मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बर्फशिल्प

मस्तानी · · कलादालन
'मिपा' चं कलादालन खर तर फारच समृद्ध आहे. तरीही मला हे जे पाहायला मिळालं त्याची भर या कलादालनात घालावीशी वाटली ... बघा आवडतंय का ! ================================================================================ आज सकाळी ठरल्या वेळी ठरल्या ठिकाणी जायला निघाले खरी घरातून, पण कालपासून मनात चालू असलेल्या विचाराने पुन्हा एकदा उचल खाल्ली आणि पावलं (आणि गाडीची चाकं) त्या वेगळ्या दिशेला घेवून गेलीच :) गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात Plymouth Ice Spectacular हा बर्फशिल्पांचा (Ice Sculptures) मेळा बघण्याची संधी मिळाली होती आणि हा जानेवारी उजाडल्या पासूनच या वर्षीचा हा मेळा कधी आहे याच्या तारखांवर लक्ष ठेवून होते. २२-२३-२४ अशा तीन दिवस हा मेळा Kellogg Park, Downtown Plymouth, MI येथे चालू आहे. वेबसाईट आहे http://www.plymouthicefestival.org/ आम्ही म्हणजे फारतर बर्फाचा snowman बनवणार पण इथे सदर होतात त्या खऱ्या बर्फातून निर्माण केलेल्या कलाकृती. अगदी १० बाय १० फुटी सागरकन्या (Little Mermaid) असो की कुणीतरी टाकून दिलेल्या-आजारी आणि कुणा चांगल्या माणसाने औषधपाणी करून पुन्हा 'माणसात' आणलेल्या कुत्र्याचा पुतळा असो ... लहान मुलांचे आवडते cartoon characters, स्थानिक व्यवसायांचे logo, प्राणी, पक्षी ... बर्फाच्या तुकड्यातून साकारलेलं असं बरंच काही बघायला मिळतं इथे. तुम्हाला स्वतः यायला जमणार नसेल तर फोटो हाजीर है ! बर्फातली कारीगरी ... Image removed. Image removed. Image removed. गोठलेले क्षण Image removed. मिकी माउस Image removed. बिग बर्ड आणि सिसमी स्ट्रीट मधील मंडळी Image removed. खारुताई Image removed. हाच तो सुदैवी कुत्रा ... Image removed. नाच रे मोरा ... Image removed. आणखी काही कलाकृती ... Image removed. Image removed. Image removed. बर्फाचं सूर्यफुल Image removed. विचारवंत (The Thinker Statue by Auguste Rodin) Image removed. सागरकन्या Image removed. ( यापैकी काही बर्फ शिल्प २००९ जानेवारीतील आहेत तर काही आजच सकाळी टिपलेली )

वाचन 4086 प्रतिक्रिया 0