मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'अग तारा गाव झोपलाय सारा'

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'अग तारा गाव झोपलाय सारा' हे गीत श्री. प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या दमदार आवाजात गायलेले आहे. गीतकार आपल्या ताराला 'आता रात्रीचे बारा वाजलेत व सारा गाव झोपलाय' असे सुचवतो. हे गाणे ऐकून काही मंडळी आपली नाके मुरडतील पण जनसामान्यांना असलीच गाणी आवडतात व जनसामान्यांचीच संख्या जास्त आहे. दुर्बोध, र ला र ट ला ट टाईप कवितांपेक्षा त्यांना असलीच डोक्याला ताप न देणारी गाणी आवडतात. आपल्यापैकी कुणाला अशी आवड असेल व हे गीत त्यांच्या संग्रही असेल तर ते आपण येथे द्यावे जेणेकरून 'सर्वसामान्यांच्या' गाण्याच्या खजीन्यात एक भर पडेल. तसेच या गीताचे गीतकार कोण आहेत ते पण येथे समजले व आपल्या गीताबाबत मिपावर चर्चा चालू आहे हे त्या गीतकाराला समजले तर त्या गीतकारास आनंद होईल.

वाचन 6455 प्रतिक्रिया 0