‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
29 Nov 2021 - 2:48 pm

गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाणघेवाण होते.

असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील ६ जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपानपर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. सांगणाऱ्यांच्या अनुभवांचे धबधबे कोसळत होते आणि ऐकणारे त्यात न्हाऊन निघत होते ! मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ.

मग मी सर्वांना म्हणालो, “तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” !

इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले,

मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” !

माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ !

मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”.
..

वाचकमित्रहो,
असा हा आमच्या आप्तस्वकीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९% खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानीमनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो.

तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? 😀

तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम ३ दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे.
…..

तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते.

तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतील नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर.

मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला.

तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता. मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे, की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची :

सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”.

ok

याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते.
मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला (व्हिसावर तसे वाक्य बॉलपेनने लिहून त्यावर सेलोटेप लावला होता ते आठवते). आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले.

हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर ‘मेहरान’ नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून ३ दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो.

जेव्हा आपण भारतातून श्रीमंत देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते.
माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते).

विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी -श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते.

परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली,

“जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”.

ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली.

परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”.

पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडेफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणे दिसतो. तिथून भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही.

अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला.

आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले.

त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता.

मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.(यथावकाश त्या परीक्षेचा निकाल लागून मी त्या परीक्षेत ८० पर्सेंटाइल गुणांनी उत्तीर्ण झालो).

जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले.

दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच.
असो.

लेखातील घटनेनंतर पुढील आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी बाद करून टाकलेला आहे. परदेश पर्यटन करायचे ठरल्यास कुटुंबाकडून अर्थातच अन्य देशांना पसंती मिळेल. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील.
........................................................................................................................................................

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2021 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी भारताने ईस्राईल ला युध्दावेळी किती मदत केली असावी हा संशोधणाचा विषय असावा.

रात्रीचे चांदणे's picture

1 Dec 2021 - 8:05 pm | रात्रीचे चांदणे

मदत करायचं जाऊ द्या माझ्या महतीप्रमाणे मोदी हे पाहिले भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी इस्राएल ला भेट दिली. UN मध्ये ही इस्राईल विरोधी ठरावाला भारताने एकतर पाठिंबा दिलाय नाहीतर तटस्थ तरी राहिलो. आपल्यासाठी अरब देशही महत्वाचे आहेत म्हणूनही ही कसरत करावी लागत असेल. इस्रायल पंतप्रधान भरतभेटीवर आलेले त्यावेळीं भारतात त्याविरोधात मोठी निर्दशने झाली होती.

कुमार१'s picture

1 Dec 2021 - 8:25 pm | कुमार१

भारत, इस्रायल आणि अरब ही उपचर्चाही रंगते आहे.

विविध मतांतरे वाचायला मिळत आहेत आणि माहितीत भर पडत आहे
धन्यवाद !

रंगीला रतन's picture

1 Dec 2021 - 9:18 pm | रंगीला रतन

काही वेळाने काँग्रेस भाजप ममता मोदी राहुल यांचीही उपचर्चा रंगेल :=)
मिस यू १८८ प्रभु __/\__

सुबोध खरे's picture

2 Dec 2021 - 11:36 am | सुबोध खरे

जगाच्या पाठीवर भारत हा असा एक देश आहे जेथे ज्यू लोकांचे शिरकाण झाले नाही किंवा ज्यू लोकांना कोणताही त्रास झाला नाही. याबद्दल सर्व इस्रायली लोक कृतज्ञ आहेत याची साक्ष आपण इस्रायली (किंवा भारतीय ज्यू)लोकांशी संभाषण केले तर जाणवते.

ज्यू लोक जसे दुसऱ्या लोकांना बाटवून ज्यू करत नाहीत तसेच हिंदू लोक करत नाहीत याबद्दल त्यांना नक्कीच आत्मीयता वाटते आणि त्यामुळेच भारतात त्यांना सुरक्षित वाटते. याउलट ख्रिस्चन आणि मुसलमान लोकांबद्दल त्यांना असा भरोसा वाटत नाही. ( ज्यू लोक एकंदर कर्मठ आहेत यात शंका नाही परंतु त्यांच्या कर्मठपणाचा दुसर्यांना फारसा त्रास होत नाही)

इतकी वर्षे अरबांच्या तेलासाठी आणि भारतीय मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी काँग्रेसने इस्रायल शी राजनैतिक संबंध ठेवले नसले तरीही त्याबद्दल इस्रायलने कधीही पूर्वग्रह ठेवला नाही.

कारगिलच्या युद्धच्या वेळेस इस्रायल ने आपल्याला अमेरिकेने पोखरण २ चे अणुस्फोट केल्यावर घातलेल्या निर्बंधांना न जुमानता कोणतीही अट न ठेवता मदत केली होती.

याबद्दल दोन मनोरंजक दुवे देतो आहे. मुद्दाम वाचून पहा.

https://www.ndtv.com/india-news/how-israel-helped-india-win-the-air-war-...

आजही आपल्याला अनेक तर्हेच्या तंत्रज्ञानात मदत करणाया इसरायल हात आखडता घेत नाही. https://caravanmagazine.in/vantage/planes-drones-missiles-kargil-indo-is...

बाकी इस्रायल ला भेट देण्यासाठी व्हिसा देण्यापुर्वी मोसादच्या एजंट आपली आडून सर्व चौकशी करून घेतात. माझा अस्थिरोग तज्ज्ञ मित्र त्याच्या एक रुग्णाच्या आग्रहामुळे इस्रायलला भेट देऊन आला. हि व्यक्ती भारतातील ज्यू समुदायांची पुढारी होती आणि एका सिनेगॉग मध्ये रब्बीचे काम करणारी होती. त्यांनी माझ्या मित्राला आडून सुचवले होते की इस्रायली हेर आपल्या नकळत दवाखान्यात येऊन जातील आणि तुमच्यावर थोडी फार पाळत ठेवतील.

साधारण पणे भारतीय "हिंदूं"ना इस्रायलचा व्हिसा मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. पण भारतीय (आणि इतर देशातील) मुसलमानांची मात्र कसून चौकशी होते. ते गेल्या काही वर्षात कुठे कुठे गेले होते, कुणाला भेटले, नातेवाईक कोण आहेत, त्यांचे ब्रेन वॉशिंग झालाय का इ इ.

कुमार१'s picture

2 Dec 2021 - 11:43 am | कुमार१

पूर्वी अंतर्नाद मासिकात इसराइल मधील मराठी बांधव यावर एक लेख आला होता.

त्यातील एकाने त्यांच्या देशाच्या नावाबद्दल स्पष्टीकरण दिले होते. त्या शब्दाचा खरा उच्चार
इ स रा ए ल
असा असून त्याचा अर्थ :

"ज्याने ईश्वरासह झुंजून यश मिळवले तो"
असा आहे.

