गाभा:
चित्तोड चा राणा प्रताप अकबराकडुन पराभुत झाला. आयुष्यभर तो परागंदा होता.रानोमाळ भटकत त्याने स्वतन्त्र चित्तोड चे लढाइ चालु ठेवली जुलुमी सत्तेविरुद्ध त्यांचा लढा होता.....
गुरु गोविंद सिंग ज्याच्याशी लढले....ज्याच्या जुलुमी सत्तेविरुद्ध ते लढले तो अकबर द ग्रेट.......
मग राणा प्रताप कोण? गुरु गोविंद सिंग कोण? देशद्रोही?
प्रतिक्रिया
26 Mar 2008 - 2:33 pm | प्रियाली
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही.
जगात काहीच व्यक्तींना "द ग्रेट" या संबोधनाने संबोधले जाते.
जसे,
सायरस द ग्रेट
अलेक्झांडर द ग्रेट
अशोका द ग्रेट
कॅथरीन द ग्रेट
अकबर द ग्रेट
याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही. अकबराला शहनशाह ए आजमचा किताब होता. त्याचे भाषांतर पाश्चात्यांनी "द ग्रेट" असे केले असावे.
राणा प्रताप आणि गुरू गोविंद यांना त्यात खेचून देशद्रोहाची पदवी लागते का असे पाहणे अनावश्यक आहे.
26 Mar 2008 - 2:46 pm | विजुभाऊ
अकबर या फार्सी शब्दाचा अर्थ "द ग्रेट"
26 Mar 2008 - 2:50 pm | प्रियाली
तसे असल्यास त्याला इंग्रजांकडून "द ग्रेट" चा किताब लागणे शक्य आहे कारण शहनशाह ए आजममुळे झाले असते तर अकबर द ग्रेट आणि औरंगजेब द ग्रेटही व्हायला हवा.
पण, हे सर्व मुद्दे बिनकामाचे आहेत.
नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या प्रमाणे नाव ठेवण्याने किंवा नाव देण्याने व्यक्तीला लोक पारखत नाहीत.
26 Mar 2008 - 2:48 pm | विजुभाऊ
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय?
मला यावरुन नाना पाटेकरचा एक संवाद आठवला
तुम्हारे बडे होनेसे मै छोटा तो नही होता हुं
27 Mar 2008 - 3:03 am | अघळ पघळ
विजुभाऊ, हे बाकी बरं आहे हां!! वर प्रश्न पण तुच विचारलास आणि खाली उत्तर पण तूच दिलेस?? ह्या चर्चेतुन नक्की काय हवे आहे?
27 Mar 2008 - 2:11 pm | चित्तरंजन भट
याचे कारण या व्यक्ती तत्कालीन इतिहासात मोठ्या प्रदेशावर राज्य करून होत्या. त्यात त्या चांगल्या असण्याशी किंवा वाईट असण्याशी काहीएक संबंध नाही.
ह्या 'ग्रेटनेस' बाबत अशोक आणि अकबर दोन राजांची बरेचदा तुलना केली जाते. ह्या दोघांचे एका विशाल मोठ्या भूभागावर छत्र होते हे दोघांना महान म्हणण्यामागचे कारण नक्कीच नाही. (विजूभाऊ, अकबर हा शब्द अरबी आहे. कबीर आणि अकबर भाऊ भाऊ)
अकबरापेक्षा औरंगजेबाचे राज्य मोठे होते, असे वाटते. [मोगल साम्राज्याच्या अस्ताला औरंगजेबापासून सुरुवात झाली असे म्हणतात. मोगलांनी आपल्या साम्राज्याचा प्रचंड विस्तार केला, पण नंतर त्यांना त्याचे प्रशासन जमले नाही. व्यवस्था कोलमडून पडली. सरदार, सुभेदार हळूहळू जवळपास स्वतंत्र आणि शिरजोर होऊ लागले (हेच नंतर मराठ्याच्या इतिहासात झाले), वगैरे वगैरे अनेक कारणं असावीत, आहेत.]
ह्या दोघांचा मुत्सद्दीपणा, सर्व जातीजमातींना, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे धोरण (अशोकाचा 'धम्म' आणि अकबराचा दीन-ए-इलाही ) आदी अनेक गोष्टी त्या मागे असाव्यात, आहेत. अशोकाच्या साम्राज्यात खऱ्या अर्थाने मौर्य साम्राज्याची घडी (प्रशासकीय बिशासकीय) बसली आणि अकबराच्या काळात मोगल साम्राज्याची (अकबराचे महसूल प्रशासन वगैरे वगैरे). ही कारणे देखील असावीत.
चूभूद्याघ्या. तूर्तास एवढेच.
अवांतर:
इतिहास संशोधन हा काही आधीच निष्कर्ष काढून मग संशोधन करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा आणि जेहाद्यांचा प्रांत नाही. हसून दुर्लक्ष करावे! दुसरे काय?
27 Mar 2008 - 3:13 pm | प्रियाली
द ग्रेट ही उपाधी नेमकी का लागते ते कळत नाही कारण सायरस आणि अलेक्झांडरचे प्रशासन उत्कृष्ट नव्हते. या व्यक्तींना त्यांच्या इतिहासात "महान" संबोधले गेले (अनेक कारणांनी - राज्यविस्तार, प्रशासन इ. इ.) हे ही एक कारण असू शकेल. चू. भू. द्या. घ्या.
उत्तम सल्ला! तेच करते आहे. ;-)
26 Mar 2008 - 2:34 pm | सृष्टीलावण्या
अकबर द ग्रेट.....
मग हे वाचा.
>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
26 Mar 2008 - 2:40 pm | सृष्टीलावण्या
सनातन वाले म्हणतात :
५ हजार हिंदु स्त्रियांना जनानखान्यात ठेवणारा, ३० हजार हिंदूंची कत्तल करण्याचे आदेश देणारा व १७ हजार राजपूत स्त्रियांना जोहार करण्यास भाग पाडणारा अकबर चांगला व सहिष्णू कसा, हे प्रथम स्पष्ट करावे.
