महाराष्ट्रातील अनेक लोक गोव्यातल्या कोंकणीला मराठीची बोलीभाषा मानतात. गोव्यात मात्र "आंत्रुजी कोंकणी"ला प्रमाण मानतात. गोव्यातील अन्य बोलीसुद्धा साहित्याच्या योग्यतेच्या आहेत असे म्हणणारा एक लेख मी सुनापरांत मध्ये वाचला - थोडी मजा वाटली म्हणून तो येथे देत आहे.
कोंकणीची महाराष्ट्री बोली बोलणार्यांना कधीकधी आपली सुशिक्षितांची प्रमाण आंत्रुजी बोली समजण्यास त्रास होतो. म्हणून प्रादेशिक पुणेरी बोलीत अनुवादही देत आहे. :-) मूळ कोंकणीतला लेख एक आठवडाच सुनापरांतच्या संकेतस्थळावर राहातो. म्हणून प्रादेशिक मराठी बोलीतील अनुवादासह मूळ प्रमाण कोंकणीतल्या लेखातले पाठ्यही येथे देत आहे. :-)
- - -
(सुनापरांत, ५ मे २००९)
गांवातली कोंकणी चुकीची न्हय तर अपभ्रंश जाल्ली
(गावांतली कोकणी चुकीची नव्हे तर अपभ्रंश झालेली)
हांव भाशातज्ञ न्हय. पूण म्हाजा वाचपांत जे कितें आयला ताजा वयल्यान काय विचार मांडूंक सोदता.
मी भाषातज्ञ नाही. पण माझ्या वाचनात जे काही आलेले आहे, त्या वरून काही विचार मांडू बघत आहे.
खरी कोंकणी गांवांत वसता हाचे विशीं कोणाचोच आक्षेप आसचो ना. केन्ना आयकूंक नाशिल्ली उतरां गांवांत आसात. तीं कोशकारांनी आपल्या कोशांत घेवपाक जाय. ताचे परस साहित्य बोरोवप्यांनी ती जाणूनबुजून वापरपाक जाय. तेन्नाच आमची म्होंवाळ कोंकणी भास आणीक म्होंवाळ, गिरेस्त जातली.
खरी कोंकणी गावांत वसते याविषयी कोणाचाच आक्षेप असणार नाही. केव्हाही ऐकू न येणारे शव्ब्द गावांमध्ये आहेत. शब्दकोश बनवणार्यांनी ते शब्द आपल्या कोशात घेतले पाहिजेत. त्याहून साहित्य लिहिणार्यांनी ते शब्द वापरले पाहिजेत. तेव्हाच आपली मधाळ कोंकणी भाषा आणखी मधाळ होईल, श्रीमंत होईल.
गांवांनी घोळटा ती चुकीची कोंकणी न्हय, तातूंतलीं थोडीं उतरां अपभ्रंश जाल्यात इतलेंच. ते कोंकणीक कोणी हिणसावपाक वचना. कोणय हिणसावतात, तुमची कोंकणी हेंगाडी, चुकीची म्हणतात जाल्यार तें योग्य न्हय. तें तशे म्हणपी मनीस चुकतां अशें म्हाका दिसता.
गावांमध्ये घोळते ती चुकीची कोंकणी नाही, त्यातील थोडे शब्द अपभ्रंश झालेले आहेत इतकेच. त्या कोंकणीला कोणी हिणवता कामा नये. कोणी जर हिणवत असेल, तुमची कोंकणी हेंगाडी, चुकीची म्हणतात तर तसे म्हणणार्या माणसाचे चुकते, असे मला वाटते.
गांवांनी आसात त्यो कोंकणीच्या शैली (बोली). देखीक सावड्डेंची कोंकणी, मालवणी कोंकणी, खानापुराची कोंकणी, काणकोणची कोंकणी, साश्टींतलीं कोंकणी, बार्देसांतली कोंकणी, पेडणेंची कोंकणी, कारवारी कोंकणी... ! त्या त्या वाठारां प्रमाण कोंकणीची उतरां, शैली बदलतात. केन्ना केन्ना व्याकरणूय कूसभर बदलता.
गावांत आहेत त्या कोंकणीच्या शैली (बोली). उदाहरणार्थ सावर्ड्याची कोंकणी, मालवणी कोंकणी, खानापुराची कोंकणी, काणकोणची कोंकणी, साश्टीतलीं कोंकणी, बार्देशातली कोंकणी, पेडणेंची कोंकणी, कारवारी कोंकणी... ! त्या त्या जागेप्रमाने बदलणारे कोंकणीचे शब्द, शैली बदलतात. कधीकधी व्याकरणही थोडेसे बदलते.
