ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
16 May 2022 - 9:49 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.

मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.

एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.

आता १० महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

18 May 2022 - 2:48 pm | जेम्स वांड

थँक्स, मला नेमके हेच हवे होते, रेफरन्स असलेले कधीही उत्तम नाहीतर नुसतं बोलण्याचा अधिकार वापरण्यात काही पॉईंट नसतो.

काड्यासारू आगलावे's picture

18 May 2022 - 6:10 pm | काड्यासारू आगलावे

पण तुम्ही त्या डॅंबिस यांची गोती केलीत ना? त्यांनी ठोकून तर दिलॅ पण पान नंबर मागीतले तर युट्युब विडीओज घेऊन आलेत. :) ऊद्या ते भाऊ तोसरेकरांच्या विडीओज ही देतील. खीक्क.

जेम्स वांड's picture

19 May 2022 - 6:50 am | जेम्स वांड

तुम्ही जे कोणी असाल ते,

तुमचे ते कोण डॅंबिस आहेत त्यांच्याशी काही वाकडे असले तर समोरासमोर बघा आपापसात, वाटल्यास एकमेकांची डोकीही फोडा, मला काहीच हरकत नाही, फक्त त्यांची मापं काढून गोळी घालायला माझा खांदा वापरण्याचे फालतू प्रकार बंद करा पाहू त्वरित.

मी काही इथे तुमचे स्कोर सेटल करण्याच्या सुपाऱ्या वाजवायला येत नाही, डॅंबिस ह्यांच्याशीही माझे वाकडे नाही काही किंवा तुमच्याशीही काही वाकडे नाही, त्यामुळे बोलायचे असले तर मुद्दे आधारित बोला नाहीतर दुसऱ्या कोणाला तरी काड्या सारा.

काड्यासारू आगलावे's picture

19 May 2022 - 12:59 pm | काड्यासारू आगलावे

हॅ हॅ हॅ हॅ. माझा खांदा वापरणे बंद करा. हॅ हॅ हॅ हॅ

एका विशिष्ठ समुदायाविषयी आगलावे विचार खऱ्याखुऱ्या आयडीने मांडता येत नाहीत म्हणून डुप्लिकेट आयडी काढावा लागला असे दिसतेय.

काड्यासारू आगलावे's picture

19 May 2022 - 1:31 pm | काड्यासारू आगलावे

प्रत्सेक समाजात चांगले वाईट लोक असतात, जगातूल कुठलाच समाज ह्याला अपवाद नाही. कुणाचे वाईट गुण दाखवले म्हणजे त्याच्या समाजाबद्दल आगलावे विचार पसरवले असे होत नाही. बुध्दी कम्प्युटर गेम पलीकडे कधी वापरली नाही का?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 May 2022 - 11:42 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

देशापुढील समस्या काय आहेत? सगळ्या मशीदींचा ईतिहास तपासुन तिकडे मंदिर होते का ते पाहणे? रस्त्यांची/शहरांची नावे बदलणे?
की महागाई/बेरोजगारी/स्टार्ट अप इन्डिया?
रूपया जो घसरत आहे तो १ डॉलर-९० पर्यंत जाणार आहे अशी चर्चा आहे.

श्रीगुरुजी's picture

19 May 2022 - 12:01 am | श्रीगुरुजी

देशाचं माहिती नाही, पण काही ओळी लिहिलेल्या एका २९ वर्षीय मुलीच्या मागे सर्व पोलिसयंत्रणा लावून, प्रत्येक पोलिस ठाण्यात तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून, तिला पकडायला अनेक पोलिस पाठवून तिला विनाजामीन आयुष्यभर तुरूंगात डांबणे ही राज्यापुढील सर्वात महत्त्वाची समस्या आहे. तिच्या फोन, लॅपटॉपची फोरेन्सिक तपासणी करून तिला अतिरेकी सिद्ध करणे हेच राज्याचे प्रमुख ध्येय आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 May 2022 - 10:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर

केतकी चितळे विरुद्ध डझनभर केसेस करणे,ह्ल्ला करणे हे निषेधार्हच आहे. खरे तर त्या संजय राउतला जो किरीट सोमय्यांना टी.व्ही.वर येउन शिविगाळ करत होता, महिनाभर जेलमध्ये टाकायला हवा होता पण आमचे पत्रकार जे आता केतकीला "विक्रुती" म्हणत आहेत तेव्हा मात्र माना डोलवत होते.

sunil kachure's picture

19 May 2022 - 12:03 am | sunil kachure

तुमचा मता शी सहमत.जग आर्थिक मंदीत जाण्या सारखी स्थिती आता आहे.भारत पण त्या मधून सुटणार नाही.
आज
मंदिर,मशीद,हिंदू ,मुस्लिम ह्या पेक्षा देशाचे आर्थिक आरोग्य चांगले राहवे ह्या वर च लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे...
इतके पोट तिडके नी हेच परत परत लिहीत आहे..
बरेच येथील आयडी त्या मुळे नाराज होत आहेत मानहानी करत आहेत..तरी हेच परत लिहीत आहे.
आम्हला ह्याच देशात राहायचे आहे.अमेरिका किंवा बाकी परदेशात राहण्याची व्यवस्था नाही.
त्या मुळे हा आपला देश आर्थिक बाबतीत कसा powerful होईल तेच ध्येय असावे..
३० कोटी भारतीय मुस्लिम आहेत ते इथेच राहणार आहेत .
त्या मध्ये बदल होणार नाही.
द्वेष करण्या पेक्षा न्यायचे आणि कठोर कायद्याचे राज्य निर्माण करणे हाच एकमेव मार्ग आहे..
मंदिर ,मशीद नंतर बघू जेव्हा सर्व समस्या सुटतील तेव्हां

सुबोध खरे's picture

19 May 2022 - 9:15 am | सुबोध खरे

काय काय आणि कसं कसं ते डिटेलवार मध्ये सांगा बघू

आपण ते भावी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू

मग झालाच भारत बलसागर आणि श्रीमंत

हा का ना का

अमर विश्वास's picture

19 May 2022 - 12:06 pm | अमर विश्वास

अरे .. तुम्ही अर्थतज्ज्ञ पण आहेत का ?
जग आर्थिक मंदीत जाणार म्हणता ?

आम्ही जरा युरोप प्रवास करावा म्हणत होतो ... मग आता कसे करावे ?

सुरसंगम's picture

22 May 2022 - 4:48 pm | सुरसंगम

असं कसं असं कसं ?

उलट आता तर प्रत्येक मशिद खोदुन बघावी लागेल. अगदी दिल्लीतील जामा मशिदसुध्दा

खरं तर औरंग्याच्या आणि इतरांच्याही काळात नुसत्या खुल्या जागेवर मशिद बांधल्याची उदा. च नाहियेत काय?

रशिया युक्रेन युद्धामुळे पुर्ण जगावर परिणाम झालेले आहेत.

१. रशियातुन तेल व वायु निर्यातीवर परिणाम. त्यामुळे खनिज तेलाच्या व नैसर्गिक वायुच्या किमती वाढु लागल्या .
अश्या परिस्थीतीत भारताने रशियाला सपोर्ट केल्या बद्द्ल रशियाने भारताला विषेश सवलतीच्या दरात खनिज तेल व नैसर्गिक वायु
उपलब्ध करुन दिला. ह्यावरुन अमेरीकेच्या पोटात मुरडा पडला. भारताच्या परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर यांनी अमेरिकेला चांगलेच
सुनावले की रशियाकडुन भारत जितका खनिज तेल व नैसर्गिक वायु महिन्या भरात विकत घेत आहे तितका एकटा युरोप एका
दुपारी विकत घेत आहे.

