मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपण सारे शिर्डीला जावूया

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आपण सारे शिर्डीला जावूया या संसारातूनी....या या संसारातूनी थोडा वेळ काढूया....हो हो थोडातरी वेळ काढूया... चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||धृ|| शिर्डीला लागले साईबाबांचे पाय हो.... साईनाथांचे पाय हो शिर्डीवाचूनी मग दुसरा स्वर्ग असेल काय हो? एकदातरी... एकदातरी आपण तो स्वर्ग पाहूया चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||१|| साईबाबांनी कितीतरी चमत्कार हो केले.... हो हो चमत्कार हो केले गोरगरीबांचे कष्ट पळवून नेले बाबांच्या दर्शनाने... बाबांच्या दर्शनाने आपले दु:ख दुर करूया चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||२|| बाबांच्या धुनीतला जाळ आजही जळतो हो हो आजही जळतो पारावरचा लिंब आजही बहरतो साईबाबांची अनुभूती... साईबाबांची अनुभूती आपणही घेवूया चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०

वाचन 2210 प्रतिक्रिया 0