मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न

मस्तानी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ! शाळेत असताना लिहावे लागलेले निबंध यापलीकडे लिखाण न केलेली मी ... पण गेले काही दिवस नियमितपणे मिपावर बागडत असते, त्यामुळे "मी सुद्धा लिहू शकेन" असा काहीसा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. तो वापरूनच आज हे धाडस करीत आहे. बघू कसं काय आणि कितपत जमतंय ते ! आम्ही सध्या आहोत अमेरिकेतल्या मिशिगन राज्यात. एकाच हिमवादळात चांगला फुट- २ फुट बर्फ आणणारा हिवाळा आणि कायम शून्याखाली तापमान अशी थंडी चालू होण्याआधी अधाशासारखे फिरून घेणारे लोक आहेत इथे ... २/३ हिवाळे पाहील्याने आम्हीही "आधीच" एखाद्या ठिकाणी जाऊ असा विचार केला. बरं, एक ठिकाण ऐकून माहित होत. Pictured Rocks National Lakeshore. ७ तास जायला न ७ तास परतीच्या प्रवासाला. तरीही शनिवार - रविवार मध्येच जाऊन यायचंच असा चंग बांधला. म्हणजे, चंग मी बांधला आणि तास-न-तास गाडी चालवण्याची जबाबदारी नवऱ्यावर सोपवून मोकळी झाले. तर हे Pictured Rocks म्हणजे मिशिगनच्या पार वरच्या टोकाला. मिशिगनची भूमी दोन भागांत विभागली गेली आहे. मला 'peninsula' ला नेमका मराठी प्रतिशब्द माहित नाही. त्यामुळे मी 'Upper Peninsula' ला सरळ "वरचं मिशिगन" म्हणतेय. अमेरिकेच्या या दक्षिण-पूर्व भागात पाच (भले) मोठे तलाव आहेत. इतके मोठे की समुद्राचीच आठवण यावी. पण तरीही गोडं पाणी ... तर या पाच तलावांपैकी एक म्हणजे सुपेरीअर (बाकीचे चार - मिशिगन, एरी, ह्युरोन, ओंटारियो). याच सुपेरीअर तलावाच्या किनारी आहेत हे Pictured Rocks. Image removed. यापुढची "चित्तरकथा" ... चित्रांच्या सहाय्याने कथा ... म्हणतात ना एक चित्र लाख शब्दांचं काम करून जात, तसंच काहिसं ! खालचं आणि वरचं मिशिगन जोडणारा - २००७ साली पन्नाशी गाठलेला हाच तो, मॅकिनाव ब्रिज. Image removed. जवळ जवळ सव्वा पाचशे फूट उंची आहे या ब्रिजची. Image removed. Image removed. हे इथलं यूपी :) Image removed. Image removed. इथून साधारण तीन तासांची बोटीची सफर होती. या अशा बोटीतून ... Image removed. "ग्रॅन्ड आयलन्ड" बेटावरचे जुने लाईट हाउस ... Image removed. पाण्यात कोसळलेले कडे Image removed. Image removed. इन्द्रधनुसम रंगीबेरंगी Image removed. वेगवेगळ्या खनिजांचा हजारो वर्षांपासून दडलेला खजाना Image removed. Image removed. निसर्गाची किमया - वारा आणि पाणी यांचा मारा सहन करत करत या दगडांनी काय काय म्हणून रूपे धारण केली आहेत बघा Image removed. Image removed. Image removed. याला नाव दिलं आहे "युद्धनौका" Image removed. याला म्हणतात "इंद्रधनूची गुहा" Image removed. Image removed. आणि हा म्हणे "तुटलेला फ्लावरपॉट" Image removed. एकला जीव सदाशिव "तग धरून राहणे" याच याहून चांगला उदाहरण कधी पाहिलंय का ? या झाडाची मुळ अक्षरशः अधांतरी आहेत कारण त्यांना आधार देणारी कमान ४०/५० वर्षांपूर्वी 'पडली' पाण्यात ... Image removed. निळशार - हिरवगार पाणी Image removed. साधारण ७०/८० फूट उंचीवरून घेतलेली छायाचित्र Image removed. Image removed. Image removed. Image removed. अथांग पसरलेला सुपेरीअर तलाव Image removed. Image removed. याच बोटीवरून सफर घडली होती आम्हाला Image removed. हे सारं नैसर्गिक सौंदर्य आठवणींचा एक अनमोल खजिना देऊन गेलं. या सहलीत सहज जाता येता टिपलेले क्षण ... Image removed. Image removed. Image removed. Image removed. तुम्हा सर्वांना ही छायाचित्रे आवडतील अशी अपेक्षा करते !

वाचन 11030 प्रतिक्रिया 0