मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी जून २०२३

चंद्रसूर्यकुमार · · राजकारण
उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात एके ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची स्तुती केली म्हणून संतापून जाऊन अमजद खान या टॅक्सी ड्रायव्हरने राजेश दुबे या व्यक्तीची हत्या केली आहे. त्याबद्दल अमजद खानला पोलिसांनी अटक केली आहे. https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/13/taxi-driver-held-for-mowing-passenger-to-death-for-praisingpm-modi-cm-yogiin-mirzapur-2584670.html समजा हीच परिस्थिती उलटी असती तर काय झाले असते? समजा मोदींवर टीका केली (किंवा राहुल, केजरीवाल, ममता वगैरेंची स्तुती केली म्हणून) कोणी एखाद्याला ठार मारले असते तर प्रचंड गदारोळ उडाला असता हीच शक्यता जास्त. भारतात असहिष्णुता किती वाढली आहे म्हणून जगभर बोंब मारली गेली असती. मोदी सत्तेत आल्यानंतर माणसामाणसातले संबंध कसे बिघडले आहेत यावर कोणीकोणी फेसबुक पोस्ट लिहिल्या असत्या. शेवटी मोदींनी राजीनामा द्यावा असती मागणी झाली असती. पण कोणा अमजद खानने राजेश दुबेला मोदी आणि योगी यांची स्तुती केली म्हणून ठार मारले आहे. मग काय? चिडिचूप शांतता.

वाचन 11912 प्रतिक्रिया 0