कॉलेज मध्ये असताना मॅगीने वेड लावल होतं. (नाही हो मुली बद्दल नाही न्युडल्स बद्दल बोलतोय.) आमच्या सोमय्याच्या कँपस मध्ये मधोमध एक मॅगीच सेंटर होत.
२ रुपयाला कागदाच्या बशीत टिच भर गरमा गरम मॅगी मिळायची आणि जोडीला आसायची १ रुपयाची नेस्लेची गरमा गरम किंवा थंडगार कॉफी.
आर्ट्स आणि कॉमर्सची पोर पोरी सदान कदा तिकडे पडिक आसायची.
नुसत थंडगार पाणीच आसायच ती कॉफी म्हणजे. रंगाला थोड दुध आणि कॉफी फक्त वासापुरती . पण कोल्ड कॉफीच वेड लागल ते तिथुनच.
या वेडापायी मग घरच्या घरीच वेग वेगळे बदल करत गेलो.
गेल्या आठवड्यात घरी केलेली ही कोल्ड कॉफी.
साहित्य :
फुल क्रिम दुध,
साखर,
कॉफी,
असल्यास कंडेन्स मिल्क,
बर्फ,
मिक्सर/शेकर.
आईसक्रिम. (व्हॅनिला, बनाना कुठल्याही चवीचं )
चॉकलेट.
एका भांड्यात चॉकलेट वितळवुन घ्याव.
ज्या ग्लासमध्ये सर्व्ह करणार आसाल त्या ग्लास मध्ये वितळलेल्या चॉकलेटचे ओघळ सोडावे, आणि लगेच फ्रिज मध्ये ठेवावे.
मिक्सर मध्ये बर्फ क्रश (बारीक चुरा) करुन घ्यावा.
त्यात दुध्,साखर,आईसक्रिम,कॉफी,कंडेन्स मिल्क (असल्यास साखरेच प्रमाण कमी कराव) टाकुन चांगल फिरवुन घ्याव.
सर्व्ह करताना वरुन परत एक एक आईसक्रिम चा छोटा गोळा टाकावा.
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 3:21 pm | सहज
मिपाचे साकीया, आद्य गुरुदेव नाटक्या यांनी दिलेल्या चॉकलेट बनाना रेसीपीची आठवण झाली.
कोल्ड कॉफी, आइस्क्रीम भारीच हो गणपाशेठ!
11 Nov 2009 - 3:39 pm | पर्नल नेने मराठे
मस्त....
चुचु (बरिस्ताप्रेमी)
11 Nov 2009 - 4:44 pm | स्वाती२
व्वा! माझा आवडता प्रकार. पण आता उन्हाळा सुरू होई पर्यंत वाट पाहायला हवी.
11 Nov 2009 - 5:42 pm | रेवती
स्वातीताई२शी सहमत.
फोटो छान आलेत.
तुमच्या सौं.ची मुलाखत घेतली पाहिजे एकदा!
आपल्या पाककलेमुळे त्यांना आराम मिळत असणार.
नुसता पदार्थाला पदार्थ केलाय असं नाही तर आपण तो छान सजवूनही वाढता त्याचं कौतुक वाटतं.
रेवती
11 Nov 2009 - 5:09 pm | मदनबाण
व्वा... सॉलिट्ट्ट्ट !!!
मदनबाण.....
11 Nov 2009 - 5:12 pm | परिकथेतील राजकुमार
सुं द र !
गणपा शेठ दा जवाब नही.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Nov 2009 - 6:20 pm | फ्रॅक्चर बंड्या
सुंदर...
"१ रुपयाची" नेस्लेची गरमा गरम किंवा थंडगार कॉफी.
आता १० रुपये तरी लागतात...
फोटोमध्ये जरा तरुण दिसतोस ...पण जाम म्हातारा असावास (तुमच्या काळात १ रु. ला कॉफी ;) ) ...
11 Nov 2009 - 6:29 pm | आशिष सुर्वे
गणपा भाऊनी पुन्हा आघात केला! (गणपा ब्रो स्ट्राईक्स अगेन)
झकास.. तोंडाला कॉफी... माफ करा पाणी सुटले!
-
कोकणी फणस
11 Nov 2009 - 6:37 pm | वेताळ
आपला आवडते पेयपान आहे हे.
वेताळ
11 Nov 2009 - 7:05 pm | झकासराव
वाह!!!!!
