स्वप्नी निवडू धुडूम्म गाज
डुडुळगावचा गोलंदाज
तोराबोरा ओमरसामा
काय ललाटी ओ ओ मामा
गोलाबारी सुसूत्र ताडन
रुजुवातीला करूण धावन
शोषण भीषण पोषण वेसण
धवल गिटारी कडकड मंथन
तित्तिरबाला ग्रंथीलाला
ग्रसनी जिव्हा कुरूप भोला
यमनाला घालू तेलघडा
हाका बिचारी मुकी चिडा
प्रतिक्रिया
16 May 2010 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिर्षकावरुन क्रिकेटच्या गोलंदाजावर काही तरी आहे असे वाटले.
पुढे मात्र चेंडु डोक्यावरुन गेला.
आपल्या लौकिकाला साजेशी कविता.
अजून येऊ दे. :)
-दिलीप बिरुटे
[निशब्द]
16 May 2010 - 10:12 pm | शरदिनी
गोलाबारी, धुडुम्म आणि गोलंदाज या तीन शब्दांवरून मला तोफ चालवणार्याविषयी म्हणायचे आहे असे मला वाटते...
16 May 2010 - 10:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या कवितांचे 'रहस्य' समजून घेणे सोपे नाही. कोणी तरी म्हटले आहे, कवींच्या दोन जाती असतात : एक कवी आत्माविष्कार करीत असतो तर दुसरा विश्वाविष्कार करीत असतो. आत्माविष्कार करणार्या कवीची दृष्टी अंतर्मुख असते; आपल्या व्यक्तित्वाचा तो शोध घेत असतो तर विश्वाविष्कार करणार्या कवींची दृष्टी बहिर्मुख असते; तो बाह्य विश्वाचा शोध घेत असतो.
आपण कवीच्या कोणत्या प्रकारात बसता आणि कोणत्या आविष्काराचा वेध घेत आहात हे समजून घ्यायला वेळ लागेल असे वाटते.
मदतीबद्दल आभारी :)
अवांतर :
-दिलीप बिरुटे
18 May 2010 - 6:27 am | मुक्तसुनीत
काहो , डुडूळगावच्या शरदिनी ..चुकलो कमलिनी चा इथे काही संबंध ?
शरदिनीबाई, जीए कुलकर्णी धारवाडच्या परिसरातले लिहायचे , माडगूळकर माणदेशाबद्दल.......तशा तुम्ही डुडुळगावबद्दल लिहिताय ! ;-) खरे ना ?
16 May 2010 - 10:01 pm | ऋषिकेश
शरदिनी तैंचा विजय असो
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
17 May 2010 - 9:24 am | मदनबाण
विजय असो... ;)
मदनबाण.....
"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner
16 May 2010 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते
यावेळी अंमळ पिचपिचित माल... नेहमी सारखा कडक माल नाही. असो.
बिपिन कार्यकर्ते
16 May 2010 - 10:49 pm | टारझन
आंब्यांचा सिझन संपत आलाय .. आता काय कडक माल भेटेलंच असं नाही ... घ्या पिचपिचीत माल चालवुन ;)
-(आंबा प्रेमी) कडकराव
16 May 2010 - 10:31 pm | ब्रिटिश टिंग्या
डुडुळगावच्या गोलंदाजांचे उसळते चेंडु सोडुन देण्यात आम्ही धन्यता मानतो! :)
- टिंगेश रैना
16 May 2010 - 11:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता मला समजली ती अशी:
सध्याच्या वीसविसाटाच्या* (T-20) जमान्यात जिथे जवळजवळ हरेक चेंडूलाच धावांची बरसात होत असते त्यावरून कवयित्रीला काही स्वप्न पडले असावे. टी-२०त गोलंदाज मार खातात, किंबहूना तशीच त्या खेळाची रचना आहे...
... पण या षटकात, आपलं, कडव्यात शरदिनीतै ओव्हर द विकेट येतात, आपलं, मोहोरा बदलतात. तोराबोरा या अफगाण-पाकिस्तान सीमेवरच्या गावात झालेल्या लढाईचा संदर्भ देतात. ओसामा बिन लादेन याच गावात लपला होता अशीही तेव्हा शंका होती, अमेरिकन सैन्याशी लढताना 'ओसामा मर' या परवलीच्या शब्दातून ओमर हा दहशतवादी आणि ओसामा हे अमेरिकन सैन्याला मामा बनवून दोघेजण निसटतात या ठिकाणी षटक संपवतात.
