ताज्या घडामोडी मे २०२२(भाग २)

चंद्रसूर्यकुमार's picture
चंद्रसूर्यकुमार in राजकारण
16 May 2022 - 9:49 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.

काल (१५ मे २०२२ रोजी) त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते माणिक साहा यांनी शपथ घेतली.

मार्च २०१८ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यात २५ वर्षे सलग सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीचा पराभव केला आणि बिप्लब देब यांना मुख्यमंत्री केले गेले. सुरवातीचा महिना-दीड महिना मुख्यमंत्री झाल्याचं वारं या गृहस्थांच्या अंगात इतकं शिरलं होतं की ते विनाकारण बाष्कळ आणि अनावश्यक बडबड करत सुटले. महाभारत काळात इंटरनेट होतं ही त्या मानाने बरीच निरूपद्रवी बडबड होती. सगळ्यात आक्षेपार्ह बडबड होती १९९७ मधील विश्वसुंदरी डायना हेडन विषयी. बिप्लब देब यांनी म्हटले होते- डायना हेडनचे सौंदर्य ऐश्वर्या रायप्रमाणे 'भारतीय सौंदर्य' नाही. त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले.

एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले. विजय रूपाणींकडून राजीनामा घेतल्यावर नवा नेता निवडायला झालेल्या आमदारांच्या बैठकीत हे भूपेंद्र पटेल शेवटच्या रांगेत बसायला चालले होते तेव्हा त्यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले गेले असे बातम्यांमध्ये आले होते. कर्नाटक आणि उत्तराखंडमध्येही पक्षाने नवे मुख्यमंत्री नेमले.

आता १० महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये काय होते ते बघायचे.

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

16 May 2022 - 10:04 am | चंद्रसूर्यकुमार

एकंदरीत भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे.

एक वर्ष अशी सुधारणा हवी.

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 10:17 am | काड्यासारू आगलावे

त्यानंतर मोदी-शहांनी दम भरला आणि त्यांनी आपली बडबड बंद केली आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले हे बरे झाले. मोदी शहांनी असाच दम महाराष्टरातील भाजप नेत्याना भरायला हवा. कधी सांगतात निवडणूक हरलो की हिमालयात जाईन. पण हरल्यावरही महाराष्ट्रातच ठाण मांडून आहेत. अजूनही काही काही बोलत असतात समाज माध्यमांवर. मोदींच्या गुरूंवर टिका करणे तर रोजचेच झालेय.

मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. आपल्या ताब्यातल्या नी आपल्या ईशार्यावर चालनारा मामू मोशांना हवा असतो. एक प्रकारे हुकूम शाहीच आहे ही.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 May 2022 - 12:35 pm | चंद्रसूर्यकुमार

तुम्ही नक्की कोणाची ड्यु.आय डी आहात? लेखनाची पध्दत ओळखीची वाटत आहे :)

कॉमी's picture

16 May 2022 - 12:54 pm | कॉमी

:)
गली गली तेरी राह चल्ली

sunil kachure's picture

16 May 2022 - 12:30 pm | sunil kachure

ह्या वर तर bjp चे वरिष्ठ नेते जाम खुश झाले असणारं.
त्या वरून मोदी ,शाह त्यांना दम देतील असे वाटत नाही.
ताटा खालचे मांजर हा व्यक्ती बनू शकणार नाही म्हणून यांना हटवून गुलामी ची सवय असलेल्या व्यक्ती ल मुख्य मंत्री केले गेले आहे.
यूपी मध्ये bjp नीच योगी ना डोक्यावर घेतले पण आता .
वरिष्ठ नेत्यांना सहन पण होत नाही आणि सांगता पण येत नाही अशा स्थिती त राहण्याची वेळ आली आहे.
राज ठाकरे दौरा,ब्रीज भूषण विरोध.राज ठाकरे नी काहीच कॉमेंट न करणे सरळ ब्रीज भूषण लं इंगोर करून दौऱ्याची तयारी करणे,काही तरी राजकीय उलथापालथ यूपी मध्ये नक्की होणार.

सुबोध खरे's picture

16 May 2022 - 12:37 pm | सुबोध खरे

कचरे बुवा

आपला लिहिणारा डावा मेंदू आणि विचार करणारा उजवा मेंदू यात सामंजस्य आणि संवाद नाही हे आपण परत परत का सिद्ध करताय?

काड्यासारू आगलावे's picture

16 May 2022 - 2:39 pm | काड्यासारू आगलावे

वयक्तिक टिका करू नये हे आपल्यासारख्या जून्या मिपाकराला सांगायला हवे का?

सुबोध खरे's picture

17 May 2022 - 9:55 am | सुबोध खरे

हायला

त्यानि खालीच लिहिलेले प्रतिसाद वाचून सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का कि त्यांचे प्रतिसाद लिहायच्या अगोदर काही खोल विचार असतील?

तसं असेल तर धन्य आहे तुमची आणि कचरेबुवांची सुद्धा.

कोणती तरी ज्ञान दीप मशीद.

