अशीच एक वसंतातली पहाट ... खिडकीतून येणारी थंड, मंद, सुखद वार्याची झुळुक गात्रास हलकेच स्पर्श करून जात होती..थोड्याच वेळात तमाचा पडदा सरला अन त्या झुळुकेने जाग आली.... सर्वांग खूपच हलके वाटू लागल्रे..अचानक अंथरूणाचा तिटकारा उत्पन्न झाला... उठ्ले.. शांत गॅलरीत उभारले.. खाली रस्ताही शांत .. वेळ पहाटे ५ वाजले असतील कदाचित... तुरळ्क व्यायामप्रेमी रस्ता कापत होते...
एका द्रुष्टिक्षेपात नजर स्थिरावली ती गॅलरीतल्या नुकत्याच लावलेल्या गुलाबाच्या रोपावर.. परवापर्यंत अगदी छोटीशी घट्ट मिटलेली कळी उमलण्याच्या प्रयत्नात होती..कालच जणू तिला जाणीव झाली की आता आपल्याला मोठे व्हायचे..फुलायचे..आणि एकाच दिवसात बळ एकवटून तिचा उमलण्याचा प्रयत्न माझ्या नजरेने टिपला होता... वाटलं काय सुंदर जीवन आहे हे!!!
मनात आले की मोठे होण्याची प्रक्रीया सुरू... माणसाचंही तसचं असतं तरं.. जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत घट्ट कळी बनून सुप्तावस्थेत पडायचे...आणि आयुष्यात कोणीतरी येण्याची चाहूल लागताच उमलायला सुरूवात करायची ... व्वा!!! ख्ररचं खूप मज्जा आली असती जर असे असतम तरं..
वस्तुतः ती कळी उमलण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली हि फारचम सूक्ष्म असल्याने जाणवली नसेल मला... म्हणूनच उगाचचं गुलाबाची कळी स्वछंदी, मनस्वी वाटली..तिला सुद्धा शेवटी काळाचे बंधन आहेच की!! एका ठराविक काळानंतर तिलाही सक्तीने मोठे व्हावं लागत असेल कदाचित..कारण कळीच्या रुपात जगायला तिला आवडलं नसतं का??
कळीचं फूल होणं ही खचितच आनंददायी घटना आहे..पण मोठे झाल्यावर पूर्ण फुलल्यावर एका विशिष्ट कालानंतर त्या पाकळ्यांना गळावं लागतं हे विसरून कसे बरे चालेलं??
माणसाचं ही तसचं आहे... उगाचचं "बालपणं देगा देवा" म्हणत नाहीत!!! एकापाठोपाठ येणार्या अटळ बदलांना सामोरे जावे लागणारे असल्याने कदाचित बाल्यावस्था सोडुच नये असे वाटते ...किंवा वार्धक्याच्या भीतीने कदाचित????
पण मधला तारूण्याचा काळ विसरून कसे चालेल?? पूर्णावस्थेचा .. जगण्याचा... कमावण्याचा आणि मग शेवटी गमावण्याचा... तारूण्यातच नवनिर्मितिची आस असते... अनेक प्रकारची उन्नती.... वैचारिक, सामाजिक...
याच काळात असतात खूप स्वप्नं.. आशा आणि आनंदच आनंद!!!
या सगळ्याला काळाच्या पट्ट्याने बांधून घातले आहे हे लक्षात येते ते वार्धक्यात.. मागे वळून पहाताना वाटतं बालपणचं सुखात गेले.. मायेच्या छायेखाली .. बिनधास्त!! तारूण्यातही मस्ती लुटली.. आणि आता अटळ वार्धक्यालाही सामोरे जावे लागणारं...
मला वाटतं वार्धक्य या शब्दाला उगाचच निराशेची किनार आहे.. ख्ररं पाहिले तरं उत्तम विचारांची बैठक, जगण्याचा आनंद लुटण्याची कला.. कोणालाही न दुखावण्याचा स्वभाव असेल तर कशाला घाबरावे या वार्ध्यक्याला?? केवळ शरीर थकले म्हणून?? छे छे!!! हा तर खास स्वतःसाठी राखून ठेवलेला काळं.. जे काही करायचं, शिकायचं, जगायचं राहिलं ते करण्याचा, शिकण्याचा, जगण्याचा!! मधे अधे कुरबूर चालणारच की!! पण ती ही आनंदाने झेलेली कि मग काहिच अवघड
नाहिये... हो खरचं आयुष्यात पूर्ण न करता आलेल्या साथीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात.. एकामेकाला वेळ द्यावा..आणि शेवटी टपोर्या फूलाला जसे गळावं लागतं तसेच आपणही एक दिवस गळून जावे... यात दु:खाचा लवलेश ही नसावा.. कारण यात काही करायचे राहिले या पर्यालालाच फाटा दिलेला असावा...
