चायनिज रोल

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
2 Dec 2009 - 2:39 pm

साहित्य : कोबी ( लांबडा कापून ), फरसबी ( डायमंड शेप ), गाजर ( लांबडं किसून ),
कांदा( लांबडा कापून ), पातिचा कांदा ( फक्त मागची पात घेणे ),
सिमला मिरची ( लांबडी पातळ कापून ), सोया सास , चिली सास , पांढरी मिरी पावडर
मीठ, तेल, नूडल्स .

कृती : सर्व भाज्या स्वच्छ धुवून तेलावर शिजेपर्यंत परतून घेणे. नंतर त्यात शिजवलेल्या नूडल्स घालून थोडा वेळ परतावे. मग त्यात चवीनुसार मीठ , मिरी पावडर , सोया व चिली सास घालून १० मि. परतून घ्यावे.गार होउन द्यावे.

मग पट्टी मधे रोल करून

तेलावर खरपूस तळून शेझवान चटणी आणि थंडगार बिअर बरोबर सर्व करावे.

टीप : या पट्ट्या बाजारात विकत मिळतात आणि शेझवान चटणी सुद्धा.
शेवटची वस्तू कुठे मिळते हे सांगण्याची गरज नाही.
( या फोटोतील शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे. )

प्रतिक्रिया

गणपा's picture

2 Dec 2009 - 4:23 pm | गणपा

यम्मी...... या चायनिज लोकांना आपण फक्त यासाठी मानतो बुवा.
>>( या फोटोतील शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे. )
हा हे अस नाही करायच ब्वॉ. सांगा की आम्हालाबी तुमचे शिक्रेट ;)

(आगामी आकर्षण इंडोचायनीज्)
-माझी खादाडी.

समंजस's picture

2 Dec 2009 - 4:13 pm | समंजस

पाकृ आवडली!!
करायला बराच वेळ लागतो, खायला मात्र थोडाच :<

टारझन's picture

2 Dec 2009 - 4:57 pm | टारझन

लालच आहा लपं लपं .. पिछे पड गये रोला !!

:)

- श्रीयुत टारझन

स्वाती२'s picture

2 Dec 2009 - 5:27 pm | स्वाती२

>>शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे.
ते सिक्रेट रेसिपीवाल्या सुगरणीसारखं नका करु. ताज्या शेजवानची पाकृ पण टाका.

माधुरी दिक्षित's picture

2 Dec 2009 - 5:29 pm | माधुरी दिक्षित

शेजवान चटणी :w

रेवती's picture

2 Dec 2009 - 5:53 pm | रेवती

मस्तच! आपणही त्या गणपासारखे बल्लव आहात.
या फोटोतील शेझवान मात्र मी ताजे तयार केलेले आहे.
अरे वा!!

रेवती

सुमीत भातखंडे's picture

2 Dec 2009 - 6:41 pm | सुमीत भातखंडे

माझी आवडती डिश.

सुमीत भातखंडे's picture

2 Dec 2009 - 6:51 pm | सुमीत भातखंडे

...

विनायक प्रभू's picture

2 Dec 2009 - 7:26 pm | विनायक प्रभू

जोषी साहेब

jaypal's picture

2 Dec 2009 - 7:41 pm | jaypal

वा! वा! वा!

प्रभो's picture

2 Dec 2009 - 7:55 pm | प्रभो

जबहरा..... :)

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रीयुत संतोष जोशी's picture

3 Dec 2009 - 6:20 am | श्रीयुत संतोष जोशी

सर्वांना अनेक धन्यवाद.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

शाहरुख's picture

3 Dec 2009 - 6:36 am | शाहरुख

>>थंडगार बिअर बरोबर सर्व करावे.
=)) मॅनली रेसिपी आहे की..

करुन बघीन सवड मिळताच.

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 8:41 am | विसोबा खेचर

झकास.. :)

मदनबाण's picture

3 Dec 2009 - 8:44 am | मदनबाण

श्री जोशी, हा पदार्थ मस्त लागतो... :) पाकृ वाचण्यास अंमळ त्रास झाला !!! ;)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

सूहास's picture

3 Dec 2009 - 2:23 pm | सूहास (not verified)

नाही..नाही म्हणता ..पाकृ उघडलीच्...आणी माझ्या आवडत्या पेयाचा उल्लेख आढळला सोबत असे काही म्हणजे जबरा....पण त्यात शेजवान ...म्हणजे त्रिवेणी संगमच..

सू हा स...