आता गहू देशातून गायब होण्याच्या मार्गावर आहे

पूजा अर्चा करण्याला आक्षेप नाही.
गोदी मीडिया ही पूजा अर्चा highlite करतं आहे.
देशाचे पंत प्रधान आहात .दोन्ही देशातील नात्यावर काय करता येत आहे का.
त्या वर चर्चा करा.
उभय पक्षी दोन्ही देशांना फायद्याचे करार करा,चर्चा करा.

उत्तर प्रदेश हे राज्य देशासाठी डोके दुखी च आहे.

मुस्लिम आक्रमक मंदिर तोडत होती तेव्हा हे नक्कीच सत्ताधारी लोकांची स्तुती करत असणार .
स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी.

दक्षिणेत विजापूर लं मुघल राज्य होते तिथे नाही मंदिर पाडून मशिदी निर्माण झाल्या,महाराष्ट्रात नाही झाल्या..बाकी कोणत्या राज्यात नाही झाल्या ..जे काय झाले ते यूपी मध्येच.

डँबिस००७'s picture

17 May 2022 - 2:11 pm | डँबिस००७

खरे साहेब.

जागतिक मानदंडाच्या पार पलिकडे गेलेले आहे.

मशीद मंदिर असले वाद लगेच थांबणे गरजेचे आहे आता नवीनच उकरून काढले आहे कोणती तरी ज्ञान दीप मशीद.
आता ती वेळ नक्कीच नाही.
देशात इंधन चे दर प्रचंड वाढले आहेत.त्या साठी नेहरू ,इंदिरा गांधी ह्यांना दोष देवून झाले.
खाद्य तेल, डाळी सर्व गरजेच्या वस्तू प्रचंड महाग झाल्या आहेत
आता गहू देशातून गायब होण्याच्या मार्गावर आहे.
देश गंभीर स्थिती मध्ये आहे..युक्रेन रशिया युद्ध मुळे हो स्थिती आली असा दावा करणे बेजबाबदार पना आहे.
लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
पक्ष भेद विसरून लोकांनी केंद्रीय सरकार जी चुकीची धोरण राबवत आहे त्या वर विचार व्यक्त करणे गरजेचे आहे.
नाहीतर श्री लंका शी जवळ जाणारी स्थिती भारतात निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे.
हनुमान चालीसा,मंदिर,भोंगे आता बाजूला ठेचा.
देशाची आर्थिक स्थिती सुधारली की मग खेळत बसू.
तो खेळ.

असे वक्तव्य दिल्लीत काश्मिरी पंडित च्या नेत्याने केले आहे.ती बातमी वाचली पण आता मिळत नाही .नाहीतर लिंक दिली असती.
काश्मिरी पंडितांना काश्मीर मध्ये परत बसवण्याची कोणतीच ठोस योजना सरकार कडे नाही.
आता ज्या काश्मिरी पंडिता ची काश्मीर मध्ये हत्या अतिरेकी लोकांनी केली.
त्यांनी मागणी करून पण त्यांना सुरक्षा दीली नव्हती.
काश्मीर पंडित राजकीय साठे मारी चे बळी ठरत आहेत.

sunil kachure's picture

16 May 2022 - 1:58 pm | sunil kachure

भारताचे पंत प्रधान नेपाळ मध्ये गेले आणि तिथे गेल्यावर तेथील एका मंदिरात जावून पूजा अर्चा केली.
पूजा अर्चा करण्याला आक्षेप नाही.
गोदी मीडिया ही पूजा अर्चा highlite करतं आहे.
देशाचे पंत प्रधान आहात .दोन्ही देशातील नात्यावर काय करता येत आहे का.
त्या वर चर्चा करा.
उभय पक्षी दोन्ही देशांना फायद्याचे करार करा,चर्चा करा.
धार्मिक यात्रेला नंतर जा.
युरोपियन देशांचे प्रमुख भारतात येतात ते त्यांच्या देशाचा फायदा बघतात की चर्च मध्ये जावून प्रार्थना करतात.

sunil kachure's picture

16 May 2022 - 1:59 pm | sunil kachure

भारताचे पंत प्रधान नेपाळ मध्ये गेले आणि तिथे गेल्यावर तेथील एका मंदिरात जावून पूजा अर्चा केली.
पूजा अर्चा करण्याला आक्षेप नाही.
गोदी मीडिया ही पूजा अर्चा highlite करतं आहे.
देशाचे पंत प्रधान आहात .दोन्ही देशातील नात्यावर काय करता येत आहे का.
त्या वर चर्चा करा.
उभय पक्षी दोन्ही देशांना फायद्याचे करार करा,चर्चा करा.
धार्मिक यात्रेला नंतर जा.
युरोपियन देशांचे प्रमुख भारतात येतात ते त्यांच्या देशाचा फायदा बघतात की चर्च मध्ये जावून प्रार्थना करतात.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 May 2022 - 5:28 pm | चंद्रसूर्यकुमार

वाराणशीमध्ये तथाकथित ग्यानव्यापी मशिदीत न्यायालयाच्या आदेशावरून केलेल्या सर्वेक्षणात एक शिवलिंग सापडले आहे. ती जागा सील करायचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. https://indianexpress.com/article/cities/lucknow/gyanvapi-mosque-case-va...

