नांदुरमधमेश्वर ची भटकंती

jaypal's picture
jaypal in कलादालन
27 Mar 2010 - 9:46 am

एकदाची २४ जानेवारी २०१० ची दुपार उजाडली. गाडी काढली आणि निघालो नासिकला एकटाच. खुप दिवस ठरत होत पण योग जुळत न्हवता. कधी हवामाना मुळे आलेल मळभ तर कधी रजेचा प्राब्लेम. या वेळेस मी ठरवल होत ग्रुपमधल कुणी बरोबर येओ अथवा राहो मी जाणारच. नांदुरमधमेश्वर नासिक पासुन साधारण ३०/३५ कि.मी वर आहे. येथे खुप जुना (ब्रिटीश कालीन असावा) मातीचा मोठ्ठा डॅम आहे. या डॅमच्या बॅक वाटर मधे चरण्यासाठी खुप लांबुन आणि परदेशातुन सुध्दा खुप पाणपक्षी येतात असे समजले होत आणि त्यांना (कॅमे-यात) शुट करण्यासाठी मी चालालो होतो.
शनिवारचा हापडे टाकला होता. सॅक, कॅमेरा व ईतर साहीत्य आद्ल्या दिवशीच भरुन ठेवल होतं.घरी आलो माझे भटकंतीदर्म्यानचे रगडायचे कपडे चढवले आणि इंडीकाला सेल्फ मारुन प्रवास चालु केला. नासिकला पोचल्यावर तीथे माझा (पत्रकार) मीत्र प्रविण खरे रीसीव्ह करायाला येणार होता.(पुढचा प्लॅन चाणाक्ष मंडळींनी ओळ्खलाच असेल.:-))
जाताना घाटातुनच फोटो काढायला सुरुवात केली. हे काही सुर्यास्ताचे फोटोज

n

n

n

n

n

रात्री ८ वाजता नासिकला पोचलो.तीथे मला भेटायला आपला पाषाणभेद आला होता. जवळपास २/४ महीने तो सारखा बोलवत होता. आम्ही फोनवर देखिल खुप वेळा बोललो होता,मेल आणि खरडी मधुन गप्पा होत होत्या पण समक्ष भेट आणि ओळख त्या दिवशीच झाली. काही लोक म्हणतात की ही इंटरनेट वरची ओळख खरी नसते. हे सगळ व्हर्चुअलरीअ‍ॅलीटी आहे. असेलही कदाचीत पण आपली virtue पक्की असली तर मग मला वाटत सगळी reality आहे. (आपण मोकळे पणाने वागलो तर फार क्वचीत समोरचा आडकाठी बाळगतो असा माझा आनुभव आहे) नाहीतर काय गरज होती त्या दगडफोड्याला तडामडत, जबर थंडीत मला भेटायाल यायची? असो प्रविणची आणि त्याची ओळ्ख झाली. गप्पा जरा कोरड्या वाटल्या म्हणुन आम्ही त्याला घसा ओला करण्याविषयी विचारल ;-)पण त्याला नाइट शिफ्ट असल्याने तो लवकर पळाला. खुप वर्षांनी प्रविण भेटला होता. एकतर जबर थंडी होती त्यामुळे प्रत्येकी १,२, करत ४ पेग कधी संपले कळलच नाही अजुन त्याच्या घरी जाउन कोंबडीवर हात मारायचा होता.मस्त गरम रस्सा आणि ज्वारीची भाकरी हाणुन १/१.३० वाजता झोपलो.
पहाटे ५ वा. उठुन पटापट दोघांनी आवरल (थंडी + व्यवस्थीत जेवण या मुळे रात्रीचा अंमल काही जाणवला नाही) वाटेत प्रविणच्या एका कार्यालयीन मित्राला गाडीत घेतला आणि नांदुरमधमेश्वरचा प्रवस चालु झाला. खुप खुप थंडी आणि धुक्यात (सोन)सकाळ अशी होती.

