नावडतीचे फूल

सुनील's picture
सुनील in कलादालन
28 Aug 2009 - 2:06 pm

गणपतीला दोन बायका होत्या. आता प्रथेप्रमाणे त्यातील एक आवडती आणि दुसरी नावडती, हे ओघाने आलेच!

लालभडक जास्वंद हे गणपतीचे आवडते फूल. अगदी लाल जरी नसले तरी फिक्क्ट गुलाबी जास्वंददेखिल गणपतीला चालते. पण पिवळे? छे छे! पिवळा जास्वंद हा नावडतीचा!

त्यातून हा पिवळा जास्वंदही तर्‍हेवाईक! सकाळी फुलायला लागतो तो दिवसभर थोडा थोडा फुलत, संध्याकाळी पूर्णत्वाला पोचतो!!


सकाळी ८ वाजता झाडावर फुलू लागलेले फूल


रात्री ८ वाजता पूर्ण फुललेले फूल

छायाचित्रणाचा दिनांक आणि स्थळ - २७ ऑगस्ट २००९, घरचा बगिचा आणि देवघर

छायाचित्रण

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Aug 2009 - 2:22 pm | श्रावण मोडक

सुरेख छायाचित्र.
अवांतर: हल्ली फुलणाऱ्या फुलांकडे फार लक्ष बुवा तुमचं!!! नेमकं चाललंय काय?

सुनील's picture

28 Aug 2009 - 3:54 pm | सुनील

धन्यवाद.

हल्ली फुलणाऱ्या फुलांकडे फार लक्ष बुवा तुमचं!!! नेमकं चाललंय काय?
हल्ली? हल्ली नाही हो, पूर्वीपासूनचच आहे ते! असो!! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पक्या's picture

28 Aug 2009 - 2:30 pm | पक्या

प्रिटी वूमन ला कधी आणताय परत?

(पुढचा भाग वाचण्यास उत्सुक)

सुनील's picture

28 Aug 2009 - 3:59 pm | सुनील

प्रिटी वूमन ला कधी आणताय परत?
पूर्णतः अवांतर प्रतिसाद!

अवांतर - प्रिटी वूमन लवकरच.

(पुढचा भाग लिहिण्यास उत्सुक) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

28 Aug 2009 - 2:31 pm | अवलिया

वा ! मस्त !!

अवांतर - रात्री ८ वाजता पूर्ण फुललेले फूल रात्री १२-१ च्या सुमारास कसे दिसते ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुनील's picture

28 Aug 2009 - 4:02 pm | सुनील

धन्यवाद.

रात्री ८ वाजता पूर्ण फुललेले फूल रात्री १२-१ च्या सुमारास कसे दिसते ?

च्य्यायला हा यॉर्कर जबराच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सोनम's picture

17 Sep 2009 - 6:33 pm | सोनम

रात्री ८ वाजता पूर्ण फुललेले फूल रात्री १२-१ च्या सुमारास कसे दिसते ?
+ सहमत
अजून दोन तीन फोटू डगवले असते तर छान झाले असते सुनील भाऊ.......... :) :)
फोटू उत्तम. =D> =D>

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

स्वाती दिनेश's picture

28 Aug 2009 - 5:04 pm | स्वाती दिनेश

फूल सुंदर आहे,
स्वाती

कवटी's picture

28 Aug 2009 - 5:06 pm | कवटी

त्यातून हा पिवळा जास्वंदही तर्‍हेवाईक!
अहो पिवळा नावात आले की असे विचित्र वागणे / तर्‍हेवाईकपणा आलेच.... त्यात त्या जास्वंदाचा काय दोष?
कवटी

काळा डॉन's picture

28 Aug 2009 - 6:09 pm | काळा डॉन

आणि काळा? काळा जास्वंदही असतो का? तो कितपत विचित्र आणि तर्‍हेवाईक असतो? ;)

काळू
=====
दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.

पिवळा डांबिस's picture

28 Aug 2009 - 10:33 pm | पिवळा डांबिस

अहो पिवळा नावात आले की असे विचित्र वागणे / तर्‍हेवाईकपणा आलेच....

बघताँय, बघताँय हां मी, वाश्या!!!!
:)

विनायक प्रभू's picture

28 Aug 2009 - 6:50 pm | विनायक प्रभू

आजकाल सुनिलभावोजींचे बरेच 'फुलिंग' अराउंड चालले आहे असे दिसते.

प्राजु's picture

28 Aug 2009 - 7:49 pm | प्राजु

छान आहे फूल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

28 Aug 2009 - 7:56 pm | नंदन

दोन्ही फोटोज मस्त. एखाद्याला रंगावरून किंवा अन्य काही कारणावरून सरसकट नावडत्यांत ढकलण्याची प्रथा फार प्राचीन आहे म्हणजे ;)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

28 Aug 2009 - 8:09 pm | श्रावण मोडक

एखाद्याला रंगावरून किंवा अन्य काही कारणावरून सरसकट नावडत्यांत ढकलण्याची प्रथा फार प्राचीन आहे म्हणजे
=D> =D> =D> =D> =D>

चतुरंग's picture

28 Aug 2009 - 8:06 pm | चतुरंग

दुसरा फोटू तर त्रिमित वाटतोय इतका फोकस सुरेख आहे! :)

(खुद के साथ बातां : रंगा, ह्या सुनीलरावांना एकंदरच पिवळ्या रंगाच्या फुलांमध्ये रस आहे हे मागेही एकदा दिसले होते नाही! ;)

(इस्टमनकलर)चतुरंग

सुनील's picture

29 Aug 2009 - 4:53 pm | सुनील

दुसरा फोटू तर त्रिमित वाटतोय इतका फोकस सुरेख आहे!
धन्यवाद!

ह्या सुनीलरावांना एकंदरच पिवळ्या रंगाच्या फुलांमध्ये रस आहे हे मागेही एकदा दिसले होते ना
;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हर्षद आनंदी's picture

29 Aug 2009 - 1:07 am | हर्षद आनंदी

ह्या जास्वंदास बर्‍याच पाकळ्या असल्याने ती उशीरा फुलत असावी, एका निरीक्षणाप्रमाणे जास्वंदी आदल्या दीवशी रात्री फुलायला लागते ती सकाळी पुर्ण फुलते.

हिंदी चित्रपट सृष्टीतीय अजरामर वाक्य : "भगवान के दर पर सारे फुल एकसमान होते है !"

आम्हाला आवडली बॉं! आणि तसेही फुले (उमलु पहाणारी, अर्धवट उमललेली हा आवडीचा विषय) ;)

विकास's picture

29 Aug 2009 - 1:16 am | विकास

फोटो मस्तच आहे आणि ही नावडतीचे फूल वगैरे माहीती नवीनच मिळाली.

क्रान्ति's picture

29 Aug 2009 - 4:46 pm | क्रान्ति

खूप सुरेख फोटो!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 9:06 am | विसोबा खेचर

सुरेख...

तात्या.