ती (आणि इतर अनेक ठिकाणच्या) मशिदी मुळातील हिंदू मंदिरे उध्वस्त करून बांधलेल्या आहेत हे निधर्मीपणाची फुकाची झापडे लावलेल्या विचारवंत मंडळीसोडून सगळ्यांना कळू शकते. ते या निमित्ताने जगजाहीर होत आहे ही चांगली गोष्ट आहे.

जेम्स वांड's picture

17 May 2022 - 8:20 am | जेम्स वांड

मला तर वाटते की ज्ञानवापी मशीद इशू हा मुस्लिम समाजाला आलेला एक मोठा चान्स आहे, ज्ञानवापी ही औरंगजेबाने हिंसा करून मिळवलेली जागा होय हे तर ऐतिहासिक सत्य होय, ती परत हिंदूंना मिळणे इष्ट,

अश्या प्रसंगी अतिशय दिलदारपणे स्वतःच्या सेक्युलरीजमचे उदाहरण ठरेल अशी कृती करत मुस्लिम समाजाने ती मशीद अन तिच्यावरचा हक्क लागलीच सोडला तर

१. त्यांचे सेक्युलरीजम बेगडी नाही कळकळ असणारे आहे, हे सिद्ध होईल

२. मुसलमान समाजाला बळी पाडणारा तथाकथित संघ भाजपचा एजंडा मुळात नष्ट होईल

३. इतके बंधुभाव जपल्यामुळे पोलरायजेशन होणार नाही अन त्या इशुचा भाजपसारख्या फॅसिस्ट पक्षाला निवडणुकीत फायदा होणार नाही

;)

चंद्रसूर्यकुमार's picture

17 May 2022 - 11:30 am | चंद्रसूर्यकुमार

हा प्रश्न मला अयोध्या आंदोलनाच्या वेळेसही पडायचा. मुळातील मंदिरे पाडून मशिदी बांधल्या अशी कित्येक ठिकाणे देशात आहेत. त्यापैकी फक्त तीन ठिकाणे मागितली जात असतील तर ती दिलदारपणे द्यायला मुस्लिम समाजाला नक्की कोणती अडचण होती? तसे झाले असते तर मग अयोध्या प्रश्नावरून इतकी वर्षे आंदोलन झाले, कित्येक लोकांचे बळी त्या प्रकरणात गेले हे सगळे टाळता आले नसते का? इतकेच नव्हे तर विचारवंत मंडळींनीही सगळ्यांनी एकजात हिंदूंनाच लेक्चरबाजी केली. त्यापैकी एकानेही मुस्लिम समाजाला- या तीन जागा तुम्ही आपण होऊन सोडून का देत नाही हा प्रश्न विचारला नाही. अयोध्या आंदोलन चालू होते तेव्हा तर एक गोष्ट वारंवार सांगितली जायची की तथाकथित बाबरी मशिदीत १९३६ की १९३८ पासून नमाज पढली गेलेली नाही. तसे असेल तर मग ती जागा सोडायला नक्की कोणती हरकत होती? अगदी कल्याणसिंगांनी स्वतः म्हटले होते की मुस्लिम समाजाने ती जागा सोडल्यास पंचक्रोशीबाहेर मशिद बांधू आणि त्यासाठी पहिली वीट मी स्वतः नेईन.

पण अशी सामंजस्याची भूमिका मुस्लिम समाजातून घेतली गेली नाही. आणि तशी घ्यायचा प्रयत्न जरी कोणी केला असता तर मुल्लामौलवींपेक्षा अति शिकलेल्या विचारवंतांनीच तो आवाज दाबायचा प्रयत्न केला असता हे नक्की.

sunil kachure's picture

17 May 2022 - 1:36 pm | sunil kachure

जावून काही शे वर्ष झाली,त्या नंतर अनेक लोकांनी भारतावर सत्ता गाजवली ब्रिटिश आले आणि गेले 75 वर्ष स्वतंत्र होवून झाली.
यूपी मध्ये इतके हिंदू बाहुबली ,गुंड आहेत ते पण हिंदू ह्यांनी फक्त हिंदू लोकांनाच लुटले...
राज्यातील हिंदू देवस्थान ची मालकी मुस्लिम लोकांकडे आहे त्यांच्या विरुद्ध आपल्या गुंड ताकती चा वापर केला नाही.
फक्त राज ठाकरे ने दम देण्यात च ह्यांची फुस्की मर्दांगी आहे..
कोण कुठले मुघल ह्यांनी उत्तर भारत काबीज केला .तेव्हा ह्या श्री रामाच्या वंशजांना शुर पना कुठे गेला होता.
मला तर यूपी मधील कोणत्याच हिंदी देवालय च्या इश्यू शी लक्ष द्यावे असे पण वाटत नाही.
2024 जवळ आले की असे मुद्दे येणार आणि नंतर 2028 पर्यंत सर्व शकतं

