शहरात धावणारी रानवाट

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
17 Jun 2009 - 6:39 am

शहरात धावणारी रानवाट
-------------------------
धावायचे बूट घालून
टोलेजंग इमारतीतून
पडतो मी लगेच बाहेर
एका पायवाटेवर.

उजवीकडे, डावीकडे
विराट वृक्षराज
ऊन झळा झाकोळतात.

धसमुसळी जनावरे
दृष्टीआड धावतात,
धुसफुसतात, खिंकाळतात.

एक खारोटी आडवी जाते.

हळूहळू हलणार्‍या
रंगीबेरंगी फुललेल्या
मादक रानटी वासांच्या
झाडीजाळीमधून
वाट काढतो, न थांबता.

मग अचानक थबकतो.

दत्त समोर वाटेत
दोन झुडपे असतात
दरवळत शनेल नंबर फाइव्ह
आणि ओल्ड स्पाईस.

त्या अरुंद फुटपाथवर
तंद्रीतच मी म्हणतो -
"अहो ताई, अहो दादा -
देता का जरा जागा?"
-------------------------

कविता

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

17 Jun 2009 - 6:50 am | मुक्तसुनीत

कविता रोचक होती. शहरात रहाताना जंगलच्या सहवासाबद्दल वाटणारी ओढ . त्या ओढीतूनच काँक्रिट जंगलातल्या वस्तुजातावर जंगलातल्या जीवांची चेतनागुणोक्ति. शेवटाचा मिश्किल धक्का - कवितेतला आणि ताईदादाना धावताना दिलेला - गमतीशीर.

- अरमानी झुडुपाचा. :-)

श्रावण मोडक's picture

17 Jun 2009 - 9:00 pm | श्रावण मोडक

एव्हढे(च) निश्चित समजले. छान.

सहज's picture

17 Jun 2009 - 7:04 am | सहज

फार क्वचित अशी हलकी, फुलकी कविता वाचायला मिळते साहेबांकडून :-)

अजुन येउ दे.

क्रान्ति's picture

17 Jun 2009 - 7:38 am | क्रान्ति

अगदी सहज, सुरेख कविता! शहरी रानवाटेचं दृश्य उभं राहिलं डोळ्यांसमोर. ताई-दादा झुडुपांची कल्पना तर खासच! कविता खूप खूप आवडली.

:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jun 2009 - 8:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली कविता.
अजून येऊ दे !

-दिलीप बिरुटे

घाटावरचे भट's picture

17 Jun 2009 - 8:30 am | घाटावरचे भट

मस्तच.

चतुरंग's picture

17 Jun 2009 - 8:35 am | चतुरंग

एक वेगळाच मूड मांडणारी कविता बर्‍याच दिवसांनी वाचायला मिळाली! :)

(काँक्रीट)चतुरंग

विसुनाना's picture

17 Jun 2009 - 10:32 am | विसुनाना

नेहमीप्रमाणे 'उत्तम' अशी प्रतिक्रिया देता येत नाही याचा खेद होतो.
(वेगळ्या उपमा - पण कदाचित हुकलेल्या,स्तर थोडासा ढळलेला,असो. अधिक कीस पाडत नाही.)

ऋषिकेश's picture

17 Jun 2009 - 1:32 pm | ऋषिकेश

वाह!! वेगळीच कविता.. :)
कवितेतील कल्पना आवडली.. अजून येऊ द्यात

"दत्त समोर वाटेत" का "दत्त म्हणून समोर वाटेत"?

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

दत्ता काळे's picture

17 Jun 2009 - 2:41 pm | दत्ता काळे

हळूहळू हलणार्‍या
रंगीबेरंगी फुललेल्या
मादक रानटी वासांच्या
झाडीजाळीमधून
वाट काढतो, न थांबता.

. . . . फार आवडलं .

चित्रा's picture

17 Jun 2009 - 6:09 pm | चित्रा

आवडली.

मराठमोळा's picture

17 Jun 2009 - 6:14 pm | मराठमोळा

वा! मस्त!! :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती's picture

17 Jun 2009 - 6:45 pm | रेवती

छान कविता!
अगदी हलकीफुलकी!