>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
26 Mar 2008 - 3:06 pm | विजुभाऊ
संबंध काय?
प्रेषक प्रियाली ( बुध, 03/26/2008 - 14:33) .
एखाद्याला "द ग्रेट" लावले म्हणजे त्याच्या विरुद्धार्थाने बाकीचे देशद्रोही होतात काय? म्हणजे हा ओढून ताणून आणलेला संबंध कळला नाही
प्रियाली ताइ तुमचा ईतिहास एक तर कच्चा तरी असावा अथवा उत्तर भारतातल्या भैय्यांच्या कडून तुम्ही ईतिहास शिकला असावा.
स्वराज्या साठी लढणारा एक एक मावळा ( इब्राहीम खान ( तोफखाने वाला)सुद्धा) हा देशप्रेमी होता.....स्वराज्याविरुद्ध लढणारा एक एक माणूस राष्ट्रद्रोही होता...अशा जयचंदांनी /खंडोजी खोपड्यानी / ह्रजोजी राजे महाडीकानी आपली भारत भू भरलेली आहे.
जलालाउद्दीन बाबर कोण तो कझाकिस्तान मधुन येतो काय आणि या खंडप्राय देशात राज्य करतो काय? सारे च नवल आहे.......
एक गोष्ट लक्षात घेतली तर याचा उलगडा होतो
आजही या देशात अकबर द ग्रेट या नावाचा जयघोष होतो त्यावर सिनेमा निघतो.
याच उत्तर भारतातल्या भैय्यांनी भारताच्या इतिहासात घोडचुका केलेल्या आहेत. त्यानी आमच्या शिवाजी ला किरकोळ लुटारु म्हण्टले आणि त्याचीच तळी उचलणार्या नेहरुनी लिहीलेला चुकीचा ईतिहासाचे आज आम्ही गोडवे गातो आणि अकबराला ग्रेट म्हणतो
26 Mar 2008 - 3:37 pm | प्रियाली
आपल्यासारख्या किंवा सनातन धर्मीयांसारख्या थोर इतिहासकारांची शिकवणी न मिळाल्याने माझा इतिहास कच्चाच राहीला. :))))))))
27 Mar 2008 - 11:25 am | जुना अभिजित
:-)
26 Mar 2008 - 4:26 pm | विजुभाऊ
तुम्ही खरे सांगता असे मी मानतो..पण हा ईतिहास आपल्या वाचनातच येत नाही...अन आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो.
माझा मूळ मुद्दा हाच आहे.....कोणतीही शहानीशा न करता आपण इतिहास स्वीकारतो.....
आपली बुद्धी आपण गहाण टाकतो.....
शूर वीर राजस्थान चे आपण कौतुक करतो....त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांचे इमारतींचे कौतुक करतो.पण आपण हे लक्षात घेत नाही की राजस्थानातील बरेचसे किल्ले टिकले आहेत ते न लढवले गेल्यामुळे च्..एखादा राणा प्रताप....चमकुन जातो...त्याचा चितोड्चा किल्ल त्याची राजधानी सुद्धा बदलते.....एखादा प्रुथ्वीराज चौहान्.त्याची राजधानी दिल्ली होती हे ही आपण विसरतो
एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे)
आणि कोणीतरी सांगितले म्हणुन अकबराला ग्रेट ठरवतो.....
नाही तरी देखल्या देवाला दंडवत घालणे हा आपल्या इथलाच वाग्् प्रचार आहे
26 Mar 2008 - 7:30 pm | llपुण्याचे पेशवेll
एक म्हणजे जेत्यानी इतिहास लिहीण्याची पद्धत आहे. त्यामुळे अकबर द ग्रेटच होणार. आणि आपल्या सारखी आंधळी मंडळी त्यालाच सत्य मानून, जो कोण अभ्यासपूर्ण विधाने करतो त्याला 'सनातन' वाले किंवा 'जातीयवादी' म्हणणार.
विजुभाऊ आपल्या मुद्द्यशी मी सहमत आहे.
पुण्याचे पेशवे
27 Mar 2008 - 6:40 am | विकेड बनी
>>एखादा शेर शहा सूरी त्याने त्याच्या केवळ ५ वर्षाच्या कारकीर्दीत भारताच्या व्यापार उदीमासाठी रस्ते बांधले हे ही आपण विसरतो ( तो शुद्ध भारतिय होता...मोघल नव्हे)
काय म्हणता? भारतीय होता का? मोघल कोण? ब्रिटिश का? मुसलमान कोण? परकीय का? नाही नाही, सगळे मुसलमान पाकिस्तानी.
हा तुमचा शेरशहा सुरी तर बिहारी होता. बिहारी म्हणजे भय्ये का? नाही नाही, बिहारी वेगळेच. भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. बिहारींनी नाही. चला तर मग एक मुखे शेर शहा सुरीला वंदन करू. अरेच्चा! पण तो तर उत्तर प्रदेशात राहीला होता.. हं हं! म्हणून तो काही भय्या नाही होत हं! तो तर पठाण, ते भय्ये साले हिंदू हो!
बिहारी आमच्या मतलबाचे असले तर भारतीय म्हणायचे नाहीतर परप्रांतिय. भय्यांचंही असंच हिंदू असले तर भय्यागिरी करतात, मुसलमान असले तर शेरशहा सुरी बनतात...काहीच नसले तर रामपुरी बनतात.
शेरशहा सुरीचं घराणं मूळ अफगाणिस्तानातलं होतं म्हणतात,अरे हो! पठाण होता पठठा...पण अफगाणिस्तान आपलाच. म्हणजे काय आपला शेरशहा सुरी तिथला ना. मोघल आपले नव्हते म्हणून अकबराचा जन्म पाकिस्तानात झाला, ह्यॅ ह्यॅ पाकिस्तान आपला कसा असू शकेल? मोघल आपले नाहीत, अफगाणि आपले.
>>आपण चुकीच्या विचारांचे गोडवे / चुकीच्या माणसांचे पवाडे गातो.......इतिहास विसरणार्याना ईतिहास पुन्हा अनुभवाने शिकावा लागतो अशा तर्जुम्याची आंग्ल म्हण ठाउक असेलच तुम्हाला अशी अपेक्षा करतो.