पूण ही उतरां अपभ्रंश जाल्ल्यान प्रमाण म्हूण थारायिल्ले कोंकणींत बसनात. तें व्याकरणूय बसना. हाचो अर्थ प्रमाण कोंकणी त्या उतरांचो द्वेश करता अशें न्हय. तें म्हणपी लोक गोंयांत आसात जाल्यार हांव नकळों.
पण हे शब्द अपभ्रम्श झाल्यामुळे प्रमाण म्हणून ठरवलेल्या कोंकणीत बसत नाहीत. ते व्याकरणही बसत नाही. याचा अर्थ असा नव्हे की प्रमाण कोंकणी त्या शब्दांचा द्वेष करते. असे म्हणणारे लोक गोव्यात असतील तर मला मला माहीत नाही.
आतां गांवांतल्या कोंकणी उलोवपी मनशाक प्रमाण केल्ली कोंकणीच मान्य ना जाल्यार कितें करप तेंय जाणकारान थारावचें. प्रमाण केल्ल्या वा मानतात (गोयांत आंत्रुजी कोंकणी) तीच कोंकणी प्रमाण कित्याक? आमचीय कोंकणी प्रमाण अशें कोणय म्हणटात आसत जाल्या कितें करप तेंय जाणकारांनी थारावचें.
आतागावातल्या कोंकणी बोलणार्या माणसाला प्रमाण केलेलीच कोंकणी मान्य नसेल तर काय करायचे तेही जाणकाराने ठरवावे. प्रमान केलेली वा मानतात (गोव्यात आंत्रुजी कोंकणी) तीच कोंकणी प्रमान का? आमचीही कोंकणी प्रमाण असे कोणी म्हणत असले तर काय करायचे तेही जाणकारांनी ठरवावे.
...
माण, आमो, कोमो, हाट्टा, पट्टा, हीं उतरां उलयतात तशीं बरोवची काय ना तेंय जाणकारांनी थारावचें. गावांतले जाण्टे अपभ्रंश जाल्ली उतरां उलयतात. मात ते चुकीचें व्याकरण वापरतात अशें माका दिसना.
(या शब्दांचे प्रमाणलेख "मांड, आंबो, कोंबो, हाडटा, पाडटा" असे आहे.) माण, आमो, कोमो, हाट्टा, पट्टा, हे शब्द बोलतात तसे लिहावे की नाही, ते जाणकारांनी ठरवावे. गावातले जाणते अपभ्रंश झालेले शब्द बोलतात. मात्र ते चुकीचे व्याकरण वापरतात, असे मला वाटत नाही.
...
आपले गांवचे कोंकणीत, कथा, कविता बरयल्यार ती लोकां सामकार येताली. साहित्य चड आसल्यार तीच शैली प्रमाण जातली. ... संत ज्ञानेश्वरान, तुकाराम तेन्नाचें मराठी भाशेंत बरयलें. बहिणाबाईन मराठींतूच पण विदर्भाच्या "शैलींत" बरयलें. ...
आपल्या गावाच्या कोंकणीत कथा, कविता लिहिल्यास ती लोकांच्या पुढे येईल. साहित्य खूप झालास तीच शैली प्रमाण होईल. ... संत ज्ञानेश्वराने, तुकारामाने तेव्हाच्या मराठीत लिहिले. बहिणाबाईने मराठीतच, पण विदर्भाच्या शैलीत लिहिले. ...
...
गोंयच्या जाणकारांनी आंत्रुजी शैलींतली कोंकणी प्रमाण केल्ल्या. ताका लागून प्रमाण कोंकणी बरोवपाची गरज आसा. थंय आमी ती प्रमाण कोंकणीच बरयपाक जाय अशें म्हजें मत. थंय आमची बोली घुसवपाचो यत्न केल्यार आसा त्या प्रमाण भाशेंचें खतखतें जातलें हेंय म्हजे प्रामाणिक मत आसा. तुमची प्रमाण कोंकणी गेली तेल लायत, म्हाका म्हज्या गांवांतले अपभ्रंश कोंकणीचो अभिमान आसा. तिका कोणें कितेंच म्हणिल्ले हांव सोसून घेवचो ना अशें जर कोणाक दिसता आसत जाल्यार कितें करपाचें तें जाणकारांनी थारावचें.
