मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

{आरती कोव्हिडची}

प्रसाद गोडबोले · · जे न देखे रवी...
मुळ आरती/ चाल : आरती सप्रेम जय जय https://www.youtube.com/watch?v=xvF50JQEZc8 ________________________________________________________________________ आरती सखेद जय जय कोव्हिड व्हायरस । विश्वसंकटीं नानाSSSSSSSSS होSSSSSSSS रुपीं आम्हां देसीं त्रास ॥ ध्रु० ॥ पहिला अवतार वुहान प्रांती प्रकटसी। चिल्लर फ्लु मानुनी तुज जग फाट्यावर मारी । आम्हीही आलो करुनी थायलंडची वारी*। ईंगा तु दाविला , भयानक पॅन्डेमिक होसी ॥ आरती० ॥ लागला लॉकडाऊन, आम्ही वाजविल्या थाळ्या*। मोदीबुवांचे प्रवचन ऐकुनी सर्व नियम पाळ्या। घरी बसुनी पत्ते कॅरम सागरगोट्या*ही खेळ्या। निजसुख हे टोचता, घरी लाविल्या लाटाया पोळ्या ॥ आरती० ॥ रसातळाला जाई हळुहळु अर्थव्यवस्थाही । आयटीवाले आम्ही सारे शेयर मार्केट हो पाही ॥ घसरले शेयर पाहुनी संधीचा लाभही घेई। आता पोर्टफोलिओ पाहुनी मनाला आनंद होई ॥ आरती० ॥ लॉकडाऊन सैलावला , लोकं बाहेरी पडती। नियमांचा भंग म्हणुनी पोलीस पावत्या फाडती । आर.टी.ओ. चौकाचौकामध्ये चिरीमिरी छापती। तू परवडला पण ह्या लोकांची आम्हां वाटे भीती ॥ आरती० ॥ दुसरा अवतार भयानक डेल्टा झालासी। माणसे मरती टपटप जैसी किडा मुंगी माशी । तयामध्येही येई ऊत ह्या राजकारणासी। थोडी सद्बुद्धी देऊनी, टुचुक* वाढवसी॥ आरती० ॥ वर्कफ्रॉमहोमीं घरी बसोनी चिंतन म्यां केले। बुडले अवघे जग जरी अथवा रसातळा गेले । हर्षमहर्षभयोद्वेगैर्मुक्त* मन आपसुकची झाले। अलिप्तपणाचे भोगु आता निजसुख हे अपुले ॥ आरती० ॥ ओमायक्रॉनरुपी तुझा नवीन अवतार आला। लसवंत झाले लोकं, न घाबरती तुजला। होईल ते होवो आता, कोव्हिड गर्दभगाडीत* गेला। पशा म्हणे आम्हा मर्फी नियम* समजला ॥ आरती० ॥ __/\__ =================================================================== अवघड शब्दांचे अर्थ : * थायलंडची वारी : ह्यावर मिपावर प्रवासवर्णन लिहिण्याचा विचार होता पण तो मोह "फॉरऑब्व्हियसरिझन्स" टाळाण्यात आलेला आहे. * आम्ही वाजविल्या थाळ्या : जन्ता कर्फ्युच्या रम्य आठवणी https://youtu.be/pD-uJd8EN7w * सागरगोट्या : हा खेळ काळाच्या ओघात लुप्तप्राय होत चालला होता, वर्कफ्रॉमहोम मुळे ह्या खेळाचे पुनरुज्जीवन करायची संधी मिळाली. तरी हौशी जिज्ञासु रसिकांनी येथील व्हिडीओ पहावा : https://youtu.be/Wbz-k-54RVY #काढा_की * टुचुक : म्हणजे वॅक्सीनेशन. हा शब्द वाचकांना बाळबुध्दी समजणार्‍या वृत्तपत्रांचा आविष्कार ! * हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो : संदर्भ भगवद्गीता अध्याय १२वा श्लोक १५वा. यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥ तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे ।आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥ १६६ * गर्दभ गाडीत : म्हणजे गाढवाच्या गाडीत * मर्फी नियम : Anything that can go wrong will go wrong. ===================================================================

वाचन 6109 प्रतिक्रिया 0