हापुरात जाउन मिसळ खायचा आचरटपणा करायला सांगितला कुणी.. पहिल्या भेटीत अथवा मिसळीत डोळ्यातून पाणी काढणारं गाव आहे भाउ ते... कोल्हापूरची मिसळ खरं तर.. बावड्याला वरिजिनल मिळते.. गगनबावडा गाव आहे.. तिकडे खाउन बघ..

>>अहो येवढी कुठली त्यांची नजर तयार असायला. म्हणजे कोल्हापूरातल्या इतरांची असेलही पण पण आता तुम्ही सातारचे आणि अर्धवट मग त्या हिशोबाने कोल्हापूरात पूर्ण निर्बुद्ध असायला हरकत नाही.

मला कशाला ह्याच्यात ओढतो रे.. खाउ दे की निवांत.. ;)

बाकी पेशवे पगडी बिगडी सांभाळून घामाघूम होत मिसळ खाताना डोळ्यासमोर आले आणि अंमळ करमणूक झाली.. ;)

मृत्युन्जय's picture

13 Dec 2010 - 11:42 am | मृत्युन्जय

कोल्हापुरची मिसळ तिखट असते?

हे पुण्यातल्या कोल्हापूरबद्दल बोलताय की कोल्हापूर गावातल्या?
तुम्हाला बघून बहुधा देणाराने त्यात पाणी मिसळून दिले असावे असा कयास आहे
१०१% सहमत!!!!!!!!!

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:20 pm | पर्नल नेने मराठे

मिसळ खावी तर शारजाहच्या रोला नामक खेड्यात...
वडापाव खावा तर माझ्या गावात बॅन्क स्त्रिट, बॉमम्बे बाइट्स मधे ...
हल्लीच एक नविन रेसत्रा झालय घराजवळ ... 'आम्ची मुम्बै' ...जाउन पहिले तर पन्जाबी मेनु :(

मिसळ खावी तर शारजाहच्या रोला नामक खेड्यात...

येण्याजाण्याच्या खर्चात आख्खी पंगत तीन वेळा जेवून उठवता येईल.

"कोल्हापुरी मिसळ" आणि "पुणेरी मिसळ" या भिन्न चिजा आहेत.

दोन्ही एकदम टेसदारच आहेत.

पुणेरी मिसळीत पौष्टिकता वगैरे असते आणि कोल्हापुरी मिसळीत जीभ खवळवणे हाच एकमेव उद्देश असतो.

पुणेरी मिसळ ताज्या बनवलेल्या पदार्थांपासून केली जाते (ताजी पोळी किंवा भात बनवून गरम वाफा येत असताना त्याचा फोडणीचा भात बनवावा तस) आणि सकाळी नवाच्या आत "मिसळ संपली" अशी पाटी लागते. एक्स्ट्रॉ कांदा मिळत नाही.

कोल्हापुरी मिसळ शिळ्या, उरलेल्या पदार्थांपासून तयार होते त्यात कधीमधी भजी, शंकरपाळ्या यांचे तुकडे असू शकतात. कांदा/लिंबू/तर्री कितीही मागा, मिळते. ती कधीही संपत नाही. संध्याकाळी खाल्लीत तर काही ठिकाणी पांचट मिळण्याची शक्यता आहे कारण ती सकाळचीच "वाढवलेली" असू शकते.

दोन्ही भूभागांवर पुरेशी वर्षं काढल्याने आमचे आपले मत ..

तीव्र असहमती..

बेडेकर चिखल नावाच्या पदार्थात आम्हाला एकदा वांगे सापडले होते..

>>कोल्हापुरी मिसळ शिळ्या, उरलेल्या पदार्थांपासून तयार होते त्यात कधीमधी भजी, शंकरपाळ्या यांचे तुकडे असू शकतात. कांदा/लिंबू/तर्री कितीही मागा, मिळते. ती कधीही संपत नाही. संध्याकाळी खाल्लीत तर काही ठिकाणी पांचट मिळण्याची शक्यता आहे कारण ती सकाळचीच "वाढवलेली" असू शकते.