गोव्यातल्या जाणकारांनी आंत्रुजी शैलीतली कोंकणी प्रमाण केलेली आहे. म्हणून प्रमाण कोंकणी लिहायची गरज आहे. तिथे आपण प्रमान कोंकणीच लिहायला पाहिजे असे माझे मत. तिथे आपली कोंकणी घुसवायचा प्रयत्न केला तर प्रमाण भाषेचे खतखते होईल हेसुद्धा माझे प्रामाणिक मत आहे. तुमची प्रमाण कोंकणी गेली तेल लावत, मला माझ्या गावातल्या अपभ्रंश कोंकणीचा अभिमान आहे. तिला कोणीही काहीही म्हटलेले मी सोसून घेणार नाही, अए जर कोणाला वाटत असेल तर काय करायचे ते जाणकारांनी ठरवावे.
नाना नागवेंकार
गोकुळवाडी, सांखळी.
मूळ लेखक - नाना नागवेंकर, गोकुळवाडी, सांखळी.
प्रतिक्रिया
8 May 2009 - 10:26 am | विनायक प्रभू
रे धनंजया
8 May 2009 - 11:38 am | नितिन थत्ते
अगदी धनंजय स्टॅण्डर्ड
खराटा
(रंग माझा वेगळा)
8 May 2009 - 11:46 am | नंदन
आवडला, त्यातल्या भावनांशी सहमत आहे. पुलंनी एका लेखात प्रमाणित (मराठळलेल्या? :).) कोकणीचे एक उदाहरण दिले आहे ते असे - "खुद्द मार्क्सान आशिया खंडातल्या विशिष्ट एशियायी उत्पादनपद्धतींची सूक्ष्म अभ्यास करून ताचे योग्य ते महत्त्वमापेन करण्याची गरज प्रतिपादन केली. हे मार्गदर्शन मानूनच ह्या देशातले मार्क्सवादी-लेनिनवादी मुक्तिलढ्याचे डावपेच आंखित आसतात." अशा कोकणीपेक्षा अस्सल मातीतले शब्द घेऊन येणारी कोकणी कधीही अधिक श्रेयस्कर.
बाकी या लेखातून भाषेचा म्हणा वा मानवी स्वभावाचा म्हणा, अजून एक पैलू दिसतो. तो म्हणजे प्रस्थापित नियमांविरूद्ध बंडखोरी करून वेगळे झालेल्या भाषेला, समूहाला किंवा अगदी संगणक आज्ञावलीलाही काहीएक नियमांची - नियम म्हणण्यापेक्षा संकेतांची, गरज भासतेच. ते नियम थोडे स्थिरावले की त्या संकेतांच्या गावकुसाबाहेरही थोडे लोक उरतातच. नियम बदलायच्या वा बाहेर पडण्याच्या खटपटीत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
8 May 2009 - 12:06 pm | यशोधरा
>>अशा कोकणीपेक्षा अस्सल मातीतले शब्द घेऊन येणारी कोकणी कधीही अधिक श्रेयस्कर.>> सहमत.
8 May 2009 - 6:50 pm | चित्रा
नाही का?
थंय आमची बोली घुसवपाचो यत्न केल्यार आसा त्या प्रमाण भाशेंचें खतखतें जातलें हेंय म्हजे प्रामाणिक मत आसा.
प्रामाणिक मत छान मांडले आहे!
माझ्या मते प्रमाण भाषा वापरणे याचा एक हल्लीच्या काळातला फायदा असा की गुगल वापरून अशा लिखाणाचा शोध घेणे सोपे जाते. त्यामुळे भाषा अलंकारिक व्हावी लागते असे काही नाही. जसे शास्त्रीय लेखांमध्ये एक विशिष्ट परिभाषा, प्रमाणभाषा वापरणे हे शिष्टसंमत आहे, तसेच काही ललित लेखनात शब्द कथेची/कवितेची गरज म्हणून येऊ शकतात. बोली-भाषेतले शब्द लेखनाची गरज म्हणून वापरता येतील, आणि ते आवडले तर मोठ्या प्रमाणावर स्विकारलेही जातील असे वाटते.
8 May 2009 - 7:32 pm | क्रान्ति
लेख आवडला. बोली भाषेच्या वापरानं साहित्य नक्कीच अधिक समृद्ध होईल .