या कडव्याचं/षटकाचं फारसं वर्णन करण्याची गरज नसावी. शरदिनीं मॅडमनी वर्णन केल्याप्रमाणे हे सर्व गोलंदाजीचं** वर्णन आहे.
या कडव्याचे पहिले दोन उसळते चेंडू मी सोडून दिले आहेत. अलिकडे गमन हा शब्द आता यमनापेक्षा जास्त ओळखीचा असल्यामुळे त्याबद्दल घडाभर तेल घालूनच शरदिनी यमनाची माहिती सांगत आहेत. अर्थात यमनाबद्दल बोलण्यात शरदिनी दुसरा क्रमांक नक्कीच मिळवतील. "हाका बिचारी" हा मात्र श्लेष आहे. रझाक खान 'भागमभाग' या चित्रपटात "हाका" या नावाने गुंडरूपात समोर येतो आणि इतर काही चित्रपटांमधे (उदा: हंगामा) तो वेटरचं बापुडवाणं काम करतो त्यामुळे हाका बिचारी हा अतिशय उच्च श्लेष आहे. तर या हाकाच्या कामावर कोणीही मूकपणे चिडा असं शरदिनी सुचवतात.
कठीण शब्दांचे अर्थः
* गुडगुडाट आणि फुडफुडाटाच्या चालीवर!
** गोलंदाज म्हणजे तोफा चालवणारे
पुरवणी अर्थः डुडुळगाव हे गावाचं काल्पनिक नाव गुगलवरून किंवा गुग्गुळवरून आलं असावं...
गुग्गुळ या शब्दावरून आलं असेल तर, शरदिनीताई, तुमची तब्येत चांगली आहे ना?
अदिती
17 May 2010 - 1:45 pm | मस्त कलंदर
वा:.. अदिती एकदम क ड क!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
17 May 2010 - 4:49 pm | सुबक ठेंगणी
डुडुळगावचा गोलंदाज और ये लगा सिक्सर!
सही अदिती!
17 May 2010 - 5:05 pm | गणपा
शरदिनी = अदिती :?
(ईतकी अंदरकी बात (कवितेच्या अर्थासंदर्भात बोलतोय) खुद्द कवयत्री खेरीज कोण जाणु शकेल ? )
17 May 2010 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे गरीबांच्या संजीव कपूर, स्वतःच्याच गोलंदाजीवर फलंदाजी करणारा अजून जन्मलेला नाही आहे रे!
(बोलंदाज) अदिती
17 May 2010 - 5:08 pm | Nile
-१.
-Nile
17 May 2010 - 5:17 pm | टुकुल
-१.१
कवितेला प्रतिसाद देण्याची औकात नाही त्यामुळे प्रतिसादाला प्रतिसाद ;-)
--टुकुल
18 May 2010 - 10:25 am | विजुभाऊ
अरे गरीबांच्या संजीव कपूर,
मेलं तेज्यायला...... कुठून बोललास रे गणपाभौ.
स्वतःच्याच गोलंदाजीवर फलंदाजी करणारा अजून जन्मलेला नाही आहे रे!
अरेच्चा.... अजून क्रिकेट मध्ये डुप्लिकेट आयडी ही कॉन्सेप्ट यायचेय्य होय?
18 May 2010 - 8:22 am | पंगा
'यमन' बोले तो 'येमेन' असू शकेल काय? (USS Cole वगैरह?) नाही, 'तेलघडा' बोले तो 'आइल बैरल'चा ज़िक्र केला आहे म्हणून वाटले... ;)
(च्या**, या कवितेतले काहीतरी कळल्यासारखे वाटले, लगता है दिमाग़ सटक गया है हमारा! =)))
(वैसे, 'यमनाला तेलघडा घालणे' हे 'sending coals to Newcastle'सारखे वाटत नाही काय? ;))
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचंही म्हणणं बरोबर असावं, पंपं (पंगापंत)!
ते काय आहे, कवितेमधेही रेषेवरची आणि खालची अक्षरं असतात ना!