n

n

n

n

n

n

वरच्या फोटोवर फोटोशाप मधुन केलेले काही प्रयोग इथे खाली..

n

n

पक्षी काही दिसेनात म्हणुन लेन्सबदलुन काही मॅक्रो फोटोग्राफीच्या प्रयोगांना सुरवात केली.

n

n

रुइची फुल...

n

n

या (मासेमारी) मावशी कडुन कळल की डॅम फुटुन पाणी वाहुन गेल आहे(ओ डेम इट) :-( आणि सगळीकडे कमरे येवढा गाळ आहे. पक्षी भरपुर होते पण गाळ अस्ल्या मुळे तिथ पर्यंत जाता आल नाही.
n

मग टाईमपास म्हणुन .....

n

पक्षी निरीक्षणासाठी उभारलेला टावर

n

माझ्यासारखा वेडाराघु

n

बिनदाढीचा प्रविण आणि त्याचा मित्र
n

मावळत्या दिनकरा अर्ध्य तुजला जोडुनी दिन्ही करा

n

n

पक्षी न दिसता देखिल हा प्रयोग फसला नाही कारण तीथल्या लोकल गाईडचा फोन नं मी मिळवला असुन त्याने पुढच्या फेरीत त्या धरणाच्या काठाशीच तंबुत राहण्याची (व्हेज/ नानव्हेज)जेवणासहीत व्यवस्था करुन देण्याच अश्वासन दिल आहे. पुढील भागात भिगवणचा फेरफटका मारुयात :-)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

27 Mar 2010 - 10:03 am | प्रमोद देव

वर्णन(खान-पान सोडून) आवडले.
छायाचित्रंही मस्त आहेत...तरीही ’दगडफोड्या आणि दस्तूरखुद्द लेखक जयपाल’ ह्यांच्या छायाचित्रांविना एकूण लेख अपूर्ण वाटला.

मेघवेडा's picture

27 Mar 2010 - 4:30 pm | मेघवेडा

असेच म्हणतो! उत्तम छायाचित्रे.. मात्र तुमचं आणि दगडफोड्याचं छायाचित्र नसल्यानं राहून राहून काहीतरी कमी आहे असं वाटतंय! बाकी मस्त!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

खादाड's picture

27 Mar 2010 - 2:43 pm | खादाड

तसे सगळेच छान आहेत वरुन तीसरा, रुइच्या फुलान्चा आणि पाण्याच्या थेम्बान्चा / चे खूप छान आहेत ! =D>

चक्रमकैलास's picture

27 Mar 2010 - 2:48 pm | चक्रमकैलास

खतरनाक फोटो आलेत...आम्हालापण बोलवा राजे कधीतरी..मजा येईल..!!!

नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

स्वानन्द's picture

27 Mar 2010 - 5:01 pm | स्वानन्द

अप्रतीम फोटो!!

फोटोशॉप्च्या कलाकारीपेक्षा मूळ फोटोच जास्त छान वाटतोय.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

पाषाणभेद's picture

27 Mar 2010 - 6:34 pm | पाषाणभेद

जयपालजी तुमच्या हाततली कला आम्हाला लगोलग पाहू देत चला. एवढा उशीर बरा नव्हे. नेहमी तुम्ही प्रतिसादात एखादा अनुषंगीक फोटो देतात. आज तुम्हीच काढलेले फोटो बघण्याचा योग आला.

बाकी हा बंधारा ब्रिटीशकालीन आहे. १९०६ साली तो बांधला (किंवा बांधायला घेतला.) नांदुरमध्यमेश्वराजवळ म्हाळसाकोरे गावात आमची कुलदेवता आहे. लहान असतांना आम्ही निफाडहून टॅक्टरने थेट या बंधार्‍यावरून म्हाळसाकोर्‍याला जात असू. बांधावरून जातांना फार भिती वाटे. धरणाच्या पुढे नदीत खडकावर शंकराचे एक मंदिर आहे. श्रीरामाने मारीच राक्षसाला मारलेला बाण त्या ठिकाणी पडला अशी अख्यायीका आहे.
नांदूरमध्यमेश्वराचे लोकेशन सांगणारी जालवहीचा पत्ता:
http://bnhsornitho.blogspot.com/2008/12/nandur-madhmeshwar-bird-sanctuar...