आजपासून या लोकांत तुमचीही गणती. अहो, शरण आलेल्या राजपुतांना, त्यांच्या बायका पोरांना दगा देणारा शेरशहा सुरी, त्याचे गुणगान तुम्ही इथे गायलेत.
देखल्या देवा नाही हो साक्षात तुम्हाला दंडवत विजूभाऊ!
विजूभाऊ द ग्रेट तुम्ही महान आहात!!
27 Mar 2008 - 3:28 pm | धम्मकलाडू
परतिसाद लय भारी.
शहमात हाये!!
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
26 Mar 2008 - 5:12 pm | प्रेमसाई
मित्रानो तो चुकुन म्हणाला असेल अकबर द ग्रेट त्याच मनाला लावुन घेउ नका
अकबर द ग्रेट होउ शकतो का?
26 Mar 2008 - 7:33 pm | अभिषेक पटवर्धन
Ithe mi vachalele thode sandharbha mala dyavese wattat. Abkar ha tyachya hindu sahishnutate baddal barach prasidhha aahe. Jya rajya chi bahunskhya praja hindu aahe ani jachya karacha (taxes) ek motha hissa hindu praje kadun yet aahe asa raja jar hindunprati sahishnu asel tar tyaat naval watanya joge kahi nahi. Pan jyacya rajyat bahusankhya praja musalman nahi, jyachya karacha agdi thoda hissa susha musalmankadun yet nahi, jyache mukhya sardar musalman nahit (kahi apavad wagalta) ashya shivchhatrapatini muslim sahishnu asana kautukachi bab aahe. (He vichar maze nasun Narhar Kurundakarache aahet. Pan mi tari yachyashi purna sahamat aahe)
Ata thodasa marathyan vishayi. Shivaji chya kalat jari marathe swatantrysathi ladhale tari peshwai chya kalat marathyanchi pratima chorala lajwel ashich hoti. Paishansathi konalahi gadiwar basavanare te marathe ashi prasiddhi shinde ani holkarani milavili hoti (panipatachya ladhait marathyana uttaretlya ekahi rajachi madat milali nahi yache ata aashcharya watayala nako).
Ani desha baddal mhanal tar tevachya eka tari satthechya manat Bharat desh ashi sadhi sankalpana tari hoti kay ya baddal mazya manat shanka aahe. deshdrihi asayala aadhi desh asayla hava nahi ka? jar Akabar ani Rana pratap yanche desh evgvegale astil tar te ekmekanche shatru hotil deshdrohi nahit
(Devanagari lipi tun na lihilyabaddal kshmaswa.)
26 Mar 2008 - 8:53 pm | चतुरंग
कळफलक सोपा आहे. चुका चालतात पण लिहिल्याशिवाय सुधारणा नाही.
अहो आपल्यासारख्या मराठी लोकांनी मराठी संकेतस्थळावर मराठीतून न लिहिणे म्हणजे त्या स्थळाचा अपमान आहे असे मी मानतो.
स्पष्ट प्रतिपादनाबद्दल राग नसावा. मिसळीची तर्री थोडी लागते कधीकधी!;)
चतुरंग
26 Mar 2008 - 10:02 pm | अभिषेक पटवर्धन
नक्की प्रयत्न करीन. लिहिताना वेळ थोडा कमी होता. पण आता नक्की लिहिन. क्शमस्व.
26 Mar 2008 - 10:36 pm | चतुरंग
शाबास!
चतुरंग
26 Mar 2008 - 11:47 pm | विसोबा खेचर
म्हणतो! शाब्बास रे अभिषेका!
तात्या.
27 Mar 2008 - 12:16 am | सर्वसाक्षी
अहो विजुभाऊ,
जर तुम्हाला निधर्मि, उदात्त विचारसरणीचे, पुरोगामी, सहिष्णु व ज्ञानी म्हणुन ओळखले जावेसे वाटत असेल, पुरस्कार, मान-सन्मान वगैरे हवे असतील तर अकबर, औरंगजेब, अल्लादिन खलजी वगरेंचे गुणगान सुरू करा! उगाच राणा प्रताप, गुरू गोविंदसिंगजी, शिवराय वगैरें संकुचित विचारसरणीच्या लोकांचे फालतु कौतुक करू नका. झालेच तर ज्ञानोबा, तुकोबा, रामदास स्वामी यांच्यातील काही वैगुण्ये शोधुन काढा. अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच! ज्याच्या बाजुने प्रत्यक्ष हिंदुस्थानी प्रजा कडाक्याने झुंजते आहे तो अकबर ग्रेटच असला पाहिजे की:))
इंग्रज सरकार किती न्यायी व दयाळु होते याचा गोडवा गाणारे काय कमी आहेत का? अहो झाशीवाली स्वार्थी होती, ती देशभक्त वगैरे नसून आपल्या गादीसाठी लढली; १८५७ चे प्रकरण म्हणजे स्वातंत्र्यसमर नसून केवळ काही शिपायांच्या असंतोषाचे परिणाम होते असे म्हणणारे महाभाग आपल्या देशात आहेतच.
आता चितोडच्या किल्ल्यावर पोटासाठी स्थलदर्शकाचे काम करणारे भले सांगोत की ' विलासी राजमहाल पाहायचे असतील तर जयपूरला जा! इथे पाहायला मिळतील ते उघडे पडलेले विदिर्ण भग्नावशेष, कारण इथला प्रत्येक वीर बरबाद होईपर्यंत लढला; आपल्या घरच्या स्त्रिया सम्राटांना भोगायला देउन महालात राहण्यापेक्षा इथले मेवाडी चितोड्-चितोड करीत लढत मेले'
27 Mar 2008 - 2:56 pm | विकेड बनी
>>अहो एवढे मोठे मोगल लिहुन गेले ते खोटे की काय? अकबर ग्रेटच!