धर्मराजमुटके's picture

2 Dec 2021 - 2:52 pm | धर्मराजमुटके

ज्युं च्या इतिहासाबद्द्ल कणव असली आणि वर्तमानातील संघर्षाबद्द्ल आदर वाटला तरी अमेरिका आणि एकंदरीतच मित्र देशांनी त्यांना "पवित्र भुमी" चे गाजर दाखवून आणि त्यांनी देखील ते गाजर घेऊन मोठीच चुक केली आहे. जर्मनी किंवा इतर युरोपीय देशांना आपल्या नाझी कृत्यांबद्दल एवढी लाज वाटत होती तर स्वत:च्या देशातील एखादा भुभाग तोडून त्यांना द्यायला हवा होता. त्याऐवजी पवित्र भूमी देऊन इतर धर्माचे नवीन शत्रू उपलब्ध करुन दिले आणि पिढ्यान पिढ्या संघर्ष करण्यातच त्यांची हयात संपेल हेच बघीतले. असो. पण तो या धाग्याचा विषय नाही त्यामुळे अवांतराबद्द्ल क्षमस्व !

सुबोध खरे's picture

2 Dec 2021 - 8:01 pm | सुबोध खरे

ज्यू लोकांच्या इतिहासात जेरुसलेम या शहराचे महत्व अनन्य साधारण आहे.

जगभर छळ झालेल्या आणि अनन्वित अत्याचार सहन केलेल्या असंख्य ज्यू लोकांना "पुढच्या वर्षी जेरुसलेम" हे स्वप्न उराशी बाळगून स्वतःची धर्म भूमी इस्रायल ची स्थापना करण्यासाठी प्रेरित केलेले होते.

अशी कुठली दुसरी भूमी त्यांना प्रेरित करू शकली नसती हे सत्य आहे.

मुळात इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माची स्थापना होण्यापूर्वी साधारण १००० वर्षे ज्यू लोक जेरुसलेमच्या पवित्र भूमीत राहत आले आहेत असा इतिहास आहे.

उद्या मक्केवर ख्रिश्चनांनी ताबा मिळवला आणि मुसलमानांना सांगितले कि तुम्ही रक्तपात टाळण्यासाठी दुसरीकडे स्थायिक व्हा तर जगभरातील मुसलमान त्याला तयार होतील का? त्या साठी हजार वर्षे युद्ध झाले तरी ते करण्याची मुसलमान युवकांची तयारी असेलच

याच जेरुसलेम ला इस्लामी सत्तेपासून मुक्त करण्यासाठी ख्रिश्चन तरुणांनी छातीवर क्रूस लावुन अनेक युद्धे केली त्याला क्रुसेड असे नामाभिमान आहे.

तेंव्हा जगभरातील एकत्र येणाऱ्या ज्यू लोकांना तुम्ही जेरुसलेम सोडून तिसरीकडेच आपली पवित्र भूमी स्थापन करा असे कसे सांगणार.

साधी एक पडकी बाबरी मशीद सोडून दुसरीकडे मशीद बांधण्यासाठी मुसलमान तयार होत नाहीत तर भारतात राम जन्मभूमीवर असलेल्या बाबरी मशिदी च्या जागेऐवजी तिसरीकडेच प्रचंड आणि भव्य राम मंदिर बांधा सांगितले तर लोकांना मान्य होईल का?

कॉमी's picture

1 Dec 2021 - 2:14 pm | कॉमी

लेख आवडला, रोचक अनुभव आहे.

टर्मीनेटर's picture

1 Dec 2021 - 3:12 pm | टर्मीनेटर

मस्त लेख कुमार१ साहेब 👍
बरीच नविन माहीती मिळाली. पुर्वी आपल्या पासपोर्टवर दक्षिण आफ्रिकेसंबंधी असा शेरा असायचा हे माहित नव्हते.

अत्तापर्यंत भटकंती केलेल्या ११ देशांमध्ये मला भेटलेल्या पाकीस्तानी लोकांबाबत माझाही अनुभव तुमच्या प्रमाणे चांगलाच आहे!

उडदामाजी काळे गोरे म्हणतात तसे असतीलही काही लोक नीच प्रवृत्तीचे (तसे ते सगळीकडे असतातच, आपल्या देशात काय कमी आहेत 😀) पण मला अजुन तरी त्या लोकांचा वाईट अनुभव आलेला नाही त्यामुळे सगळेच मुस्लीम कींवा सगळेच पाकीस्तानी हरामखोर असतात अशा सरसकटीकरणावर माझातरी काडीमात्र विश्वास नाही (अर्थात प्रत्येकाचे व्यक्तीगत अनुभव वेगवेगळे असु शकतात हे मान्य!).

बाकी राहीली गोष्ट पाकिस्तानला पर्यटनासाठी भेट देण्याची, तर मला मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीचे अवशेष पहाण्यासाठी नाईलाजाने का होईन पण तिथे जायला नक्कीच आवडेल (हे मी दुबईवरील मालिकेच्या पहील्या भागातही लिहीलेले आहे 😀).

एका चांगल्या अनुभवाधारीत लेखासाठी आभार 🙏

कुमार१'s picture

1 Dec 2021 - 3:22 pm | कुमार१

टर्मी.,
आभार !
**मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीचे अवशेष पहाण्यासाठी नाईलाजाने का होईन पण तिथे जायला नक्कीच आवडेल
>>>
तुम्ही अभ्यासू पर्यटक असल्याने हे स्वाभाविक आहे.
व्हिसा साठी शुभेच्छा !

रंगीला रतन's picture

1 Dec 2021 - 9:14 pm | रंगीला रतन

लेख आवडला. मला पण पाकिस्तानला जायचंय. फिरायला नाही तर इतकी लफडी करून त्यांनी काय मिळवले ते बघायला :=)

कुमार१'s picture

1 Dec 2021 - 9:19 pm | कुमार१

**इतकी लफडी करून त्यांनी काय मिळवले ते बघायला :=)
>>
ते मिळवण्यासाठी त्यांना फक्त एक टंकनयंत्र आणि एक टंकलेखक एवढेच सामुग्री पुरली होती असे म्हणतात !!
:))

इस्राईलचा व्हिसा काही दशकांच्या आधी एक वेगळ्या कागदावर देत असत, जेणेकरून पासपोर्टमध्ये काही उल्लेख रहात नाही. ही पद्धत अजून चालू असेल तर वर उल्लेख झाला तशी काही काळजी करण्याचे कारण नाही, सुखाने जगप्रवास करून या सगळे :-D

कुमार१'s picture

2 Dec 2021 - 10:58 am | कुमार१

नुकतीच केंद्रीय मंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेली माहिती :
गेल्या पाच वर्षात 87 देशातील 10646 लोकांनी भारताचे नागरिकत्व मागितलेले आहे .

त्यामध्ये पाकिस्तानचा क्रमांक प्रथम आहे( 7782 लोकांनी)
https://mahanews.live/24620/

रात्रीचे चांदणे's picture

2 Dec 2021 - 11:07 am | रात्रीचे चांदणे

भारतीय नागरिकत्व मागणाऱ्यांमध्ये बहुसंख्य हिंदू आणि शीख असतील. याच काळात 6 लाख भारतीयांनी पण भारतीय नागरिकत्व सोडले आहे.

कुमार१'s picture

2 Dec 2021 - 11:19 am | कुमार१

बरोबर
या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे तिकडचे बरेच सिंधी लोक उत्सुक असतात

जेम्स वांड's picture

2 Dec 2021 - 1:03 pm | जेम्स वांड

( ज्यू लोक एकंदर कर्मठ आहेत यात शंका नाही परंतु त्यांच्या कर्मठपणाचा दुसर्यांना फारसा त्रास होत नाही)

कर्मठ ज्यूंचा न्यूयॉर्क शहरातील कोरोना पॅनडेमिक सेकंड वेव्ह मध्ये लावलेला हातभार, आपल्याकडे ज्या कारणांसाठी तब्लीग जमातची स्क्रुटीनी झाली जवळपास तसलीच कारणे आहेत ही पण.

