मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"याच साठी का केला होता अटटाहास".......

अनामिका · · काथ्याकूट
सध्या ठाकरे बंधुंमधे जी वर्चस्वाची लढाई सुरु आहे आणि त्यानिमित्ताने विधानसभा निवडणु़कीत उमेदवारांचा प्रचार करताना उपलब्धहोणारे व्यासपिठ हा जणु एखाद्या तमाशातील फड आहे ..................व सभांना उपस्थित असणारी जनता ही फेटे उडवुन दाद देणारी व नेहमीच बारिला हजेरी लावणारे रसिकजन आहेत अश्या थाटात ठाकरे द्वयींचा कलगीतुरा सुरु आहे .......दोघांनी नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा सोडुन एकमेकांची उणिदुणि ,उखाळ्यापाखाळ्या,कुलंगडि बाहेर काढत तमाम महाराष्ट्रातील मराठी जनतेला व सत्तारुढ पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एक करमणु़कीच साधन उपलब्ध करुन दिलय?आणि त्यांचीच गादी त्यांचे समर्थक म्हणवणारे देखिल चालवतायत हेच इतर नेत्यांच्या वक्तव्या वरुन स्पष्ट होतय.......तिथे राजने राजु परुळेकरांना हाताशी धरुन लोकसत्तामार्फत उद्धवच चारित्र्यहनन चालवलय आणि इथे उद्धव घरचेच असलेल्या संजय राऊतांना हाताशी धरुन सामनामधुन रोज मुलाखती छापुन आणत आहे..........त्या आघाडिच्या नेत्यांनी प्रचार करायची देखिल गरज नाही खरे तर ?त्यांना विनासायासच पुन्हा पाच वर्ष सत्ता भोगायला व खुर्च्या उबवत महाराष्ट्राला पारच रसातळाला नेण्याची संधी या दोन्ही सेना व त्यांचे प्रमुख मिळवुन देणारच आहेत तेंव्हा चिंता नसावी......... वाईट वाटतय ते बाळासाहेबांच व सेना घडविण्यात अपार कष्ट घेत योगदान देणार्‍या त्यांच्या शिलेदारांच व अखेरचा श्वास देखिल सेनेवर निष्ठा ठेउन घेतलेल्या आनंद दिघे,साबिर शेख,दत्ताजी साळवी, यासारख्या मातब्बर नेत्यांच.................वर स्वर्गात देखिल हे शिलेदार या अंगाखांद्यावर वाढवलेल्या दोन पोरांचा रंगलेला कलगीतुरा बघुन अशृ ढाळत असतील व बाळासाहेबांसारखेच कदाचित ते देखिल म्हणत असतील "याच साठी का केला होता अटटाहास"....... मरण होतय आमच्यासारख्या सेनेवर बाळासाहेबांवर ,उध्दव राजवर नि:स्वार्थी निस्पृह व मनापासुन प्रेम करणार्‍यांच......ज्यांनी सेना घडताना बघितली व त्याच बरोबर ते देखिल घडत गेलेत अश्यांच दु:ख या नव्याने समर्थक बनलेल्यांना नाही कळायच हेच खर! जय हिंद! जय महाराष्ट्र!

वाचन 11702 प्रतिक्रिया 0