(मनसुबे)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
5 Mar 2008 - 11:58 pm

आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल मनसुबे

गंध हा कसला कळेना श्वास गुदमरतोच आहे
रेशमी सदरा जरी हा रोज मी धूतोच आहे

मज किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
मी तरी दारी तिच्या हा नित्य घुटमळतोच आहे

लपवलेले तोंड जाताना तिच्या खोलीवरी मी
हाय बापाला तिच्या मम मनसुबा कळतोच आहे!

नेमका आलाच तो ही आज सामोरा मला अन
बोलला काहीच नाही पण मिळाली पोच आहे

काल अंधारात त्याने एवढे समजावले मज
कान डावा आज माझा हा जरा दुखतोच आहे!

उघड रे डोळे अता तू - शुद्ध तुज असलीच जर का
कोण हे कानात माझ्या आज ओरडतोच आहे?

या टुकार विडंबनाची फारशी मज खंत नाही!
दु:ख हे सलते उरी की - तेच ते लिहतोच आहे...

लोक थकले! 'रे पुरे' सांगून मेल्या "केशवा"ला...
हा तरी सगळ्या जनाला नित्य बघ छळतोच आहे!

प्रतिक्रिया

प्राजु's picture

6 Mar 2008 - 12:06 am | प्राजु

तुमच्या गझलांचा अभ्यास करावा अशाच असतात सगळ्या रचना..
- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग's picture

6 Mar 2008 - 12:09 am | चतुरंग

पुलस्तींचे विडंबनास मिळवलेले मनसुबे आवडले!:)

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

6 Mar 2008 - 12:09 am | इनोबा म्हणे

केशवा झक्कास रे!
तुझी ही असली खुमासदार विडंबने वाचायला मिळाली की 'दिल खुश' होतो बघ.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा(मिसळबोध)

सर्किट's picture

6 Mar 2008 - 12:18 am | सर्किट (not verified)

आणखी काय म्ह्णू ? त्रिवार वंदन !

- सर्किट

केशवसुमार's picture

7 Mar 2008 - 9:42 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
केशवसुमार