(अवांतर - लेखक स्वतः ज्युईश आहेत)

जाता जाता :
अमेरिकेतील ज्युईश गुन्हेगारी

पारशी गुंड नसतात कारण पारशी मुळातच इथं अलसंख्याक आहेत (६८,०००) आणि ज्युईश तर एकंदरीत ५००० उरलेत त्यातलेही ३५०० मुंबईत असतात. इथं त्यांच्या "कर्मठपणाचे" दर्शन ते काय होणार, जिथं होईल तिथं आकडा जास्त असतो.

अजूनही जाता जाता :-

गूगल सर्च मजेशीर प्रकरण आहे, सहज सर्च करताना "ज्यू कसे चांगले आहेत" किंवा "ज्यू कसे वाईट आहेत" असे सर्च केले की आपल्याला आवडतात त्या विचारांच्या लिंक्स अन लेखन अन दुवे सहज सापडतात, त्यामुळे गूगल केलेल्या लिंक्स किंवा एकंदरीत इंटरनेटवर घातलेल्या वादांनी माणसे आपले विचार बदलू शकतात असे मला वाटत नाही त्यामुळे लेट्स एन्जॉय अवरसेल्स अँड नॉट टेक एनी टेन्शन ऍझ सच.

ओव्हरऑल, एकंदरीत चंद्रसूर्यकुमार ह्यांनी जे ज्युईश लोकांचे विश्लेषण केले आहे तूर्तास तरी मी त्यालाच धरून असेन.

कुमार१'s picture

2 Dec 2021 - 1:43 pm | कुमार१

छान !
ज्यूंचे विश्लेषण आवडले.

रच्याकने ….

आता 2023 मध्ये बहुधा सर्व प्रवास निर्बंध संपलेले असतील. तेव्हा इथल्या एखाद्या दर्दी पर्यटकाने छानशी इसराएल सफर करून यावे आणि इथे मस्तपैकी अनुभवांचा धागा काढावा अशी सूचना /विनंती करतो !
:)

अभिजीत अवलिया's picture

2 Dec 2021 - 4:06 pm | अभिजीत अवलिया

वरची इसराईल व पाकिस्तानची चर्चा वेगळ्या प्रतिसादात नेतो.
पाकिस्तानने इजराईलला मान्यता दिलेली नाही. त्यांच्या लेखी तो देशच नाही. बहुतेक पाकिस्तानच्या पासपोर्टवर (व्हॅलिड फाॅर आॅल कंट्रीज एक्सेप्ट इजराईल) असे लिहीले जाते हे वाचल्याचे स्मरते. (इथे अनवधानाने का होईना असे लिहून पाकिस्तानने इजराईल हा वेगळा देश आहे हे मान्य केले आहे)

कुमार१'s picture

2 Dec 2021 - 4:12 pm | कुमार१

सर्वप्रथम चर्चा नवीन स्वतंत्र प्रतिसादात आणल्याबद्दल धन्यवाद
एखादी उपचर्चा जेव्हा प्रतिसादांची रांग लावते, तेव्हा ते मोबाईलवर सलग वाचताना खूप त्रास होतो. शेवटचे काही प्रतिसाद अगदी कोपर्‍यात जातात.
..

अनवधानाने का होईना असे लिहून पाकिस्तानने इजराईल हा वेगळा देश आहे हे मान्य केले आहे)

छान मुद्दा.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2021 - 6:03 pm | अमरेंद्र बाहुबली

ईस्राईल हा भारताचा खरा मित्र आहे. ईस्राईलवर भापतीयांचा गाढ विश्वास आहे. आता हेच पहा ना मित्र ईस्राईल ला चाललाय हे ऐकल्याबरोबर विश्वासराव सरपोतदारांसारख्या चिंगू माणसाने ७० रूपये लगेच काढून दिले.

समीरसूर's picture

2 Dec 2021 - 6:16 pm | समीरसूर

अप्रतिम! आपले लेख खूप समतोल आणि मनाला उभारी देणारे असतात. अनुभव मस्तच आहे! शेवटी ती तरी माणसेच! आपल्यासारखी! तो धागाच माणसाला जोडतो...बाकी सगळा निव्वळ फापटपसारा...

Nitin Palkar's picture

2 Dec 2021 - 8:08 pm | Nitin Palkar

अतिशय रोचक लेख आणि त्यावरील माहितीपूर्ण प्रतिसाद.

_/\_

शाम भागवत's picture

2 Dec 2021 - 9:34 pm | शाम भागवत

संयत भाषेतला छान लेख आणि माहीतीपूर्ण प्रतिसादही उत्तम.

कुमार१'s picture

2 Dec 2021 - 9:42 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
...

धागाच माणसाला जोडतो...बाकी सगळा निव्वळ फापटपसारा

>>> हे आवडले.

चौकस२१२'s picture

3 Dec 2021 - 9:14 am | चौकस२१२

भारताने जू धर्मियांना आसरा दिला म्हणून आज त्यांना भारताबद्दल प्रेम वाटत असले पण "धर्म सर्वात महत्वाचाच " हे त्यांचे तत्व आहे ..( याचाच अगदी साधं उदाहरण म्हणजे अलिबाग भागातील पिढयानपिढया अक्षरशः हिंदू वातवरणात वाढलेले मराठी भाषिक ज्यू इस्राएल मध्ये स्तहलन्तरित झाले .. केवळ धर्म हे कारण
इस्राएल मध्ये अंतर्गत लोकशाही असली तरी तो धर्मावर बसवलेला देश आहे हे कोणी वसु नये .. तेवहा जजो पर्यंत भारताचाच फायदा तो पर्यंत इस्राएल मित्र हे ठीक .. उडतो उडतो नको पण हे हि खरे कि काह्ही करून अरबांची बाजू हे टोक पण अत्यतं चुकीचे होते

सुबोध खरे's picture

4 Dec 2021 - 9:32 am | सुबोध खरे

देशकारणात आणि राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो कि कायमचा शत्रू नसतो.

भारत आणि इस्रायल यांच्यातील मैत्री संबंध केवळ भारतात ज्यूंवर अत्याचार झाले नाहीत म्हणून आहेत असे नाही तर

दोन्ही देशांना इस्लामिक दहशतवाद हि एक कायमची डोकेदुखी होऊन बसलेली आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना भारत सोडला तर थे इस्रायल पर्यंत कोणत्याही देशात लोकशाही नाही आणि हि सर्व राष्ट्रे इस्लामी आहेत ( मुळात इस्लामला लोकशाही मान्यच नाही).
आणि इस्रायलच्या पश्चिमेस सुद्धा (इजिप्त, लिबिया अल्जेरिया मोरोक्को इ देश) हीच स्थिती आहे. यातल्या कोणत्याही देशाला इस्रायल मान्यच नाही. ( अधिकृतरीत्या मान्यता दिली असली तरी

अशा स्थितीत दोन्ही देशांना परस्पर सामंजस्याचा फार मोठा फायदा होत असतो.

त्यामुळे गुप्त माहितीची देवाण घेवाण आणि त्यावर केलेली प्रक्रिया विश्लेषण इ. मध्ये दोघांना होणारा फायदा फार मोठा आहे.