आपले गांवचे कोंकणीत, कथा, कविता बरयल्यार ती लोकां सामकार येताली. साहित्य चड आसल्यार तीच शैली प्रमाण जातली. ... संत ज्ञानेश्वरान, तुकाराम तेन्नाचें मराठी भाशेंत बरयलें. बहिणाबाईन मराठींतूच पण विदर्भाच्या "शैलींत" बरयलें. ...
१००% सहमत. पूर्वी आम्हाला वर्हाडी बोली भाषा लौकर कळायची नाही, पण आता श्याम पेटकर, शंकर बडे, मिर्जा अली बेग, राजा धर्माधिकारी अशा आणि इतर अनेक लेखकांचे / कवींचे साहित्य वाचून ती कळायला लागलीय आणि तिचा गोडवा आणि सहजता मनात भरलीय.
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
9 May 2009 - 2:14 am | वेदनयन
बहिणाबाई खानदेशातील(जळगाव), विदर्भातिल नव्हे. मलातरी अहिराणी (बहिणाबाईंची बोली) आणी विदर्भातिल बोलीत जमिन अस्मानाचा फरक वाटतो.
9 May 2009 - 3:52 am | धनंजय
मला गंमत वाटली, म्हणून ते वाक्य मी बदलले नाही. दूरून मला वाटते अंतरांचे परिमाण बदलते.
त्यामुळे गोव्यातील काही लोकांना (त्यात या लेखाचे लेखक) फक्त कोकण, मुंबई-पुणे-कोल्हापूर, आणि विदर्भ इतकेच भाग माहीत असणार.
8 May 2009 - 8:05 pm | लिखाळ
लेख आवडला.
-- लिखाळ.
8 May 2009 - 8:09 pm | अवलिया
हेच बोलतो
--अवलिया
9 May 2009 - 7:26 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला.
लिखाळशी सहमत ,
स्वाती
15 May 2009 - 5:42 am | धनंजय
१३ मे २००९च्या सुनापरांत मध्ये वरील लेखाला श्री. अविनाश च्यारी (थिवी, बार्देश) यांचे उत्तर आले आहे. ते म्हणतात की सांखळीत चौकशी करता "नाना नागवेंकर" नामक कोणी व्यक्ती नाहीच आहे.
पत्रात ते आंत्रुजी कोंकणीतल्या अनेक वैचित्र्यपूर्ण प्रयोगांचा उल्लेख करतात आणि म्हणतात, की आंत्रुजी कोंकणी ही प्रमाण होण्याच्या लायकीचीच नाही.
(उदाहरण : पूर्णभूतकाळ "म्हणलें"चे अतिपूर्णभूतकाळातले आंत्रुजी रूप "म्हणिल्लें" हे श्री च्यारी यांना विचित्र वाटते, त्यांना "म्हणलेलें" असे रूप तर्कानुसारी वाटते, वगैरे. अशी ४-५ उदहरणे दिली आहेत.)
सारांश करत ते म्हणतात :
(प्रमाण केलेली कोंकणी काही मोजकेच लोक बलतात म्हणून ती अख्ख्या गोवेकरांच्या गळ्यात बांधावी काय? ती सुद्धा व्याकरणाचा धाक दाखवून? कोंकणी ही एकादोघांची मिरास असू शकू नये. खूपसे गोवेकर बोलतात तीच प्रमाण कोंकणी म्हणून ठरवु नये काय? अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ, हा विषय भाषातज्ञांचा. पण काना, मात्रा वेलांटी काढायचा त्यांना अधिकार नाही, असे मला वाटते.)
- - -
गंमत म्हणजे "खूपसे गोवेकर बोलतात" ती कुठली कोंकणी हे कोणास ठाऊक. कारण गोव्यात (महाराष्ट्रातही) दहा-वीस किलोमीटरांवर बोली बदलते. आता श्री. च्यारी राहातात ती थिवीची बोली प्रमाण केली तर फोंड्याच्या लोकांना ती अशीच "गळ्यात बांधलेली" होईल नाहीतर काय? प्रमाणित बोली सोडली तर बाकी सार्या बोली गुण्यागोविंदाने एकमुखाने बोलतात अशी अद्भुतरम्य कल्पना खूप लोकांची असते. याचा पुनःप्रत्यय पुन्हापुन्हा येतो, आणि मला मोठी गंमत वाटते.
15 May 2009 - 7:42 pm | लिखाळ
ता क छान आहे.