रेवती

लिखाळ's picture

17 Jun 2009 - 8:54 pm | लिखाळ

वा .. कवितेतली कल्पना मस्तच आहे.
मला कल्पना लगेच स्पष्ट झाली नव्हती. मुक्तसुनितांचा पहिला प्रतिसाद वाचताना एकदम स्पष्ट झाले.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अवलिया's picture

18 Jun 2009 - 7:04 am | अवलिया

आवड्ली की नाही हे सांगता येणे कठिण आहे.
पण एकंदर कवीच्या नावलौकिकाला साजेसी वाट्ली नाही.
कदाचित माझ्या अपेक्षा जास्त असतील.

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

धनंजय's picture

18 Jun 2009 - 11:31 pm | धनंजय

वाचकांचे आवड-नावड कलवण्याबद्दल आभार.

माझी मूळ इंग्रजी कविता :
URBAN TRAILRUNNER
---------------------

I step from my highrise
Sneakers laced
Right on to a trail.

Tall trees tower right and left
And deftly filter
The afternoon sun.

Out of my line of sight
Restless wildlife rustles
Hustles, squeals -
A squirrel scurries across.

I dodge torpid thickets
- Thickets with floral aromas
And subtle citrus scents
Never stalling
Till at a narrow pass
Two trunks stop me short
Smelling of Chanel No. 5
And Old Spice.
I say -
"Madam, Sir -
I beg pardon.
Please make way."

---------------------

नंदन's picture

18 Jun 2009 - 5:52 pm | नंदन

कविता अधिक आवडली. कदाचित दोन-तीन ठिकाणी सहज येणार्‍या प्रासामुळे आणि 'हळूहळू हलणार्‍या, रंगीबेरंगी फुललेल्या'पेक्षा torpid thickets - Thickets with floral aromas सारख्या अधिक ठाशीव शब्दप्रयोगांमुळे असू शकेल. इतर समानार्थी क्रियापदांऐवजी Stall चा उपयोग जाणीवपूर्वक केला आहे का? (म्हणजे 'मी थबकलो' बरोबरच अधिक काही अभिप्रेत आहे?)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

18 Jun 2009 - 6:56 pm | चतुरंग

धन्याशेटचे इंग्रजीवरचे प्रभुत्व आणि शब्दनिवडीतली सहजता जास्त ठसली त्याने असेल कदाचित पण इंग्रजी कविता अधिक आवडली.

(लॉर्ड)चतुरंग

धनंजय's picture

19 Jun 2009 - 12:40 am | धनंजय

इंग्रजी कवितेतले काही शब्द अर्थछटांच्या दृष्टीने अधिक नेमके आहेत, हे खरे.

"स्टॉल" शब्दाची अर्थछटा वैशिष्ट्यपूर्ण आहे हे निरीक्षण योग्य आहे.

**कीस : (मात्र येथे तो मराठीतील "थबक" शब्दाशी समांतर नाही. "थबक"च्या समांतर "स्टॉप शॉर्ट" योजला आहे. मराठीतील "थांब" या सामान्य शब्दाशी समांतर अर्थछटा वेगळी असलेला "स्टॉल" योजला आहे. "स्टॉल"मध्ये आतली शक्ती, धमक किंवा प्रेरणा कमी पडल्यामुळे थांबणे, अशी अर्थछटा आहे. (इंजिनची फिरायची शक्ती कमी पडली - पेट्रोल किंवा ठिणगी - तर इंजिन स्टॉल होते. विमानाला समोर आणि वर ढकलणारा हवेचा दाब कमी होतो तेव्हा विमान स्टॉल होते...) समोर मोठाच आडथळा येतो म्हणून थांबावे लागते, त्याला मात्र कवितेत "स्टॉप" म्हटले आहे. अचानक असल्यामुळे "स्टॉप शॉर्ट".**

"सहज येणारे अनुप्रास" या प्रशंसेने विशेष आनंद होतो आहे.

