मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही बातम्या कशा तयार होतात?

विकास · · काथ्याकूट
जसवंतसिंगांमुळे तयार झालेल्या विविध बातम्या वाचताना एक प्रश्न डोक्यात आला: काही बातम्या कशा आणि का तयार होतात? हाच ह्या चर्चेचा विषय आहे. निव्वळ जसवंतसिंग आणि जीनांसाठी इतरत्र चालू असलेल्या धाग्याचा अधिक उपयोग होऊ शकेल पण येथे केवळ त्यावर चर्चा होऊ नये असे वाटते. जेंव्हा २६ जानेवारी/जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर सारख्या घटना (भूकंप, पाऊस, दहशतवाद, त्सुनामी) घडतात, निवडणूकांच्या आधीचे अथवा निकालाचे दिवस असतात, कोणा मोठ्या व्यक्तीचे निधन होते तेंव्हा आणि तत्सम इतर अनेक सरळ घडणार्‍या गोष्टींच्या जेंव्हा बातम्या दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रात अथवा या काळात त्याच दिवशी केबल चॅनेल्सवर दिसतात, जालावर तात्काळ अवतरतात तेंव्हा त्यात आश्चर्य काहीच नसते. मात्र काही बातम्या अशा असतात की ज्याला, "जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा, हम हिलके थोडे झुमे तो सबने देखा" ह्या प्रकारात मोडतात. त्यात जास्त वेळ जात असतो जितका इतर अनेक गंभीर विषयांवर जात नाही. एकदा सर्वत्र तीच बातमी दिसली की त्याचा परीणाम घरदार, लोकल, महाविद्यालये, आणि जालावर चर्चा करण्यात होतोच होतो. सोप्या भाषेत कायम सांगितले जाते की माणूस कुत्र्यास चावल्यास बातमी होते, उलट झाले तर नवल ते काय! दोन आठवड्यांपुर्वी स्वाईन फ्लू मुळे काही प्रमाणात योग्य बातम्या आल्या तर काही बाबतीत लोकशिक्षणाच्या ऐवजी एक प्रकारची भिती तयार करण्यात आली. ती मुद्दामून केली असे म्हणायचे नाही पण बातमी म्हणले की "एक्सायटींग" पाहीजेच असे कुठेतरी वाटत असावे. तरी देखील आता जालामुळे आणि एकंदरीत वर्तमानपत्रांमधे थोडीफार अधिक माहीती असते. जनतेला "informed decision" घेता येईल अशा प्रकारचे लेख येत असतात. मात्र जेंव्हा याच बातम्या या राजकीय विश्लेषण म्हणून येतात तेंव्हा सगळे काही बदलते. अडवाणींचे पुर्वीचे जीना वक्तव्य, आत्ताचे जसवंतसिंग यांचे पुस्तक हा यातीलच एक भाग आहे. त्यावर बातम्या आल्या, लिहीले गेले यात आश्चर्य असे काहीच नाही मात्र जेंव्हा त्या बातमीचा चावून चावून चोथा होतो, चघळून सांगितले जाते आणि तोच प्रकार बातमी दिली तरी इतर वेळेस हलकेच केला जातो. तेंव्हा ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणले जाते तो खरेच आपले काम बजावतो का असा प्रश्न पडतो... या चर्चेदरम्यान काही उदाहरणे देऊ इच्छितो. पहीले महाराष्ट्रातील - "नथूरामने गांधीजींना मारली ती चूकच झाली, त्यामुळे ते महात्मा झाले... वास्तवीक गांधीजींचे पुतळे काढून नथूरामचे पुतळे उभे केले पाहीजेत..." हे उद्गार जेंव्हा ज्या व्यक्तीने काढले तेंव्हा भरपूर टिका झाली कारण तेंव्हा ती व्यक्ती शिवसेनेत होती. मात्र नंतर जेंव्हा तीच व्यक्ती राष्ट्रवादीत आली, नंतर मंत्री/उपमुख्यमंत्री वगैरे झाली. तेंव्हा मात्र त्यांना म्हणजे भुजबळसाहेबांना घेणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस अथवा त्यांना युतीत उपमुख्यमंत्री करणार्‍या काँग्रेसला मात्र अशा व्यक्तीस कसे घेता हा प्रश्न देखील धड विचारला गेला नव्हता... दुसरे उदाहरण हे त्या व्यक्तीचे वक्तव्य सांगूनच देतो:
"Today, with the balance and perspective offered by the passage of time and the benefit of hindsight, it is possible for an Indian Prime Minister to assert that India’s experience with Britain had its beneficial consequences too. Our notions of the rule of law, of a Constitutional government, of a free press, of a professional civil service, of modern universities and research laboratories have all been fashioned in the crucible where an age old civilization of India met the dominant Empire of the day. These are all elements which we still value and cherish. Our judiciary, our legal system, our bureaucracy and our police are all great institutions, derived from British-Indian administration and they have served our country exceedingly well.... ...Our Constitution remains a testimony to the enduring interplay between what is essentially Indian and what is very British in our intellectual heritage.... ...Of all the legacies of the Raj, none is more important than the English language and the modern school system. That is, of course, if you leave out cricket!..."
