तर्पणाची छाया

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
28 May 2010 - 2:44 pm

तर्पणाची छाया

दि. ४ मार्च २०१०
"प्रथम पत्नीला स्मरून रामेश्वरच्याकिनाऱ्यावर तर्पण कर" अशी आज्ञा नाडी महर्षींनी केली त्याप्रमाणे मी ३४ वर्षानंतर सौ.छायाला तर्पण करायला मी रामेश्वरमच्या तटावरील समुद्रात सुर्याकडे हात जोडून उभा होतो. तेंव्हा एक वाक्य. क्षणात तरळून गेले.
"छाया मी तुझ्या मृत्यूला नकळत का होईना जबाबदार आहे. त्यासाठी तू मला माफ कर. मला माझ्या जबाबदारीच्या त्या बोचणीतून सोडव." डोळ्यातून अश्रु टपकले. छायाचा चेहरा डोळ्यासमोरून हटत नव्हता.
पाण्याच्या लाटा अंगावर येत होत्या. तर्पणाची कामगिरी झाली. सर्व अन्य मृतात्म्यांनाही त्या निमित्ताने तर्पण केले गेले. नंतर पुन्हा समुद्रातून मिळालेल्या मातीच्या पिंडाला, फुलांना, तिळांना परत समुद्रात विसर्जन करायला पुन्हा पाण्यात गेलो. तोवर मन शांत झाले. होते. छायाचा चेहरा आठवुनही मनात येईना.
पुढे "रामेश्वराच्या मंदिराच्या आवारातील २२ विहिरींच्या पाण्याने स्नान करावे" असा आदेश होता त्याप्रमाणे स्नान झाले. मुख्य मंदिरातील शिवाला दर्शन घ्यायला सुकलेले कपडे चढवून मंदिराच्या गाभाऱ्यात निघालो. मी, माझ्या सोबतचा प्रवासात भेटलेला मित्र व स्नानासाठी केलेला गाईड एका मागे एक चाललो असता, विलक्षण प्रकार घडला.
गरुडध्वजाच्या पितळेच्या खांबापाशी जायच्या वाटेत एक कावळा अचानक मला दिसला. जणु तो माझी वाटच पहात होता तिथे. मी चमकून मित्राला व गाईडला थांबवत म्हटले, "ये कौवा यहां क्या कर कहा है? मित्राने व गाईडने पाहून म्हटले, "कौआ मंदिर में इतने अंदर यहा आ नही सकता। इतने सालों में मैं पहली बार देख रहा हूँ। पता नही कहां से आ टपका है।"
वर्दळीच्या वाटेवर, मंदिराच्या गाभाऱ्यातील आतील भागात कोणताच पक्षी सहजासहजी येणे शक्य नव्हते. त्यात फक्त एक कावळा उडून आला कुठून? माझ्या मनात त्या दृष्याने घर केले. "नाडी महर्षी यथावकाश याचे रहस्योद्घघाटन करतील". असे मी मनात म्हणत त्या कागाला पहात पहात सलाम केला व पुढे सरकलो. त्याप्रमाणे त्याचा खुलासा नाडी महर्षींनी नंतर एका वाचनात केला तेंव्हा मला थक्क व्हायला झाले.
पुर्वी एकदा एका कुत्र्याच्या पिल्लाला मी बिस्किटाचे तुकडे खाऊ घातले होते. "ते श्वान रुपात शुक महर्षी होते". असे नंतर मला नाडी ग्रंथातून सांगण्यात आले होते!

कथाप्रवासअनुभव

प्रतिक्रिया

आंबोळी's picture

28 May 2010 - 2:56 pm | आंबोळी

कुत्र्याचे पिल्लू, शुक महर्षी आणि कावळ्याचा संबंध कळाला नाही.... जरा विस्ताराने सांगा.
अवांतर :हल्ली आमच्या खिडकीतूनही एक कावळा घरात घुसायला लागलाय....
(त्याला कसे रोखायचे या चिंतेत) आंबोळी

रामपुरी's picture

28 May 2010 - 9:00 pm | रामपुरी

कुत्र्याचे पिल्लू, शुक महर्षी आणि कावळ्याचा संबंध कळाला नाही.
नाहीच कळणार. त्यासाठी नाडी बघावी लागते नाडीवाल्यांच्या *डीत पैसे सारून आणि महर्षींवर गाssssssढ विश्वास असावा लागतो. मग रहस्याचं उद्घाटन (पक्षी: रहस्योद्घघाटन ) करतात महर्षीं.

