प्रमोदकाकांना मिपाचे संपादकपद..
नमस्कार,
आपले एक वरीष्ठ मिपाकर प्रमोदकाका यांनी यापूर्वी मिपाच्या संपादक पदावर काम केले होते. काही कारणांनी मध्यंतरी त्यांनी हे पद सोडले होते.
तरीदेखील पुन्हा एकदा त्यांच्यावर संपादकपदाची जिम्मेदारी टाकण्यात येत आहे आणि त्यांनी ती मान्य करावी अशी त्यांना जाहीर व कळकळची विनंती. तात्याच्या शब्दाखातर ते ती मान्य करतील असा विश्वास!
अलिकडेच वयाने, ज्ञानाने, अनुभवाने खूप वरीष्ठ असणार्या एका मिपाकराबद्दल मिपावर अत्यंत खालच्या पातळीवर काही लेखन केले गेले/प्रतिसाद दिले गेले याची मिपाचा मालक या नात्याने मला अत्यंत शरम वाटते! मिपावर असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून थट्टा-मस्करीची लिमिटस् कुठे सुरू होतात, कुठे संपतात याची धुसर रेषा ओळखणार्या प्रमोदकाकांसारख्या ज्येष्ठ मिपाकराची संपादक या नात्याने मिपाला या क्षणी अत्यंत गरज आहे..
आणि म्हणूनच प्रमोदकाकांनी पुन्हा एकवार संपादक म्हणून काम पाहावे अशी त्यांना कळकळीची विनंती!
ते ती मान्य करोत अथवा न करोत, मी याच क्षणापासून मिपाच्या संपादकाचे अधिकार त्यांना बहाल करत आहे!
धन्यवाद,
--तात्या अभ्यंकर.
वाचन
27039
प्रतिक्रिया
0