काय म्हणता? मोगल अकबराला "ग्रेट" म्हणून गेले? त्यांना इंग्लिश येत होतं? वा! वा!! आमच्या "ईईईईई"तिहासविषयक सॉरी! भाषाविषयक ज्ञानात मोलाची भर हो!
27 Mar 2008 - 7:31 pm | llपुण्याचे पेशवेll
मोघलाना इंग्लिश नक्की येत असणार. नाहीतर आपल्या आत्ताच्या इतिहासकारानी त्यांची बाजू काय उगाच घेतली का? उद्या आपले इतिहासकार हे ही म्हणतील की मोघलाना काय पण अलेक्झांडर्(अलक्षेंद्राला) ला पण इंग्रजी येत होते. असे लिहील्याशिवाय निधर्मी भारतात पुरस्कार मिळत नाही.
पुण्याचे पेशवे
27 Mar 2008 - 4:38 am | झुमाक्ष (not verified)
१. अल्लाउद्दीन खिल्जी
२. शेरशहा सुरी
३. बाबर
४. अकबर
५. राणा प्रताप
६. औरंगजेब
७. शिवाजी (चुकलो! छत्रपती शिवाजी महाराऽऽऽज!!! की जय!!!!!!)
८. पेशवे
९. इंग्रज
१०. झांशीचीं राणीं
हम्म्म्म्... आपले बापूजी कोठें राहिलें बरें? त्यांनाहीं आणूयांत, म्हणजे भारताचां समग्र इतिहास (नव्हे, ईतिहास) इथेंच उरकून टांकूं!
(मध्ये भगतसिंगांनाही आणावयांस हरकत नसावीं. आणि झांशीचीं राणीं, भगतसिंग वगैरे 'द ग्रेट' म्हटल्यावर बापूजी आपोआपच 'व्हिलन', नव्हेंत कांय?)
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
27 Mar 2008 - 4:54 am | गृहिणि
असा (गैर)समज आहे कि अकबर हा सर्वधर्मसमभाव ह्या तत्वावर विश्वास ठेवणारा होता. कदाचित ह्या कारणास्तव त्याला अकबर द ग्रेट म्हंटले गेले. हा अत्यंत चुकिचा दृष्टिकोण नक्कि कोणि प्रचलित केला माहिति नाहि पण हा प्रचार खोटा आहे हे नक्कि. निपक्षपातिपणे फारतर एवढेच म्हणता येइल कि अकबराला सबंध भारत आपल्या अधिपत्याखालि आणायचा होता त्यासाठि त्यानि हिंदु आणि मुसलमान अश्या दोन्हि प्रकारच्या राजसत्तांवर हल्ले केले. पण एवढ्या जोरावर त्याला श्रेष्ठ समजायचे म्हणजे बुश साहेबांनि सद्दाम ला सत्तेवरुन दुर केले त्यामुळे ते थोर आहेत असे समजण्यासारखे आहे.
27 Mar 2008 - 5:32 am | धनश्रीदिनेश
i m sorry i tried to write in marathi but not able to write some words are difficult for me. marathi manoos khot pahuhi shakat nahi tasach pachau shakat nahi. he aapalya raktatach aahe. koni kiti aawaz kela tarihi AKBAR THE GREAT houch shakat nahi . he wisarun kas chalel JODHAAKBAR ha cinema marathi mansaans kadhala aahe, tyala ka underestimate karat aahot. he dusara koni kela aasat tar tyala bakichyani kiti uchalun dharala aasta. SHIVAJI MAHARAJ great hote , aahet karan tyani lokanchy manawar rajya kela , lokawar nahi . marathi asmita moden pan waknar nahi
MAZ MARATHIPAN MAZYA KARYATUN VYAKTA VHAWE DUSARYALA KHALIPANA DAKHAWNYAT NAHI
'' JAI MAHARASHTA ''
27 Mar 2008 - 6:59 am | चतुरंग
आपण माझी वरील प्रतिक्रीया वाचलेली दिसत नाही.
हे मराठी संकेतस्थळ आहे कृपया मराठीतून लिहा. मोडकेतोडके असले तरी चालेल.
चतुरंग
27 Mar 2008 - 9:14 am | प्रकाश घाटपांडे
चतुरंग म्हणतात त्या प्रमाणे टंकलेखन थोड्याशा सरावाने जमते. आपण रोज अर्धा तास कळफलकाशी खेळलात कि महिन्याच्या आत जमेल. प्रयत्न व सातत्य ठेवा.मला स्वतःला अजिबात टंकता येत नव्हते.
प्रकाश घाटपांडे
27 Mar 2008 - 11:31 am | विजुभाऊ
प्रियाली
प्राजु ने मला एक व्य नी पाठवले त्याला मी दिलेले उत्तर इथे पेस्ट करतो आहे.
मी तुमचा इतिहास कच्चा आहे असे म्हंटलेले नाही "कच्चा तरीअसावा असे" म्हंटले आहे .असो...
माझा मुद्दा होता अकबराला ग्रेट म्हणताना बाकी इतिहास सुद्धा लक्षात घेतला पाहीजे..........इतकेच
बाकी तुम्हाला मैत्रीण झकास मिळाली आहे.. नेट वर सुद्धा नेटाने भांडते तुमच्या साठी
प्राजु च्या व्य नीला माझे उत्तर..............
प्राजु सल्ल्याबद्दल धन्यवाद्...मला कोणाला नाव ठेवायचे नव्हते..मी फक्त आपण अकबराबद्दल आपण त्याला ग्रेट का म्हणतो असे विचारले होते.
त्याला प्रियाली ने खूपच कॅजुअल उत्तर दिले... अकबराला उगीचच मोठे केले जाते आणि ते तसे करताना आपण आपल्याच शूर योद्ध्याना विसरतो.असे मला म्हणायचे होते. अकबराला थोर म्हणायला माझी हरकत नाही ( तसे करणारा मी कोण)
आपण सगळेच जण चुकीचा इतिहास शिकतो कालांतराने तेच खरे वाटु लागते...