याशिवाय इस्रायली तंत्रज्ञानासाठी भारताची प्रचंड बाजारपेठ आणि भारताला इस्रायल देत असलेले तंत्रज्ञाना चा भारताला होणार फायदा असे अनेक पैलू आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेंव्हा युद्धाला तोंड फुटले असताना अतिशय आवश्यक होते तेंव्हा इस्रायल ने भारताची केलेली मदत ( जसे अमेरिकेने पाकिस्तानची तळी उचललेली असताना रशियाने आपल्याला केलेली मदत) हे भारत कधीच विसरत नाही.

आज अमेरिका त्यांच्या गरजेसाठी( चीनशी दोन हात करण्यासाठी) आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवण्यासाठी तयार झाला आहे. उद्या गरज संपली कि ते हात वर करणार हा अनुभव सार्वत्रीक आहे. फ्रांस, इस्रायल, रशिया यांच्याशी संबंध चांगले ठेवण्यामागे हेच राजकारण आहे.

शेखरमोघे's picture

3 Dec 2021 - 10:09 am | शेखरमोघे

छान चटकदार लेख - आवडला!

"कराची" नाव अजूनही वापरणारे मझ्या माहितीतले सगळ्या भारतातले लोकप्रिय ठिकाण म्हणजे हैदराबादमधील "कराची बेकरी" (हैदराबादमध्ये अनेक शाखा). यान्ची उत्पादने मी अमेरिकेत देखील पाहिली/वापरली आहेत.

मी अनेक वेळा बान्गलादेशचा (कामानिमित्त) प्रवास केला आहे - ढाक्याचा श्रीमन्त भाग मुम्बईसारखा तर गरीब भाग कलकत्त्याहूनही बकाल वाटला होता.

कुमार१'s picture

3 Dec 2021 - 11:35 am | कुमार१

शेखर, धन्यवाद.

हैदराबादी कराची रोचक.
यावरून पुणे कॅम्प मधील दोन वेफर्सच्या प्रसिद्ध दुकानांची आठवण झाली. त्यातले एक म्हणजे बुधानी आणि दुसरे कराची.

एकंदरीत बुधानीचा बोलबाला जास्त होता आणि तिकडे लोक रांग लावून वेफर्स घ्यायचे. कराचीचे वेफर्स तुलनेने कोरडे असायचे आणि त्यांची किंमत बुधानीच्या साधारण दीडपट होती.

घरी काही विशेष प्रसंग असला की मुलांकडून कराचीच्या वेफर्सची मागणी होई आणि मग ते आम्ही आणत असू.

प्रचेतस's picture

3 Dec 2021 - 12:28 pm | प्रचेतस

मस्त लेख.
पिंपरीत कराची स्वीट मार्ट, हॉटेल कराची इत्यादी कराचीशी अनुबंध असलेली सिंधी बांधवांची दुकाने आहेत.

कर्नलतपस्वी's picture

3 Dec 2021 - 1:14 pm | कर्नलतपस्वी

कुमार१ तुमचे अभिनंदन, लेखास ज्या प्रमाणात प्रतीसाद आलाय तो एक प्रकारे मर्यादित जनमत संग्रह बनू शकतो. ७९-८० मधे श्रीनगर मधे होतो तेथील जनमत मधे कमालीचे खरब होते.आमच्याबद्दल कमालीचा द्वेष व राग होता. काही दिवसानीं सीमावर्ती भागात ग़ेल्यानंतर आगदी उलटा अनुभव आला. नंतर मात्र परिस्थिती खराब होत गेली.

१९९४ मधे श्याम बेनेगल यांची राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेती " मोम्मो" हा सिनेमा दोन्ही देशांतील सामान्य माणूस कसा विचार करतो याचे सुदंर चित्रण. सुरेखा सिक्री फरीदा जलाल व रजत कपूर यानीं सुदर अभिनय केला आहे.

व्यक्तीगत अनुभव आसाच काहीसा आहे. कालानुरूप सर्व काही बदलत आहे.

कुमार१'s picture

3 Dec 2021 - 1:32 pm | कुमार१

प्रचे., कर्नल
पूरक माहितीसाठी धन्यवाद !
.....
@ क त,
प्रतिसादांकडे पाहण्याचा तुमचा एक वेगळा दृष्टिकोन आवडला.

" मोम्मो" ची माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. युट्यूबवर असल्यास सवडीने बघेन.

कर्नलतपस्वी's picture

3 Dec 2021 - 2:21 pm | कर्नलतपस्वी

हा सिनेमा यु ट्युब वर आहे.
मेडीकल कोअर मधे असल्याने स्थानिक जनतेशीं संवाद अनिवार्य.

कुमार१'s picture

3 Dec 2021 - 9:26 pm | कुमार१

माझा एक साधारण अनुभव या लेखाद्वारे लिहिला. तो आपणा सर्वांना आवडला हे वाचून आनंद वाटला.

त्यावरील चर्चेत आपल्यातील सहभागी अनेक लोकांनी चांगले योगदान दिले. भारत पाक
दरम्यानचे आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि लष्करी संबंध याबाबतीत बरेच जणांनी अभ्यासू प्रतिसाद दिले.

अशी अर्थपूर्ण चर्चा घडवून आणल्याबद्दल मी आपणा सर्वांचे कौतुक करतो.

पाकिस्तान हा संवेदनशील आणि स्फोटक विषय असतानाही या चर्चेदरम्यान धाग्याचा काश्मिर झाला नाही हे विशेष. उलट आपण सर्वांनी चर्चेतून माहितीचे नंदनवन फुलवले असेच म्हणतो. :)

या चर्चेदरम्यान इसराएल संबंधीही बरीच उपयुक्त माहिती आपल्यापैकी काही जणांनी दिली. अन्य देश आणि इसराएलचे संबंध यावरील उपचर्चाही छान रंगली.
ज्यांना मनापासून पाकिस्तान पर्यटन करायची इच्छा आहे अशांना भविष्यात त्यासाठी व्हीसा मिळो ही सदिच्छा.

आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे !
….

श्रीरंग_जोशी's picture

4 Dec 2021 - 9:03 am | श्रीरंग_जोशी

एका नेहमीपेक्षा वेगळ्या अनुभवावर आधारीत लेखन करुन मिपावर उत्तम चर्चा घडवून आणल्याबद्दल आपले आभार. एकाहून एक माहितीपर प्रतिसादांसाठी इतर मिपाकरांनाही धन्यवाद.

इस्राएलला भेट देण्याबाबत चर्चा निघालीच आहे तर काही वर्षांपूर्वी पाहिलेला लल्लनटॉप युट्यूब चॅनेलवरचा हा व्हिडिओ येथे डकवतो.

कुमार१'s picture

4 Dec 2021 - 6:19 pm | कुमार१

1971 च्या भारत-पाक युद्धात भारतीय नौदलाच्या २२ किलर किलर्स स्क्वॉड्रन’ने कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने या स्क्वॉड्रनला येत्या ८ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh/fifty-years-of-india-pakistan-1971-...

भारतीय नौदलाचे अभिनंदन.!

जेम्स वांड's picture

4 Dec 2021 - 10:34 pm | जेम्स वांड

नौसेना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

imgbox

नंबर २२ किलर स्क्वाड्रनला विशेष शुभेच्छा आणि अभिनंदन प्रेसिडेंशियल स्टँडर्ड प्राप्त केल्याबद्दल.