असोच.

बर्गर, हॉटडॉग, पिज्जा वगैरे खायचे सोडुन तुम्ही कुठले जुनाट मराठी पदार्थ खाता? सुधरा !

रोमना's picture

9 Dec 2010 - 3:32 pm | रोमना

ठाकूद्वारला तांबे (वामनहरिपेठे शेजारी) मध्येहि ही मिळते, पण ब्राम्हणी पध्दतीची थोडी जास्त गोडट. पूर्वी कुलकर्णींची(प्रार्थना समाज) मिसळ झक्कास होती, पण दुकान बंद केले. सध्या चहा थंडपेये चालतात तेथे.

विलासराव's picture

9 Dec 2010 - 3:48 pm | विलासराव

रहात असल्याने तांबे, विनय दोनही ठिकाणी ईथे माझे नेहमीच जाणे असते. त्यातल्या त्यात विनय चांगले आहे.

वडापाव म्हणाल तर तो अशोकचा वडा दादरला कीर्ती कॉलेजजवळ खुपच प्रसिद्ध आहे.
फाऊंटनला कामत हॉटेल्मधेही मस्त वडापाव मिळतो. सीएसटी स्टेशनसमोर आराम वडापावही चांगला आहे.

रोमना's picture

9 Dec 2010 - 4:52 pm | रोमना

धन्यवाद विलासराव

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:25 pm | पर्नल नेने मराठे

किर्ति कॉलेजजवळचा वडापाच एवढा अस्तो कि तोण्द आ करुन दुखते..

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 5:28 pm | नन्दादीप

वडा पाव म्हणजे काही पाणीपुरी नाही...एकदम खायला.

थोडा थोडा खाल्ला तरी चालतो...

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:33 pm | पर्नल नेने मराठे

खायला आ करायलाच लागतो ना :ओ
पाणी पुरी म्हणशिल तर सेना भवनवरुन माहिमच्या दिशेने राजाराणी ट्रॅव्हल्सचा सिग्नल , राइटला यु टर्न करुन आदर्शच्या गल्लीत जायचे ....लगेचच भैयाची गाडी लागलेली असते. सुरेख पाणीपुरी !!!

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:37 pm | पर्नल नेने मराठे

विलास पेठ्यांच्या दारात ति भाजीवाली अजुन बसते का ओले काजु घेउन विकायला?

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 3:37 pm | मृत्युन्जय

ठाण्याला राजमाता मध्ये उत्तम वडापाव मिळतो. दुर्गा पण चांगले.

पुण्यात जे जे चा बेस्ट. नवी पेठेत विट्ठल मंदिराबाहेर अण्णा (गोखले) ची गाडी असते. कर्वे रोडवर आजूबाच्या शेजारी, कासट समोर भोलाची गाडी लागते. तोही वडा सुंदर. कर्वेनगर मध्ये पूना स्वीट्स समोर एक घाणा अखंड चालु असते. तो वडा पुण्यात तरी सर्वोतम. हाटेहात खायचा असल्या वाडेश्वरचा वडा छान आहे. नारायण पेठेत प्रभा विश्रांती गृहात देखील एक नंबर वडा मिळतो

पुण्याकडुन नाशिकला जाताना नारायणगाव स्टेशनच्या बाहेर उत्तम वडा मिळतो. तसेच संगमनेरच्या २७-२८ किमी आधी राजस्थान ढाब्यावर वडा छानच.

मिसळीची ढीगभर प्रसिद्ध ठिकाणे मिपावर आधीच प्रसिद्ध झाली आहेत. त्यामुळे परत लिहित नाही.

विजुभाऊ's picture

9 Dec 2010 - 3:57 pm | विजुभाऊ

तोही वडा सुंदर
वडा सुंदर......... मग वडा करणारा / करणारी स्वादिष्ट म्हणायची का ;)

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 4:04 pm | मृत्युन्जय

तुम अगर देखके नही खात्या तो तुम्हारा लाइफ बर्बाद है. अहो खाण्याचा पदार्थ कसा पाहिजे तर नुसता बघुनच भूक चाळवली पाहिजे. खाण्याच्या चवीबरोबरच त्याचे दिसणे पण तेवढेच मह्त्वाचे असते साहेब.