पुण्याहून येतांना सरळ सिन्नरहून पुढे जावून नाशिकचा मोठा चक्कर अन वेळ वाचवू शकतात.
तशी या बंधार्‍याची साठवणक्षमता फार कमी होती अन त्यातच गाळामुळे ती लक्षणीयरित्या कमी झालेली होती. तरीही सरकारी लोकांच्या हलगर्जीपणामुळे या वर्षी हा बंधारा फुटला आणि सगळे पाणी वाहून गेले होते. खरी बातमी अशी की या बंधार्‍याची साठवण क्षमता कमी झाल्याने या बांधाच्या खालीच एक बांध बांधत होते. त्या वेळी मागे असलेल्या (ब्रिटीशकालीन) बांधाला मातीचा भराव टाकलेला होता. तो भराव कोसळला (की नगर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी कोसळवू दिला गेला? कारण दोनच दिवस आधी या बंधार्‍यावर दोन पुढार्‍यांची या पाण्यावरून भांडणे झाली होती. ) अन सगळे पाणी वाहून गेले. ब्रिटीशकालीन बांध अजूनही चांगला आहे. तो फुटलेला नाही!

(कालच पेपरात वाचलेली बातमी खाली देत आहे. (लोकमत: २७/०३/२०१०):

मुंबई: नागपूर जिल्ह्यातील पेंच प्रकल्पातील कालव्याची भिंत खेकडे, घोरपड यांनी केलेल्या बिळांमुळे कोसळल्याची माहिती जलसंपदामंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. कालव्याची भिंत कोसळल्याने धानपिकाचे नुकसान झाले. कालवा कसा फुटला त्याची चौकशी करण्यात आली असून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

काही ठिकाणचे ब्रिटीशकालीन बांध, पुल अजूनही आहे तसेच आहे अन आत्ताची बांधकामे धडाधड कोसळतात. भ्रष्टाचार कसा मुरलेला आहे ते दिसतेच अन आपले पुढारीही त्याला सपोर्ट करतात. कालव्याची भिंत खेकडे, घोरपड यांनी केलेल्या बिळांमुळे कोसळण्यापर्यंत तुम्ही काय करत होते रे चोच्यांनो? त्या सरकारी लोकांना तर चाबकाने बडवले पाहीजे. जल वन संप्पत्तीचा नाश करतात अन आपली पोटे मोठी करतात.

असो. जयपालजी तुम्ही भिगवणचे फोटो लगोलग टाका अन आमची नजर सुखावू द्या.

शेवटचे दोन फोटो फार आवडले.

अन माझे अन जयपालांचे फोटो काही पक्षांइतके चांगले नाही हो देवकाका अन मेघवेडा भाऊ. म्हणून नाही टाकले.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

प्राजु's picture

27 Mar 2010 - 7:28 pm | प्राजु

फोटोंच्यावर्णनासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत..
मंत्रमुग्ध झाले फोटो बघून.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

शुचि's picture

27 Mar 2010 - 8:53 pm | शुचि

अ-प्र-ति-म
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Love is older than you but the light shining through makes me see your love is all new.

चिन्मना's picture

28 Mar 2010 - 8:56 am | चिन्मना

व्वा!! जलबिंदूंचे मॅक्रो फोटो निव्वळ अप्रतिम !!!

jaypal's picture

29 Mar 2010 - 11:45 am | jaypal

रसिक प्रतिसाद कर्त्यांचे आभार. तुमच्या कौतुका मुळे उत्साह अजुन वाढतो. :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/