याचा अर्थ काय असावा? काढायचा म्हणजे काढून टाकायचा असे काही का?
-- लिखाळ.
15 May 2009 - 8:57 pm | धनंजय
नागवेंकर (खरे किंवा टोपणनाव) आणि च्यारी (खरे किंवा टोपणनाव) हे दोघे भाषावैज्ञानिकाच्या व्याख्या-परिभाषेत बोलत नाहीत.
भाषावैज्ञानिकाला कसलाच "अधिकार नसतो". भाषावैज्ञानिक कुठल्याही वैज्ञानिकासारखा वर्णने सांगतो. ही वर्णने सगळी "जर व्याख्या अमुक असेल तर जे दिसते त्याची व्यवस्था तमुक आहे," अशा धर्तीची असतात.
उदाहरण : "जर हिवाळ्याच्या संपात-दिवसाची व्याख्या सूर्योदयाची दक्षिणमर्यादा असेल, तर आजकाल संपात २२ डिसेंबराला येतो, पूर्वी कधी १४ जानेवारीला येत असे. जर संपात आणि संक्रांत (१४ जानेवारी) यांचा काही संबंध असेल, तर पूर्वी तो निकट होता, आता तो विस्कळित आहे." वगैरे. वाटल्यास राजा संपाताची व्याख्या "राजाचा वाढदिवस" असा करू शकतो - तो राजाचा अधिकार, खगोल-वैज्ञानिकाचा नाही. त्याचप्रमाणे संक्रांतीचा सण संपातापासून तोडून नंतर कधी साजरा करायचा अधिकार धर्मपीठाधीशाचा आहे. खगोल-वैज्ञानिकाचा नाही.
(त्याच प्रमाणे) भाषावैज्ञानिकाचे म्हणणे फारतर असे असेल :
आंत्रुजी लोकांचे [जर "आंत्रुजी" शब्दाची व्याख्या अमुक ठिकाणी राहाणारे तमुक लोका अशी केली तर] बोलणे जर ऐकले, आणि त्यांच्या बोलण्यात "म्हण"चे पूर्णभूतकाळातले [जर पूर्णभूतकाळाची अमुक व्याख्या असेल तर... ही पालुपदे जोडून घ्यावीत] रूप "म्हणलें" असे आहे, आणि अतिपूर्णभूतकाळातले रूप "म्हणिल्लें" असे ऐकू येईल. त्याच प्रमाणे बार्देशी लोकांचे बोलणे ऐकले, आणि त्यांच्या बोलण्यात "म्हण"चे पूर्णभूतकाळातले रूप "म्हणलें" असे आहे, आणि अतिपूर्णभूतकाळातले रूप "म्हणलेलें" असे ऐकू येईल.
गोव्याची प्रमाणभाषा आंत्रुजी हे ठरवणे भाषावैज्ञानिकांचे काम नव्हे - ते काम आहे समाजव्यवस्थेचे आणि त्यातील बलवत्तर लोकांचे. (मराठीत पुणेरी-दक्खनी बोली प्रमाण ठरवणारी शिवशाहीतील राज्यव्यवस्था होती. कोणी मराठवाड्यातल्या राजाने महाराष्ट्रात राज्य स्थापन केले तेव्हा ज्ञानेश्वर-मुकुंदराज कवींनी त्या तिथल्या बोलीचा प्रमाण म्हणून स्वीकार केला. त्याचप्रमाणे गोव्यामध्ये आज जी काय सामाजिक बल-व्यवस्था आहे, तिने आंत्रुजीला प्रमाण केले आहे.)
श्री. च्यारी यांची तक्रार खोलवर बघावी तर गोव्याच्या समाजव्यवस्थेबद्दल आहे. आंत्रुजी बोली बोलणार्यांनी राज्यभाषा-कोंकणी वापरामध्ये आंत्रुजी बोली रुजवली - गोव्यातील राजकारणावर आंत्रुजी बोलणार्यांचा पगडा आहे. पण त्याचे खापर श्री. च्यारी भाषावैज्ञानिकांवर फोडत आहेत.
श्री. च्यारी यांचे म्हणणे आहे, की ते स्वतः "म्हणलेलें" असे बोलतात ती "खरी, बहुसंख्य लोकांची" कोंकणी, आणि "म्हणिल्लें" हे आंत्रुजी बोलीतले रूप भाषावैज्ञानिकांनी लादलेले आहे. (माझ्या मते भाषाविज्ञानाबद्दल चुकीची कल्पना करून) श्री. च्यारी म्हणतात की "म्हणलेलें->म्हणिल्लें" बनवण्यासाठी भाषावैज्ञानिकांनी एक वेलांटी आणि एक मात्रा छाटली आहे, आणि तसे करण्याचा भाषावैज्ञानिकांचा अधिकार नाही.