मराठे's picture

9 Dec 2010 - 6:50 pm | मराठे

ठाण्याला असताना मला राजमातापेक्षा गजानन (विष्णू नगर) चा वडापाव जास्त प्रिय होता. विशेषतः त्यांची चटणी.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 3:37 pm | परिकथेतील राजकुमार

शेतकरी आत्महत्या करत असताना, स्वयंपाक करता येणारी बायको न मिळाल्याने आयटीची पोरं भुकेनी तडफडत असताना, मद्यार्कासाठी धान्य मिळत नसताना काही सदस्य अशा प्रकारचे धागे काढुन त्यावर चवीचवीने चर्चा करताना पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 3:39 pm | मृत्युन्जय

बर्गर, हॉटडॉग, पिज्जा वगैरे सोडुन मराठमोळ्या वडा आणि मिसळीबद्द्ल चर्चा चालु आहे हे बघुन जळती आहे हो तुमची. हिरवा माज नुसता.

इंटरनेटस्नेही's picture

9 Dec 2010 - 3:51 pm | इंटरनेटस्नेही

मद्यार्कासाठी धान्य मिळत नसताना


साहेबांच्या बोलण्याला जोरदार अनुमोदन.. साला दोन टाईम बीअर प्यायचे वांदे झालेत या महागाईमुळे.. आणि मिसळ आणि वड्यांवर चर्चा कसली करताय??

-
ॠषिकेशकुमार इंट्या,

मुंबई प्रदेश उपाध्यक्ष,
मिसळपाव दुर्लक्षित पँथर.

स्पा's picture

9 Dec 2010 - 3:57 pm | स्पा

असेच म्हणतो, बाकी यंदा...
कणसांच आणि काजूंच पिक जोरदार आलाय असं आईकून आहे

@बर्गर, हॉटडॉग, पिज्जा वगैरे
अवलिया ( उर्फ सुधरा काकास),
बर्गर, हॉटडॉग, पिज्जा वगैरेनी पोट भरेल हो. पण मन नाही.
पंचपक्वांनावर जस वरणभात मात करतना अगदि तसं.

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 3:56 pm | शैलेन्द्र

"बर्गर, हॉटडॉग, पिज्जा वगैरेनी पोट भरेल हो. पण मन नाही."

जाउद्या, तुम्ही मनात वडा खा... हवा तिथला खा.

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 3:52 pm | नन्दादीप

मामलेदार ची मिसळ मस्त असते.......कान्दिवली ल त्यान्ची एक शाखा आहे....मुख्य शाखा - THANE.

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 3:56 pm | छोटा डॉन

>>मामलेदार ची मिसळ मस्त असते.......
+१, एकदम सहमत !

कोणी एके काळी सव्वीस जानेवारीच्या मुहुर्तावर आम्ही मुंबापुरीस गेलो असता आमच्या श्रे. निखील देशपांडे नामक मित्राने ( की जे आजकाल संपादक म्हणुन मिरवत असतात ) आम्हाला ही 'श्रेष्ठ' मिसळ आग्रहाने खायला घातल्याचे स्मरते.
मामलेदारचा मिसळीचा मामला कडक आहे अशी मी इथे ग्वाही देतो :)

- छोटा डॉन

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 4:06 pm | शैलेन्द्र

सकाळी कैलास जिवनची गरज पडली का? कि सकाळ उजाडायच्या आधीच कोंबडा आरवला?

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 4:11 pm | छोटा डॉन

आमचा कोठा मजबुत आहे.
पुण्याला या एकदा, तुम्हाला 'काटा किर्र'ची दणकेबाज कोल्हापुरी मिसळ खाऊ घालतो :)
( पत्ता धमालरावांना विचारावा )

- छोटा डॉन

शैलेन्द्र's picture

9 Dec 2010 - 5:20 pm | शैलेन्द्र

आपण दर आठवड्याला पुण्यात पडीक असतो..

