होळी..

हर्षद आनंदी's picture
हर्षद आनंदी in जनातलं, मनातलं
1 Mar 2010 - 6:21 am

सप्तअश्वांचा लगाम सुटला, दाही दिशा झाकोळल्या
तमदैत्याचा नि:पात करावया नीशापती अवतरला
फाल्गुन शुक्ल पुनव आजी, सण होळीचा
आज दिन तेजाचा, करुया नमन अग्निदेवाला

रचली ही रास शुष्ककाष्टांची वेढुनी ओंडक्याला,
धुप, कापूर, तुप घालुनी वडवानल प्रज्वलिला,
सुवासिनी घालिती रींगण पाण्याचे, नेवैद्य पोळीचा
श्रीफळ वाढवुनी अग्निनारायण तुष्टविला

धगधगती ज्वाळा, गजर ढोलताशांचा
तांडव करीती लवलवत्या जीव्हा कळीकाळही थबकला
आसमंत अवघा निनादला, महाध्वनी बोंब जाहला
पाहुनी खेळ भावनांचा, मृत्युसुध्दा गहीवरला

घाली सांगड निसर्गाशी, अमुल्य ठेवा संस्कृतीचा
ईथेच घडले शिवराय आमुचे, विश्वसांगे तो जाणता राजा
धगधगत्या होळीतुन श्रीफळ ऊचले शंभुबाळ तयाचा
धर्मासाठी शिवयज्ञी आहुती देऊनी धर्मवीर जाहला

कुठले देता संदर्भ हो तुम्ही भुतकाळ सगळा,
जाहला राम, जाहला कृष्ण, शिवशंभुही अवतरुनी गेला
जागती न येथली मर्त्य मने, काळ खदखदला
नवी अस्त्रे नवी शस्त्रे शत्रु मात्र जन्मजन्मांतरीचा

शतकानुशतके जाहले यत्न नाश आमुचा करावया
नसानसातुन वहात असे नुसता अभिमान परंपरेचा
येईल की कुणी शहाजी, शिवाजी वा संभाजी
रक्षुनी आम्हास राखील धर्मास विश्वास मनामनात भरला

जरी पानीपत होऊनी विश्वासाचे देशही दुभंगला
रक्तबंबाळ माता आक्रोशीते परी कोण तो ऐके तीजला
धर्म निर्दालन्या अधर्म पुन्हा सरसावला
पुन्हा पेटले रान चोहीकडे, भगवंता धाव आता

हताश तो जगदनियंता, गर्जुनी ऊठला
धगधगत्या ज्वालेतुन उमटली होती शलाका
रूप घेऊनी शिवाचे ठेविला आदर्श सकळा
क्षणार्धात विझुन जाई आग अंतरीची, तुम्हापरी वानर बरा

वाण हे सतीचे, हाती धराया कुणी नाही वीर निधडा
शिवप्रभुंच्या देशी कोण दुष्काळ हा पराक्रमाचा
तेवतसे ज्योत शिवमंदीरी सांगे व्हा पूढे जन्मभू रक्षिण्या
सरसावुनी शस्त्रे लढण्या ठाकताच साक्षात शिवराय येतील साथीला

"हर हर महादेव" "हर हर महादेव""हर हर महादेव""हर हर महादेव""हर हर महादेव"

मुक्तकइतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

तिमा's picture

1 Mar 2010 - 9:33 am | तिमा

हे गद्य की पद्य ? पद्य असेल तर हितं कसं?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

आशु३५'s picture

1 Mar 2010 - 11:00 am | आशु३५

हि कविता होलि पासुन सुरु होउन हर हर महादेव वर कशि काय सम्प्लि ते कहि कलले नाहि बुवा.