मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनात भाषांतर न करता

उपयोजक · · काथ्याकूट
एक माहिती हवी आहे. शहरात राहणार्‍या बहुतांश मराठी लोकहो! तुमच्या घरात हिंदीभाषिक कोणीही नसूनही,किंवा तुमच्या अवतीभोवती हिंदी भाषिकांचा घोळका सतत नसूनही आपल्याला सहजपणे हिंदीतून कसं काय बोलता येतं? विशेष परिश्रम न घेताही हिंदी शब्द कसे आठवतात? वाक्ये बरोबर कशी काय तयार होतात मनात? हिंदीतून बोलताना शहरी मराठी लोकांना(विशेषत: महानगरातल्या) मनात मराठी वाक्याचे हिंदीत भाषांतर करावे लागत नाही. सहजपणे बोलता येतं हे भाषांतर न करता सहजपणे एखादी भाषा बोलता येणं मानवी मेंदू कसं शक्य करतो? किंवा हे कशामुळे होतं? हिंदी आणि मराठीत बरेचसे शब्द समान आहेत किंवा हिंदी मालिका ,हिंदी सिनेमे यांच्या भडिमारानेच हे शक्य झालंय का? तसं असेल तर मराठीशी अजिबात मिळतीजुळत्या नसणार्‍या भाषेतील कार्यक्रम अनेक महिने ऐकले तर त्या भाषेत हिंदी येतं तितक्या सहजपणे बोलता येईल का? म्हणजे मनात मराठी वाक्याचं लक्ष्यित भाषेत भाषांतर न करता?

वाचन 6465 प्रतिक्रिया 0