२. युक्रेन जगातील सर्वात मोठा गहु उत्पादक देश आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत सुद्धा तो जगातल्या सर्वात मोठ्या उत्पादक देशापैकी
एक आहे. युद्धामुळे युक्रेन वर या दोन्ही वस्तुसाठी अवलंबुन असलेले सर्व देश आता दुसर्या गहु उत्पादक देशाकडे बघु लागले आहेत.
टर्की, ईजित्प सारखे युक्रेन कडुन गहु विकत घेत असत पण आता गव्हासाठी त्यांना भारता कडे बघावे लागत आहे.
केन्या सारखा गरिब देशा भारताच्या गव्हाला खालच्या दर्ज्याचा समजत असे. भारतीय गव्हात किडे, फंगस आहे अश्या सबबी खाली
केन्याने भारतीय गव्हाला कधीच पसंती दिली नव्हती. पण रशिया युक्रेन युद्धामुळे परिस्थिती बदलली. आता केन्याच्या सरकारला
भारतीय गव्हाची चाचणी करण्यासाठी आपल्या अधिकार्यांना पाठवायचे आहे. भारतीय गव्हा शिवाय दुसरा पर्याय केन्याकडे नसल्याने
त्यांना भारतीय गव्हाला पसंती द्याविच लागेल.

३. जागतीक पातळीवर गव्हाच्या कमतरतेमुळे भारताच्या गव्हाला चांगला दर मिळत आहे. गव्हाला आता चां गलीच मागणी आहे.
अश्या निर्यात ऑर्डर असताना कोणतीही पैश्याच पाठबळ नसलेला गहु उत्पादक भारतीय शेतकरी अश्या संधीचा फायदा घेऊ
शकणार नाहीत. पण ह्याचा खुप मोठा फायदा गव्हाच्या बिझनेस मधले आडते घेऊ शकतात. ते सर्व गहू सरकारला विकण्याएवजी
निर्यात करुन टाकतील पण गहु उत्पादक भारतीय शेतकरी मात्र निर्धनच राहील. ह्याचा सारसार विचार करुनच भारत सरकारने गहु
निर्यातीवर बंदी आणलेली आहे.

अर्धवटराव's picture

19 May 2022 - 10:54 am | अर्धवटराव

एव्हाना कृषी कायदे अमलात आले असते तर प्राप्त परिस्थितीचा गहु उत्पादक शेतकर्‍यांना फायदा झाला असता काय? कदाचीत थोडाफार झाला असता असं वाटतं.

जेम्स वांड's picture

19 May 2022 - 11:13 am | जेम्स वांड

युक्रेन जगातील सर्वात मोठा गहु उत्पादक देश आहे. खाद्य तेलाच्या बाबतीत सुद्धा तो जगातल्या सर्वात मोठ्या उत्पादक देशापैकी

.

वरील तक्त्यानुसार युक्रेन हा टॉप टेन प्रोड्युसर्स मध्ये आहे गव्हाच्या पण टॉपला नाही. तो आठव्या क्रमांकावर असून डबघाईला आलेला पाकिस्तान सुद्धा त्याच्यापेक्षा एक पायरी वर आहे गहू उत्पादनात, आकडे २०२० चे आहेत २०२१च्या एका हंगामात युक्रेन आलाच असला तर एखाद पायरी वर पाकिस्तानच्या जागी आला असेल, असे नसल्यास एकाच मोसमात युक्रेन जागतिक गहू उत्पादनात अव्वल झाला असल्यास २०२२ ची युक्रेनियन गव्हाची आकडेवारी आपण मांडावीत.

डँबिस००७'s picture

19 May 2022 - 4:03 pm | डँबिस००७

वांड साहेब ,
चुक निदर्शनास आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या मते, रशिया युक्रेन युद्धा मुळे गहु , खनिज तेल, नैसर्गिक वायु, खाद्य तेलाच्या बाजारपेठेचे संतुलन बिघडले हे मान्य करायला काही हरकत नसावी.