कुमार१'s picture

5 Dec 2021 - 8:45 pm | कुमार१

यंदा 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाची पन्नाशी आहे. 16 डिसेंबर चा 'विजय दिवस' जवळ येत आहे. त्यानिमित्ताने तेव्हाच्या काही आठवणींना इथे उजाळा दिलेला आहे :

https://www.google.com/amp/s/www.news18.com/amp/news/india/vijay-diwas-1...

बांगलादेश निर्मिती नंतर पाकिस्तानची लोकसंख्या निम्म्याहून अधिकने कमी झाली.

बेकार तरुण's picture

9 Dec 2021 - 7:03 pm | बेकार तरुण

लेख खूप आवडला... प्रतिक्रियाही छान आहेत.

ईसराएल बद्दल विषय निघाला आहे म्हणुन माझा एक अनुभव...
मी आखाती देशात काम करतो अन ईथे माझ्या ऑफिसमधे अनेक लोक मुळचे फिलिस्तानी निर्वासीत (आता जॉर्डन लेबेनान वगैरे पासपोर्ट होल्डर्स आहेत)...
मी सुरुवातीला काही गुंतवणुकीसाठी "तेवा फार्मा" कंपनीबद्दल काही सुचवले होते... तेव्हा सर्वांनी मीटींगमधे एकदमच कडवट चेहरे केले होते.. नंतर माझा बॉस ( ज्याचे पूर्वज फिलिस्तानी आहेत अन ४८ साली जॉर्डनला पळुन गेले होते).... मला बाजुला घेउन गेला अन कसे आम्ही ईसराएलला स्वतंत्र देश मानतच नाही वगैरे ची माहिती दिली..
आता आखाती देशात ईसराएलला मान्यता दिल्याने हे लोक्स प्रचंड नाराज आहेत...

कुमार१'s picture

10 Dec 2021 - 10:07 am | कुमार१

@बे त : आभार व सहमती.
…….

लेखात, जे पासपोर्टवरील अमुक देशाला जायची परवानगी नाही, असे वाक्य आहे त्या संबंधात प्रश्न :

समजा अ देशाचे ब देशाशी राजनैतिक संबंध नाहीत. म्हणून अ देश आपल्या नागरिकांना ब देशात जायला परवानगी देत नाही.

इथे मला एक मूलभूत शंका आहे.
समजा,अ देशातील एखाद्या अभ्यासू पर्यटकाला ब देशात कुतूहल म्हणून पर्यटन करायचे आहे. तरीसुद्धा अशा वेळेस परवानगी का मिळू शकत नाही ? अ देशाने तिकडे जाण्यासाठी का अडवावे ? ब ने व्हीसा नाकारला तर समजू शकतो.

कुठेही पर्यटन करता येणे हा मूलभूत मानवी अधिकार नसतो का ?

माहितगारांनी भर घालावी.

अभिजीत अवलिया's picture

10 Dec 2021 - 1:03 pm | अभिजीत अवलिया

पाकिस्तानचे इजरायलशी राजनैतिक संबंध नाहीत. म्हणून पाकिस्तान आपल्या नागरिकांना इजरायलमधे जायला परवानगी देत नाही. पण इजरायला पाकिस्तानी लोकांचे वावडे नाही. एखादा पाकिस्तानी व्यक्ती इजरायलच्या एअरपोर्टवर आल्यास पेपर व्हिसा दिला जातो.

कुमार१'s picture

10 Dec 2021 - 3:08 pm | कुमार१

तुमचा मुद्दा समजला पण मी वेगळे म्हणतोय
आमचे त्यांच्याशी राजनैतिक संबंध नसेनात का,
आमच्या नागरिकाने तिकडे पर्यटनाला सुद्धा का जाऊ नये ?
असे धोरण का असते ?

सुबोध खरे's picture

11 Dec 2021 - 1:08 pm | सुबोध खरे

एखादा पाकिस्तानी व्यक्ती इजरायलच्या एअरपोर्टवर आल्यास पेपर व्हिसा दिला जातो.

हे फार अभावानेच होते आणि ते सुद्धा त्या नागरिकांची पार्श्वभूमी त्याचे सार्वजनिक जालावरील अस्तित्व इत्यादी बरंच कसून तपासल्यावर होतं.

पाकिस्तानी नागरिकाने इस्रायल ला जाणे हेच मुळात बेकायदेशीर आहे त्यामुळे पाकिस्तानच्या पासपोर्टवर not valid for israel असे छापलेले असते.

मूळ पाकिस्तानी असलेल्या पण इतर देशांचे नागरिक असणाऱ्या पाकिस्तानी माणसांना (कोणत्याही मुसलमान माणसाला- अगदी भारतीय मुसलमानास सुद्धा) सुद्धा व्हिसा देताना इस्रायल फार काळजी घेतं.

देशाच्या जन्मापासून इस्लामी दहशतवादाने पोळलेल्या आणि सतत युद्धमान असलेल्या या देशाला इतकी काळजी कायमच घ्यावी लागते.

तर्कवादी's picture

10 Dec 2021 - 6:57 pm | तर्कवादी

उदा: अ देशाचा नागरीक ब देशात गेला आणि तिथे काही अपत्तीत अडकला तर राजनैतिक संबंध, दूतावास व इतर सुविधा नसल्याने अ देश आपल्या नागरिकाला काहीच मदत करु शकणार नाही किंवा ते मदत करणे कठीण असेल. आणि "कुठेही पर्यटन करता येणे हा मूलभूत मानवी अधिकार" आहे की नाही माहित नाही पण आपल्या नागरिकाला आपत्तीतून बाहेर काढण्याकरिता प्रयत्न करणे हे मात्र प्रत्येक सरकारचे कर्तव्य असावे.
येवू शकणार्‍या अडचणी - उदाहरणादाखल
१) पासपोर्ट हरवणे
२) गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवणे (अपघात वा आजारपण)
३) मृत्यू

कुमार१'s picture

10 Dec 2021 - 7:15 pm | कुमार१

सहमत.
समजा, त्यातून एखादा स्वतःच्या जबाबदारीवर गेलाच.
जर काही आपत्ती ओढवली तर तो दुसरा देश अजिबात मदत करणार नाही हे गृहीत असावे.

चौकस२१२'s picture

16 Dec 2021 - 3:14 pm | चौकस२१२

कुठेही पर्यटन करता येणे हा मूलभूत मानवी अधिकार नसतो का ?
असायला हवा पण प्रत्यक्षात कोणीच तो तसा मानत नाहित
आणि समजा देश "अ " चे देश "ब" बरोबर एवढे वाकडे असेल तर आपलया नागरिकांना "ब" देशात जाण्यावर बंदी आणणे हा देश "अ " चा अधिकार असू शकतो (.अर्थात त्या त्या देशातील अंतर्गत शासन व्यवस्थेवर अवलंबून आहे म्हणा .. )
या शिवाय पुढे तर्कवादी यांनी ,मांडलेले मुद्दे लागू होतात

कुमार१'s picture

11 Dec 2021 - 6:00 pm | कुमार१

वरती विविध देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि प्रवास प्रतिबंध यासंदर्भात चर्चा झाली आहे.