"( पत्ता धमालरावांना विचारावा )"
कि खाल्यावर धमालरावांचा पत्ता द्यावा?

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 5:56 pm | धमाल मुलगा

ओ शैलेंद्रराव,
आयला! इन्व्हेस्टमेंटबद्दल चौकशी करतोय म्हणजे काय लै पैशे घेऊन नाय बसलो हां ;)

हां, सांच्याला पूनममध्ये भेटायचं असलं तर बोला. :D

विलासराव's picture

9 Dec 2010 - 7:37 pm | विलासराव

सांच्याला पूनममध्ये भेटायचं असलं तर बोला

आलोच.

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 9:15 pm | धमाल मुलगा

वाटच पाहत होतो कुनी पार्टनर मिळतो का!
य्या! गल्लास घ्याचा. :)

- धमा धायगुडे.

शैलेन्द्र's picture

10 Dec 2010 - 11:34 pm | शैलेन्द्र

कुठे आल हे पुण्यात?

चिंतामणी's picture

10 Dec 2010 - 11:37 pm | चिंतामणी

(जनता सह. बँकेसमोर. ) गरवारे कॉलेजसमोर.

शैलेन्द्र's picture

11 Dec 2010 - 2:06 pm | शैलेन्द्र

तरीच गरवारे कॉलेज एवढ फेमस आहे...

आमचा कोठा मजबुत आहे.

शिव शिव शिव.......... तुम्ही सुद्धा डानराव !!!!

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 5:33 pm | मृत्युन्जय

म्हणजे तुम्ही नाही की काय विजुभाउ?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Dec 2010 - 4:13 pm | llपुण्याचे पेशवेll

का कमळ फुललं? ;)

कुठेशी आल हे ठीकाण मुंबापुरीत

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:21 pm | पर्नल नेने मराठे

ठाण्यात

तिमा's picture

9 Dec 2010 - 6:33 pm | तिमा

ही मामलेदार ची मिसळ एक घोटही पाणी न पिता खाण्याची पैज मी जिंकली आहे, पण एके काळी!

छोटा डॉन's picture

9 Dec 2010 - 6:38 pm | छोटा डॉन

>>ही मामलेदार ची मिसळ एक घोटही पाणी न पिता खाण्याची पैज मी जिंकली आहे, पण एके काळी!

घ्या, कुठल्या काळचं सांगता राव ?
आम्ही त्या दिवशी चक्क २ मिसळी येका मागोमाग येक ( दुसरी विदाऊट पाव ) करत हानल्या, त्या ही पाणी न पिता, आहात कुठे ?
विश्वास नसल्यास निखील देशपांडे ह्यांना विचारावे. :)

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 7:54 pm | धमाल मुलगा

चला, येताय का पूनममधली 'दाल-खिचडी' खायला? ;)

साला दाल-खिचडी! अहाहा! आत्ताच एक प्रतिसाद त्या दुसर्‍या धाग्यावर लिहिला! त्यात दाखिचा उल्लेख केला! साला आपण सगळेच दाखिभक्त! मी आलोच रे.. ऑर्डर करून ठेव! ;)

@परिकथेतील राजकुमार
शेतकरी आत्महत्या करत असताना....

आपण सध्या कोणती चळवळ लढत आहात शेतकर्यांसाठी ?

याला आपला विरोध म्हणून मुख्यमंत्र्यांना (सध्याचे कोण, किती दिवस टीकेल, पत्रात प्रति कोणाला लिहू हे ध्यानात ठेवून) साधे पत्र तरी लिहेले आहे का?

अर्थात तुम्ही काय करावे हा तुमचा प्रश्न? तेव्हा शेवट सुखाचा होण्यासाठी प्रयत्न करा, शरम कसली करता.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार

आपण सध्या कोणती चळवळ लढत आहात शेतकर्यांसाठी ?