अदिती
17 May 2010 - 12:07 am | राजेश घासकडवी
साधारण अर्थ असा वाटतो - सकृत्दर्शनी तरी तोफगोळे हे शाब्दिक वाटतात. असा प्रचंड आवाज करणारे, तोंडाने वायफळ वाफ दवडणारे, ससूत्र वाक्ताडन करणारे, शोषण, पोषण वगैरे भीषण शब्द वापरणारे, शुभ्र चारित्र्याबाबत कडकड मंथन करणारे तथाकथित नेते - जनतेला मनाला भावतात. त्यांना निवडून देण्याची स्वप्न पडतात. अशा नेत्यांच्या हाती मुकी बिचारी कुणी हाका अशी जनता आहे म्हणून आपल्यालाच चीड येते. चीड येण्यापलिकडे हाती तरी काय असतं?
अधिक विशिष्ट अर्थ काढायचा झाला तर मिपावरच्या गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांशी नातं जोडता येतं असं वाटतं. विशेषत शेवटच्या कडव्यातले उल्लेख (तित्तिरबाला, ग्रसनी जिव्हा, यमन) जुळतात. तसं असेल तर वरच्या कडव्यांच्या अर्थामध्ये किंचित फेरफार (ओसामा, सुसूत्र ताडन) करावा लागतो. (अधिक विचार करताना मला हाच अर्थ आवडायला लागला आहे)
डु़डुळगावचा संदर्भ लागला नाही. अदितीने म्हटल्याप्रमाणे ते गूगल वरून आलं असू शकेल, किंवा डूडल वरून आलं असेल - संस्थळांशी निगडित वाटतं.
17 May 2010 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll
अधिक विशिष्ट अर्थ काढायचा झाला तर मिपावरच्या गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांशी नातं जोडता येतं असं वाटतं.
मलाही तेच वाटलं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
17 May 2010 - 6:35 pm | टुकुल
माझी थोडी भर.
डु़डुळगाव = मिसळपाव
गोलंदाज = तात्या.
हि कविता तात्यांना अर्पण केलेली आहे.
--टुकुल
17 May 2010 - 5:50 am | शुचि
कोणीतरी वेसण घालून पोषण केलं आणि नंतर भीषण शोषण केलं.
रुजुवात शब्द आलाय.
"काय ललाटी ओ ओ मामा" -----> अनिश्चितता दर्शवतो.
ठीक वाटली.
17 May 2010 - 6:05 am | sur_nair
उगाच लावायचा म्हणून जो तो हवा तो संदर्भ लावतो त्याला कविता म्हणायची कि इंग्रजीत असतात तसं 'nonsense verse ' म्हणायचं? शब्दांची मांडणी अतिशय गेय आहे हे मान्य असले तरी बाकी अर्थाने मला निरर्थक वाटली.
17 May 2010 - 7:21 am | स्पंदना
साष्टान्ग नमस्कार!!!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
17 May 2010 - 8:15 am | अक्षय पुर्णपात्रे
त्यांनाच (ओबामा-ओसामा) माहिती. सुरुवातीला यो यो मा वाचले.
हे जॅक व्हाइट या गिटारप्लेयरशी संबंधित आहे का?
अवांतर: वाचकांना उत्तरे देण्याच्या प्रयत्नाचे स्वागत.
17 May 2010 - 9:34 am | आनंदयात्री
गिटार वाजवणे हे एका विविक्षित सदस्याची आवड आहे. गिटारीच्या संदर्भावरुन कडकड करणारा सदस्य निर्देशिला आहे. (अर्थात असे वाटते ;) )
17 May 2010 - 11:33 am | विजुभाऊ
गिटार वाजवताना कधी कधी स्ट्रायकर चा फडफड आवाज येतो
तारा तुटताना तटतट असा आवाज येतो
कदाचित गिटार वाजवताना गायकाच्या ग़ळ्यातून एखादी यमनातली तान तळपत्या विजेपरी कडाडून गेली असेल. डोळ्यापुढे अंधेरी आली असेल म्हणून. ( ए कोण रे तो म्हणाला विजुभाऊ तुम्ही पार्लेकर अंधेरीपुढे जरा जा म्हणून ......आकशेप) गिटारचा आवाज कडकड असा भासला असेल
डु़डुळगावचा संदर्भ लागला नाही
डहुळलेल्या डोहात उतरलेल्या कृष्णाला कालीयाने डोहात वसवलेले गाव गवसलेले त्या गावाचा संदर्भ घेऊन ज्या गावाचा नाश करायचा आहे त्या गावा संदर्भात काही असावे.... अर्थात इथे असलेले अभ्यासू पुणे ३० वाले सदस्य इथे प्रकाश टाक्तील्च
17 May 2010 - 11:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डहुळलेल्या डोहात उतरलेल्या कृष्णाला कालीयाने डोहात वसवलेले गाव गवसलेले त्या गावाचा संदर्भ घेऊन ज्या गावाचा नाश करायचा आहे त्या गावा संदर्भात काही असावे
=)) चालू द्या...चालू द्या..!
