ओंकाराची नाडीपरिक्षा
मिसळपाववर सध्या नाडीचे प्रस्थ वाढत आहे. वेळोवेळी त्याचा प्रतिवाद केला आहे. वाद प्रतिवाद चालुच असतात. आम्ही ज्या ओंकार पाटील यांचा संदर्भ दिला होता तो लेख संपुर्णपणे टंकणे शक्य नसल्याने तो पीडीएफ स्वरुपातील आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या डिजिटल ग्रंथालयातील प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या पुस्तकात आहे .तेवढ्याच लेखाचा संदर्भ खाली देत आहे.
श्री. ओंकार पाटील हे एक बीएसएनएल मधील अधिकारी आहेत. त्यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा तटस्थ पणे अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा या यातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती. ( १७०० वर्षापूर्वीच्या ज्योतिषाला विसाव्या शतकातल्या कुंडल्या कशा बनवता आल्या हा तांत्रिक प्रश्न ओकांना व त्यांच्या साथीदारांना जिथे समजणेच शक्य नाही तिथे त्यातली लबाडी कुठून कळणार ? ) त्यांना एकूण दोनशे साठ प्रश्न विचारले गेले. त्यांनी पॉकेट रेकॉर्डर हळूच खिशात ठेवला होता म्हणुन हा लेख त्यांना लिहिता आला.
Fasve Nadi Jyotisha
वाचन
9301
प्रतिक्रिया
0