बाकी "स्नानासाठी केलेला गाईड" म्हणजे नक्की काय हे कळले नाही. बाकी लेख उत्तम. पु ले शु

मिसळभोक्ता's picture

29 May 2010 - 3:21 am | मिसळभोक्ता

"स्नानासाठी केलेला गाईड"

हे वाचून नुकताच ऐकलेला एक विनोद आठवला.

मुलगा: किती मस्त गातेस तू ! तू जाहीर मैफिली करायला हव्यात.

मुलगी: (विनयाने) छे रे, मी तर फक्त बाथरूम सिंगर आहे.

मुलगा: अच्छा ? बोलव कधीतरी, मग मैफिल करू आपण.

ओकसाहेब स्नानासाठी गाईड घेऊन जातात, असे दिसते. असतात कुणाकुणाचे शौक.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चिन्मना's picture

29 May 2010 - 5:12 am | चिन्मना

रामेश्वराचे मंदिर अतिशय भव्य आहे. त्यात वर शशिकांत ओकांनी लिहिल्याप्रमाणे २२ विहिरी आहेत. भाविक या प्रत्येक विहिरीवर एकामागून एक स्नान करतात. मला वाटते त्याचा काहितरी क्रमही ठरला असावा. म्हणून गाईड. गाईड विहिरीतून रहाटाने पाणीदेखील काढून देतो.

मी लहान असताना गेलो होतो तेव्हा अशाप्रकारे २२ वेळा आंघोळ केल्याचे स्मरते.
_______________________________

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 May 2010 - 3:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तर्पण म्हणजे काय? मला सर्पण आणि श्राद्ध ठाऊक आहे.

मी पण एका कुत्र्याच्या पिल्लाला खायला घालायला सुरूवात केली. तर त्या येड्याने नंतर होस्टेलमधल्या इतरांच्या चपला-बुटं चावली. "त्या कुत्र्याला इंजेक्शनं दिली आहेत." असं मला त्याच्या लोकल गार्डीयनने सांगितलं. म्हणून मी त्याला खायला देते आणि नंतर फटके मारून होस्टेलमधून हाकलूनही देते.

अदिती

कुत्री दरवर्षी प्रसवणार। निस्सीम त्यांना इंजेक्शनं देणार।
मी फक्त खायला देणार। होस्टेलमेट्स भडकणार निश्चित॥
॥ इति होस्टेलनिवासी अदित्या: महावाक्यम्॥

मेघवेडा's picture

28 May 2010 - 3:07 pm | मेघवेडा

>> तर्पण म्हणजे काय? मला सर्पण आणि श्राद्ध ठाऊक आहे.
असेच विचारतो आणि म्हणतो.

अवांतरः टार्‍या जसा 'रासपाडवी' विडंबनं करत होता तशा मोहिमेवर आहेस काय गो तू?

म्हणून मी त्याला खायला देते आणि नंतर फटके मारून होस्टेलमधून हाकलूनही देते.

तो कुत्रा कोणी तरी प्राचीन ऋषी मुनी असला तर त्याचा गैरसमज होईल नव्या पिढीबद्दल.
परंतु एक क्षुद्र प्रश्न मनात येतोय कि जर ऋषीमुनीनी आपल्या आयुष्यात फक्त पुण्य कमावले असेल तर ते ह्या जन्मी कुत्री,मांजरे असल्या जन्माला कसे काय आलेत?
देवाच्यात पण काही केमिकल लोच्या तर झाला नाही ना?

वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2010 - 3:51 pm | परिकथेतील राजकुमार

परंतु एक क्षुद्र प्रश्न मनात येतोय कि जर ऋषीमुनीनी आपल्या आयुष्यात फक्त पुण्य कमावले असेल तर ते ह्या जन्मी कुत्री,मांजरे असल्या जन्माला कसे काय आलेत?