'तित्तिर बाला' हा शब्द मला कालपासून 'पाली’ भाषेशी काही संबंधीत तर नसावा असे वाटत आहे. च्यायला ही कवयित्री कविता करुन जाते. आणि आपल्या डोक्याला उगाच ताप होतो. :)
बरं या 'शोषण भीषण पोषण वेसण' शब्दांनी नाद साधलाय हे खरं आहे. पण नाकात वेसण घालून फिरणार्या 'मदन' करणार्या बैलांची आठवण झाली.
-दिलीप बिरुटे
17 May 2010 - 9:04 am | नितिन थत्ते
कवितेची गेयता एकदम छान जमली आहे.
आता अवांतर सुरू
>>करूण धावन
हे सुरुवातीला करुण घावन* असे वाचले आणि पोटात खड्डा पडला.
पूर्वी केव्हातरी वाचलेल्या कथेत राजाच्या मेव्हण्याला मेजवानी म्हणून हरणाची मादी आणलेली असते. आपल्या मागे आपल्या पिलांचे कसे होणार अशी चिंता तिच्या डोळ्यात पाहून राजा त्या हरिणीला सोडून देतो असे काहीसे आठवले.
हरणाचे कारूण्य ठीक हो... आता ते यःकश्चित घावन जर आपल्याला करूण वगैरे वाटू लागले तर मग आपण खाणार काय? तोफगोळे?
नितिन थत्ते
*घावन हा शब्द तोफांच्या कवितेत कसा येईल हे शरदिनीतैंच्या कवितेबाबत कोणी म्हणू नये.
22 May 2010 - 9:54 am | सविता
मी पण घावन च वाचले.... =))
------------
आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा......
जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
17 May 2010 - 11:18 am | दत्ता काळे
अदितीच्या म्हणण्याप्रमाणेच अर्थ असावा.
17 May 2010 - 11:23 am | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =))
शरदिनीच्या कवितेतुन अर्थ काढण्याची णिश्फळ धडपड पाहुन ह ह पु वा झाली =))
17 May 2010 - 11:46 am | शैलेन्द्र
+१
17 May 2010 - 9:10 pm | टारझन
अजुन ही काही हस्यास्पद प्रतिसाद वाचण्यात आले .... =)) =)) =))
शरदिणीची कविता "आपल्यालाच्च कशी (आणि किती)समजली , हे दाखवण्याचा हळवा प्रयत्न" पाहुन अंमळ करमणुक झाली ;)
अवांतर : काय शरदिनी मॅडम , सायकॉलॉजीचे क्लासेस कसे चालु आहेत ? एस्पीच्या कट्ट्यावर भेटुयाय .. चहा-कॉफ्या पिऊयात , इत्यादी इत्यादी =))
-दैणंदिणी
17 May 2010 - 11:35 am | दत्ता काळे
शरदिनीच्या कवितेतुन अर्थ काढण्याची णिश्फळ धडपड पाहुन ह ह पु वा झाली - पण मी प्रयत्न केलाच नाही. एकवारच वाचली. शॉर्टपिच बाऊन्सर आहे, हे लक्षात आल्यावर सोडून दिला. (निष्फळ ) प्रयत्नसुध्दा केला नाही.
17 May 2010 - 11:51 am | विजुभाऊ
शॉर्टपिच बाऊन्सर आहे, हे लक्षात आल्यावर सोडून दिला
माताय........२०-२० च्या म्याचच काय पण पाच दिवसाच्या टेस्ट म्याचमध्ये सुद्धा मध्ये शॉर्ट्पिच बाउन्सर हा हमखास छकडी साठी आवातण असते........ आणि तुम्ही सोडून देताय....