भारतातल्या भारतात आपल्याला काही भागांमध्ये प्रवेश करायचा असेल तरीसुद्धा अंतर्गत परवानगीची (ILP) गरज लागते. असे काही भाग इथे वाचनात आले ते असे :
• अरुणाचल प्रदेश
• लक्षद्वीप ,लडाख व सिक्कीमचे काही भाग
• नागालँड आणि
• मिझोराम

चौकस२१२'s picture

16 Dec 2021 - 3:32 pm | चौकस२१२

आंतरराष्ट्रीय प्रवासातील अजून एक गोम .. लक्षात ठेवावी
धरून चला कि तुम्ही अश्या देशाचे नागरिक आहात "अ " कि ज्यांना बऱ्याच देशात " व्हिसा ऑन अराईवल" ची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे खालील उदाहरणात व्हिसा हा प्रश्न नाहीये ...
आणि समजा तुम्ही तात्पुरते कामासाठी किंवा फिरायला राहत्या ("अ " ) देशातून दुसरया एका देशात ("ब " ) गेला आहात आणि तुमच्या कडे अ ते ब असे परतीचे तिकीट आहे. थेतील वास्तव्यात तुम्ही ठरवलेत अजून तिसरया देशांत (" ड " ) थोडे दिवस जाऊयात आणि तुम्ही ब ते ड असे परतीचे तिकीट काढलेत

ड मध्ये प्रवेश करताना तुमचे "अ " ते "ब" हे जे तिकीट आहे त्याची प्रत सोबत असणे महत्वाचे आहे कारण असे कि " ड " ला माहीत आहे कि तुम्ही "ब" चे कायमचे रहिवासी नाहीत त्यामुळे "ड " सोडताना तुम्ही "ब" पासून "अ" या मूलदेशी कसे जाणार याची विचारणा होऊ शकते

माझ्य मित्राचं बाबतीत एकदा असे झाले आहे .. ऑस्ट्रेलयं नागरिक , इंडोनेशिया मध्ये कामास जायचा आणि तेथून सिंगापुर ला जाताना जकार्ता ते सिडने चे तिकीट बरोअबर ठेव्यायला विसरला

कुमार१'s picture

16 Dec 2021 - 5:15 pm | कुमार१

**तुम्ही "ब" पासून "अ" या मूलदेशी कसे जाणार याची विचारणा होऊ शकते
>महत्त्वाचा मुद्दा
धन्यवाद.!

नगरी's picture

16 Dec 2021 - 2:48 pm | नगरी

1980-2022 मोठा काळ

कुमार१'s picture

16 Dec 2021 - 3:29 pm | कुमार१

1980-2022 मोठा काळ

नक्की समजले नाही
प्रतिसाद अर्धवट राहिला आहे का?

कुमार१'s picture

17 Dec 2021 - 8:51 pm | कुमार१

या धाग्यात पासपोर्ट-व्हिसा इत्यादींची माहितीपूर्ण चर्चा झालेली आहे. यासंदर्भात इंग्लंड मधील हा एक नवा दावा.

एका व्यक्तीने आपल्या पासपोर्ट मध्ये लिंगनिरपेक्ष असा उल्लेख (जेंडर न्यूट्रल) करावा अशी मागणी केली होती. परंतु इंग्लंडच्या कायद्यानुसार व्यक्तीचे लिंग या सदरात पुरुष किंवा स्त्री लिहिणे हे सक्तीचे आहे. या व्यतिरिक्त काही लिहून त्यांचा पासपोर्ट दिला जात नाही.

या नियमाविरुद्ध संबंधित व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात गेली होती. परंतु तिथे तिच्या विरोधात निकाल लागलेला आहे.
वास्तविक लिंगनिरपेक्ष अशी नोंद करून अनेक देशांमध्ये पासपोर्ट दिले जातात. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, अमेरिका कॅनडा, जर्मनी इत्यादींचा समावेश आहे. न्यायालयाचा वरील निर्णय दुर्दैवी असल्याचे फिर्यादीच्या वकिलाने म्हटले आहे. आता ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायालयाकडे दावा दाखल करतील.

https://www.bbc.com/news/uk-59667786

सुबोध खरे's picture

24 Dec 2021 - 10:36 am | सुबोध खरे

एकदा लिंग निरपेक्ष असे कायद्यात मंजूर केले गेले कि

त्यांना वेगळी प्रसाधन गृहे दिली गेली पाहिजेत रेल्वेत, बसमध्ये, शैक्षणिक संस्थात वेगळे आरक्षण या मागण्या चालू होतील आणि यासाठी मोठा मूलभूत बदल आणि खर्च करावा लागेल.

कारण बऱ्याच लोकशाही देशात एकदा अधिकार दिला कि सरकारला त्याच्यासाठी कितीही खर्च करावा लागला तरी करावाच लागतो.

यासाठी बरेच वेळेस सरकारे असे हक्क देण्याच्या विरोधात असतात

कुमार१'s picture

24 Dec 2021 - 10:51 am | कुमार१

त्या प्रकारची खास वेगळी स्वच्छतागृहे वापरताना येणाऱ्या अडचणी आणि एकंदरीतच विमानतळावर होणारे त्रास एका अमेरिकी प्रवाशाने इथे वर्णन केले आहेत:
https://www.cntraveler.com/story/for-gender-nonconforming-travelers-airp...

कुमार१'s picture

17 Dec 2021 - 8:53 pm | कुमार१

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायालयाकडे >>> युरोपीय ....असे वाचावे.

कुमार१'s picture

24 Dec 2021 - 10:14 am | कुमार१

अमेरिकेतील पहिले लिंगभावनिरपेक्ष पारपत्र ऑक्टोबर २०२१ मध्ये देण्यात आले. संबंधित व्यक्ती 66 वर्षीय असून तिने 2015 पासून न्यायालयात दाद मागणे चालू केले होते. आता संबंधिताच्या पारपत्रावर लिंग या सदरात फुली मारण्याची (X) परवानगी मिळालेली आहे.
https://www.reuters.com/world/us/us-issues-first-passport-with-x-gender-...
……………………………………
भारतात पारपत्रावर ट्रान्सजेंडर हे तिसरे लिंग नोंदवायचा पर्याय आहे. पण त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागते.
https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/pdf/ApplicationformIns...

संगीता व अनिता या दोन मुली 33 वर्षांपूर्वी अज्ञान असताना पाकिस्तानातून भारतात आल्या. त्यांच्या आई-वडिलांना भारताचे नागरिकत्व आठ वर्षात मिळाले. पुढे या मुलींनी सज्ञान झाल्यावर भारतीय नागरिकांशीच विवाह केले. परंतु अद्यापही त्या मुलींना भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही.

ते मिळण्यासाठी पाकिस्तानने काहीतरी अहवाल पाठवणे अपेक्षित आहे, जो त्यांनी अद्याप पाठवलेला नाही.

https://www.opindia.com/2022/01/2-hindu-sisters-pakistan-indian-citizens...

कुमार१'s picture

5 Jan 2022 - 11:24 am | कुमार१

1980 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे हुकूमशहा झिया उल हक तेव्हाच्या ऱ्होडेशियात भेटले होते. तेव्हाचा दोघांमधला एक रोचक संवाद नुकताच वाचला. तो असा :

भेटीच्या सुरुवातीसच झिया इंदिराजींना म्हणाले,
“मॅडम, वृत्तपत्रात जे काही छापून येतं, ते तुम्ही सगळं खरं मानू नका बरं का”

त्यावर इंदिराजीं उत्तरल्या,
“अर्थातच नाही, तसही सगळी वृत्तपत्रे तुम्हाला लोकशहा आणि मला हुकूमशहा म्हणताहेत, नाही का ?”

