श्रावण मोडकांची मुक्तिदाता वाचुन हे काही तरी मोडकं तोडकं ;)
प्र-भाव, तर्र, बोळा
देशी, विदेशी, वारुणी!
बालांच्या कल्लोळात,
इंद्रियांच्या अविष्कारातही
उच्चाराच्या अपेक्षेत,
उद्गाराच्या प्रतीक्षेतही
तराठलेल्या डोळ्यांत,
जडावलेल्या पापण्यांतही
विरलेल्या विस्मृतीत,
दाटलेल्या आठवणींतही
सुन्न एकटेपणात,
समुहांच्या दाट गर्दीतही,
सकाळी दुपारी,
संध्याकाळी रात्रीही
भरलेल्या मद्यालयात,
आभास अन् अस्तित्त्वाचा
आसक्त मुक्तिपावक
टुल्लतराठ बेवडा
प्रतिक्रिया
31 Oct 2009 - 6:31 pm | मराठमोळा
:(
नाही जमलं, मजा नाही आली.
माझ्या मते विडंबन तेव्हाच चांगलं जमू शकतं जेव्हा मूळ कविता व्यवस्थित समजलेली असते. ;)
मूळ कविता ही कवीच्या संमिश्र भावनांनी बनलेली आहे असे मला वाटते.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
1 Nov 2009 - 12:14 pm | चेतन
ज्याची त्याची आवड
माझ्या मते प्रतिक्रिया तेव्हाच जमू शकतं जेव्हा लिहलेलं व्यवस्थित समजलेल असतं (ह. घे.) ;)
धन्यवाद मराठ्मोळ्या
चेतन
अवांतरः हे विडंबन ही कवीच्या संमिश्र भावनांनी बनलेलं नाही