sunil kachure's picture

16 May 2022 - 7:43 pm | sunil kachure

उत्तर प्रदेश हे राज्य देशासाठी डोके दुखी च आहे.
बेरोजगार लोकांच्या फौजा निर्माण करणारे,जातीय द्वेष मध्ये पूर्ण बुडालेले,गुन्हेगारी वृत्ती ची लोक जास्त असणारे,देश भर करोडो बेरोजगार पाठवणारे आणि देशातील सुंदर शहरांना बकाल बनवणारे.
हे तर आहेच आणि हे पण आहे
बाबरी मशीद,आता ही कोणती ज्ञाध ््ज्ञा न व्यापी मशीद.
हिंदू मंदिर पाडून त्याचे मशिदीत रूपांतर .
ही अशी स्थान पण ह्याच राज्यात.
देशाने का स्वतःचे लक्ष तिकडे द्यावे.
मुस्लिम आक्रमक मंदिर तोडत होती तेव्हा हे नक्कीच सत्ताधारी लोकांची स्तुती करत असणार .
स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी.
जसे पूर्ण देश केंद्रीय सरकार च्या आर्थिक निती चा विरोध करत आहे आणि यूपी त्यांनाच प्रचंड मतदान करत आहे .
दक्षिणेत विजापूर लं मुघल राज्य होते तिथे नाही मंदिर पाडून मशिदी निर्माण झाल्या,महाराष्ट्रात नाही झाल्या..बाकी कोणत्या राज्यात नाही झाल्या ..जे काय झाले ते यूपी मध्येच.

हा माणूस काय लिहतो हे त्यांना स्वतःला तरी कळत कि नाही कुणास ठाऊक, सामना वाचत असलं तर बंद करा.

sunil kachure's picture

16 May 2022 - 9:20 pm | sunil kachure

पाहिले स्पष्टीकरण देवून कसे चुकीचे आहे ते सिद्ध करा आणि नंतर .
'hya माणसाला काय लिहत आहे ते स्वतःलाच कळत नाही"
हा पारंपरिक डायलॉग मारा..
अजून देश द्रोही हे लेबल लावलं नाही हे नशीब.
शेतकरी देश द्रोही,शीख देश द्रोही,काँग्रेस देश द्रोही,ममता देश द्रोही, मुस्लिम देश द्रोही
आणि हेच फक्त देश प्रेमी रुपया चे मूल्य ८० रुपये प्रति डॉलर होण्यासाठी वाटचाल करणारे.

sunil kachure's picture

16 May 2022 - 9:21 pm | sunil kachure

पाहिले स्पष्टीकरण देवून कसे चुकीचे आहे ते सिद्ध करा आणि नंतर .
'hya माणसाला काय लिहत आहे ते स्वतःलाच कळत नाही"
आणि नंतर
हा पारंपरिक डायलॉग मारा..
अजून देश द्रोही हे लेबल ला यवलं नाही हे नशीब.
शेतकरी देश द्रोही,शीख देश द्रोही,काँग्रेस देश द्रोही,ममता देश द्रोही, मुस्लिम देश द्रोही
आणि हेच फक्त देश प्रेमी रुपया चे मूल्य ८० रुपये प्रति डॉलर होण्यासाठी वाटचाल करणारे.

sunil kachure's picture

16 May 2022 - 9:21 pm | sunil kachure

पाहिले स्पष्टीकरण देवून कसे चुकीचे आहे ते सिद्ध करा आणि नंतर .
'hya माणसाला काय लिहत आहे ते स्वतःलाच कळत नाही"
आणि नंतर
हा पारंपरिक डायलॉग मारा..
अजून देश द्रोही हे लेबल ला लावले नाही हे नशीब.
शेतकरी देश द्रोही,शीख देश द्रोही,काँग्रेस देश द्रोही,ममता देश द्रोही, मुस्लिम देश द्रोही
आणि हेच फक्त देश प्रेमी रुपया चे मूल्य ८० रुपये प्रति डॉलर होण्यासाठी वाटचाल करणारे.

जेम्स वांड's picture

17 May 2022 - 8:14 am | जेम्स वांड

प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसू नये म्हणून विधानसभा निवडणुकांना एक महिना राहिलेला असताना मुख्यमंत्री बदलायचे धोरण अवलंबलेले दिसते आहे. त्या अंतर्गतच गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल या त्यामानाने अपरिचित चेहर्‍याला मुख्यमंत्री केले.

