मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आली पन्नाशी!

बहुगुणी · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
वडा-सांबार खावं, नाहीतर छोले-पुरी चमचमीत सारं शेवटी येणार घशाशी! तरूणांची मजा आहे, येऊन आमच्या घरी, नावालाच यजमान, पण आम्ही आपले उपाशी आली पन्नाशी! पोट आड येतंय, म्हंटलं खुर्ची मागे सरकवावी जराशी जमतंय असं वाटलं पण टेबल पडलं तोंडघशी! आली पन्नाशी! 'सकाळी जावं पळायला, अजून झालं नाही वय' 'जलद चालणं' बरं वाटलं, पहिल्याच दिवशी 'आधिक ताण बरा नव्हे, हळू-हळू होईल सवय' कुणाला माहीत इथे, व्यायाम खातात कशाशी आली पन्नाशी! 'ट्रेकींगला निघालाय? मी आहे की जोडीला' डोंगर दिसल्यावर मात्र, आम्ही आपले पायथ्याशी रक्तदाब थोडासा, कोलेस्टेरॉल वाढीला सकाळ-संध्याकाळ गोळ्या, जेल्युसिल उशाशी आली पन्नाशी! कुरकुरी ऐकून माझ्या प्रकृतीच्या दर दिवशी तीर्थरूप उद्गारले, "इतक्यात धापा टाकशी? बरंच अंतर बाकी, अर्ध्यात आताशी मी बघ पंचाहत्तरीत, अजून खातो तुपाशी म्हणे आली पन्नाशी!"

वाचन 6606 प्रतिक्रिया 0