सध्या आम्ही लेखकांसाठी 'दुर्लक्षित पँथर' हि चळवळ चालवत आहोत. लवकरच आम्ही शेतकरी प्रश्नात लक्ष घालणार आहोतच.

याला आपला विरोध म्हणून मुख्यमंत्र्यांना (सध्याचे कोण, किती दिवस टीकेल, पत्रात प्रति कोणाला लिहू हे ध्यानात ठेवून) साधे पत्र तरी लिहेले आहे का?

मुख्यमंत्त्र्यांना वगैरे पत्रे लिहिण्याचे गावठी चाळे आम्ही करत नाही. आम्ही फक्त ओबामा,पुतिन, हिलरी अशांना पत्रे पाठवतो. कुठे जास्तीची केलेली मस्ती अंगाशी आली तर हळुच संपादक मंडळास देखील एक पत्र धाडतो.

अर्थात तुम्ही काय करावे हा तुमचा प्रश्न? तेव्हा शेवट सुखाचा होण्यासाठी प्रयत्न करा, शरम कसली करता.

शेवट हा कायम सुखाचाच व्हावा अशी आमची अपेक्षा नाही. तरुण असल्याने अजुन अंगात ताकद आहे तेंव्हा नवनवे किल्ले सर करुच आणि नाहीच जमले तर ढोपर फोडुन घेउ. हाय काय आन न्हाय काय !

रोमना's picture

9 Dec 2010 - 4:19 pm | रोमना

गावठी चाळे म्हणजे म्हणायचे काय तुम्हाला ?

गावाकडील लोकांचा सुध्दा बुध्यांक जास्त असू शकतो एखाद्या शहरी माणसापेक्षा.
तेव्हा कोणाला हिनवणे चांगले नाही.
आजचा एक (सु)विचार नाही वाचला वाटत (मिपा वरचा)

असो पुढिल सद्कार्यासाठी शुभेच्छा.....

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 4:24 pm | नन्दादीप

म्हणजे तुम्हाला उत्कर्श गावठी आहे अस म्हणायचे आहे का????

रोमना's picture

9 Dec 2010 - 4:33 pm | रोमना

म्हणजे तुम्हाला उत्कर्श गावठी आहे अस म्हणायचे आहे का?
अजिबात नाही.

मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, परिकथेतील राजकुमार काका एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना... लेख लिहितात व दुसर्‍या लेखात पत्रे लिहिण्याचे गावठी चाळे आम्ही करत नाही लेख लिहितात.
आता सर्वसामान्यपणे शेतकरी गावातच असतात, आणि त्यांनी मुख्यमंत्त्र्यांना वगैरे पत्रे लिहिण्याचे कर्म केले तर ते गावठी. किती विसंगती हि.
मला वाटते त्यांनी वरवर असे काहीतरी लिहायचे म्हणून लिहिले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Dec 2010 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार

'गावठी चाळे' हा शब्द आवडला नसल्यास 'माकडचाळे' हा शब्द समजावा.

शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

रोमना's picture

9 Dec 2010 - 4:43 pm | रोमना

हे काय काका ? अस का बोलता ?

स्पा's picture

9 Dec 2010 - 4:31 pm | स्पा

लवकरच आम्ही शेतकरी प्रश्नात लक्ष घालणार आहोतच.

कणीस आणि काजूंची निर्यात..............

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 4:36 pm | नन्दादीप

काजूच्या बोन्डापासून "अस्सल स्वदेशी" निघते बर का स्पा भौ....
आता तरी विदेशी सोडून स्वदेशी कडे वळा....पैक पन कमी लागत्याल्..है का न्हाई????

काजूच्या बोन्डापासून "अस्सल स्वदेशी" निघते बर का स्पा भौ....

हो तर......

सो टक्के कि बात कि आपने नंदादीप साब

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 4:52 pm | नन्दादीप

स्वदेशी जिन्दाबाद...म्हणून सान्गतो..देशी वापरा आणि देशाचा विकास करा.

कशाला कोण झक मारायला जीव देइल...ना रहेगा बाज ना बजेगी बासुरी...
मग लोकाना चळवळी पण उभारायला नकोत....