ह्यात अजून एक महत्वाचा मुद्दा जोडायचा राहिलाय तो म्हणजे भुपेंद्रभाई प टे ल आडनाव अन जात असलेले असणे, २०१७ निवडणुकीनंतरच तर नितीन पटेल खूप इच्छूक होते मुख्यमंत्री पदाला, पण समहाऊ ते नरेंद्रभाई आणि अमितभाईंना इतके अपील झाले नाहीत, राज्य भाजप अध्यक्ष सी आर पाटील हे नाव पण खूप चर्चेत होते अर्थात मराठी माणूस गुजरातेत इतका वर पोचला हेच खूप झाले, जय जय गर्वी गुजरात पंचलाईनला सी आर पाटील फिट बसले नसते, त्यामुळे भुपेंद्रभाई ह्यांची वर्णी लागलेली दिसते एकदम तडकाफडकी, अर्थात सत्तालक्ष्मी त्यांना लाभदायी ठरो ह्या शुभेच्छा आहेतच कायम :)

चंद्रसूर्यकुमार's picture

17 May 2022 - 10:17 am | चंद्रसूर्यकुमार

भूपेंद्र पटेल यांना एकदम मुख्यमंत्री बनविण्यामागे आणखी एक गणित होते. गुजरातमध्ये भाजप मार्च १९९५ पासून (ऑगस्ट १९९६ ते मार्च १९९८ हा काळ वगळता) सतत सत्तेत आहे. त्यामुळे प्रस्थापितविरोधी मतांचा फटका बसायची शक्यता कमी व्हावी म्हणून पूर्वीपासून सत्तापदे भूषविलेल्या लोकांना दूर ठेवणे हे एक कारण होते असे दिसते. नितीन पटेल पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत पण ते १९९५ मध्ये केशुभाई पटेलांचे पहिले भाजप सरकार स्थापन झाले त्या मंत्रीमंडळातही होते. मला वाटते त्यांचा २००२ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने ते २००२-२००७ या काळात मंत्री नव्हते पण तो काळ सोडला तर १९९५ पासून अगदी २०२१ पर्यंत नितीन पटेल प्रत्येक भाजप मंत्रीमंडळात होते. त्यांनाच परत मुख्यमंत्री केले असते तर प्रस्थापितविरोधी मते टाळणे हा उद्देश सफल झाला नसता असे मोशांना वाटले असावे. बहुदा त्याच कारणाने आताही भूपेंद्र पटेलांच्या मंत्रीमंडळात पूर्वी एकदाही मंत्रीपद न मिळालेली अशी सगळी नवीन टीम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे २०१७ मध्ये मुख्यमंत्री केले न गेल्यामुळे ते नाराज होते अशा बातम्या होत्या. पक्षातील आतल्या गोष्टी मोशांना आपल्यापेक्षा नक्कीच जास्त माहित असतील. ते पण नितीन पटेलांना डावलण्याचे एक कारण असू शकेल.

भूपेंद्र पटेलांना मुख्यमंत्री बनविण्यामागे जात हे कारण किती महत्वाचे होते याची कल्पना नाही. २०१६ मध्ये पटेल आरक्षण आंदोलन जोरात असताना विजय रूपाणी या जैन व्यक्तीला मुख्यमंत्री बनविले होते. तसेच महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणातही त्या राज्यातील संख्येने अधिक असलेल्या जातींमधील मुख्यमंत्री न करता दुसर्‍या जातींमधला मुख्यमंत्री बनविला होता. पण कर्नाटकात मात्र येडियुराप्पा या लिंगायत मुख्यमंत्र्यानंतर बसवराज बोम्मई हा पण दुसरा लिंगायत मुख्यमंत्रीच केला. तेव्हा भूपेंद्र पटेल आणि बसवराज बोम्मई यांना जातीच्या कारणाने मुख्यमंत्री केले की त्यांना अन्य कारणाने मुख्यमंत्री केले आणि ते त्या जातींचे असणे हा योगायोग होता याची कल्पना नाही.

P1

P2

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नागेन्द्रहाराय त्रिलोचनायभस्माङ्गरागाय महेश्वराय । नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय॥

आनन्दा's picture

17 May 2022 - 1:25 pm | आनन्दा

हे नेमके काय आहे?
नंदीची दिशा बदलण्यासाठी काही प्रयत्न केले होते का?

डँबिस००७'s picture

17 May 2022 - 6:57 pm | डँबिस००७

ज्ञानवापी मस्जिद, मथुरा तसेच अयोध्या सारख्या हिंदु समाजासाठी अती पवित्र स्थळांना मुक्त करण्यासाठी जन आंदोलनातुन तब्बल ७५ वर्षे लागली.
मूसलमानांना पाकिस्तान वेगळा काढुन दिल्यानंतरही मुसलमानांचे तुष्टीकरण करताना हिंदु समाजाचे अहित भारतातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी केले.
हिंदु विरोध
सोमनाथ मंदिराचा जिर्णोद्धार सरकारी तिजोरीतुन होऊ देणार नाही अस म्हणणार्या नेहरुंनी सोमनाथ मंदिराच्या समारंभाला देशाच्या राष्ट्रपतींनीं जाउ नये अशी भूमिका घेतली होती पण स्व:ता मुसलमानांनी दिलेल्या ईफ्तार पार्ट्या मध्ये जात असत.
ह्याच नेहरुंनी "Disvovery of India " पुस्तकात मुघलांची तारीफ करत भारतातल्या हिंदु मंदिराच्या विध्वंसाला दुसरेच जवाबदार होते अस म्हंटलय.