वरच्या विश्लेषणातील केवळ निळ्या ठशातला मजकूर श्री. च्यारी यांच्या लेखनातूनच सहज आलेला आहे. पण तसे काही म्हणण्याकरिता वर विश्लेषण केल्याप्रमाणे त्यांची गृहीतके असली पाहिजेत. (श्री. नागवेकर यांची सुद्धा भाषावैज्ञानिकांच्या कामाबद्दल विचित्र कल्पना आहे, असे दिसते.)
15 May 2009 - 7:55 am | विसोबा खेचर
ए धन्या, मस्त लेख रे. मजा आली! :)
आपला,
(बोलीभाषेचाच पुरस्कर्ता) तात्या.
--
प्रमाणभाषा? ते काय असतं बॉ? आणि अमूक अमूक म्हणजे प्रमाण हे ठरवायचा अधिकार आम्ही कुणालाही दिलेला नाहीये!
16 May 2009 - 11:52 am | यन्ना _रास्कला
(बोलीभाषेचाच पुरस्कर्ता) तात्या.
प्रमाणभाषा? ते काय असतं बॉ? आणि अमूक अमूक म्हणजे प्रमाण हे ठरवायचा अधिकार आम्ही कुणालाही दिलेला नाहीये!
तात्त्यानु निलुभावु कड पन पाहा. डामरट मानुस मिपावर सुद्द लिवायला सान्गतो. आशान मिपा वरली मजाच जायील. कायतरी करुन मिपा बरखास्त करन्याचा डाव दिस्तो त्याचा. :( सांबालुन राहा.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
15 May 2009 - 9:58 am | पिवळा डांबिस
Sorry,
AamI fkta romI kokaNIMch vaachatoMva....
XaviorsaayabaachI aaNa!!
15 May 2009 - 11:05 am | ऋषिकेश
मस्त लेख.
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
15 May 2009 - 1:48 pm | अभिरत भिरभि-या
इटुकल्या राज्यातल्या भाषेचे हे आभाळाएवढे वाद पाहून गंमत वाटली. मागच्या आठवड्यातल्या टाईम्समध्ये एका लेखकाने फारशी साहित्यनिर्मिती होत नसल्याकारणाने कोकणी आणि इतर काही भारतीय भाषांना Endangered म्हटले होते.
रोमी/देवनागरी, प्रमाण/ग्राम्य, मराठी/कोकणी अशा वादातून आता गोव्याने बाहेर पडायला हवे.
अवांतर:
पाश्चात्य धर्तीची कोकणी गाणी खूप गोड असतात. मराठी जनतेला कळतील इतपत सुलभ केली तर त्यांना महाराष्ट्राचा प्रचंड मोठा ऑडीयन्स मिळेल. कोणी करेल काय ? :?
10 Oct 2011 - 5:52 pm | मेघवेडा
लोकसत्तचा आजचा अग्रलेख सुनापरान्ताची माती वाचून सुनापरान्त वर्तमानपत्राची आठवण झाली आणि त्यांची एखादी ई-आवृत्ती असावी अशा शंकेने गूगलले असता हे सापडले. मस्त लेख धनंजयशेठ. लेखातील भावनांशी बहुतांशी सहमत.. पुलंचा 'एक शून्य मी' पुस्तकातला 'दिशाभूल म्हणतात ती हीच, कळ्ळें मूं भेंब्रोबाब?' हा लेख आठवला.
10 Oct 2011 - 7:27 pm | पैसा
प्रमाण भास गेली तेल लायत! कोकणी मरपाक पावल्या. ताजेबद्दल लेख हांव बरयतां आसां. मात्शे र्हावांत.
11 Oct 2011 - 12:20 am | प्रीत-मोहर
वाट पळयता गो .. बेगीना बरय
(गावठी) प्रीमो
24 Jan 2016 - 12:10 pm | नीळा
माज्या कोकणे चौ माका अभीमान असा
24 Jan 2016 - 12:45 pm | DEADPOOL
लेख आवडला!
माझे आजोबा नेहमी म्हणायचे कोकणी भाषेतली शीवीही कानाला गोड वाटते!