गणपाशेठ कडे पाहुणचार झोडायची संधी मिळु दे रे देवा!!!!!!!!! :)
11 Nov 2009 - 7:14 pm | लवंगी
मस्त थंडीत गरमागरम वाफावलेली कॉफी पिण्याची मजा जशी और
तशीच रणरणत्या उन्हात थंडगार कोल्डकॉफी चाखत्-माखत जीव गार करण्याची मजाही आगळीच..
स्वातीताई म्हणते तशी अजुन ५-६ महिने वाट पहावी लागेल.. तोवर गरम्-गरम नेसकॅफे पिऊ..
11 Nov 2009 - 7:34 pm | सुबक ठेंगणी
आणि पुन्हा इथल्या दुधाला सायीचं वावडं आहे. त्यामुळे चवीत फरक पडेलच.
पण रेसिपी आणि फोटो नेहमीप्रमाणेच झकास! इथल्या थंडीतही कोल्ड कॉफीची तल्लफ आलीच त्यामुळे! :)
11 Nov 2009 - 8:48 pm | बाकरवडी
मस्तच!!!!
पुण्यात दुर्गाची कोल्ड कॉफी प्या, चांगली असते.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
11 Nov 2009 - 8:59 pm | आशिष सुर्वे
+१
अगदी अगदी..
गणपा म्हणजे आधुनिक बल्लवाचार्यच जणू..
काय गणपा येऊ का लागोसात??
'याम'ची भजी खायची खूप इच्छा झालीय ओ!!
-
कोकणी फणस
11 Nov 2009 - 10:10 pm | प्रभो
जियो.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
12 Nov 2009 - 12:46 am | प्राजु
बोलती बंद...!
वीक पॉईंट आहे अशी कॉफी.. :)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
12 Nov 2009 - 1:11 am | बिपिन कार्यकर्ते
अबे त्या दिवशी का नाही बनवली बे? आता मारे फोटो टाकून राह्यला मस्त मस्त तू!!! आम्ही पण मारली असती ना घोट घोट.
बाय द वे, तुझ्या रेस्टॉरंटचे काम कुठवर आले?
बिपिन कार्यकर्ते
12 Nov 2009 - 1:22 am | चतुरंग
अरे काय बाबा असा त्रास देतोस? जबराटच दिसते आहे कॉफी. ग्लास एकदम उचलून तोंडाला लावावेत असे वाटते आहे.
तुझ्या बायकोची मज्जा आहे पण असला सुगरण नवरा म्हणजे काय बोलावं!
(खुद के साथ बातां : ह्या गणपानं रेसिपी टाकली की त्या दिवशी लई बोलणी बसतात बुवा "साधा चहा सुद्धा नीट येत नाही!" म्हणून. काय करावं बरं? :?)
चतुरंग
12 Nov 2009 - 1:42 am | बिपिन कार्यकर्ते
शिंपल. गणपाच्या पाळतीवर राहू आपण आळीपाळीने. पाकृ आली रे आली की उडवायची. सरळ डिलिटच. नुसतं अप्रकाशित नाहीच. बोल, डील?
बिपिन कार्यकर्ते
12 Nov 2009 - 1:44 am | प्रभो
फक्त गणपा का बकिचे पण????
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
12 Nov 2009 - 1:52 am | चतुरंग
उगाच खरड बिरड टाकली असतीस तर आपला बेत गावभर झाला असता! ;)
डन डील!
(सुप्त संपादक)चतुरंग
12 Nov 2009 - 1:37 am | पाषाणभेद
काय भयानक माणूस आहेस रे गणपा तू!
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
12 Nov 2009 - 9:53 am | आशिष सुर्वे
>>
नका रे नका.. माझ्यासारख्या बकासुरांच्या पोटावर पाय देऊ नका!!
-
कोकणी फणस
12 Nov 2009 - 12:26 pm | मसक्कली
=P~ कोल्ड कॉफी 8>
कोण्त्याही सिजन मध्ये प्यायला तयार आहे... :D
>>>गणपाशेठ कडे पाहुणचार झोडायची संधी मिळु दे रे देवा!!!!!!!!!>>>हो खरच कधि बोलवता गणपाशेठ आमाला....वाट पाहतीये... :W
17 Nov 2009 - 7:24 pm | मॅन्ड्रेक
काफी टैम हो गया - कॉफी नहि पिया..
at and post : Xanadu.