अयोध्येच्या राम मंदिराच्या आंदोलनात उ प्र च्या मुख्य मंत्री असताना मुलायम सिंगांनी कित्येक कित्येक साधु संतांना गोळ्या घालण्याचे आदेश दिलेले होते. मुसलमानांच्या तुष्टीकरणाची राजनीती करणार्या ह्या नेत्याची आजची परीस्थीती खरच वाईट आहे.

सबका साथ सबका विकास म्हणत सर्वांना योजनेच्या लाभात सहभागी करणार्या मा योगी आदित्यनाथांना सुद्धा कळले आहे की सरकारच्या योजनेत घर घेणार्या मुसलमानांनी आपले अमुल्य व्होट जेल मध्ये बंद असलेल्या सपा च्या मुसलमान उमेदवारालाच दिले. चक्क जेल मधुन निवडणुका लढणारे मुसलमान उमेदवार निवडणुकीत विजयी झाले.
सरकार कोणाचही असो, कितीही कल्याणकारी असो, काफिराला व्होट न करता आपल्या धर्माच्या उमेदवारालाच व्होट करुन विजयी करतात हे लोक.

सरते शेवटी अतिरेक्यांना धर्म नसतो पण पकडलेल्या अतिरेक्यांचा धर्म ईस्लामच निघतो. मुंबई IIT मध्ये Engineer झालेला अतिरेकी गोरखपुर हल्ल्यात जेंव्हा पकडला जातो तेंव्हा " हा समाज शिकला नसल्याने तिथला युवा अतिरेकी होतो" हा भाबडा युक्तिवाद गळुन पडतो.

शेवटी हिंदु म्हणुन निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. ।। धर्म रक्षती रक्षित: ।।

जेम्स वांड's picture

17 May 2022 - 7:33 pm | जेम्स वांड


ह्याच नेहरुंनी "Disvovery of India " पुस्तकात मुघलांची तारीफ करत भारतातल्या हिंदु मंदिराच्या विध्वंसाला दुसरेच जवाबदार होते अस म्हंटलय.

ह्याचा नेमका पृष्ठक्रमांक, ओळ किंवा प्रकरण सांगितल्यास आमचेही वाचन बरोबर दिशेने नेता येईल.

काड्यासारू आगलावे's picture

17 May 2022 - 8:38 pm | काड्यासारू आगलावे

:)
वांड देशद्रोही कुठले

डँबिस००७'s picture

17 May 2022 - 9:24 pm | डँबिस००७

अरे व्वा व्वा !!

याचा अर्थ नेहरुवर केलले ईतर सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत तर !

जेम्स वांड's picture

18 May 2022 - 8:06 am | जेम्स वांड

आपण पहिले तुम्ही केलेल्या दाव्याबद्दल बोलू, नंतर मला कुठले आरोप मंजूर नामंजूर तो ताळेबंद करता येईल, बाकी तुम्हाला आम्हाला काहीही मंजूर किंवा नामंजूर असणे नसणे हा तुमचा आमचा वैयक्तिक भाग झाला

डँबिस००७'s picture

17 May 2022 - 9:42 pm | डँबिस००७

जालावर उपलब्ध असलेल्या पं नेहरुवरील स्फोटक माहीती बरहुकुम , जन मागणी मुळे सादर.

प्रखर श्रीवास्तवच्या शो मध्ये पं नेहरुंचे पुराव्यानीशी असे चेहरे समोर आणलेत की आता पर्यंत ज्ञात असलेला प्रस्थापीत ईतीहासाला मुठ माती देणे भाग पडेल!

नेहरु आणि मूस्लिम पार्ट १
https://youtu.be/rkpeqeCQUYw

नेहरु आणि मूस्लिम पार्ट २

https://youtu.be/KGIac6UkBJM

नेहरु आणि मूस्लिम पार्ट ३
https://youtu.be/przexVvRZEo

आंतरजालावरुन .....

जेम्स वांड's picture

18 May 2022 - 8:04 am | जेम्स वांड

माझ्या माहीतीप्रमाणे,

डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक बॅन झालेले नाहीये, तरीही जर आपण यु-ट्युब वरील विडिओ न देता जर डिस्कव्हरी ऑफ इंडिया मधील पृष्ठक्रमांक अन प्रकरण सांगितले तर वाचन सोपे होईल मला, तुम्ही दिलेल्या विडिओ मधेच दुसऱ्या विडिओत आंबेडकरांनी जे लेखन केले आहे त्याचे पान क्रमांक अन इतर तपशील साद्यंत दिले आहेत, तुम्ही केलेल्या विधानाला समर्थनार्थ नक्कीच काहीतरी असेल डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये लेखी, त्याचा तितका रेफरन्स द्या, हे विडिओ वगैरे काय असतीलही उत्तम पण ह्यात थर्ड पार्टी व्यु होऊन जातात, मला त्याची सवय नाही वाचनाची आहे, मजबूत पुरावा असतो दस्तुरखुद्द लेखी शब्द, म्हणजे बघा तुम्ही मला एकदाचा तो डिस्कव्हरी ऑफ इंडिया मधला लेखी पुरावा देऊन टाका रेफरन्स सहित म्हणजे मी तो नेहरू समर्थकांना दाखवून देईन त्यांच्या नेत्याचे कर्म त्यांच्याच पदरात घालताना.