डँबिस००७'s picture

19 May 2022 - 4:40 pm | डँबिस००७

अफघाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यावर अमेरिकेने अफघाणिस्तानचे डॉ अकॉंउट गोठवले. त्यामुळे तिथे अन्न धान्याचा तुटवडा झालेला होता. अश्या परीस्थितीत भारताने व पाकिस्तानने हजारो टन गहु अफघाणिस्तानला पाठवला. निकृष्ट दर्जाचा गहु म्हणुन पाकिस्तानच्या गव्हाला अफघाणिस्तानच्या सरकारने नाकारले होते.
भारताच्या गव्हाची अशीच स्थिती केन्यात झाली होती.
जेंव्हा व्यापारी थोड्या फायद्यासाठी हलक्या दर्ज्याचा माल निर्यात करतात त्यावेळेला तो व्यापारी ब्लॅकलिस्ट होतोच पण देशाच नाव खराब होत. निर्यात मालाच्या गुणवत्तेच्या बाबती सरकारचे बँधनकारी निकष असावेत. ज्यामूळे अश्या प्रकारांना आळा बसेल. केन्याच्या बाबतीत हेच झाल होत.
हल्लीच नायजेरीयाने भारतीय औषध निर्मात्याबद्दल भारत सरकार कडे आरोप केलेले आहेत. भारतीय औषधाला बॅन करु अशी धमकीही नायजेरीयाने दिलेली आहे. १९९०-१९९५ साली कापुस उत्पादक शेतकर्याची परिस्थिती कशी होती हे सर्वांनाच माहिती असेल. जीव देणार्या शेतकर्यात कापुस पिकवणार्या शेतकर्याचा नंबर मोठा होता. पण आज देशात पिकणार्या कापसापैकी ८०% निर्यात होतो. कापड बनवणार्या कंपन्यांना लागणारा कापुस मिळवण्यात कंपन्यांची दमछाक होत आहे. आयत केलेला कापुस महाग असतो. जगात सर्वात जास्त कापुस पिकवणारा देश असुन सुद्धा तयार कापड व शिवलेले कपडे निर्यातीच्या रेस मध्ये भारत कुठेच नाही. उलट भारतातले कापड कारखाने बंद व्हायच्या मार्गावर आहेत.
जगात सर्वात जास्त कापुस पिकवणारा देश आज सर्वात जास्त कापुस निर्यात करत आहे. पण कापुस पिकवणारा शेतकरी ? तो निर्धनच राहीला. ह्या कापुस निर्यात धंद्यातले
दलाल मात्र गब्बर झाले.
तरी सुद्धा भाजपा सरकारच्या शेती विषयीच्या कायद्याच्या बाजुने जनता व शेतकरी उभे राहिले नाहीत.

" शेती विषयक कायदा "केला तर पंजाब मधिल "अकाली दलाचा" पाठिंबा रहाणार नाही व त्याचे दूरागामी परीणाम होतील ह्याची खात्री असुनही भाजपा सरकारने हा कायदा आणला. भाजपाला कायदा मागे घ्यावा लागला, पंजाबची निवडणुक हरावी लागली. पण ह्या पेक्षा मोठ नुकसान शोतकर्यांनी स्व:ताच करुन घेतल, आता ह्या पुढे कोणतेही सरकार शेतकर्याचा विचार करायला कचरतील.

जेम्स वांड's picture

19 May 2022 - 4:57 pm | जेम्स वांड

मी थोडा वेगळ्या फॅक्टमध्ये शिरलो पण तुमचा मुद्दा मान्य करण्यास मला काहीच प्रत्यव्याय नाही.

डँबिस००७'s picture

22 May 2022 - 10:46 am | डँबिस००७

पाकिस्तान जगातला ७ वा मोठा गहु उत्पादक देश आहे. २५.२ मिली टन च्या हिशेबाने २५ कोटी पाकिस्तान जनतेला पर डोई १०० किलो गहु बसतो. निर्यात तर सोडा पाकीस्तान गेले कित्येक वर्ष गहु आयात करतोय. त्याविरुद्ध भारत जनसंख्येच्या हिशेबाने पाकीस्तानच्यापाच पट आहे आणि गहु उत्पादना प्रमाणे पाकीस्तानच्या चारच पट आहे. तरी सुद्धा गेले अनेक वर्षे भारत गहु निर्यात करत आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 May 2022 - 11:08 am | चंद्रसूर्यकुमार