उदा: ताजमहाल मुमताझ च्या प्रेमाखातर बांधला...खरी गोष्ट अशी आहे की मुमताझ वयाच्या ३३व्या वर्षी मेली...३३ व्या वयापर्यन्त तीची १९ बाळंतपणे झाली( इतिहासात ही नोन्द आहे)..ती प्रथम बुर्हाणपुर मधे पुरली गेली. नन्तर तीच्या शवा ला ताझमहाल मधे पुरले गेले ( ?)
ते ही दुसर्या मजल्यावर ( कबर दुसर्या मजल्यावर्?. हे सुद्धा इतिहासात नमुद आहे)
दुसरे उदाहरण : छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात. थोरातांच्या कमळा या गोष्टीमुळे..तीने जीव दिला असेही सांगतात्...वस्तुस्थिती अशी आहे की.....छ. संभाजी महाराज १६९२ मधे मारले गेले.....पाचाड ला थोरातांच्या कमळा हीची समाधी आहे त्यावर तारीख आहे १६९८ ची....... हा इतिहास आपल्याला माहीतच नसतो.
माझे म्हणणे इतकेच की एखाद्याचे नाव सोन्या असले म्हणुन त्याला सोन्याचा पुतळा मानु नये....
परखड भाषेत सांगण्यामुळे आपल्या तसेच आपल्या मैत्रीणीच्या भावना दुखवल्या गेल्या असतील मी समजु शकतो.........
कळावे लोभ असावा...
विजुभाऊ
27 Mar 2008 - 2:03 pm | प्रियाली
प्राजु माझी मैत्रिण आहेच. तिने माझी बाजू उचलून धरली असणार तेव्हा तिला धन्यवाद.
माझ्या भावना अजिबात दुखावल्या गेलेल्या नाहीत. :-)
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली.
बाकी, चालू दे!
27 Mar 2008 - 2:33 pm | विजुभाऊ
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली......
मला या वाक्याचा खेद झाला.........असो.इतिहास हा इतिहास असतो.....
फक्त त्यावर कोणतेही मुलामे चढवु नयेत .अर्थात असा इतिहास दुर्मीळच....
चितोड गडावर असा एक विजय्स्तम्भ आहे. तिथे सती जोहार यांचा उदोउदो केलाजातो...अल्लाउद्दीन खिलजी ची कथा सांगतात ती पद्मिनी राणी चित्तोड मधे कधी नव्हती असेही सांगतात. खरे खोटे इतिहास जाणे.
तुमच्या बद्दल व्यक्तिगत कोणताही राग नाही.....
काही भावना दुखावल्या गेल्या असल्यास ते जाणतेपणाने /मुदद्दाम झाले नाही...
असो .............
27 Mar 2008 - 2:41 pm | प्रियाली
आँ! तो कशाबद्दल?
आता कितीवेळा सांगू की माझ्या भावना दुखावल्या गेल्या नाहीत? :-)
कृपया, माझ्या भावना इतक्या स्वस्त नाहीत की काही क्षुल्लक कारणाने दुखावल्या जाव्यात याची नोंद घ्यावी!
तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो!
27 Mar 2008 - 3:17 pm | विजुभाऊ
आपल्याशी इतिहास या विषयावर चर्चा वाढवण्यात फारसे हशील नाही इतकीच उपरती झाली......
मलाही........
तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो!
चला एकुण प्रकराणातुन विनोद निर्मिती झाली हे काय कमी आहे
...........प्रसंगी अखंडीत विनोदीत जावे
27 Mar 2008 - 3:21 pm | विसोबा खेचर
तात्या, हा प्रकार जरा जास्तच विनोदी होतोय हो!
अहो विजूभाऊ, मला इतिहासातलं काहीच समजत नाही, तेव्हा उगाच मला तुमच्यात खेचू नका. तुमचे विनोद चालू द्यात, आपल्याला का बी देणंघेणं नाही.. :)
आपला,
तात्या द ग्रेट!
27 Mar 2008 - 10:47 am | सृष्टीलावण्या
छ. संभाजी महाराज हे बदफैली होते..बाइल वेडे होते असे सांगतात.
कोणताही ऐदी आणि लंपट माणूस जिवंतपणी औरंग्याने त्यांचे जे हाल केले ते त्यांच्यासारखे हूं की चूं न करता सहन करू शकला नसता. मी वाचले की औरंग्याने त्यांची कातडी सोलली, डोळे काढले, हात छाटले इ.इ. (अर्थात माझ्या ह्या वाक्याला इथले स्वघोषित इतिहासकार पुरावा मागतील यात शंका नाही पण मी बाबासाहेब पुरंदर्यांकडे पुरावा न मागता त्यांच्या लेखनावर डोळे झाकून बिनदिक्कत विश्वास ठेवते).
>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
27 Mar 2008 - 12:44 pm | विजुभाऊ
तेजखान भाऊ
भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ...
हो केवळ मराठी लोकांचा नव्हे तर सार्या भारताचा.आजही ते तेच करतात्...रोजच्या बातम्या पहा...काय काय दिवे पाजळतात भय्ये पत्रकार ....
आजही ते छ. शिवाजी हे दख्खनचे लुटारु होते म्हणुन सांगतात. दिल्लीच्या लाल किल्ल्यात औरंगझेबा नन्तर चा काळ दाखवताना ते दिल्ली वर कधी मराठे लुटारुं सारखे हल्ले करायचे असेच सांगतात.( खरे तर मराठे पानपतात दिल्ली करांच्या रक्षणार्थ गेले होते)
नेहरुं " डिस्कवरी ऑफ ईंडीया" शिवाजी ला लुटारु ठरवतात आणि अजुनही उत्तरेमधे हेच शिकवतात
भय्यांनी मराठी लोकांचा इतिहास डागाळला. ......
हो.... बादशाह आणि त्यांचे नबाब यांची जी हुजुरी करण्यात हयात गेली त्या सर्वांची.........त्याना काय कळणार आमच्या व्यथा...
दिल्ली मधे औरंगझेब रोड असे नाव वाचल्यावर माझ्या डोक्यात क्षणभर तिढीक उठली होती....
ताजमहाल मधल्या बंद खोल्या का खुल्या करत नाहीत ते....पडकी बाबरी मशीद पाडताना शौर्य(?) दाखवणारे ही या बाबतीत गप्प रहातात?