कळावे
- वांडो

सुखीमाणूस's picture

18 May 2022 - 1:11 pm | सुखीमाणूस

Discovery of India या नेहरुन्च्या पुस्तकाची pdf download केली.
त्यात पान २४१ वर हे सापडले
Synthesis and Growth of Mixed Culture
Purdah. Kabir. Guru Nanak. Amir Khusrau
It is thus wrong and misleading to talk of a Moslem invasion of
India or of the Moslem period in India, just as it would be wrong
to refer to the coming of the British to India as a Christian inva-
sion, or to call the British period in India a Christian period.
Islam did not invade India; it had come to India some centuries
earlier. There was a Turkish invasion (Mahmud's), and an
Afghan invasion, and then a Turco-Mongol or Mughal invasion,
and of these the two latter were important. The Afghans might
well be considered a border Indian group, hardly strangers to
India, and the period of their political dominance should be
called the Indo-Afghan period. The Mughals were outsiders and
strangers to India and yet they fitted into the Indian structure with
remarkable speed and began the Indo-Mughal period

सुखीमाणूस's picture

18 May 2022 - 1:16 pm | सुखीमाणूस

हे सापडले.
I have no doubt at all that among the causes of India's decay
in recent centuries, purdah, or the seclusion of women, holds an
important place. I am even more convinced that the complete
ending of this barbarous custom is essential before India can
have a progressive social life. That it injures women is obvious
enough, but the injury to man, to the growing child who has to
spend much of its time among women in purdah, and to social
life generally is equally great. Fortunately this evil practice is
fast disappearing among the Hindus, more slowly among the
Moslems.

आणि नेहरुन्ची पणती प्रियान्का गान्धी म्हणते बुर्खा, हिजाब घालणे मुस्लीम स्त्रियान्चा अधिकार आहे.

सुखीमाणूस's picture

18 May 2022 - 1:51 pm | सुखीमाणूस

Widespread and apparently easy as the Arab conquests were,
they did not go far beyond Sind in India, then or later. Was
228
this due to the fact that India was still strong enough to resist
effectively the invader? Probably so, for it is difficult to explain
otherwise the lapse of several centuries before a real invasion
took place. Partly it may have been due to the internal troubles
of the Arabs. Sind fell away from the central authority at
Baghdad and became a small independent Moslem state. But
though there was no invasion, contacts between India and the
Arab world grew, travellers came to and from, embassies were
exchanged, Indian books, especially on mathematics and astro-
nomy, were taken to Baghdad and were translated into Arabic.
Many Indian physicians went to Baghdad. These trade and
cultural relations were not confined to north India. The southern
states of India also participated in them, especially the RSshtra-
kutas, on the west coast of India, for purposes of trade.
This frequent intercourse inevitably led to Indians getting to
know the new religion, Islam. Missionaries also came to spread
this new faith and they were welcomed. Mosques were built.
There was no objection raised either by the state or the people,
nor were there any religious conflics. It was the old tradition
of India to be tolerant to all faiths and forms of worship. Thus
Islam came as a religion to India several centuries before it came
as a political force.
T

sunil kachure's picture

18 May 2022 - 2:04 pm | sunil kachure

एकटा माणूस नेहरू सारखा हिंदू चा इतिहास बदलत असेल त्यांना दाबून ठेवत असेल तर नेहरू काळात जे हिंदू होते ते सर्व नालायक असले पाहिजेत स्वार्थासाठी विरोध न करणारे महा स्वार्थी असले पाहिजेत
ह्या मध्ये नेहरूंचा दोष नाही हिंदू समाजाचा दोष आहे.
नेहरूंना दोष देवून स्वतः आपण नालायक नव्हतो हे सिद्ध होत नाही . उलट आपण नालायक च होतो हे सिध्द होतें

sunil kachure's picture

18 May 2022 - 2:12 pm | sunil kachure

Maharshtra मध्ये तरी हिंदू मंदिर पाडून तिथे मशीद उभी केल्याची उदाहरणे नाहीत.आणि तसा दावा पण आज पर्यंत कोणी केल्याचे ऐकिवात नाही.
तमिळ nadu, कर्नाटक,केरळ,आंध्र मध्ये पण असे काही ऐकण्यास येत नाही.
ज्या काही समस्या आहेत त्या यूपी मध्ये.
पण फक्त कल्पना म्हणून महाराष्ट्र मध्ये कोणत्या ही मंदिरावर मुस्लिम लोकांनी दावा केला.
अगदी शस्त्र घेवून ते रस्त्यावर आले तर.