मला सांगा असे जर एखादी इंग्लंड मधे राहणारी भारतीय व्यक्ती भारतात येऊन बोलली तर त्या अनिवासी भारतीयाची मिसळ काय तर्री पण केली जाईल...पण हे तर म्हणले आहे विद्यमान आणि भाषण देताना देखील पंतप्रधान असलेल्या मनमोहनसिंग यांनी! किमान या साहेबाच्या भाषेचे कौतुक करणार्‍या सिंगसाहेबांने Why India's Rise is Business As Usual वाचला असता तर अजिजीने लिहीलेले शब्दप्रयोग तरी टाळता आले असते. मात्र यावर कधी माध्यमांमधे आजच्या इतकी चर्चा झाल्याचे आठवत नाही की माहीत नाही. असे का व्हावे? आता त्या बाळासाहेबांना "झक मारली आणि महाराष्ट्रभुषण पुरस्कार दिला" असे म्हणत पुलंना नावे ठेवली, याचे निमित्त करून येथेच्छ झोडपण्यात आले. मात्र एका सरकारने घेतलेला त्याच पुलंचे नाव मुंबई-पुणे महामार्गाला देण्याचे धुडकावून यशवंतरावांचे नाव दिले गेले तेंव्हा मात्र सगळे चिडीचूप. शब्दाला प्रतिशद्ब देताना टिका केली तर त्याचा गाजावाजा, आणि न बोलून देण्याचे ठरवलेले नाव रद्दबातल करून उपेक्षा केली तर मात्र काहीच नाही. असे का व्हावे? परत मला आधीच्या चर्चेत सांगितलेल्या आंबेडकरांच्या दुव्यातील काही वाक्ये आठवली:
Journalism in India was once a profession. It has now become a trade. It has no more moral function than the manufacture of soap. It does not regard itself as the responsible adviser of the Public. To give the news uncoloured by any motive, to present a certain view of public policy which it believes to be for the good of the community, to correct and chastise without fear all those, no matter how high, who have chosen a wrong or a barren path, is not regarded by journalism in India its first or foremost duty. To accept a hero and worship him has become its principal duty. Under it, news gives place to sensation, reasoned opinion to unreasoning passion, appeal to the minds of responsible people to appeal to the emotions of the irresponsible. Lord Salisbury spoke of the Northcliffe journalism as written by office-boys for office-boys. Indian journalism is all that plus something more. It is written by drum-boys to glorify their heroes. Never has the interest of country been sacrificed so senselessly for the propagation of hero-worship. Never has hero-worship become so blind as we see it in India today. There are, I am glad to say, honourable exceptions. But they are too few, and their voice is never heard.
- Dr. Babasaheb Ambedkar ("RANADE GANDHI & JINNAH" 1943) हे सर्व येथे लिहीण्याचे कारण कुणाचाही बचाव करणे, बाजूने लिहीणे हे नाही आहे. हा प्रकार भारतातच नाही तर स्थानीक राजकारणासंदर्भात अमेरिकेत देखील आहे. पण नक्की असे वागून माध्यमे काय मिळवतात? कुठेतरी वाटते, लोकप्रतिनिधी झाले, सुप्रिम कोर्टाचे न्यायाधिश झाले, आता माध्यमाच्या संपादक/वार्ताहारांना पण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मालमत्ता जाहीर करायला लावायला हवी का? तुम्हाला काय वाटते? आपण वाचून/ऐकून/लिहून informed decision घेण्यासाठी काय करायला हवे?

वाचन 10361 प्रतिक्रिया 0