मराठी वीरांबद्दल बोललो की मी संकुचीत प्रांतवादी ठरतो अन मोघलांचे गोडवे गाईले की मग चांगला ठरतो् हे असे का?
असा लाळ घोटे पणा न जमणारा.....आपला संकुचीत प्रांतवादी ....
...विजुभाऊ
27 Mar 2008 - 2:16 pm | मनस्वी
या बद्दल मलाही कुतुहल आहे.
संशोधनाच्या नजरेतून का बरे उघडता येउ नयेत.
हिंदुस्थानात राहून आपल्यालाच का संकोच वाटावा असे करण्यात.
27 Mar 2008 - 3:47 pm | धम्मकलाडू
नक्की कोणाला शिव्या द्यायच्या आहेत तुम्हाला विज्जुभाऊ? मुसलमान की भैय्ये की बिहारी की इंग्रज...
(विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
27 Mar 2008 - 6:09 pm | विसोबा खेचर
अवांतर -
(विज्जुभाउंचे प्रतिसाद वाचून डोक्याची मंडई झालेला) धम्मकलाडू
'डोक्याची मंडई होणे' हा वाक्प्रचार मनापासून आवडला! :)
असो, हे अवांतर होते, बाकी चालू द्या! इतिहास या विषयाचा आमचा नगण्य अभ्यास आहे..
तात्या.
27 Mar 2008 - 4:42 pm | विजुभाऊ
मत्प्रिय.धम्मकलाडवा: मुसलमान भैय्ये बिहारी इंग्रज...माझे या कोणा ही बद्दल काहीच म्हणणे नाही.
मी फक्त इतिहासाचा विपर्यास करण्याबद्दल लिहीले आहे...
मला तुझे म्हणणे पटते ...तुझ्या डोक्याची खरोखरच मंडै झाली आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
या बाद्दल विचारशील तर..
माझे वाचन चांगले आहे.....पगार ही चांगला आहे....
दोन्ही गोष्टी चांगल्या असल्यावर बोलायला हवेच की
27 Mar 2008 - 11:27 pm | धम्मकलाडू
मत्प्रिय विज्जुभाउ, कन्फर्म केल्याबद्दल धन्यवाद...
धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
27 Mar 2008 - 7:42 pm | आंबोळी
गेल्या १० -१२ प्रतिक्रिया ठळक अक्षरात लिहिल्याने तुम्ही लोक भान्डत आहात कि चर्चा करत आहात तेच कळत नाही.
इतिहासाचा विपर्यास करनार्यान्चा धिक्कार असो |
(इतिहास प्रेमी) आम्बोळी
27 Mar 2008 - 7:44 pm | आंबोळी
माझी प्रतिक्रियासुध्धा ठळक झाली.... पूर्व्परिक्षणात ति ठळक दिसत नाही.... तात्या/निलकान्त इकडे लक्ष द्या.....
27 Mar 2008 - 7:49 pm | llपुण्याचे पेशवेll
इतिहासाचा विपर्यास ही तर अगदी सामान्य गोष्ट आहे.
मराठी किल्ले पेशवाई पर्यंत एकदम व्यवस्थित होते. नंतर ते तोफा लावून ब्रिटीशांनी पाडले कारण, मराठी माणूस लढवय्या होता, दौलत लुटली गेली तरी किल्ल्यावर उपाशीपोटी राहून लढला असता. मुरारबाजीने लढवलेला 'पुरंदर' आणि त्याचा लढा या गोर्यांनी पाहीलेला होता.
अर्थात किल्ले पाडूनही साहेबाला काही फायदा झाला नाही कारण किल्ले नसलेल्या महाराष्ट्राने त्यानंतरही अनेक लढवय्ये निर्माण केले.
लो. टिळक, सावरकर, कान्हेरे, भाई कोतवाल इतरही अनेक हुतात्मे नावे घ्यावी तेवढी कमीच.
पण साहेबाने जाताना भारतीय लोकांचा बुध्दीभेद केला हेही तितकेच खरे. त्यामुळे आपल्या चांगल्या गोष्टी आपण अजूनही ओळखू शकलो नाही असे वाटते.
पुण्याचे पेशवे
27 Mar 2008 - 7:49 pm | विजुभाऊ
हा हा हा आजचा दिवस हा इतिहासात ठळक अक्षरात लिहीला जावा........
27 Mar 2008 - 7:50 pm | llपुण्याचे पेशवेll
माझाही प्रतिसाद ठळक आला आहे.
पुण्याचे पेशवे
27 Mar 2008 - 9:48 pm | सर्किट (not verified)
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले.
आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ?
- सर्किट
28 Mar 2008 - 9:56 am | विजुभाऊ
संभाजी राजे दिलेरखानाला मिळाले, आणि महाराजांविरुद्ध युद्ध केले.
आता संभाजी राजांना देशद्रोही म्हणावे का ?
इतिहास आठवा स्वतः थोरल्या आबासाहेबानी संभाजी राजाना एकुण ५ वेळा बादशहाच्या चाकरीत रुजु केले होते....संभाजी राजाना पंच हजारी मनसबदारी होती...
हो...स्वतः संभाजी राजाना सुधा त्या प्रसंगाबद्दल असे वाटत होते.....
पण सर्किट्राव तुम्ही तेंव्हाचा इतिहास आठवा..ताराबाइ काय राजकारण खेळल्या होत्या. संभाजी राजाना थोरल्या आबासाहेबांपासुन कसे दूर ठेवले जात होते. ताराबाइनी शिवाजी महाराजांचा म्रुत्युची बातमी सुद्धा संभाजी राजाना कळु नये याची तजवीज करुन ठेवली होती.....( वाचा संभाजी..विश्वास पाटील)
माझा मूळ मुद्दा हा आहे की उगाच एखाद्याचे उदात्तीकरण केले जाउ नये
27 Mar 2008 - 10:56 pm | सुधीर कांदळकर
अकबराचा डोळा होता असे एका नॉन हिंदुत्ववाद्याच्या पुस्तकात मी वाचले. परंतु प्रस्तुक लेखन कादंबरी होती व इतिहासाच्या दृष्टीने ग्राह्य पुरावा धरता येत नाही. प्रियालीताईंनी कृपया भाष्य करावे. अकबराबद्दल इतर कोणी उदा. पोर्तुगीज, डच, काय चांगले लिहिले आहे?
अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.
27 Mar 2008 - 11:18 pm | प्रियाली
डच, पोर्तुगीज लांब राहीले. खुद्द शिवाजीमहाराज अकबराला पुण्यश्लोक म्हणून गेले आहेत पण महाराज महाखोटारडे आणि त्यांच्यावर संशोधन करणारे कुरुंदकर खोटारडे आहेत. सनातन धर्मीच तेवढे खरे...तेव्हा मी काय बोलावं... इथल्या थोर संशोधकांत म्या पामराने गप्प राहीलेलच बरं!
28 Mar 2008 - 1:35 am | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा हा! प्रियालीताई तुमचे बोलणे मला विनोदी वाटले.
मग तसे पाहता महाराज, खुद्द अफझलखानाला पण "आपण वडील पण आम्हास आपले भय वाटते. त्यामुळे आपण आम्हास जावळीत भेटायला यावे" असे म्हणाले होते..
मग त्यामुळे अफझलखान थोर झाला?? का महाराज पळपुटे आणि घाबरट झाले...??? सांगा बरे?
ज्यात अकबराला महाराजानी पुण्यश्लोक म्हटले आहे ते पत्र अथवा त्याचा मसुदा आम्हास वाचायला मिळाला तर फार बरे होईल. कारण माझ्या माहीतीनुसार ते पत्र महाराजानी औरंगजेबाला पाठवले होते. आणि त्यात 'गरीब जनतेकडून कसला झिजिया कर उकळतोस मनगटात रग असेल तर आमच्या कडून तो उकळून दाखव' असे आव्हानही होते. त्यामुळे त्याबद्दल जरा जास्त माहिती दिलीत तर बरे होईल.
पुण्याचे पेशवे
28 Mar 2008 - 2:52 am | पान्डू हवालदार
इथे हिन्दुस्तान च्या इतिहासावर लिहिणारे किति लोक अमेरिकेत अणी अमेरिकन आहेत ...... आणि उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत आहेत?
...
'आपण कोर् डे पाशाण'
'चुभूद्याघा'
28 Mar 2008 - 3:00 am | llपुण्याचे पेशवेll
अमेरीकेत आणि अमेरीकन इथे याचा काय संबंध.. उद्या एखादा अमेरीकन माणूस जर शिवाजी महाराजाना गुणी, पुण्यश्लोक राजा म्हणला तर आपण काय त्याला शिव्या घालणार आहात का?
जर तो उगाच अर्धवट माहीतीच्या आधारावर महाराजाना वाईट म्हणत असेत तर त्याला फोडून काढणे ठीक आहे.
इथे कोणी उगिचच 'पर् कियान्ना' नावे ठेवत नावे ठेवत नाहीये.
आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले...
उगाच आपण संबंध नसलेली विधाने करून चर्चेचा रोख का बदलत आहात?
पुण्याचे पेशवे
28 Mar 2008 - 3:06 am | इनोबा म्हणे
आणि हो आम्ही कोरडे पाषाण आहोत सह्याद्रिचे कोरडे पाषाणकडे ज्यानी शिवराय आणि त्यांचे किल्ले स्वतःचा शिरावर धारण केले...
ह्याला म्हणतात प्रतिसाद...
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
28 Mar 2008 - 2:55 am | पान्डू हवालदार
आणी हो .. अक्बर वाज द ग्रेट .. आणी इग्र च देखिल .. :)
28 Mar 2008 - 3:10 am | इनोबा म्हणे
नक्कीच्...आपले पूर्वज आपल्याला महान तर वाटणारच.
आम्ही मराठ्यांचे वंशज असल्याने आम्हाला मराठे जसे महान वाटतात तसेच.
(तुकोबाचा वारकरी-शिवबाचा धारकरी)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
28 Mar 2008 - 3:22 am | पान्डू हवालदार
महान असणॅ अनि महान वाट्णे ह्यात फर् क नक्किच आहे :)
वाटणॅ = स्वता साथी
अस् णॅ = इतिहास गवाह आहे
;)
28 Mar 2008 - 3:34 am | इनोबा म्हणे
इतिहास गवाह आहे
ह्याला म्हणतात पूर्वजांचा अभिमान्.(एकदम खुदा गवाहची आठवण झाली)
तो इतिहास कुणी लिहीला हो! महाराष्ट्राच्या इतिहासात तर मराठेच महान आहेत. हा आता पाकीस्तानचा इतिहास आम्ही वाचला नाही.(अकबर त्यांचा बाप आणि इंग्रज त्यांचा तारणहार-त्यामुळे ते दोघेही त्यांना महान वाटणार यात शंका नाही.)
इंग्रजांनी कुणाला महान म्हटले म्हणून आम्हीही म्हणावे की काय? आणि इंग्रज महान असतील तर अशा इंग्रजांना उगाचच आपण आपल्या देशातून हाकलले.
छ्या! ह्या लोकमान्य टिळकांना,स्वा.सावरकरांना,भगतसिंग्-सुखदेव-राजगुरु ह्यांना काही अक्कलच नव्हती म्हणायची.आणि हो,बापूजी राहीले की!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
28 Mar 2008 - 3:41 am | पान्डू हवालदार
"इंग्रज महान असतील तर अशा इंग्रजांना उगाचच आपण आपल्या देशातून हाकलले"
हाकलले कि कटाळून परत गेले ;) .... परत इतिहास कोण् ता खरा :)
28 Mar 2008 - 3:50 am | इनोबा म्हणे
बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते.
