त्वचेचा वर्ण
एक प्रश्न आहे.
जर पहिला माणूस अफ्रिकेत जन्माला आला असेल आणि अफ्रिकेत जन्मलेला तो माणूस आणि त्याची जी कोणी सहचारिणी असेल आणि ती सुद्धा अफ्रिकेत जन्मल्यामुळे हे दोघेही कृष्णवर्णीय असतील तर त्यांच्या संबंधातून जन्मलेली पुढची सगळी प्रजा ही सुद्धा कृष्णवर्णीय असायला हवी हा साधा तर्क आहे. पण प्रत्यक्षात मात्र युरोपियन लोक हे 'गोरे' कसे? शिवाय बहुतांश युरोपियन लोकांचे डोळे घारे कसे? जर आदिमानव जोडपे काळे असेल तर मग युरोपियन वंशाची प्रजा ही गोरी कशामुळे झाली? काही जनुकीय बदल घडले का? की इतर काही कारण? हे कधी घडले? किती वर्षे गेली यात? भारतात २ हजार वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय लोक इझराईलमधून आली. अजूनही ते लोक भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात राहतायत. भारतातल्या सध्याच्या ज्यू लोकांच्या त्वचेचा वर्ण हा त्यांच्या २ हजार वर्षांपूर्वीच्या पूर्वजांच्या तुलनेत बदलला आहे का? फारसा बदल झाला नसेल तर वातावरणाचा त्वचेच्या रंगाशी संबंध फारसा नसतो असे म्हणावे का?
विनंती: १) वेबलिंकपेक्षा सोप्या मराठीत हा विषय उलगडला जावा.
२) कृपया विषयाला अनुसरुन प्रतिसाद यावेत. कशाला हवीय ही माहिती? रंगावर काही नसतं हो! माणसाचं मन चांगलं असलं की झालं वगैरे नको.
मानववंशशास्त्र विषयातली साधी उत्सुकता आहे.
वर्गीकरण
वाचन
8574
प्रतिक्रिया
0