लेखात 'जन्माला आले' असे म्हणले नसुन ते 'विशिष्ठ रुपात आले' होते असे म्हणले आहे. देव / ॠषी वगैरेंना तपसमर्थ्यानी वेगवेगळी रुपे घेता येतात म्हणे. तुम्ही कसे आत्ता इथे सदस्य रुपात प्रतिक्रीया द्यायला आलातना अगदी तसे !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

महेश हतोळकर's picture

28 May 2010 - 3:48 pm | महेश हतोळकर

तर्पण हा अंत्यसंस्कारातला एक विधी आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे यालाच तिलांजली असेही म्हणतात.
बाकी चालूदेत.....

रामपुरी's picture

28 May 2010 - 8:58 pm | रामपुरी

मी पण एका कुत्र्याच्या पिल्लाला खायला घालायला सुरूवात केली
बिस्कीटं खायला घालत असाल तर तुम्हाला "देवळात कावळा" दिसणार हे नक्की (संदर्भः नाडीग्रंथ).

बिपिन कार्यकर्ते's picture

28 May 2010 - 3:59 pm | बिपिन कार्यकर्ते

तर्पण, नाडी इत्यादी जाऊ दे. पण ओकांनी त्यांच्या आयुष्यातल्या एका अतिशय भावनावश क्षणाबद्दल लिहिलंय. म्हणून या धाग्यावर दंगा अथवा भरकटणे अथवा नाडी इत्यादीवरून खेचाखेची मला व्यक्तिशः योग्य वाटत नाहीये. असो.

बिपिन कार्यकर्ते

आंबोळी's picture

28 May 2010 - 4:03 pm | आंबोळी

तर्पण, नाडी इत्यादी जाऊ दे. पण ओकांनी त्यांच्या आयुष्यातल्या एका अतिशय भावनावश क्षणाबद्दल लिहिलंय. म्हणून या धाग्यावर दंगा अथवा भरकटणे अथवा नाडी इत्यादीवरून खेचाखेची मला व्यक्तिशः योग्य वाटत नाहीये.

सहमत...

त्यामुळेच बहुतेक बहुतांश मेंबरांनी आपापल्या भावना आवरून धरलेल्या आहेत असे वाटते.

आंबोळी

पांथस्थ's picture

28 May 2010 - 4:17 pm | पांथस्थ

सहमत आहे. त्यांनी विश्वासाने मिपावर त्यांच्या भावना मांडल्या आहेत. त्यात अंधश्रद्धेचा समावेश असला तरीही त्या त्यांच्या मनातल्या एका हळव्या कोपर्‍यातल्या आणि वैयक्तीक स्वरुपाच्या आठवणी वाटतात. असो.

जाता जाता: दंगा घालण्यासाठी ओकसाहेबांनी वेगळ्या धाग्यांची सोय करुन ठेवली आहे आणि पुढेही करत राहतीलच अशी आशा!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

महेश हतोळकर's picture

28 May 2010 - 4:21 pm | महेश हतोळकर

कोणत्याही प्रकाराने का असेना खांद्यावरचे माकड पळाले हे महत्वाचे.

आनंदयात्री's picture

28 May 2010 - 9:11 pm | आनंदयात्री

बिकाशी सहमत आहे.
ओक साहेबांच्या भावनांचा आदर आहे.

स्पंदना's picture

28 May 2010 - 4:15 pm | स्पंदना

"छाया मी तुझ्या मृत्यूला नकळत का होईना जबाबदार आहे. त्यासाठी तू मला माफ कर. मला माझ्या जबाबदारीच्या त्या बोचणीतून सोडव." :SS :O :SS

असे पुर्वी 'चांदोबा" त लिहायचे तसे का लिहिलय?

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

मितभाषी's picture

29 May 2010 - 4:19 pm | मितभाषी

संपादक - शब्द सांभाळून वापरा. चिखलफेक चालणार नाही. लोकांच्या भावनांचा आदर करा.

मितभाषी's picture

29 May 2010 - 4:20 pm | मितभाषी

संपादक - शब्द सांभाळून वापरा. चिखलफेक चालणार नाही. लोकांच्या भावनांचा आदर करा.