या शाब्दिक टोल्यावर झियाना निरुत्तर होण्याखेरीज गत्यंतर नव्हते !

कुमार१'s picture

9 Jan 2022 - 7:27 pm | कुमार१

आजच्या सकाळच्या सप्तरंग पुरवणीत ‘हडप्पा संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय व्यापार’ हा लेख आहे. त्यातली ही काही माहिती :
हडप्पा संस्कृतीतील भारतात सापडलेली नगरे अशी : धोलावीरा, लोथल कालीबंगन, राखीगढी.
...............................

आणि पाकिस्तानात सापडलेले हेही रोचक :
2300 वर्षे जुने बौद्ध मंदिर आणि २७०० मौल्यवान वस्तू
https://indiadarpanlive.com/2300-year-old-temple-found-in-pakistan/

श्रीरंग_जोशी's picture

10 Jan 2022 - 11:17 pm | श्रीरंग_जोशी

या लेखावरील चर्चेशी संबंधीत विषयावरच्या २ जानेवारीच्या बातमीचे दुवे:

चंद्रसूर्यकुमार's picture

11 Jan 2022 - 8:47 am | चंद्रसूर्यकुमार

क्रांतीकारक भगतसिंग मुळचे फैसलाबादजवळच्या (पूर्वीचे लायलपूर/ ल्यालपूर) एका गावातील. तिथे त्यांचा जन्म झाला ते घर अजूनही आहे आणि तिथे एक छोटेखानी स्मारकही केले आहे. त्यासंबंधी अनेक व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यातील एक खाली देत आहे.

या व्हिडिओत जरा इतिहासाची ऐशीकीतैशी केली आहे पण तो भाग सोडून द्यायचा. तिथे केलेल्या स्मारकात भारतीय क्रांतिकारकांचे फोटो लावले आहेत त्यात वासुदेव बळवंत फडके, राणी लक्ष्मीबाई यांचेही फोटो दिसले.

कुमार१'s picture

11 Jan 2022 - 12:13 pm | कुमार१

भगतसिंग यांची हवेली छान जतन केलेली आहे.
आवडले बघायला

कुमार१'s picture

13 Jan 2022 - 5:16 pm | कुमार१

करतारपुर कॉरिडोर मार्गे विना व्हिसा पाकिस्तानला जाता येते.
त्यासंदर्भातील अशा बातम्या अधून मधून येत असतात :

दुरावलेल्या भावांची 74 वर्षांनी भेट

कुमार१'s picture

16 Jan 2022 - 8:53 am | कुमार१

ट्रेन टू पाकिस्तान हा चित्रपट आलेला आहे. पण बघवणार नाही असे वाटते .
निर्णय होत नाही....

चंद्रसूर्यकुमार's picture

16 Jan 2022 - 9:06 am | चंद्रसूर्यकुमार

हा चित्रपट जुनाच आहे की त्याच नावाने नवा चित्रपट बनवला आहे? कारण त्याच नावाने एक चित्रपट पूर्वी पण होता. मी कॉलेजात असताना घरी टिव्हीवर लागला होता पण नेमके त्याच वेळेस लाईट गेल्यामुळे तो चित्रपट बघता आला नव्हता. त्यानंतर खुशवंतसिंगांचे ट्रेन टू पाकिस्तान हे पुस्तक वाचले . त्यात फाळणीच्या वेळच्या हिंसाचाराचे थोडे उल्लेख आहेत पण जास्त करून गोष्ट एक लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे ते बघताना फार त्रास व्हायला नको. मागे तमस म्हणून एक मालिकाही फाळणीच्या वेळच्या हिंसाचारावर होती. त्यातही अशा घटना घडल्या हे जास्त आडवळणाने दाखवले आहे. त्यापेक्षा भाग मिल्खा भाग मध्ये तेवढ्या भागाचे अधिक त्रासदायक चित्रण आहे असे वाटले.

कुमार१'s picture

16 Jan 2022 - 9:13 am | कुमार१

या सिनेमाची माहिती :
दिग्दर्शक पमेला रुक्स
कलाकार : मोहन आगाशे, निर्मल पांडे, दिव्या दत्ता.
त्याचा सारांशमध्ये ती प्रेते भरून आलेली ट्रेन हा उल्लेख आहेच.
त्याच कारणास्तव मला ते बघायला नको वाटते

कुमार१'s picture

7 Feb 2022 - 4:43 pm | कुमार१

इंटरनेटवरील भेटीतून प्रेमात पडलेल्या भारतीय-पाकिस्तानी समलैंगिक स्त्री जोडप्याची गोष्ट

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 3:25 pm | कुमार१

एक अभ्यासपूर्ण लेख:

याचकाची चहुबाजूंनी कोंडी व्हावी, तशी सध्याची पाकिस्तानची अवस्था आहे
https://www.aksharnama.com/client/trending_detail/5816

रावसाहेब चिंगभूतकर's picture

18 Feb 2022 - 11:01 am | रावसाहेब चिंगभूतकर

तुमच्या शत्रू ला भिकारी ठेवलं तर त्याला मारायची गरज नसते. भारताने पाकिस्तान बाबतीत जागतिक स्तरावर सतत प्रचार करून दबाव जारी ठेवावा. अभी पाकिस्तान को और जलील होना है. नायजेरिया, सोमालिया, अफगाणिस्तान आदी देशांपेक्षा खालच्या तळाला पाकिस्तानची अर्थव्यवस्था पोचल्याशिवाय हे प्रयत्न सोडू नयेत. शेजारी राष्ट्रे समृद्ध असली तर चांगले वगैरे सर्व परिकल्पना आहेत.

कुमार१'s picture

18 Feb 2022 - 1:22 pm | कुमार१

**भारताने पाकिस्तान बाबतीत जागतिक स्तरावर सतत प्रचार करून दबाव जारी ठेवावा.
>>> सहमत.

नायजेरियातील उत्पन्न भारतापेक्षा खुप कमी नाही. तेल भरपुर आहे तिकडे.

भाषांतरः
भारत प्रति व्यक्ती $2,625.09 130 व्या क्रमांकावर आहे. नायजेरियापेक्षा 12% जास्त
नायजेरिया $2,334.26 प्रति व्यक्ती 82 व्या क्रमांकावर आहे.
मुळ संदर्भ

India $2,625.09 per capita Ranked 130th. 12% more than Nigeria
Nigeria $2,334.26 per capita Ranked 82nd.

https://www.nationmaster.com/country-info/compare/India/Nigeria/Economy

तुमच्या शत्रू ला भिकारी ठेवलं तर त्याला मारायची गरज नसते. भारताने पाकिस्तान बाबतीत जागतिक स्तरावर सतत प्रचार करून दबाव जारी ठेवावा. अभी पाकिस्तान को और जलील होना है. नायजेरिया, सोमालिया, अफगाणिस्तान आदी देशांपेक्षा खालच्या तळाला पाकिस्तानची अर्थव्यवस्था पोचल्याशिवाय हे प्रयत्न सोडू नयेत. शेजारी राष्ट्रे समृद्ध असली तर चांगले वगैरे सर्व परिकल्पना आहेत.

शाम भागवत's picture

21 Feb 2022 - 11:23 pm | शाम भागवत

भाषांतरः

🙏

निखिल वागळे सारखे लोक जेथे लिहितात तेथे विश्वासार्हता शून्य असते! अक्षरनामाचे संपादकीयात पेड न्युज वगैरेला थारा देत नाही असे म्हणतात त्यामुळे हे पोर्टल त्यातलेच आहे याविषयी संशय अजून वाढतो. अन्यथा इतके दाबून लिहायची गरज काय!