यात लोकांच्या खाण्याच्या सवयी/पद्धती यांचा वाटा असेल का? भारतात दक्षिणेत, अगदी महाराष्ट्रात सुद्धा तांदूळ खायचे प्रमाण बरेच आहे. सामान्यतः किनारट्टीवरील प्रदेशात तांदूळ जास्त खातात. पाकिस्तान पेक्षा भारताला अधिक प्रमाणात किनारपट्टी आहे. त्याउलट पाकिस्तानात अर्धी लोकसंख्या पंजाबमध्ये आहे. आपल्या पंजाबमध्येही गहू खायचे प्रमाण बरेच जास्त आहे. तसेच तिकडच्या पंजाबमध्ये असेल याची कल्पना करता येते.

मुक्त विहारि's picture

22 May 2022 - 11:54 am | मुक्त विहारि

भ्रष्टाचार ....

सरकारने गहू खरेदी करायचा आणि तो सडवायचा...

आणि मग आयात केलेल्या गव्हात कमीशन खायचे ...

सुबोध खरे's picture

19 May 2022 - 11:42 am | सुबोध खरे

उत्पादनात नाही पण निर्यातीत रशिया पहिला आणि युक्रेन पाचवा क्रमांक असलेले देश आहेत.

https://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_wheat_exports

आता पहिल्या आणि पाचव्या देशाने निर्यात बंद केली म्हटल्यावर गव्हाची किंमत वाढणे आपोआप होणारच

sunil kachure's picture

19 May 2022 - 1:50 pm | sunil kachure

खरे भले माझ्या नावाचा विकृत रुपांतर करत असलं तरी त्यांच्या काही पोस्ट शी प्रामाणिक पणाने(जे पटत तेच लिहणे मला आवडत)
गहू उत्पादन करणारे पहिले दहा देश ह्या मध्ये युक्रेन पाठी असेल .
चीन आणि भारत पुढे असेल पण चीन आणि भारताची लोकसंख्या पण खूप मोठी आहे .
देशातील नागरिकांचे पोट भरण्यासाठी लागणारा गहू बाजूला केला तर एक्सपोर्ट करायला काय शिल्लक राहणार.
देशाच्या साधन संपत्ती वर पाहिले देशातील नागरिकांचा हक्क.
युक्रेन मध्ये उत्पादन कमी होत असले तरी त्यांची देशांतर्गत गरज कमी आहे त्या मुळे तो मुख्य गहू निर्यातदार आहे.
युक्रेन,रशिया युद्ध मुळे जगात अन्न धान्य ची टंचाई निर्माण होईल असा इशारा दिला गेलेला आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

19 May 2022 - 1:58 pm | चंद्रसूर्यकुमार

दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविल्याबद्दल यासिन मलिकला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. https://www.ndtv.com/india-news/kashmiri-separatist-yasin-malik-convicte...

आणि असल्या माणसाला एकेकाळी आपले पंतप्रधान मानाने दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात बोलावून घेत असत. असला घाणेरडा माणूस आपला १० वर्षे पंतप्रधान होता याची खरोखरच लाज वाटली.

manmohan

चंद्रसूर्यकुमार's picture

19 May 2022 - 2:06 pm | चंद्रसूर्यकुमार

शाळेत असताना तरूण भारतमध्ये आलेल्या लेखांचे संकलन असलेली एक 'झेलमची हाक' म्हणून पुस्तिका वाचली होती.त्यात उल्लेख होता की यासिन मलिकला हृदयविकार आहे. या प्रकाराला आता ३० वर्षे होऊन गेली आहेत. तेव्हापासून हा लेकाचा कधी गचकतो याची वाट बघत आहे. तरी तो अजूनही जिवंतच आहे :(

असले राक्षस लवकर गचकत नाही हो.
बाकी आता तमाम भेदी लोक हा कसा न्याय व्यवस्थेचा दुरुपयोग आहे / कश्मीरी लोकांवर अन्याय आहे वगेरे वगेरे रुदन चालु करतील.
काश्मीरात पुर आला होता तेव्हा ह्यानेच भारतीय सैनिका कडुन मदत सामग्री हिसकाउन आपली म्हणुन लोकांना वाटली होती ..

