भक्तिभाव आणि काही प्रश्न
लेखनप्रकार
सध्या गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि संपूर्ण जोशात चालू आहे.
आपण दररोज पेपरात आणि टीव्हीवर लालबागच्या राजाच्या विक्रमी गर्दीच्या बातम्या वाचतो. लोकं २०-२२-२४ तास रांगा लावून मुलाबाळांना घेऊन दर्शनासाठी ताटकळत उभे राह्तात. त्यातुन निर्माण होणार्या समस्यांचा (सामाजिक आणि वैयक्तिक) लोकं विचार करतात का? एवढा वेळ गर्दीत उभे राहील्याने मुलाबाळांचे जे हाल होतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे ती बरी व्हावित म्हणुन पुन्हा एक नवस. आणि मग हे चक्र संपत नाही. शिवाय सुरक्षा यंत्रणेवर जो ताण पडतो. तो वेगळाच.
भक्तिभाव मलाही मान्य आहे. पण हा भक्तिभावाचा अतिरेक नाही का? आजकाल लालबागच्या राजाचे दर्शन मिळणं म्हणजे prestige issue झाला आहे.
तुम्हाला काय वाटते?
क्रुपया लक्षात घ्या मी परमेश्वराच्या ( व पर्यायाने राजाच्या) विरोधात नाही. फक्त ही अतिरेकी श्रध्दा मला अनाकलनीय आहे. ह्यात कुणाच्याही भावना दुखावायचा हेतु नाही.
वाचन
2905
प्रतिक्रिया
0