असेच मनात आले...

एकशुन्य's picture
एकशुन्य in जनातलं, मनातलं
11 Nov 2009 - 12:56 am

रात्री टि.व्ही समोर बसुन जेवत असताना 'ब्रेकिंग न्युज' ही पाटी बघितली, 'सुनीता देशपांडे यांचे निधन'. हातातला घास गळ्यातल्या आवंढ्या बरोबर तसाच ढकलला. वाटलं. प्रत्येक घरातला 'नारायण',वर्तमानात असुन देखील भुतकाळात जगणारे 'हरितात्या', कोकणातला 'अंतु बर्वा' ही आणि अशी बरीच मंडळी आज खरोखर पोरकी
झाली.
जेव्हा पासून कॉमिक्स सोडून कादंबरी हा फक्त मोठ्यांसाठी असणारा प्रकार वाचू लागलो तेव्हा प्रथम हात लावलेली ' व्यक्ती आणि वल्ली ' ही एक. खरे म्हणजे
दहावीच्या पुस्तकात 'उपास' हा धडा म्हणुन जेव्हा वाचला तेव्हाच या लेखका बद्दल एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली आणि ती वाढीला लावण्यात ' व्यक्ती आणि वल्ली '
ने फार मोठा हातभार लावला. आजही हे पुस्तक माझ्या सारख्या असंख्य चाहत्यांच्या घरात असेल. 'पुराव्याने शाबीत करेन' :)
सुनीता ताई या पुलंच्या सावली म्हणून राहिल्या ..वावरल्या .पण पु.ल आणि सुनीता देशपांडे हे माझ्या मते वेगळे नव्हते , मला ते नेहमी एकच वाटत म्हणून जेव्हा पु.ल. गेले तेव्हा त्या लेखकाशी आपली नाळ जोडणारा एक तरी दुवा आहे यांत थोडे दु:ख हलके झाले होते.खरे तर सुनिता देशपांडे या एक संपुर्ण वेगळे व्यक्तीमत्व आहे.('होते ' लिहायला जमणार नाही.) पण ते कधी नव्या पिढीला दिसू दिले नाही, ह्यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो. म्हणून आजही पु.ल आणि सुनीता देशपांडे ही व्यक्तीमत्वे संपूर्ण मराठी समाजासाठी 'आहे' आणि ती कधीच 'होते' होणार नाहीत.
बर् याच वेळा वाटायचे त्यांना पत्र पाठवून त्या कुटुंबीयाबद्दलचा आदर ,आपुलकी व्यक्त करावी. त्यांच्या पुस्तकामुळे ,त्यातल्या मंडळींमूळे जगण्याकडे बघण्याचा नवा
द्रुश्टिकोन मिळला, आणि मिळत राहिल.पण आता ' नो रेसिपियंट' हा ठप्पा मारुन 'रुपाली'हून येनारे पत्र हातात घेववणार नाही. पण या देशपांडे कुटूंबियाविशयीचा आदर व्यक्त करायला पत्रच पाठवायला लागेल असे नाही.तसे न करता तो आहे आणि अनंत काळा साठी राहील.
जेव्हा जेव्हा त्यांचे लेखन वाचून हासू उमटेल, तेव्हा तेव्हा त्यांच्या आठवणींनी ओलावनार् या डोळ्यांद्वारे तो व्यक्त होईल.

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

पक्या's picture

11 Nov 2009 - 2:22 am | पक्या

छान प्रकटन.

-जय महाराष्ट्र , जय मराठी !

दिपक's picture

11 Nov 2009 - 11:02 am | दिपक

खरयं मित्रा !