काश्मीरातल्या तथकथीत नेते लोकांचे मुखवटे गळत आहेत हे खुप चांगले आहे ... अजुन २/३ वर्षात काश्मीर मुळ प्रवाहात येईल अशी आशा आहे ...

“मंदिर-मशिदीवर वणवा पेटवताना…”; ‘ज्ञानवापी हे २०२४ साठीचे उत्खनन’ असल्याचं म्हणत शिवसेनेचा BJP, RSS वर निशाणा

https://www.loksatta.com/desh-videsh/gyanvapi-mosque-case-is-preparation...

उदारमतवादी शिवसेना ......

शिवसेनेची, हिंदू हितवादी भुमिका, काही वर्षांपुर्वी होती ...

-------

ग्यानव्यापी मशीद प्रकरण: ३१ वर्षांपूर्वी लोकसभेत काय म्हणाल्या होत्या उमा भारती?

https://www.loksatta.com/politics/uma-bharti-said-31-years-ago-in-parlia...

लोकसभेमध्ये २१ सदस्यांनी यात सहभाग घेतला आणि फक्त भाजपाच्या चार व शिवसेनेच्या अशोक आनंदराव देशमुख या एका खासदाराने विधेयकाला विरोध केला...

--------

तेंव्हा शिवसेना हिंदू हितवादी भुमिका घेत होती आणि सध्या उदारमतवादी भुमिका घेत आहे ....

काड्यासारू आगलावे's picture

20 May 2022 - 8:02 pm | काड्यासारू आगलावे

मंदीर मशीदीचे मुद्दे ऊकरून हळूच गॅस सिलेंडर चे रेट वाढवून हिंदूंचे कंबर मोडमार्यांबद्दल आपले काय मत?

सुबोध खरे's picture

20 May 2022 - 8:08 pm | सुबोध खरे

हायला

म्हणजे गॅस सिलेंडर चे रेट वाढले तर फक्त हिंदूंचं कंबरडं मोडतं?

रुपये २००० चा सिलिंडर झाला तरी मुसलमानांचं कंबरडं मोडत नाही का?

तुमच्या मुदलातच खोट आहे.

काड्यासारू आगलावे's picture

20 May 2022 - 10:15 pm | काड्यासारू आगलावे

हिंदूंच मोडत नाही का?? तुमच्या माहीतीसाठी सांगतो मुसेलिम फक्त १५ टक्के आहेत. हिंदूनाही पोट असतं.

मुक्त विहारि's picture

21 May 2022 - 12:44 pm | मुक्त विहारि

तुमच्या आणि माझ्या, विचारसरणीत फरक आहे...

आणि,

वादे वादे जायते संवादः, असे होत नसेल तिथे मी, प्रतिसाद-उपप्रतिसाद, असा अनावश्यक खेळ करत बसत नाही ....

त्यामुळेच, काही लोकांच्या प्रतिसादाला मी उपप्रतिसाद, देत बसत नाही. अशा लोकांच्या यादीत, आपले पण नांव सामील आहेच .....

आपण देखील, शक्यतो, माझ्या बरोबर हा, प्रतिसाद-उपप्रतिसाद, खेळ नाही खेळलात तरी चालेल ....

तुमच्या बरोबर केलेला हा माझा पहिला आणि शेवटचा, प्रतिसाद-उपप्रतिसाद ..

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमीनीवर बेकायदेशीर खोदाई

https://www.esakal.com/pune/illegal-excavation-land-of-senior-actress-us...

