रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - ३

Primary tabs

कॅलक्यूलेटर's picture
कॅलक्यूलेटर in भटकंती
24 Nov 2021 - 11:31 am

रेणीगुंटा, महाबलीपूरम, पाँडिचेरी, रामेश्वरम आणि मदुराई - ३
सकाळी जाग आली तीच पावसाच्या आवाजाने. रात्र भर पाऊस पडत होता. आणि रस्त्यात सगळं पाणी साचला होतं. सगळे यावरून बसलो होतो. मुलांना भूक लागली होती मग तसाच चालत चालत पुढे गेलो आणि एक चहाची टपरी दिसली त्याला चहाची ऑर्डर दिली आणि जवळपासची सगळी दुकान बंद होती मग त्यालाच विचारला आणि त्याने सांगितलेल्या ठिकाणी गेलो. त्याच्याकडं इडली, ,मेदु वडा, आणि पुरी भाजी होती. ३० रुपयांमध्ये ४ इडल्या १ वडा आणि भरपूर सांबर आणि नारळाची चटणी त्याच्याकडून आणि चहा वाल्याकडून पार्सल घेऊन हॉटेल वर गेलो. सगळ्यांनी नाश्ता केला आणि तसेच बसून राहिलो होतो, पाऊस कधी थांबतोय याची वाट पाहत. एक दोन तास असेच गेले पाऊस काही थांबायची लक्षणे दिसत नव्हती. पण आम्ही पण सहयाद्रीच्या कुशीत वाढलोय एवढयाश्या पावसाला घाबरतो होय. तसेच पावसात निघालो, आदल्या दिवशी एका रिक्षा वाल्याने नंबर देऊन ठेवला होता त्याला बोलावलं तर तो लगेच १० मिनटात आला. ४५० रुपये ४ तास असं ठरवून तो आमच्या सोबत आला. सगळी ठिकाण चालत जायच्या अंतरावर होती खरं तर पण पाऊस असल्यामुळे आम्हाला दुसरा काही पर्याय नव्हता. मग रिक्षा वाल्याने आम्हाला सगळी ठिकाण २-३ तासाच्या आतच दाखवली. सगळ्यात शेवटी शोर मंदिराच्या इथून त्याला जायला सांगितलं.आणि मुलांसोबत थोडा वेळ समुद्रकिनाऱ्यावर घालवून विंडो शॉपिंग करत करत चालत चालत हॉटेल वर आलो

शोर टेम्पल

कृष्णा बटरबॉल. अतिशय कमी जागा असून पण हा महाकाय दगड एकाच ठिकाणी आहे. त्याला लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सरकारने हलवायचा पण प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश नाही आल.

मंदिरांमधली काही शिल्पे

पंच रथ

महाकाय हत्ती

निवांत आणि निर्जन समुद्रकिनारा

परत येताना एक वेगळीच गणेश मूर्ती दिसली ती कशावर उभी आहे ते कळत नाहीए लहान बाळ वाटतंय. पण तस नसावं. ज्याला माहिती असेल त्याने माहिती दिल्यास बर होईल.

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2021 - 12:51 pm | चौथा कोनाडा

छान भटकंती वर्णन आणि फोटो.
पावसाळी वातावरणामुळे महाबलीपुरमचे फोटो खासच आलेत.
बटर बॉल भारी.
सी शोर टेम्पल, पंचरथ, लाईटहाऊस हा सर्व परिसर सुंदरच आहे !
लाईटहाऊसचे फोटो नाही दिसले ?

कॅलक्यूलेटर's picture

24 Nov 2021 - 2:58 pm | कॅलक्यूलेटर

लाइट हाउस ला नाही गेलो. ड्राइवर ने सांगितलं होता पण शोर टेम्पल च्या बीच वर मुले खेळत होती म्हणून मग ड्राइवर ला जायला सांगितलं आणि मग नंतर राहुन गेल.

कर्नलतपस्वी's picture

28 Nov 2021 - 10:50 am | कर्नलतपस्वी

मदुराई ते रामेश्वरम खुपच सुदंर प्रवास. छान फोटो शेअर केलेत. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. मदुराई ,कोडाई कँनाल ,रामेश्वरम ,कन्याकुमारी ते त्रीवेंद्रम आसा बाय रोड प्रवास केला. स्थानिक मीत्रांन मुळे खुप बारीक सारीक नवीन गोष्टी कळल्या. त्यातलीच एक म्हणजे "देवाचे गाव", एक वेगळा धागा टाकतो आवडेल आशी आपेक्षा करतो.

कॅलक्यूलेटर's picture

1 Dec 2021 - 4:53 pm | कॅलक्यूलेटर

(मदुराई ते रामेश्वरम खुपच सुदंर प्रवास.) हो एकदम मस्त. (छान फोटो शेअर केलेत)धन्यवाद तुमचेही अनुभव वाचायला आवडेल, येउद्यात लौकरात लौकर

गोरगावलेकर's picture

28 Nov 2021 - 11:34 am | गोरगावलेकर

सर्व फोटोही सुंदर

अथांग आकाश's picture

30 Nov 2021 - 5:06 pm | अथांग आकाश

कुठलेच फोटो दिसत नाहीयेत :(

कॅलक्यूलेटर's picture

1 Dec 2021 - 4:54 pm | कॅलक्यूलेटर

काही लोकांना अजूनही फोटो दिसत नाहीएत काय कारण असेल बरं?