इंटरनेटस्नेही's picture

9 Dec 2010 - 4:45 pm | इंटरनेटस्नेही

लवकरच आम्ही शेतकरी प्रश्नात लक्ष घालणार आहोतच.

कणीस आणि काजूंची निर्यात..............

काजुची ;) उसळ मस्त लागते.. यम्मी!

बाकी मुळ लेखाबद्दल, मिसळची चव ही आईन्स्टाईन सांगुन गेल्या प्रमाणे सापेक्ष असते.. तेव्हा आपण जमेल तसे सर्व ठिकाणांची मिसळ चाखुनच नंतर त्यावर भाष्य करणे उचित ठरेल. श्री कृष्ण वडेवाले यांचा 'रेट' जरी जास्त असला तरी त्यांच्या वड्यांची सर मुंबईत तरी कोणाला नाही. जोशी वडेवाले देखील उत्तम. परवाच शिवाजी पार्क / शिवसेना भवन येथील वडापाव खाल्ला, चव लै भारी होती.

-
ॠषिकेशकुमार इंट्या, मुंबई प्रदेश अध्यक्ष, मिसळपाव दुर्लक्षित पँथर.

काजुची उसळ मस्त लागते.. यम्मी!

तशी कोलंबी सुद्धा चविष्ट लागते ;)

धमाल मुलगा's picture

9 Dec 2010 - 5:58 pm | धमाल मुलगा

आवरा!
आता चिंबोर्‍यांपर्यंत जाऊ नका.

त्या रोमना ह्यांना मिसळ-वडे-भजी हवीये. :D

सा रे ग म प... पुढचं तुम्ही गा !

मा. रोमनाजी,
केवळ आपल्या माहितीकरीता -

श्री पराकुमार हे एक शेतकरी असुन आजकाल फार्मविलेमध्ये शेती करतात!

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 4:03 pm | नन्दादीप

पत्र लिहून काही होत का?????

आपल्याकडे आता रॉबिनहूड नायतर शिवा, तूफान, करण्-अर्जुन व्हायला हवे......

अवलिया's picture

9 Dec 2010 - 4:04 pm | अवलिया

मिसळ चढली का काय ?

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 4:18 pm | नन्दादीप

आता उतारा सान्गा लवकर....

काही होत नाही.. गप गुमान पडून रहावा..

देवाक काळजी ... !

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:13 pm | पर्नल नेने मराठे

रोमना आइक... JSS RD वरुन मेट्रो कडे जाताना गायवाडिच्या आधी म्हण़जे केतकर मोतिवालेच्या जरासे पुढे डाव्या हातालाच गल्लीत एक वडेवाला आहे . छान वडा मिळतो ग ;;) .. ताब्मे हल्लिचे मालक सरपोतदार फारच महाग ग :(
प्रार्थना समाजचे ... माझ लग्न झाले त्या हॉलच्या पुढचे कोणते ते होटल नाव विसरले मी..मस्त पावभाजी ग ;)

ताब्मे हल्लिचे मालक सरपोतदार फारच महाग ग

मालक महाग असो की स्वस्त आपल्या वडे खाण्याशी मतलब
प्रार्थना समाजचे ... माझ लग्न झाले त्या हॉलच्या पुढचे कोणते ते होटल नाव विसरले मी..मस्त पावभाजी ग

लग्नात हाटेलात पौभाजी खायला घातलीस की काय लोकान्ना?