एवढ्या विचारांच्या वादळात ती कळी क्षणाक्षणानं मोठी होताना जाणवली अन कणाकणानं मला आयुष्याचं तत्त्वज्ञान उलगडून गेली .... खरचं हे जीवन सुंदर आहे! हे जीवन सुंदर आहे!!!!
प्रतिक्रिया
5 May 2010 - 3:44 pm | इंटरनेटस्नेही
अप्रतिम!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
5 May 2010 - 4:40 pm | ह्रुषिकेश
खरच खुप सुंदर.. कधीही आयुष्यात मनाला मरगळ आली असेल ना तर हा लेख वाचावा... जीवन हे रडत रडत वेळ वाया घालवण्यासाठी नाही तर हसत हसत आनन्द लुटण्यासाठी आहे..
5 May 2010 - 6:20 pm | धमाल मुलगा
कसं क्काय सुचतं बुवा हे असं छान छान लिहायला?
आम्ही कितीही प्रयत्न केला तरी शब्दकोलांट्यांच्या पुढे मजलच जात नाही. :( ...असो, तरीही रडणार नाही मी..कारण...हे जीवन सुंदर आहे!!!!!
-(शब्दकोल्हाटी) धम्या डोंबारी. :)
5 May 2010 - 8:10 pm | टुकुल
मन शांत करणार लेखन.
--टुकुल
6 May 2010 - 6:30 am | स्मृती
जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत घट्ट कळी बनून सुप्तावस्थेत पडायचे...आणि आयुष्यात कोणीतरी येण्याची चाहूल लागताच उमलायला सुरूवात करायची ...
क्या खयाल है!! मस्त!!
सकाळी सकाळी असं सकारात्मक वाचलं, पाहिलं, बोललं की दिवस कसा छान जातो!! धन्यवाद!
6 May 2010 - 9:40 am | अमोल केळकर
सुंदर, खुप छान
अमोल केळकर
-----------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
6 May 2010 - 9:49 am | बिपिन कार्यकर्ते
फारच सकारात्मक!!! :)
बिपिन कार्यकर्ते
6 May 2010 - 12:07 pm | मस्त कलंदर
+१
खरंच सकारात्मक लेख आहे...
हे जीवन सुंदर आहेच... मला हे गाणंही व्यक्तिशः त्यातल्या अर्थामुळे नि नादमाधुर्यामुळे खूप आवडतं!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
6 May 2010 - 1:15 pm | नाद्खुळा
अप्रतिम अप्रतिम केवळ अप्रतिम
6 May 2010 - 1:37 pm | आनंदयात्री
वाह क्या बात है सांजसखी .. एकानंतर एक येणारे ललित लेख .. आवडले !!
सकारात्मक म्हणून वाचण्यापेक्षा मला ते ललित आवडले .. जियो .. अजून येउ द्या !!
6 May 2010 - 2:18 pm | भाग्येश
हे जीवन खरच खूप सुंदर आहे. त्याला अजुन सुंदर बनवल पाहिजे !!
खूपच सुंदर सकारात्मक विचार आहेत..
मन अगदी प्रसन्न झाल..
अभिनंदन.
-भाग्येश
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ ||
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागमः ||
6 May 2010 - 9:10 pm | भानस
सांजसखी, आयुष्याचे सगळे रंग आसुसून जगायला हवेत. दु:खी होऊन कुठलाही लाभ तर नाहीच वर आपण दु:खी आहोत याचेही दु:ख. किती सुंदर लिहीलेस गं. मन आनंदलं.
7 May 2010 - 12:48 pm | स्पंदना
असेच म्हणते..
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
7 May 2010 - 1:16 pm | वाहीदा
आज अगदी सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राचा सुंदर एस एम एस आला ... या लेखाला साजेसा..
सप्न थांबली की आयुष्य संपते ..
विश्वास उडाला की आशा संपते..
काळजी घेणं सोडलं की प्रेम संपते ...
म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा अन काळजी घ्या ! अगदी स्वतःची ही ..
आयुष्य खुप सुंदर आहे :-)
~ वाहीदा
7 May 2010 - 2:24 pm | मेघवेडा
=D> मस्तच!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!