बाय द वे तुम्ही जेफ बायकॉटचे स्टुडन्ट्स का?
17 May 2010 - 12:16 pm | जे.पी.मॉर्गन
त्यावर अजून चरायला कोण आलं म्हणून कधी नव्हं ते कविता वाचली! #:S हुश्श.... #:S अशीच गोलंदाजी, फलंदाजी क्षेत्ररक्षण चालणार असेल तर काय हारकत न्हाय ! बाकी तुमचं चालूद्या !
जे पी
17 May 2010 - 12:35 pm | मेघवेडा
जेपीशी शब्दशः सहमत.. मी म्हटलं कोण हा गोलंदाज बघूया तरी.. गार्नर, मार्शल, होल्डींग, अक्रम, ली वगैरे सर्वांपेक्षा खतरनाक गोलंदाज निघाला!! :)
पाठ्यपुस्तकात हे असले बाऊन्सर्स सोडावेत असंच शिकवलं जातं, त्यामुळे, बाऊन्सर सोडलेला आहे!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
17 May 2010 - 12:23 pm | वेताळ
त्या मराठी शब्दाचा विश्वकोष नव नवीन शब्द शोधुन समृध्द करत आहेत.
अजुन येवुद्या नवीन कविता तै.
वेताळ
17 May 2010 - 1:03 pm | jaypal
क्रमिक पाठ्य पुस्तकात आलिच पाहीजे =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
17 May 2010 - 1:35 pm | मनीषा
अडगळ भाऊंनी http://misalpav.com/node/12355 येथे
अर्थोत्पत्ती बिकट विडा,
हे सांगीतले आहेच...
आपण सुद्धा तसेच म्हणू..
बाकी शरदिनी ताईंच्या कविते मधे काय अर्थ आहे? म्हणजे त्यांच्या कवितेचा अर्थ शोधण्यात काय अर्थ आहे?
फक्त एन्जॉय (शदिनी ताईंची) कविता !!!
17 May 2010 - 3:51 pm | धमाल मुलगा
खरं सांगायचं तर सदर रचना ही केवळ नाद-गेयता आणि अर्थक्लिष्टता ह्यांच्या कसोटीस उतरत असल्याने ती शरदिनी ह्यांची आहे असे वाटावे ह्यापलिकडे काही नाही...इतपत अपेक्षाभंग सदर रचनेमुळे झाला आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
एके काळी अत्यंत दमदार, आषयगर्भाच्या काळोख्या आवरणातुन स्फुट-अस्फुट भावकल्लोळांना जागतिक युध्दघटनांशी नाळ सांगणार्या अश्या अनावृत्त काव्यरचनेच्या जन्मांचे श्रेय असलेल्या शरदिनी ह्यांच्या गुढगर्भ काव्यकौशल्यास अशी कोण्या कारणाने क्षती दिसु लागली ह्या गढुळचिंतेने माझी शब्दसंपदाच खुंटली आहे.
असो,
शरदिनी ह्यांनी बर्याच काळानंतर इथे आपली रचना सादर केली, त्यामध्ये पुर्वीची सफाई जाणवत नाही, ह्याचा अर्थ आम्ही असा लावतो, की काळ त्यांनी काव्यसन्यासच घेतला असावा. त्यामुळे अतार्किकतेच्या कोसळकड्यावरची विचारचक्रे काहीशी गंजली असावी आणि सदर रचना अस्स्सल शरदिनी अभिव्यक्तीची जमली नसावी असा कयास आहे.
एकदा लिहायला सुरु केलेच आहे, तर आता हळुहळु विचारचक्रे गंज झटकुन पुन्हा नव्या जोमाने खडखडु लागतील आणि आम्हा रसिकांना नवनवी मेजवानी मिळेल अशी एक ओशटआशा आहे.
17 May 2010 - 4:10 pm | Nile
थोडक्यात, शरदीनीं बाईंनाही मास्तरांकडुन गाईंडन्स घेण्याची आवश्यकता आहे असे तुला म्हणायचे आहे का रे धम्या?
-Nile
17 May 2010 - 5:33 pm | धमाल मुलगा
मास्तरांकडुन गायडन्स? आणि शरदिनींना?