रोमना's picture

9 Dec 2010 - 5:38 pm | रोमना

तुम्ही लेखात
फारच महाग ग
पावभाजी ग
असा उल्लेख केलात
जर माझ्या बद्दल असेल तर लक्षात घ्या कि मी पुरुष आहे.
अभिप्रायासाठी धन्यवाद
तुम्ही पावभाजी खाल्ली ते हॉटेल बहूदा नित्यानंद असावे. आजही फार सुरेख पावभाजी मिळते तेथे असे म्हणतात. मी एकदा नव्हे दोनदा गेलो होतो तेथे पण मित्रांच्या पार्टिला. त्यांना वेगळा फटका नको म्हणून पंजाबी हाणल. मस्त असत.
आणि तुम्ही उल्लेख केलेला वडापावचे दुकान जर परशुराम वाडीत (कांदेवाडी पुलिसचौकी समोर असेल) तर माहीती साठी सांगतो. त्याचे मालक वारले. फारच चांगले गृहस्थ होते.
एका अमराठी (भैया) माणसाने गर्दिमुळे त्रास होतो अशी तक्रार केल्याने धंदा बंद करायला लावला. त्यानंतर फारच मानसीक त्रास दिला त्यांना.
असो.
पुढच्या वेळि अरे तुरे करा पण अग बिग नको

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:44 pm | पर्नल नेने मराठे

रोमन नाव हवे मग तुमचे ...
असो
परशुराम वाडीत ..हो हो..वारले का..अगो बै..
ते हॉटेल बहूदा नित्यानंद असावे...हो हो तेच ते होटल .... मी अनेकदा जात असे मग वेटर न विचारताच पाव भाजी समोर आणुन ठेवत असे :ओ
लग्नाचा हॉल नाहि ओळ्खलात पण :ओ

रोमना's picture

9 Dec 2010 - 5:47 pm | रोमना

ब्राम्हणसभा ?

पर्नल नेने मराठे's picture

9 Dec 2010 - 5:51 pm | पर्नल नेने मराठे

होय ..आता कसं..

प्रदीप's picture

9 Dec 2010 - 5:50 pm | प्रदीप

खोताच्या वाडीतले 'अनंताश्रम' अजून आहे का?

नंदन's picture

9 Dec 2010 - 6:01 pm | नंदन

खरं तर, हाच नेमका प्रश्न :)
खडपे बंधूंचं ना? बहुतेक बंद झालं ते.

मेघवेडा's picture

9 Dec 2010 - 7:12 pm | मेघवेडा

चालू आहे कदाचित रे. आता नवा लूक दिलाय त्याला.

मृत्युन्जय's picture

9 Dec 2010 - 6:49 pm | मृत्युन्जय

धाग्यावर लोकांनी फक्त वडा आणि मिसळ कुठे चांगला मिळेल ते दिले आहे. भजीबद्दल कोणि बोलेना.

तर भजी म्हणजे कांदा भजी आख्ख्या जगात केवळ आमच्या सिंहगडावर चांगली मिळते. केवळ ती खाण्यासाठी म्हणुन आम्ही कित्येक्वेळा गडावर गेलो आहोत.

मुंबईत (बृहन्मुंबईत नव्हे) थोडे तरी मराठी लोक अजून टिकून आहेत हे बघून सुखद धक्का बसला. माझे काका गिरगावात राहायचे (अजून जागा सोडली नसली तरी आता ठाण्याला शिफ्ट झालेत). तेव्हा त्यांच्या चाळीत शेजारी पाजारी सगळे मराठीच होते. काही एक दोन गुजराथी, मारवाडी. एक दोन वर्षांपूर्वी तिथे गेलो तर काकांचं घर सोडलं तर एकही मराठी घर दिसेना! :(
असो, मूळ धागा मिसळ व वड्यांचा आहे त्यामुळे हा विषय नकोच. पण मुंबईतल्या जुन्या हॉटेलांची व स्थळांची नावं वाचून जरा नॉस्टॅल्जिक झालो.

नन्दादीप's picture

9 Dec 2010 - 7:08 pm | नन्दादीप

"नॉस्टॅल्जिक " म्हन्जे काय ले भाउ?????

म्ह्यायती नाय ले. मोठठे लोक बोल्तात मनून मी पन बोल्लो.

