मृगजळ

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
17 May 2010 - 2:11 pm

लवचिक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास,
जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास.
भासामागे धावत जाता, मनात हीरवळ पायी आग,
बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग!

अशी बंधने हलके धागे, वार्‍यावरती फिरती विरती,
कधी हव्याश्या कधी नकोशा, गाठी त्याला आपसुक पडती,
नसता गुंता - ओढातान, अडकत जाते आपली मान,
तुला दुखावे मला दुखावे, असे मोकळे अंतर छान!

अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार,
अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार,
तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस,
कुरवाळु हे मृगजळ र्‍हदयी, सत्याहुनही सुखद भासं...

मुक्तक

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

17 May 2010 - 8:26 pm | स्पंदना

लवचिक अंतर जरी निरंतर,हळवे आपुले नाते ख़ास,
जवळ येईना दूर जाईना, तरी सुखावे खोटा भास.
भासामागे धावत जाता, मनात हीरवळ पायी आग,
बेधुंदित ना दाह जाणवे, स्वप्नी राहो नकोच जाग!

8> ;;)

सुन्दर!!

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

sur_nair's picture

17 May 2010 - 11:18 pm | sur_nair

वा. अतिशय सुरेख. म्हणजे या सदरातील उठून दिसावी अशी हि कविता . यावरून मला विक्रम सेठ यांची एक कविता आठवली.

Unclaimed

To make love with a stranger is the best.
There is no riddle and there is no test. --

To lie and love, not aching to make sense
Of this night in the mesh of reference.

To touch, unclaimed by fear of imminent day,
And understand, as only strangers may.

To feel the beat of foreign heart to heart
Preferring neither to prolong nor part.

To rest within the unknown arms and know
That this is all there is; that this is so.

शुचि's picture

18 May 2010 - 1:13 am | शुचि

कविता फरच आवडली.
"कधी हव्याश्या कधी नकोशा, गाठी त्याला आपसुक पडती," :<

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

राजेश घासकडवी's picture

18 May 2010 - 1:40 am | राजेश घासकडवी

कविता खूपच सुंदर झालेली आहे. संस्थळांवर इतक्या उच्च दर्जाची कविता फारच विरळा.

बेसनलाडू's picture

18 May 2010 - 1:41 am | बेसनलाडू

नादमधुर कविता आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

क्रान्ति's picture

18 May 2010 - 9:26 am | क्रान्ति

खूप खूप आवडली. राजेश यांच्या प्रतिसादाशी अगदी १००% सहमत!
विक्रम सेठ यांच्या कवितेसाठी धन्यवाद नायर.
:)

क्रान्ति
अग्निसखा

शैलेन्द्र's picture

21 May 2010 - 12:04 am | शैलेन्द्र

आपणां सर्वांचे खुप खुप धन्यवाद.

प्राजु's picture

18 May 2010 - 10:19 pm | प्राजु

अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार,
अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार,
तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस,
कुरवाळु हे मृगजळ र्‍हदयी, सत्याहुनही सुखद भासं...

क्लास!!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शैलेन्द्र's picture

19 May 2010 - 10:02 am | शैलेन्द्र

एका कवियत्रीची दाद मिळाल्याने आणंद झाला.. धन्यवाद..

टारझन's picture

19 May 2010 - 11:56 am | टारझन

अच्छा ... म्हणजे बाकी प्रतिक्रीयांमुळे (इण्क्लुडिंग गुर्जी) आणंद नाय झाला ? =)) बाकिच्या पब्लिक चा शुद्ध अपमाण आहे हा ;)

शैलेन्द्र's picture

19 May 2010 - 1:49 pm | शैलेन्द्र

छ्या.. टार्‍या.. पुढच्या प्रतिसादात पुस्तक प्रकाशकाचा पत्ता विचारणार होतो... जरा गप्प बसत ज रे...

मीली's picture

18 May 2010 - 10:38 pm | मीली

सुरेख कविता !
संदीप खरे यांच्या कवितेची आठवण झाली .
"कितीक हळवे कितीक सुंदर
किती शहाणे आपुले अंतर !"

मीली

मदनबाण's picture

18 May 2010 - 11:19 pm | मदनबाण

सुंदर कविता...

मदनबाण.....

“control oil and you control nations; control food and you control the people”.
Henry Kissinger

राघव's picture

18 May 2010 - 11:46 pm | राघव

छान कविता. आवडेश!

"..तुला दुखावे मला दुखावे, असे मोकळे अंतर छान!" .. स्स्स्स्स!

राघव

फटू's picture

19 May 2010 - 12:02 pm | फटू

छान आहे कविता.

ह्म्म्म... शब्दांवाचून कळले सारे हे सांगण्यासाठीसुद्धा शब्दांचाच आधार घ्यावा लागतो .

- फटू

शैलेन्द्र's picture

19 May 2010 - 1:51 pm | शैलेन्द्र

मीली, मदनबाण, फटु, राघव... सर्वांचे आभार.