अत्तर

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
18 Sep 2009 - 4:38 pm

सरती संध्याकाळ, प्लॅट्फॉर्म नंबर चार,
आंबलेली तनु, तीने लोटली खाली.

निमुळता जीना. शोधक त्या नजरा,
हातातली पिशवी, तीने छातीशी नेली.

सुटे हाताचा आधार, टोचती अंगार,
स्पर्शाची जाणीव, तीला सोडुनीया गेली.

मनातला आक्रोश, कसा शरीराचा वापर,
ऊपाशी गिधाडांना, तीने अन्नदान केले.

उसवले शरीर, गेले लाजेचेही भाव,
ऊचलुन पावले, ती बाहेरही आली.

घरी येता मग, उभि पाण्याखाली न्हाली,
त्वचेवरची विषे , तीने जाताना पाहिली.

इतक्यात दरवळ, आला मोगर्‍याला बहर,
जाणीवांचे द्वार, तीने ऊघडुन दीले.

अनाम हुरहुर, झाली स्पर्शाला आतुर,
अत्तराची कुपी, तीने जपुन आणली.

मुक्तक

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

18 Sep 2009 - 4:46 pm | श्रावण मोडक

वाचाविशी कविता.

बेसनलाडू's picture

18 Sep 2009 - 8:58 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

सुरेख कविता !!!

विशाल कुलकर्णी's picture

18 Sep 2009 - 5:30 pm | विशाल कुलकर्णी

मस्त ! पुलेशु ....

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

शैलेन्द्र's picture

18 Sep 2009 - 8:36 pm | शैलेन्द्र

आभार.

The great pleasure in life is doing what people say you cannot do