मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२

पाषाणभेद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक, १५ ऑगस्ट, २०२२ मिपाकट्टा संपन्न - पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ मु. मोहाडी ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे भेट व सह्याद्री फार्म हा कारखाना पाहणी. ठरल्याप्रमाणे मिपाकट्टा अर्थात पावसाळी भेट १५ ऑगस्ट, २०२२ रोजी संपन्न झाला. मिपाकर पिंगू व वहिनी नव्या मुंबईतून नाशिकला आले. मयुरेश पालकर आधीच आले होते. त्यांची गाडी खराब झाल्याने ते उशीरा जॉईन होणार होते. मी, माझी पत्नी व माझी मुलगी तसेच पिंगू व वहिनी मोहाडी येथे दुपारी१२ च्या सुमारास पोहोचलो. आजूबाजूला अतिशय रम्य व हिरवागार परिसर आहे. डाळींबांच्या बागा, पेरू, द्राक्षांच्या बागा, ऊस व भाजीपाला यांची हिरवी शेते यामुळे पावसाळ्यात हा प्रदेश नयनरम्य दिसत होता. मोहाडी गावातील खालील ठिकाणे पाहिली. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (जुनी बांधणीचे दुमजली लाकडी बांधकामातील मंदीर. रंगकाम सुरेख) Board गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव. पाण्याची बारव. बारकाईने पाहिल्यास शेंदूर लावलेल्या सात असरा (देवी) दिसतील. या असरा जेथे वस्ती करतात तेथे पाणी असतेच असते, कमी होत नाही असा समज आहे. निसर्गरम्य परिसर होता. मोहाडमल्ल देवस्थान. मोहाडमल्ल देवस्थान. यांच्या नावाने आषाढ महिन्यात सोंगे (बोहाडा) निघतात. सोमवंशी वाडा त्यानंतर सह्याद्री फार्म कारखाना येथे गेलो. जेवणाची वेळ झाल्याने प्रथम कारखान्याच्या कॅन्टीनमध्ये जेवण केले. सह्याद्री फार्म हा शेतीमाल प्रोसेस करणारा कारखाना आहे. येथे फळे व भाज्या पॅकींग, कोल्ड स्टोरेज करणे, जॅम, जेली, सॉसेस बनवणे इत्यादी कामे चालतात. पर्यटकांना बॅचेसमध्ये कारखाना दाखवला जातो. १५ ऑगस्ट असल्याने कारखान्यात वर्कर्स नव्हते. त्यामुळे वर्कींग पाहता आले नाही. इतर सर्व विभाग गॅलरीतून दाखवतात. अतिशय प्रसन्न वातावरणात ऑफीस व फॅक्टरी परिसर आहे. बर्ड आय व्ह्यू ऑफ सह्याद्री फार्म्स, मोहाडी. श्री. विलास शिंदे यांनी मोठ्या प्रयत्नातून शेतकर्यांसाठी हे काम केले आहे. सह्याद्री फार्म्स ऑफीस. जॅम, जेली, सॉसेस, पॅकेज्ड फुड, प्रोसेस्ड फुड आदी शंभराच्या वर उत्पादने आहेत. १५ ऑगस्ट, २०२२. जय हिंद, - माझी मुलगी, स्वराली. झेंडा आमचा उंच फडकतो प्रगतीचे शिखर गाठतो सह्याद्री फार्म्स, मोहाडी येथील १५ ऑगस्टचा झेंडा. मिपाकरांची भेट १५ ऑगस्ट २०२२, मोहाडी, सह्याद्री फार्म्स. डावीकडून पिंगू, पाभे, सौ. पाभे, कु. स्वराली, सौ. पिंगू, सौ. पालकर, मयुरेश पालकर. परिसर खूप मोठा आहे. सह्याद्री फार्मच्या कार्पोरेट कार्यालयापुढे अतिशय उंच उभारलेला १५ ऑगस्टचा झेंडा फडकत होता. पाऊस अधून मधून सुरूच होता. तशाच वातावरणात पुन्हा नाशिकला प्रयाण झाले. पुढील कट्टा असाच गर्दी नसलेल्या निसर्गरम्य ठिकाणी ठरवू या अन तेथे भेटूया.

वाचन 9141 प्रतिक्रिया 0