>>>>>

फार सौम्य भाषेत लिहीत होतो मी.
लोकांच्या भावनांचा आदर करण्यास सदर महाशयांनाही तंबी दिली तर बरे होईल. मिपा म्हणजे बाबा-माहाराजांचा अड्डा बनवला आहे का?

फालतु/थोतांड कि ज्याला काहीही आधार नाही अशा कपोलकल्पित कथा कशा चालुन घेता तुम्ही.
अंन्धश्रध्दा पसरवणार्‍या ह्या भाकडकथा वाचुन अनेक सुज्ञ मिपाकरांनी नाराजी व्यक्त केली होती. तेंव्हा तुम्ही का जनमताचा आदर केला नाही.

नाडीविरोधी भावश्या.

प्रकाश घाटपांडे's picture

29 May 2010 - 8:08 am | प्रकाश घाटपांडे

ओक साहेब आपण प्रथम पत्नीचे केलेले स्मरण व वाहिलेली श्रद्धांजली भावपुर्ण आहे त्याचे मूल्यमापन होउ शकत नाही. भले निमित्त नाडीचे असो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

टारझन's picture

29 May 2010 - 8:24 am | टारझन

ओक साहेब , काहीही म्हणा ... तुमचा णाडीवर दृढ विष्वास आहे आणि त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते नं , तिथेच प्रश्न संपला ... आमच्या सारखी लोकं कितीही केकलली तरी कै फरक पडत नाय ,(अर्थात "मी" केकलतो ते त्या नाडीच्या जाहिराती पै) ... पण तुम्ही ते तर्पण का काय ते ... जे कोणी तरी सांगुन तुम्ही केलंय , असं तुम्ही सांगता , तुमचं मन शांत झालं , आम्ही देखील भरुन पावलो.

- टारझन
"ये टार्‍या यहां क्या कर कहा है? बिकाने व सर्किटने पाहून म्हटले, "टार्‍या षिरियस धागे में इतनी षिंपल कमेंट डाल नही सकता। इतने सालों में मैं पहली बार देख रहा हूँ। पता नही कहां से आ टपका है।"

मृगनयनी's picture

29 May 2010 - 4:25 pm | मृगनयनी

पुर्वी एकदा एका कुत्र्याच्या पिल्लाला मी बिस्किटाचे तुकडे खाऊ घातले होते. "ते श्वान रुपात शुक महर्षी होते". असे नंतर मला नाडी ग्रंथातून सांगण्यात आले होते!

शशिकान्त'जी... तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात!...
साक्षात शुकमहर्षिंना घास भरविण्याचे भाग्य तुम्हाला लाभले..... :)

______________

छाया'जींबद्दल समजल्यामुळे आज मिपाकर बर्‍यापैकी "सोबर" प्रतिक्रिया देताहेत... हे पाहून अंमळ बरे वाटले!

:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मितभाषी's picture

29 May 2010 - 4:44 pm | मितभाषी

कुत्री दरवर्षी प्रसवणार। निस्सीम त्यांना इंजेक्शनं देणार।
मी फक्त खायला देणार। होस्टेलमेट्स भडकणार निश्चित॥
॥ इति होस्टेलनिवासी अदित्या: महावाक्यम्॥

»

>>>>>>>

=)) =)) =)) =))

:H :H :H :H :H

=D> =D> =D> =D> =D>

संजा's picture

29 May 2010 - 6:36 pm | संजा

ओक साहेब आपण एक प्रकारे इथे लेख लिहुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
खुप छान प्रकटन.

शंका.
१.
'प्रथम पत्नीला स्मरून रामेश्वरच्याकिनाऱ्यावर तर्पण कर'
'प्रथम' चा अर्थ काय घ्यायचा
अ) पहिली पत्नी
ब) सर्वात आधी
३.
कावळ्याच्या रुपात कोण आले होते ?

(शंका नं २ व्यक्तिगत असल्याकारणाने व्यनी केली आहे)

संजा
'कंटाळा आलेला असताना सुध्दा माझ्या मित्राने मला खुपच रिझवले.'