मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक नवा प्रस्ताव मांडू इच्छितो!

सुधीर काळे · · काथ्याकूट
सर्वश्री तात्यासाहेब, विकास, चतुरंग, बिपिन व इतर मिपा मॅनेजमेंटचे सदस्यः (इतरांची नावें अद्याप माहीत नाहींत) मी एक प्रस्ताव मांडू इच्छितो. बर्‍याचदा आपल्या वाचनात एकादी झकास ललितकलेतली गोष्ट येते; ते व्यंगचित्र असेल किंवा एकादा आंग्ल भाषेतला लेख असेल किंवा कविता असेल. ती प्रस्तुतकर्त्याने लिहिलेली नसेल, अमराठी असेल, पण त्याला/तिला ती मिपावरील सभासदांना सांगण्यायोग्य वाटत असेल तर आज मिपावर अशी कांहीं सोय नाहीं. उदा: जेंव्हा ए. आर. रहमान यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले त्यावेळी एका पाकिस्तानी विचारवंताने/प्राध्यापकाने एका पाकिस्तानी वृत्तपत्रात लिहिलेला एक अतीशय सुंदर लेख माझ्या वाचनात आला. तो इतका टॉपर आहे की तो मला सांगितल्याशिवाय रहावत नाहीं. मी तसाच विनापरवाना चढवला तर आपण नाराज व्हाल. एक तर तो इंग्रजी भाषेतला आहे व मी लिहिलेला नाही! मग काय करायचे? काल "सहज"साहेबांनी एक मस्त लेख माझ्या 'खव'वर पाठविला. आपली अतिरेक्यांविरुद्धची "तयारी" किती बेगडी आहे हा विषय होता. हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा. पण तो सहजसाहेबांनी लिहिलेला नाहीं व वर आंग्ल भाषेतला आहे. मग काय त्या लेखापासून मिपावाल्यांना वंचित करायचे? असे होऊ नये असे मला प्रमाणिकपणे वाटते. माझा असा प्रस्ताव आहे कीं आणखी एक लेखनप्रकार (category) निर्माण करावा. त्याला आपण "तात्पुरता" किंवा "क्षणिक" "बुलेटिन बोर्ड" किंवा "Transit Lounge" असे नाव देऊ. तिथे आज "वर्ज्य" असलेल्या गोष्टी (इतर कुणी लिहिलेले लेख, स्वतः किंलेखैतरांनी लिहिलेले मराठीतर भाषेतले साहित्य, व्यंगचित्रे वगैरे) "चढवू" द्याव्यात व त्या ४८ किंवा ७२ तासांनंतर आपोआप नाहींशा कराव्यात किंवा ज्याने प्रस्तुत केल्या त्याला डिलीट करू द्याव्यात. (शक्यतो स्वयंचलित पद्धत बनवावी). असे केल्यास सभासदांचा खूप फायदा होईल अशी मला खात्री आहे. पहा पटते का! इतर मिपाकरांनीही आपली मतें नोंदवावीत. सुधीर काळे

वाचन 12355 प्रतिक्रिया 0