हा हन्त हन्त!! अरे त्या स्वयंभू आहेत हे त्यांच्या काव्यरचनांवरुन दिसुन येत नाही काय?
त्या प्रगल्भ काव्यप्रतिभेचा असा चुकुनही उपमर्द घडु नये ही नम्र विनंती.!
18 May 2010 - 10:21 am | झकासराव
धम्स समीक्षणाची पुस्तक लयी वाचली काय रे???
18 May 2010 - 10:47 am | विजुभाऊ
आम्हा रसिकांना नवनवी मेजवानी मिळेल अशी एक ओशटआशा आहे.
धमाल पंत.. आता कसल्या जेवणावळी... पुण्याची पेशवाई बुडाली..
पण हेही नसे थोडके.अकबराच्या दरबारात नवरत्ने होते बहादूरशहा जफरच्या दरबारात जौक, गालीब सारखी नररत्ने होते........ नवरत्ने आणि नररत्ने यांची तुलना अग्राह्य आहे पण तरिही एक निश्फळ प्रयत्न...
तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या योग्य आहेत पण युद्धात असलेले सैन्य युद्ध संपल्यानन्तर सुद्धा त्याच मोड मध्ये रहाणे अशी आशा ठेवणे गैर आहे... सैनीक आणि त्या सैनीकाला आदेश देणारा हे देखील स्खलनशील मर्त्य मानव असतात हे विसरलात
मर्त्याने अमर्त्यासारखे वागणे म्हणजे स्वतःची नैसर्गीक स्खलनशीलता नाकारून द्वैत वाद निर्माण करण्यासारखे आहे... शंकरभाष्यावर बोलताना एकदा श्री श्री श्री डॉन महाराज ५५५( सिग्नेचरवाले) हे बोलले होते.
श्री श्री श्री डॉन महाराज ५५५( सिग्नेचरवाले) यांची एक आठवण येथे सांगितल्यास ते अप्रस्तूत ठरू नये.... ते एकदा आमच्या प्रासादावर मुक्कामी असताना त्यानी एका निद्रेमध्ये असताना ४० लोकाना उपदेशांमृत पाजले होते... अमॄत ग्रहण करणारे लोकही योगनिद्रेमध्ये होते. त्याकारणे त्यांच्या स्मृतीपटलावरून हा प्रसंग श्री श्री श्री डॉन महाराज ५५५( सिग्नेचरवाले) यानी पुसून टाकला.
सद्गुरुचा चमत्कार या पेक्षा काय वेगळा असतो.......
हा अर्थात प्रत्येकाच्या श्रद्देचा प्रश्न आहे........ अंधश्रद्धा नसावी हे १०० % बरोबर पण श्रद्धा असायला काय हरकत आहे .आता तुम्ही म्हणाल की श्रद्द्धा हीच अंधश्रद्धा असते......... हे खरे आहे आणि खोटेदेखील आहे....... इतिहासात थोर पुरुष होऊन गेले ही श्रद्धा आहे..... पण त्याना जन्माला घालणार्या आणि त्या स्त्रियानाही जन्माला घालणार्या थोर स्त्रिया यांची थोरवी त्यामुळे झाकली जाते...... ही वस्तुसस्थिती आहे.. वस्तुतः त्या स्त्रीयाच थोर....... त्या नसत्या तर हे थोर पुरुष जन्माला आले असते का?
असो.... इथे तुमच्या श्रद्धेचा कस लागतो...... शेवटी कसाला पुरून उरते ते खरे सोने.......
सोन्याचे भाव हल्ली कडाडल्यामुळे लोक १ ग्रॅमचे स्वर्गचे दागिने वापरतात. शरदिनी तैंची कविता त्या १ ग्रॅम दागिन्याप्रमाणे आहे. ते कसदार बावनकशी आहेच पण्त्याच बरोबर जे झाकायचे ते बरोबर झाकते आणि थोड्याशा शब्दात सुद्धा उत्तम उठावदारपणा आणते.
असो.... ही साठा उत्तराची प्रतिसादी पाचाउत्तरी सफळ होवो. ही श्री श्री श्री डॉन महाराज ५५५( सिग्नेचरवाले) यांच्या दूरवीक्षणाने ती सफळ होईलही याची त्यांना आणि अंटार्टीका पासून टुंड्रा प्रदेशा पर्यन्त जगभर पसरलेल्या त्या दिवशीच्या सर्व भक्ताना खात्री आहे
17 May 2010 - 4:25 pm | नाना बेरके
तित्तिरबाला ग्रंथीलाला
ग्रसनी जिव्हा कुरूप भोला
. . . चिअर गर्ल्स :?