काय बोलणार? .... एका स्त्रीवर, भर सभेत चप्पलफेक ते आता एका स्त्रीच्या शेतात, जबरदस्तीने खोदकाम...

sunil kachure's picture

20 May 2022 - 10:17 pm | sunil kachure

आज हा सिनेमा झी 5 वर बघितला .विषय छान मांडला आहे.
370 कलम राज्य घटनेत आहे त्याची गरज असेल पण तेव्हाची स्थिती लक्षात घेवून.
घटनेत ते कलम टाकण्याचं हेतू चांगला असेल.
पण त्याचा गैर वापर खूप झाला.
काश्मीर मधील लोकांचे काश्मिरी पण टिकावे ,त्यांच्या वर सांस्कृतिक आक्रमण होवू नये. हे मला पण पटत.
काश्मीर च काय अगदी दहा लोक जरी वेगळ्या संस्कृती,भाषेची असतील आणि एकाध्या लहान गावात राहत असतील तरी.
पण काश्मीर मध्ये खूप वेगळे घडले काश्मिरी पंडित हे काश्मीर चेच ते परके नव्हते.
त्यांच्या मुळे काश्मिरी संस्कृती ला धोका नव्हता .
त्यांची हत्या होत असेल आणि 370 च च्य मागे लपणार असाल तर निषेध आहे.
भारत सारख्या मजबूत राष्ट्र नी ही देश द्रोही ,अन्यायकारक वृत्ती अतिशय क्रूर पने मोडून काढली पाहिजे होती

काड्यासारू आगलावे's picture

20 May 2022 - 10:35 pm | काड्यासारू आगलावे

घरातला कर्ता मेला की घराची जशी वाट लागते अगदी तशीच ईंदिरा गांधी मेल्यावर देशाची लागली. नंतर आलेले सर्वच पंतप्रधान कमजोर/दुबळे होते/आहेत. ही मालिका अजूनही खंडीत झालेली नाहीये. ईंदिरा गांधी असत्या तर हे असले प्रश्न सहज सोडवले असते. भाजपेयींचा राज्यपाल त्यावेळी कश्मिरात होता तरी पंडीतांचं शिरकाण झालं, कारण भाजपचा प्रेफरंस सत्तेला आहे हिंदू किंवा देशाला नाही हे ज्यादिवशी अंधांना समजेल तो सूदिन.
ईंदिरा गांधीं सारखा पंतप्रधान मिळायला ह्या भारतभूला किती दिवस/वर्षे/शतके लागतील देव जाणे. तोपर्यंत वाचाळवीर झेलायचे हेच ह्या देशाच्या नशिबी.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 May 2022 - 2:36 pm | चंद्रसूर्यकुमार

तोपर्यंत वाचाळवीर झेलायचे हेच ह्या देशाच्या नशिबी.

जसे तुमच्यासारखे एकाहून एक अज्ञानमूलक प्रतिसादांचा विक्रम करणारे मिपा सदस्य झेलणे हे इतर सदस्यांच्या नशिबी आले आहे.

काड्यासारू आगलावे's picture

21 May 2022 - 3:23 pm | काड्यासारू आगलावे

आपल्या आवडत्या व्यक्तिंबद्दल खरं लिहीलं तर ते अज्ञानमूलक असतं. :)

सुखी's picture

21 May 2022 - 9:19 pm | सुखी

खिक

सुबोध खरे's picture

24 May 2022 - 10:31 am | सुबोध खरे

घरातला कर्ता मेला की घराची जशी वाट लागते अगदी तशीच ईंदिरा गांधी मेल्यावर देशाची लागली

हायला

म्हणजे इंदिरा गांधींच्या अगोदर देश अगदी खातेऱ्यातच होता म्हणताय काय? आणि त्यांनीच तो सुजलाम सुफलाम केला काय?

काड्यासारू आगलावे's picture

24 May 2022 - 1:37 pm | काड्यासारू आगलावे

तसंच समजा. त्या गांधीबाईंनीच पाकिस्तानवर हल्ला करायची हिंमत दाखवली. ना कधी आधीचानी ना कधी नंतरच्यानी.

सुबोध खरे's picture

25 May 2022 - 11:03 am | सुबोध खरे

हायला

कारगिल, उडी, बालाकोट हि नावे तुमच्या नकाशातून गायबच आहेत म्हणा कि.

