आमच्या सार्वजनीक गणपतीची आरास आम्ही अशी केली.
छाया. १ तुकाराम महाराज सदेह स्वर्गात जात आहेत.
साधीशीच आहे. मागे तुकाराम महाराज सदेह स्वर्गात जात आहेत असा हलता देखावा आहे. गरूडाचे पंख, तुकारामांचे हात व मान हालते आहे. आजुबाजूला तुकाराम महाराजांचे केलेले अभंग, चित्रे पेंटरने (चित्रे हे पेंटरचे आडनाव नव्हे, ते बनकर आहे) काढलेले आहेत, समोर प्रसन्न श्री गणेश मूर्ती आहे.
छाया. तुकारामांचे अभंग
छाया. श्रींची मुर्ती
पुजेचा तांब्या मात्र पहिल्याच दिवशी चोरीला गेला. काय पण चोर असतात. देवाच्या ठिकाणीही चोरी करतात.
तुमच्याकडे कसली आरास आहे की दुसरी काही स्पेशल?
तुमच्या सार्वजनीक गणेशोत्सवाची श्री गणपती ची मूर्ती कशी आहे? तुम्ही आरास कशी केलीत?
इथे फोटो टाकू शकलात तर तुमचा सार्वजनीक गणेशोत्सव उत्सव आम्हाला पाहता येईल.
प्रतिक्रिया
29 Aug 2009 - 5:01 am | मीनल
व्वा व्वा. याचीच वाट पाहत होते.
आमच्या गावात उद्या गणेशोत्सव आहे. मी नंतर फोटो टाकेनच.
:)
मीनल.
29 Aug 2009 - 9:40 am | अमोल केळकर
पंचरत्न असोसीएशन गणेशोत्सव मंडळ, सेक्टर ५ , स्वामी विवेकानंद नगर ( कोकण भवन )
आम्ही राहतो त्या सोसाइटीत ७ दिवसाचा गणपती असतो. यावेळेला दगडूशेठ गणपतीची मुर्ती आणली आहे.
गणपती बाप्पा मोरया !!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
29 Aug 2009 - 9:43 am | यशोधरा
छान दिसत आहेत बाप्पा! :)
29 Aug 2009 - 9:47 am | दशानन
मोरया !!!!
29 Aug 2009 - 4:50 pm | क्रान्ति
सुरेख आहेत दोन्ही गणपती.
">आमच्या बिल्डिंगचे बाप्पा
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
29 Aug 2009 - 5:31 pm | अवलिया
मोरया !!!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Aug 2009 - 9:46 pm | मदनबाण
व्वा...गणपती बाप्पा मोरया !!!
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html