बाकी राज्य जास्त करून यूपी आणि बाकी
हिंदी भाषा असणारी राज्य.
हिंदू म्हणून महाराष्ट्र ची बाजू घेतील का?
हिंदी न्यूज चॅनेल पण घेणार नाहीत.
लोक सोडा.
आपण का यूपी मधील मंदिर ,मशीद वादात स्वतःला गुंतवून घेत आहे हे समजत नाही.
मुंबई पावसात बुडली तेव्हा महाराष्ट्र च्या मदतीला हे राज्य आली होती का?
कोणी मदत केली नाही.
अगदी मुंबई मधील अमराठी उद्योगपती नी पण मदत केली नाही.
आपल्या मध्येच जास्त किडा का वळवळतो.

कपिलमुनी's picture

18 May 2022 - 2:22 pm | कपिलमुनी

पुण्यातला पुण्येश्वर पाडून छोटा सल्लाची मशीद उभारली आहे.

sunil kachure's picture

18 May 2022 - 2:34 pm | sunil kachure

मग पुण्यात राहणारे ::::::: आहेत .शब्द टाकत नाही.समजून घ्या.
स्वतःची कातडी वाचवणे,स्वतःला काहीच नुकसान न होता कोणी तरी ह्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रस्त्यावर यावं आणि ह्यांनी घरात बसून मजा घ्यावी ह्या वृत्ती चे आहेत
त्यांचे कौतुक का सांगत आहात.

आग्या१९९०'s picture

18 May 2022 - 2:42 pm | आग्या१९९०

सही पकडे है .

काड्यासारू आगलावे's picture

18 May 2022 - 6:05 pm | काड्यासारू आगलावे

+१
स्वत:चे मूलंबाळं अमेरीकेत पाठवून ईतरांनी स्वतची डोकी फोडून घ्यावी.

कर्नलतपस्वी's picture

18 May 2022 - 5:38 pm | कर्नलतपस्वी

इ.स.१२९० मधे जेंव्हा पुणे मुसलमानांच्या ताब्यात गेले तेव्हा पुणेश्वर आणी नारायणेश्वर ला दर्गा बनवला जो आज धाकटा व थोरला शेखसल्ला या नावानेओळखतात.
संदर्भ-"पुण्यातल्या पेठा", लेखक वि वि करमरकर,बि ए एल एल बी, प्रकाशित १९२५. पान-११-१२.

काड्यासारू आगलावे's picture

18 May 2022 - 6:06 pm | काड्यासारू आगलावे

अटकेपार झेंडे रोवनारे “शूरवीर” पेशवे पुण्यात पुन्हा मंदीर बनवू शकले नाहीत??

कर्नलतपस्वी's picture

18 May 2022 - 6:44 pm | कर्नलतपस्वी

इतीहास वाचा कळेल.

विवेकपटाईत's picture

26 May 2022 - 10:32 am | विवेकपटाईत

मल्हार राव होळकर तिथे मंदिर बांधणार होते. पण तिथल्या हिंदूंनीच विरोध केला. कारण तुम्ही गेल्यावर आम्हाला कोण वाचविणार. देवी अहल्याबाई होळकर ने मंदिर
बांधले पण तिथले ब्राह्मण पुजारी बनण्यास ही तैयार नव्हते. शेवटी मध्यप्रदेशातून पुजारी ही पाठवावा लागला. बाकी रघुनाथ राव पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात ओडिशा आणि बंगाल मध्ये तोडफोड केली होती.

रघुनाथ राव पेशव्यांनी मोठ्या प्रमाणात ओडिशा आणि बंगाल मध्ये तोडफोड केली होती.
हो. बंगालच्या ग्रामीण भागात आजही मराठ्यांना "बरगी" (लुटारु) म्हणुन ओळ्लखले जाते. बंगालच्या विष्णुपुर वगेरे सारख्या ठिकांणी देव जमीनीवर आला व त्याने बरगींना पळवुन लावले वगेरे दंतकथा अजुनही सांगितल्या जातात.

विवेकपटाईत's picture

27 May 2022 - 10:43 am | विवेकपटाईत

जिथे जिथे मराठे बंगाल मध्ये पोहचले होते तोच भाग भारतात राहिला. जगन्नाथ पुरीच्या मंदिरात पुन्हा रथ महोत्सव ही रघुनाथ रावांनी सुरू केला. मुस्लिम नवाबांसाठी मराठे लुटारूच होते. बाकी रघुनाथ रावांना इतिहासात जे स्थान मिळाला पाहिजे होते ते मिळाले नाही. जर ते पेशवा झाले असते तर शाहू महाराज दिल्लीचे बादशाह निश्चित झाले असते. दुर्भाग्य ते लहान बंधु होते.

हे माहीत नव्हते. माहीतीबद्दल धन्यवाद.

हिंदी न्यूज चॅनेल प्रत्येक व्यक्ती नी ब्लॉक केले तर एक लक्षात येईल.
देशात .
महागाई,बेरोजगारी, infrastructure, फास्ट भ्रष्ट्राचार विरहित प्रशासन , ह्या व्यतिरिक्त काहीच समस्या नाहीं.

देश पातळीवर विचार केला तर.
अंतर राष्ट्रीय स्तरावर विविध देशांशी आपण योग्य ते संबंध स्थापित करू शकलो नाही.
सर्वच देश संशयाने भारताकडे बघतात.
ही सर्वात मोठी समस्या आहे.