माझेही....

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
6 Mar 2008 - 6:01 am

संदीप खरे यांच्या काव्यांवर सध्या तलवार चालवली जाते आहे. केशवसुमार, धनंजय, सर्किट, ओगले साहेब यांच्या खमंग भाजलेल्या खार्‍या शेंगदाण्याच्या पुडित माझा हा खवट, कुसका शेंगदाणा खपवून घ्यावा ही विनंती.

चाल : मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत....

खर गव्हातं, तांदळातं, गूळाच्या शिर्‍यातं..
खर नाजूकशी एक गार, माझ्या वरण आणि भातात..

घरी चाळणींची चळचळ
वाढे खरखरं उगी तशात

इथे वाण्याला सांगतो आणि
अरे वाणी..
असे भेसळ तुझ्या मालात..

भिडू लागे राख दातालाही
माझ्या दातांची धार घशात...

माझ्या नयनी लक्ष त्या धारा
आणि राग तुझ्या डोळ्यांत...

- प्राजु

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

प्रयत्न ठीक वाटतो आहे, पुन्हा एकदा चालीत म्हणून पाहीन..

अवांतर - मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत हे माझंही अत्यंत आवडतं गाणं आहे....

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2008 - 12:56 am | llपुण्याचे पेशवेll

'मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत' माझे पण फार आवडते गाणे आहे.
'भिडू लागे रात अंगालागी' हे मस्त कडवे आहे. काय सांगू! :)
माफ करा जरा जास्तच 'भावुक'(सेंटी) झालो ना!
पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या's picture

6 Mar 2008 - 8:49 am | सृष्टीलावण्या

खरांची खरी मजा येते मटकीची उसळ खाताना अगदी त्यांचा रंगाचा दगड दाताखाली येऊन
त्याची कळ मस्तकात उठल्यावर (बाकी ह्या वाणी लोकांचे रंगज्ञान चांगले असते हां).

कविता वास्तवपूर्ण.
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

सर्किट's picture

6 Mar 2008 - 9:19 am | सर्किट (not verified)

प्राजु,

कवितेतील भावना आवडली.

आत उद्या मुक्तसुनीत वृत्तात सुधारणा करतील, तेव्हा पुन्हा वाचीन.. ;-) ;-)

सध्या दातात सारखे खडे येत होते ;-)

- सर्किट

विडंबनाने मीटरचे यमनियम पाळले आहेत. सर्कीटरावानी मूळ गाणे ऐकल्यानंतर त्याना या विशिष्ट कवितेतील अनियमित अशा मीटरचे स्वरूप लक्षांत येईल. विडंबनाची विश्वासार्हतासुद्धा तेव्हा पटेलच. मूळ गाण्यात कवी हाच संगीतकार असल्यामुळे अनियमित अशा मीटरला चालीमधे चपखल बसविणे / चालीला अनियमित मीटरमधे सामावून घेणे सहज शक्य झाले आहे.

स्वाती राजेश's picture

7 Mar 2008 - 12:05 am | स्वाती राजेश

तू सुद्धा विडंबन करायला लागलीस?
मस्त केले आहेस.
आगे बढो...

सुवर्णमयी's picture

7 Mar 2008 - 4:28 am | सुवर्णमयी

माझ्या नयनी लक्ष त्या धारा
आणि राग तुझ्या डोळ्यांत...

चालू द्या

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2008 - 8:33 am | पिवळा डांबिस

माझ्या नयनी लक्ष त्या धारा
आणि राग तुझ्या डोळ्यांत?

च्यामारी, जास्त राग दाखवला ना, तर सांग! म्हणावं मी माझ्या डांबिसकाका आणि काकूंकडे रहायला जाईन. मग येशील नाकदुर्‍या काढत...:))))
आपण फुल्ल ढोस देऊ जावईबापूंना!!!:))))

पुतणीच्या नेहमी पाठीशी असलेला,
डांबिसकाका

प्राजु's picture

9 Mar 2008 - 5:28 am | प्राजु

धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मुक्तसुनित,
आपण "टेस्टेड् अँड सर्टिफाईड् , टू बी ऍक्सेप्टेड्" असे म्हंटल्यामुळे मला बरे वाटले.

डांबिसकाका,
खूप खूप बरं वाटलं. असेच रहा नेहमी पाठीशी माझ्या.
- (सर्वव्यापी)प्राजु