काय पाकिस्तानात छापलेला नकाशा वापरताय का?

सुबोध खरे's picture

25 May 2022 - 11:20 am | सुबोध खरे

आणि

आपले एक लाल बहादूर शास्त्री नावाचे पंतप्रधान सुद्धा होते.

ते पण स्मरणशक्तीतून नाहीसे झाले म्हणा की

कॉमी's picture

20 May 2022 - 11:04 pm | कॉमी

नॉर्थ कोरियाचे नशीब कि आज त्यांना इंदिरा गांधींच्या तोलामोलाचा, काकणभर जास्तच कणखर नेता लाभला आहे.

ऊत्तर कोरीयाच्या हुकुमशहा किम जोंग उनची श्रीमती ईंदिरा गांधींशी तुलना ?

ईतका अपमान ?

काड्यासारू आगलावे's picture

21 May 2022 - 5:22 am | काड्यासारू आगलावे

ज्यांची बुध्दी कम्प्युटर गेम पलिकडे कधी चालली नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करनार?

वामन देशमुख's picture

21 May 2022 - 8:04 am | वामन देशमुख

ज्यांची बुध्दी कम्प्युटर गेम पलिकडे कधी चालली नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा करनार?

संमं -
सदर id ला प्रतिबंध करण्यात यावा ही विनंती.

काड्यासारू आगलावे's picture

21 May 2022 - 2:33 pm | काड्यासारू आगलावे

संमं-
लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या थोर पंतप्रधान आदरणीय ईंदिरा गांधी ह्यांची तूलना किम जोंग ऊन ह्या हुकूमशहाशी करनार्या काॅमी ह्या आयडीची तसेच द्वेषातून माझ्या आयडीवर बंदी घाला असं सांगनार्या “वामन“ ह्या आयडीवरदेखील बंदी घालावी अशी विनंती करतो.

1) राज ठाकरे ची मराठी पना सोडून हिंदू वादी भूमिका घेतली
भोंगे, मशीद,मुस्लिम हे राज ठाकरेंच्या यादीत कधीच नव्हती
अचानक आता च भूमिका बदलली
२) अयोध्या दौरा करावा अशी इच्छा राज ठाकरे ह्यांनी व्यक्त केली त्याला प्रसिध्दी दिली.
हा दौरा होणारच नव्हता.
ह्या मुळे एक मोठं राजकारण साध्य झाले.

ब्रिजभुषण ह्या bjp आमदार की खासदार नी जुना उत्तर भारतीय मुद्धा उकरून काढत आला.
उत्तर भारतीय लोकांच्या भावना भडकावून त्याचा फायदा मुंबई महानगर पालिकेत घ्यायचा
हा bjp च डाव ,राज ठाकरे ना पुढे करून ब्रीज भूषण ल त्या वर बोलायला लावून साध्य झाला.
महाराष्ट्र मधील bjp नेते हा विषय उकरून काढू शकतं नाहीत नाही तर मराठी मत जातील.
हा विषय चर्चेत तर आला पाहिजे,राज ठाकरे काही आता उत्तर भारतीय आक्रमण विरुद्ध बोलायला तयार नाहीत..
मग इतका भारी राजकीय मुद्धा वाया जाईल.
भावना भडकावून निवडणुका जिंकणे ही bjp ची कला आहे.
म्हणून हे सर्व ठाकरे, ब्रीज भूषण तमाशा कम नाटक .
रचले गेले

कर्नलतपस्वी's picture

22 May 2022 - 3:51 pm | कर्नलतपस्वी

कदाचित राजकारण यालाच म्हणत आतील. काही ब्राम्हणांबद्द्ल वाटेल ते बोलून भाषणात टाळ्या घेतात व त्यांचे आका ब्राम्हण सघांला भेट देतात.

या देशाचे दुर्दैव आहे कदाचित, जाती,धर्माच्या गंगेत सर्वच हात धुवून घेतायत आणी जनता शिक्षित अजुनही अशिक्षित आसल्या सारखी वागतेय. कदाचित यात दोन्ही चा फायदा.

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.