**कीस : इंग्रजी आणि मराठी दोन्ही कवितांमध्ये अनुप्रास मोठ्या प्रमाणात रचले आहेत. अनुप्रासांनी वाचनाच्या लयीवर नियंत्रण ठेवण्याची इंग्रजी मुक्तछंदातली लकब कित्येकांना माहीत असेलच. मिताक्षरी रचनेत सहज किंवा "आपोआप" असे फारच थोडे असते :-) पण जे मुद्दामून रचले आहे, ते सकृद्दर्शनी सहज असल्याची भावना मात्र वठणे अनिवार्य. (पण बघितल्यास अनुप्रास प्रचंड प्रमाणात आहेत हे गुपित नाही.)**

जमल्यास दोन्ही भाषांत कविता वाचून ध्वनिफीत मी येथे देईन. लयीचे नियंत्रण करणारे अनुप्रास दोन्हीमध्ये कदाचित जाणवतील.

मनापासून सांगायचं तर काल जेव्हा ही कविता वाचली तेव्हा विशेष आवडली नव्हती. मात्र आज मूळ कविता इथे दिलित. ती जास्ती परिणामकारण आहे असे वाटले. किंबहुना, ती खरंच आवडली असे म्हणेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

19 Jun 2009 - 2:12 am | संदीप चित्रे

जास्त सहज आणि आतून आलीय असं वाटतंय दोन्ही कविता वाचल्यानंतर... शेवटी ओरिजनल ते ओरिजनच की हो :)

धनंजय's picture

19 Jun 2009 - 6:57 am | धनंजय

काव्य हे पुष्कळदा श्राव्य माध्यम असते. जोवर कवितावाचनाची एखादी पद्धत रूढ असते - म्हणजे वृत्त ओळखीचे असते - तोवर लेखी माध्यमातून पुष्कळदा पुरेशा तपशिलात कविता लिहिली जाऊ शकते.

आता मराठी कवितेत ओढाताण झाली आहे की नाही, हा एक उत्तम प्रश्न आहे. मी ज्या प्रकारे शब्द बोलतो (आणि यात माझे महाराष्ट्राबाहेर राहाण्याचा घनिष्ट संबंध असावा), त्या बोलण्याच्या तर्‍हेत वरील कविता सहज म्हटली जाऊ शकते. ती येथे :
Get this widget | Track details | eSnips Social DNA

आता पुढे दोन वेगवेगळ्या इंग्रजी ध्वनिफिती देत आहे. यांच्या हेलात फरक आहे, आणि त्यामुळे कवितेचे श्राव्य गुण थोडेतरी बदलतात. बहुधा खूपही बदलतात.

प्रथम हेल मिश्र भारतीय-अमेरिकन हेल आहे - या प्रकारे मी सध्या इंग्रजी बोलतो. दुसरा हेल भारतीय-मराठीकडे झुकलेला आहे. साधारण अशा प्रकारे मी पूर्वी बोलत असे. (त्याही पूर्वी मी कोकणी हेलात इंग्रजी बोलायचो, पण तो हेल माझ्या जिभेवरून पुरता निसटला आहे.)

मिश्र भारतीय-अमेरिकन हेल
Get this widget | Track details | eSnips Social DNA

भारतीय-मराठीकडे झुकलेला हेल
Get this widget | Track details | eSnips Social DNA

आता बहुधा पटेल की मला तरी या कविता विशेष ओढाताण न करता म्हणता येतात. कविता रचताना मला ती जिभेवर घोळवून घोळवून स्वतःला पटवावी लागते. कविता सर्वश्रेष्ठ आहे की नाही, माझ्या नेहमीच्या दर्जाची आहे का नाही, हा विचार मनात जर असला तर फारच अस्पष्ट असतो. जिभेवरून ती ओघळत असताना लयीशी मला हवा तो खेळ होतो आहे का? हा विचार सर्वात समोर असतो. माझ्या हेलातला ध्वनी आणि मनात ठरलेल्या कथेशी इमान राखणारा अर्थ, दोन्ही पटेपर्यंत शब्द बदलणे ही पद्धत. अशी गंमत...

Nile's picture

19 Jun 2009 - 10:23 am | Nile

मराठी हेल लै आवडला. अतुल कुलकर्णी (रंग दे बसंती) आठवला! :)

काव्यातल का व ही समजत नसलेला (कावळा),
नाईल,

विसोबा खेचर's picture

19 Jun 2009 - 7:48 am | विसोबा खेचर

खास धन्याशेठ पेश्श्सल कविता!

फार आवडली! :)

तात्या.