कुमार१'s picture

18 Feb 2022 - 10:45 am | कुमार१

पाकिस्तान व चीनच्या मैत्रीला लागली ओहोटी:

https://idrw.org/china-pakistan-honeymoon-is-over-imran-khans-historic-v...

धाग्याच्या मूळ विषयासंदर्भात सांगायचं तर 'अष्टचक्री रोमायण'कार प्रवीण कारखानीस तसेच मनीषा टिकेकरांच्या पाकिस्तानभेटीवरच्या पुस्तकांमध्ये बरेच गंमतीदार प्रसंग आणि निरीक्षणं वाचायला मिळतात. टिकेकरांच्या पुस्तकात एक किस्सा आहे. तिथं एका ठिकाणी भारतीय नृत्याचा सराव विद्यार्थिनी करत असतात. तिथल्या परिस्थितीमुळे 'जमुना के पार मेरे कृष्णमुरारी'चे 'रावी के पार मियाँ अब्दुल की बारी' असा तो प्रकार त्यांना पहायला मिळतो.

कुमार१'s picture

21 Feb 2022 - 7:39 am | कुमार१

रंजक संदर्भ दिल्याबद्दल आभार !

*रोमायण'कार >>> हे रामायण शब्दाचे विडंबन आहे काय?

रामचंद्र's picture

21 Feb 2022 - 7:47 am | रामचंद्र

(बहुधा) १९७५ घ्या दरम्यान आठ तरुण मित्र चार मोटारसायकलींवरून खुष्कीच्या मार्गाने भारतातून रोमला जातात त्या प्रवासाची ती धमाल हकिगत आहे.

पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी भारतचं वाली; युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांची सुटका

https://marathi.abplive.com/news/world/russia-ukraine-war-india-helps-pa...

कुमार१'s picture

3 Mar 2022 - 8:33 pm | कुमार१

जैन भाविकांना पाकिस्तानी विसा मिळाला आहे. परंतु भारत सरकारने त्यांना जाण्यासाठी अजून परवानगी न दिल्याने ते तिकडे जाऊ शकत नाहीत. सदर विसा आता ७ मार्चला संपणार आहे

कुमार१'s picture

26 May 2022 - 1:41 pm | कुमार१

पाकिस्तानात हिंसाचार : इम्रान खान समर्थकांनी मेट्रो स्टेशन जाळलं; इस्लामाबाद शहराला युद्धभूमीचं स्वरुप

पुणेकर असलेल्या ९० वर्षीय श्रीमती रीना वर्मा या १९६५ पासून पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज करीत होत्या. त्यांचे वडीलोपार्जित घर 'प्रेम निवास' रावळपिंडीत असून त्यांना ते पाहण्याची तीव्र इच्छा होती.

आतापर्यंत त्यांचा व्हिसा नाकारला जात होता. अखेर पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी यांनी विशेष लक्ष घालून आजींचा विसा मंजूर केला आणि आजी त्यांच्या मातृभूमीचे दर्शन घेऊ शकल्या !

तर्कवादी's picture

20 Sep 2022 - 6:33 pm | तर्कवादी

नुकतेच कोणत्यातरी विषयावरील व्हिडिओ बघत असताना झेम (Zem) टिव्ही चॅनेलचा एक व्हिडिओ बघण्यात आला. व्हिडिओ आवडला मग त्याच चॅनेलचे आणखी काही विविध विषयांवरील माहितीपर व्हिडीओज बघितले. सुरुवातीला तर लक्षातही आले नाही की हे पाकिस्तानी चॅनेल आहे.नंतर समजले.
या चॅनेलच्या सब्स्क्राईबरर्समध्ये अनेक भारतीय आहेत हे उघडच आहे.
चॅनेलसंबंधी काही वैशिष्ट्यपुर्ण निरिक्षणे :
१) व्हिडिओजमध्ये अनेकदा संदर्भाकरिता वा एखाद्या गोष्टीच्या तुलनेकरिता पाकिस्तानी संदर्भांबरोबरच ,भारतीय संदर्भही दिला गेला आहे.
उदा: सहारा वाळवंटाबद्दलच्या व्हिडिओत सहारा वाळवंटाच्या क्षेत्रफळाची तुलना भारताच्या व पाकिस्तानाच्याही क्षेत्रफळाशी केला आहे.

किवा एका ईराणी मेजवानीबद्दलच्या या व्हिडिओत डॉलरमधील आकड्यांची तुलना भारतीय व पाकिस्तानी रुपयांतील आकड्यांशी केली आहे.
तर इलन मस्कच्या व्हिडिओत तर डॉलरच्या तुलनेकरिता फक्त भारतीय रुपयांचा संदर्भ घेतला आहे.
२) या व्हिडिओजवरिल कॉमेंट्सवर नजर टाकल्यास दिसते की अनेक भारतीय प्रेक्षकांनी या व्हिडिओजना पसंत केले आहे. पण वेळोवेळी भारतीय संदर्भ दिलेत म्हणून पाकिस्तानी प्रेक्षकांनी निषेध केलाय असे कुठे दिसले नाही.
३) मुकेश अंबानीचे अँटेलिया हे घर, ताजमहाल , शाहरुख खान, बॉलिवूड अभिनेते , बॉलिवूडमध्ये लोकप्रिय पाकिस्तानी गायक ई भारतीय विषयांवर व्हिडिओज बनवलेले आहेत. तसेच अहमद शाह अब्दालीबद्दल एक छोटासा व्हिडिओ आहे त्यात अर्थातच पानिपतच्या युद्धाबद्दल संक्षिप्त माहिती आहे. हा व्हिडिओ सुमारे तीन वर्षापुर्वीचा आहे . तेव्हा प्रदर्शित होत असेलेल्या पानिपत चित्रपताच्या निमित्ताने बहुधा हा व्हिडिओ बनवला गेला असावा तरी त्यानंतर या चॅनेलने असे व्हिडिओज टाळले आहेत असे दिसते.

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 6:44 pm | कुमार१

सविस्तर माहिती दिलीत
पाहतो...

कुमार१'s picture

25 Sep 2022 - 5:55 pm | कुमार१

अनुवादित पुस्तक मराठीत

द ‘एलओसी’’ - हॅपीमॉन जेकब
मराठी अनुवाद - मिलिंद चंपानेरकर
रोहन प्रकाशन, पुणे

नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची ही कहाणी आहे.

कुमार१'s picture

26 Oct 2022 - 4:34 pm | कुमार१

पाकिस्तानातील दिवाळी : काही फोटो

कुमार१'s picture

13 Nov 2022 - 6:00 pm | कुमार१

फाळणी संदर्भात लाहोर शहरावर आधारित एका नाटकाचा चांगला परिचय:
जिस लाहौर नइ देख्या...’ :

या म्हातारीला लाहोर शहराचा प्रचंड अभिमान असतो. ज्याने लाहोर पाहिले नाही‚ जो लाहोर शहरात राहिला नाही‚ त्याचा जन्म फुकट गेला, असे तिचे मत असते. आणि तेच नाटकाचे शीर्षकही आहे.

कुमार१'s picture

27 May 2023 - 9:00 pm | कुमार१

ok