मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फोकाचे वळ

विनायक प्रभू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
"मास्तर, खुर्चीत बसवत नाहीय्ये".- एक सन्माननिय मिपासद्स्य फोन वर म्हणाले. ढेकुण झालेत की काय? "नाही हो, फोकाचे वळ उठलेत. आय शप्पथ सांगतो आता परत कधी १८०+ शिट्टी घरात वाजवणार नाही. गाडाव झालो होतो. आता परत माणुस झालो.आतापर्यंत झाले ते साल्वेज कसे करायचे ते विचार करतोय." घरी जा. जाताना एखादी भेट घेउन जा. डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवा. बस्स. आणि ह्या पुढे तीला आवडणार्‍या विषयात गप्पा मारुन जमेल तेवढे खीखीखीखी खी करा. ती अगदी योग्य मार्गावर आहे. काहीही काळजी करु नका. तीला जे हवे आहे ते ती मिळवेलच ह्याची मला खात्री आहे. ह्या बाबत माझा अंदाज सहसा चुकत नाही. तुम्ही फक्त आई, बाबा व्हा. एज्युकेशनीस्ट होउ नका. "फोकाचे वळ नुसते मलाच नाही, बर्‍याच ठीकाणी उठलेत" चालायचेच. _________________________________________________________________ रात्री साडे आठ वाजता तो येणार होता. नशीबाने घरी कुणीही नव्हते. सहसा मी धक्का तंत्राचा वापर करत नाही. पण आज ते करायचे ठरवले होते. बेल वाजली. समोर तो उभा होता. मी 'सुरक्षा दरवाजा' न उघडताच त्याच्या हातात पाकीटात घातलेला फोटो त्याला दिला. "सर, जरा बोलायचे पण होते" माझ्या घरात फक्त माणसाना परवानगी आहे. "सर, प्ली़ज" ठीक आहे असे म्हणुन मी दरवाजा उघडला. ४ माळे चढून आला होता. पाणी द्यायचा विचार आवरता घेतला. "सर, माझी बाजु मांडायची होती" हे बघा, शिक्षणावरुन आपल्या जन्माला घातलेल्या मुलांचा मानसिक, शारिरीक छळ करणार्‍याबद्दल मला अत्यंत घृणा आहे. त्यामुळे काय बोलायचे आहे ते बोला आणि सुटा. आणि काय बोलणार हो तुम्ही. तीच जुनी कहाणी असणार. " मिसेस ने सांगितली काय"( लगेच बायकोवर संशय) नाही. त्या साठी वेळच नव्हता. काय वेगळी नसणार. कुठले तरी ३० वर्षापुर्वीचे मढे खांद्यावर बाळगलेले असणार. आई किंवा बाबानी वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणावरुन केलेल्या छळाचा बदला घ्यायला मुलीचा वापर याहुन दुसरे काय सांगणार आहात. तो आश्चर्यचकित झाला. आणि तेच होते. बाप आय. आय. टीयन. आई एम. फिल. आणि हे ' तारे जमीन पर' सतत टोमणे खाउन वयात आलेला. आई बाबाबद्दल विलक्षण तिरस्कार. कुठल्या तरी कंपनीत कारकुन. सर्व आशा आकांक्षा मुलीवर केंद्रीत. आणि मग मी फोकाचे वळ सुरु केले. काय हो, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामामधे कधीही चूक करत नाही. साहेबाची बोलणी खात नाही. आणि तोच साहेब तुमच्या अडीअडचणी सांभाळतो की नाही. का हाकलुन देतो. आणि घरी काय हो. घरी पेपर अर्धवट लिहीला किंवा नापास झालात म्हणुन बायको बोलायचे सोडते काय? तीथे पण ए.टी.के.टी मिळतेच ना? नशिब समजा मुलगी आजोबा, आणि आजीच्या प्रतीचे डोके घेउन आली आहे. तुमच्या दोघांचे नाही. ते असते तर काय केले असते.; ४८ तासाचा युफोरिया असतो तो बुके, बक्षिससमारंभ वगैरे चा. नंतर सर्व जण एकाच पीच वर. काहीही फरक नाही. टॉपर मधे आणि तिच्यामधे. उलट ह्या सहा मार्कांच्या फरकाने पेटुन उठेल आणि टॉपर ला मागे टाकेल. ते फक्त तुम्ही ही नौटंकी सोडून माणुस झाला तरच शक्य आहे. असेच चालु ठेवले तर आणखी ३० वर्षाने आणखी एक डीसफंक्शनल आई तयार होईल आपल्या मुलांवर बदला घेणारी. गाडा ती ३० वर्ष जुनी'ममी.' आंघोळ करा स्वच्छ. नव्याने सुरुवात करा. मुलगी आपला बाप आजही आपल्यावर तेवढेच प्रेम करतो हे कळाले तर नक्कीच पुढे जाईल. बाकी तुमची जी सर्व मध्यम वर्गियांची असते तशी शैक्षणिक गुणवत्ता आणि आयुष्यातले यश ' गणित सुत्राबद्दल मी काही ही बोलणार नाही. तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल टीका करणारा मी कोण? मुली बद्दल खात्री आहे म्हणुन बोललो. बाकी तुमची इच्छा. डुकरासारखे त्याच घाणीत लडबडायचे का माणुस व्हायचे. तो काहीही बोलला नाही. ह्स्तांदोलन केले आणि निघुन गेला. जाता जाता: फोटो टी पॉय वरच ठेउन गेला.

वाचन 4455 प्रतिक्रिया 0