णॉस्टॅल्जिक म्हणजे डोळे पाणावणे . मराठी अंतरजालावर सर्वप्रथम तात्या णॉस्टॅल्जिक झाले होते. नंतर कोदा. (कोदा कोण ? असे प्रश्न विचारण्या ऐवजी "खोदा म्हणजे कळेल कोण कोदा" )

-टा.रा. अंबाणी
(माहितिगार, रिलायंस अंतरजालिय विदागॄह)

आपण तर कधी कधी वडे खायला तडक वडखळ नाक्याला जातो ब्वॉ.. लै भारी!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Dec 2010 - 8:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वडखळला डायरेक यश्टीनंच येता का काय?

तर वो! "परवाशांच्या शेवेसाठी" असं ब्रीदवाक्यच आहे ना यष्टीचं! :D

पुण्याला असताना दगडुशेठ हलवाई मन्दिरासमोर "जोशी वडेवाले"...येथे वडापाव खायचो....

अपूर्व कात्रे's picture

10 Dec 2010 - 11:39 am | अपूर्व कात्रे

गिरगावात राहता तर माधवाश्रमात खाऊन बघा एकदा (वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ५). मिसळ पाव, वडा-उसळ पाव एकदम चविष्ट. पुचाट बेचव पण नाही आणि झणझणीत तिखट पण नाही. त्याच्याच जवळ "स्पेशल टी हाउस" नामक उपहारगृह आहे. मिसळ तिथेही चांगली मिळते. मात्र बऱ्यापैकी मसालेदार (तिखट नव्हे) असते. वडापावसाठी बोरकरचा वडापाव (मुगभाट) try करून बघा. (वेळ संध्याकाळी ४ ते ९). मिरचीच्याऐवजी तिखटपणासाठी काळी मिरी वापरतात इथे. एकदम वेगळी चव.
दादरला गेलात तर कीर्ती कॉलेजजवळ अशोकचा वडापाव famous आहे. दत्तात्रेय हाटीलातही बरी मिसळ मिळायची. भज्यांची काही कल्पना नाही बुआ....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 8:55 pm | निनाद मुक्काम प...

@कीर्ती कॉलेजजवळ अशोकचा वडापाव
मी लिहील होत त्या बद्दल (तो कीर्तीचा वडापाव म्हणून फेमस आहे दोन वडापाव/ मिरची पार्सल घ्यायची .दोन बियर (काळ्या पिशवीत ) व सरळ अशोकाच्या इथून चौपाटी वरील कट्यावर बसायचे
तिथून मग शिवाजी पार्कात कट्यावर जाऊन चकाट्या पिटायच्या .मिलिंद सोमण धावायला आला असेल तर बालपाणीचे सवंगडी असल्यासारखे हाय करायचे .हळूच कणेकर काकांच्या ग्रुप मध्ये (वयाचे बंधन नाही .)
शिरकाव करायचा .मनसोक्त हसून झाल्यावर .मग जिप्सीत जेवायचे .तेही खेकडा खायला संगतीला अतुल परचुरे नाहीतर मोहन काका असायचे (म्हणजे बाजूच्या टेबलावर आपल्या मिन्त्रांसोबत )

चिंतामणी's picture

10 Dec 2010 - 11:55 am | चिंतामणी

हा धागा वाचला नाही का?

http://www.misalpav.com/node/683

नसेल तर आत्ताच वाच. खूप माहिती मिळेल.

विषेशत:

http://www.misalpav.com/node/683#comment-254346

चिंतामणी's picture

11 Dec 2010 - 11:13 am | चिंतामणी

मिपा वर मिसळीबद्दलचा धागा हिट होणारच.

पुस्तक अथवा फाईल (कॉम्प्युटरवर) बनवा.

पोटपुजेची ठिकाणे

चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?

या दोन धाग्यावरची माहिती वाचुन आता कुठे जायचे कळेनासे झाले आहे.

शहर, पत्ता, खाण्याचे पदार्थ अश्या क्रमाने मार्गदर्शक पुस्तक (त्याला मराठीत "गाईड" म्हणतात) बनवले तर खूप उपयोग होईल.

(कॉम्प्युटरवर कोण काम करून देउ शकेल हे सगळ्यांना माहीत आहेच. ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 8:56 pm | निनाद मुक्काम प...

पुस्तकाचे नाव अर्थातच मिसळपाव