बाकी काही म्हणा,इंग्रजांचा इतिहास तेवढा खरा. बाकी साले सगळे फेकू.काफीर कुठले!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
28 Mar 2008 - 4:20 am | llपुण्याचे पेशवेll
बरोबर आहे,पांडूखान. १५० वर्ष राज्य केल्यानंतर आणि हवं ते लूटून झाल्यानंतर कंटाळतील नाहीतर काय होईल. खरंतर आपण होतं नव्हतं ते आधीच द्यायला हवं होतं.बिचारे एवढ्या लांबून आपल्यासाठी आले होते,जरा लवकर तरी घरी गेले असते
हे मात्र खरे. पण त्यानी इथे येऊन आपल्याला किती चांगल्या गोष्टी शिकविल्या. इतिहास शिकवला, त्यांची थोर संस्कॄती आपल्याला शिकविली. जाऊदे आपल्याला शिवाजी महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू.
आमेन...
पुण्याचे पेशवे
28 Mar 2008 - 4:24 am | विकेड बनी
>>महाराजानी लिहीलेली पत्रे वगैरे नाही कळणार त्यापेक्षा आपण जेम्स लेन याचे पुस्तक वाचू, अकबराच्या नावाने दर्ग्यावर चादर चढवू, झालेच तर पोर्तुगिज चर्च मधे जाऊन इंग्रजी राज्य परत यावे म्हणून प्रार्थना करू.
आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये. कारण महाराजांचे पत्र तुला मिळाले तर तू म्हणणार ते जेम्स लेनने ढापून बदललं होतं. अरे तू पडलास "पुण्याचा पेशवा" आणि काय असणार तुझ्याजवळ?
28 Mar 2008 - 4:38 am | llपुण्याचे पेशवेll
हो का तेजराव.
आता कसं शहाण्यासारखं बोललास? आपल्याला जे कळत नाही तिथे बडबड करू नये.
हा सल्ला आपण पहीले आचरणात आणा. नुसते नावानेच तेज वाटता डोके मात्र निस्तेजच वाटते आहे तुमचे... :)
पुण्याचे पेशवे
28 Mar 2008 - 11:15 am | इनोबा म्हणे
नुसते नावानेच तेज वाटता डोके मात्र निस्तेजच वाटते आहे तुमचे... :)
हा हा हा :)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
28 Mar 2008 - 11:52 am | धमाल मुलगा
आई जगद॑बे...हे काय चालल॑य काय नक्की?
अरे कोण कुठला अकबर तो, शतकानुशतका॑पुर्वी होऊन गेला..
असेलही तो ग्रेट..कि॑वा असेल हलकट! अरे पण माझ्या राजा॑हो, त्याच्या गाडलेल्या मुडद्यावरुन किती आगडो॑ब उसळवताय रे!
एक मात्र खर॑, आम्हा मराठीया॑च्या नशिबी हा दुहीचा रोग कायमचा.
चर्चा जरुर करा, पण भान सोडून एकमेका॑वर वैयक्तिक पातळीला जाऊन का भा॑डता? "हे तुला कळेल का...अन् ते तुला समजेल का" काय हे तेजराव? जशी तुमची मत॑ आहेत...अगदी लिखित ईतिहासाला धरुन असतीलही, पण तशीच इतरा॑नाही त्या॑ची मत॑ आहेतच ना?
अरे जरा एकमेका॑च्या मता॑चा आदर ठेवा रे!
गेले काही दिवस बघतोय, कोणाची दृष्ट लागलीये कोण जाणे, जो उठतो तो हमरीतुमरीवर येतोय...का रे बाबा॑नो (आणि बाया॑नो सुद्धा)? इतके दिवस कसे छान वागत होता सगळेजण...
हात जोडून सगळ्या॑ना एकच विन॑ती करतो रे, नका भा॑डू. अरे बघवत नाही रे अस॑!
तात्या जरा धो॑डोप॑ता॑शी बोलून बघा बॉ, मिपाला आणि गावकर्या॑ना ही कसली बाधा झालीये!
असो, कळकळ वाटते म्हणून पोटतिडिकीन॑ बोललो. तेजराव, वैयक्तिक तुमच्यावर शरस॑धान करायच॑ नव्हत॑ ! स॑दर्भामुळे आल॑.. माफ करा !
आई जगद॑बे सगळ्या॑ना सुबुद्धी दे!..आमच॑ मिपा पुन्हा हसत॑-खेळत॑ होऊ दे ग॑ !!!!
आपलाच,
- (व्यथित) ध मा ल.
28 Mar 2008 - 12:23 pm | विजुभाऊ
धमाल्या
आपण विषय कोणता मांडतो आणि लोक त्याला काय प्रतिसाद देतात हेच कळेनासे झाले मला.
कोणाचेही चुकीचे उदात्तीकरण करु नये हे माझे म्हणणे होते. त्यावर चांगली चर्चा होउन काहीतरी ज्ञान मिळेल असे मला वाटले होते
त्यावर मला.... तुझे वाचन किती... तुझा पगार किती.....असे प्रश्न विचारले गेले...थोडी थट्टा थोडी मस्ती चालते नव्हे ती काही वेळा अपेक्षीत असते...लहान मूल नाही का तसे करत....पण त्यालाही काही सुमार ? तुझे वाचन किती... तुझा पगार किती याचा विषयाशी काय संबंध मला तरी नाही कळाले... बाल बुद्धी असेल असे समजुन मी दुर्लक्ष केले.....
पण या विषयावर मी का चर्चा सुरु केली मला हाच प्रश्न पडला आहे.. मिपा वर अभ्यासु सदस्य आहेत असा माझा समज आहे...(तो तसा राहीलही.)
महाजालावर चर्चासत्र सुरु करणे सोपे असते पण बंद करणे अवघड असते..
पण असे एकेरीवर आणणारे ,विषयाशी अजिबात संबंध नसणारे मूर्खा सारखे प्रतिसाद येणार असतील तर ही चर्चा बंद करणे चांगले
किंबहुना अशी चर्चा सुरुच करायची नाही असे मला वाटायला लागले आहे.
वादे वादे जायते तत्वबोधः हे मला ठाउक होते......वादे वादे जायते कंठशोषः हे नव्याने कळले........
आपण हा धागा बंद करुया............