यह मेरा काम नही है
"अरे सचिन यहा आना तो."
अनिल ने मला त्याच्या कॅबीनमध्ये बोलावले.
अनिल म्हणजे डाटा सेंटरचा हेड मॅनेजर होता. स्वभावाने अगदीच मोकळा नसला तरी एक माणूस म्हणून तो ठिक होता. एखादी गोष्ट, नवी टेक्नॉलॉजी माहीत करून आपल्या डेटा सेंटर मध्ये कशी आणता येईल याबाबत तो नेहमी विचार करत असे.
आता त्याने मला कसल्यातरी कामाला बोलावले होते. तसेही मी काही महत्वाचे काम करत नव्हतो.
"तुम्हे कल शाम को नगर जाना पडेगा. यह अपना पहेलाही प्रोजेक्ट है. वहा जाके कॉम्पूटर को नेटवर्क मे लाना यह काम है." - अनिल.
"मतलब वहा जाकर कॉम्पूटर इंटॉल करना वगैरा काम है क्या?", मी प्रश्न केला.
हा लगभग वही है. नगर अर्बन बॅंक है. उसका प्रोजेक्ट है. ब्रांच मिलाकर १२५ कॉम्पूटर है.
लेकीन सर यह अपना काम नही है, मी उत्तरलो.
यहा देखो.,
असे म्हणून अनिलने त्याच्या डेस्कटॉपमधील टास्कबारमधील नोटीफिकेशन एरीयामधील कॉप्यूटर नेटवर्कींगचे आयकॉन दाखवले व मला विचारले, "यह क्या है?"
मी उत्तर दिले की आपका डेस्कटॉप नेटवर्क मे है उसीके बारे मे यह आयकॉन जानकारी देता है.
"बस, यही तो काम करना है. अपना काम नही भी है, और वह हमे आता है तो करना पडता है. मेरा काम नही है ऐसे नही बोलना चाहीए", अशी पुस्ती त्याने जोडली.
असेही मी या डिपार्टमेंटमध्ये, कंपनीत नवीन होतो. नक्की नाही म्हटले की काय होईल असा विचार करून मी ठासून होकार भरला नाही. पण मला उद्या नगरला जावे लागणार होते हे नक्की.
अनिलने मग सांगितले की प्रोजेक्टमधून दिलेश, तसेच हार्डवेअर मधून प्रसाद हे देखील येत आहेत. त्यांचेबरोबर को-ऑर्डीनेशन करून उद्या निघा.
थोडक्यात अनिलने त्याचे काम बरोबर करून घेतले होते. एकतर मला स्पष्टपणे नाही म्हणाता येणार नव्हते हे त्याला माहीत होते. प्रोजेक्टचे दोन जण तेथे जाणारच होते, पण त्यांच्या मदतील आणखी एखादा असावा म्हणून मला तेथे जायला त्याने भाग पाडले होते.
दुसर्या दिवशी आम्ही चार जण एका बसने नगरला पोहोचलो. रात्री आधीच बुक केलेल्या हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी छान पैकी नाष्टा केला. त्यानंतर तेथे काम सुरू केले. अर्थात तेथे मला तसे काम नव्हते. पण मग रिकामे राहून काय करायचे त्यापेक्षा काहीतरी करावे म्हणून कॉम्पूटर मध्ये ऑपरेटींग सिस्टम टाकत बसलो.
नगर शहरात आम्ही तीन दिवस होतो. तेथील काम अजून चालणार होते. पण मी तिसर्या दिवशी घरी निघालो.
त्यानंतर असेच एक दिवस अनिलचे टेलीफोनवर बिलींग टीम बरोबर काही तरी वादाचा प्रसंग चालू असावा अशा अर्थाचे आवाज चढवून काहीतरी बोलणे चालू होते. तेव्हा अनिल अगदी स्पष्टपणे बोलला की, "यह मेरा काम नही है."
वाचन
7000
प्रतिक्रिया
0