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
17 May 2010 - 6:00 pm | परिकथेतील राजकुमार
जिभेला लकवा वगैरे मारला असेल तर व्यायामाला बरी आहे पद्यरचना.
©º°¨¨°º© दैनंदिनी ©º°¨¨°º©
आमचे राज्य
17 May 2010 - 6:21 pm | वाहीदा
शरदिनी ,
तुझी कविता म्हणून वाचायला घेतली पण भ्रमनिरास झाला . ही कविता तुझ्या आधीच्या कवितांसारखी फुललेली दिसली नाही .
तुझ्या कवितेच थोडक्यात रसग्रहण तुच देत जा ग ... नाहीतर आम्ही पामर येईल तसे अर्थ काढू . आदीतीचे रसग्रहण चपलख बसले आहे की नाही ते तरी सांग #:S
~ वाहीदा
18 May 2010 - 4:05 pm | श्रावण मोडक
ओ बाई, लई भारी बरं का... वरचे प्रतिसाद पाहता अनेकांच्या विकेटी पडल्या की. आमचीबी पडली बघा. गंडलो की राव पार... चुकलं. गंडलो की बाई पार!!!
:)
17 May 2010 - 7:09 pm | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
17 May 2010 - 7:44 pm | अनिल हटेला
=))
=)) =))
=))
अवांतरः लै दिवसाणी शरदीनीतैची कविता वाचायला मिळाली..:)
(ओ की ट्ठो न कळालेला)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
17 May 2010 - 8:04 pm | sur_nair
एक हत्ती आणि पाच आंधळे यांची गोष्ट माहित आहे का? तसेच काहीसे चाललेले दिसते या कवितेचे आणि ती वाचणार्यांचे. चालू दे, कविता कशीही असली तरी TP चांगला आहे http://www.wordinfo.info/words/index/info/view_unit/1
17 May 2010 - 8:20 pm | स्पंदना
कसला टी.पी. राव!! जे समजत नाही त्याला नमस्कार करुन पुढे जायच्या आम्च्या सन्स्कारान आज सकाळ पासुन हात भरुन आले. सार् या कवीता कश्या कड कट्ट, कड कट्ट अश्या टाईप राइटरच्या आवाजा सकट इथ येवुन पडल्या . विडम्बन जरा तरी कळली पण ही कविता आत्ता वरच्या जयपालान्च्या व्यन्ग्य चित्रा मुळ कळली. आता शान्त झोपायला हरकत नाही.
आभार जयपाल, असच काय काय तरी पाळत जावा, म्हणजे ऐन वेळी बाहेर काढुन वेळ भागवता येते.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
17 May 2010 - 8:26 pm | धमाल मुलगा
हा हा हा....
पुढे कधी डोक्याला चालना हवी असेल तर सरळ हे पान उघडावे. :)
फ्रेशर्स जसे शकुंतलादेवींचे गणिती कोडी घेऊन बसतात तसं करावे. :)
17 May 2010 - 11:31 pm | पाषाणभेद
या आधीच्या कविता पाहून शरदिनी ताई प्रतिसाद देत नाही असे लक्षात आले होते. आता या कवितेत त्यांनी वर प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर एवढ्या चर्चेनंतरही त्यांनी कवितेची उकल केलेली नाही. हे म्हणजे उंदिर मांजराशी खेळते तसे वाटते आहे. त्यांनी या व या आधिच्या कवितांचे रसग्रहण करवून द्यावे (हा आग्रह त्यांना).
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
18 May 2010 - 8:27 am | पंगा
आग्रह? की शिक्षा?
(मराठी शिक्षा!)
- पंडित गागाभट्ट
18 May 2010 - 7:19 am | सुधीर काळे
नोस्ट्राडामसच्या भविष्यकथनाची आठवण झाली. ज्याने-त्याने आपला-आपला अर्थ घटना घडल्यावर काढावा!
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
16 May 2015 - 8:05 pm | टवाळ कार्टा
काय रत्न आहे हे =))