सध्या मी काय पाहतोय ? भाग ८

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
31 Jul 2021 - 7:43 pm

डोर... २ स्त्रियांची कहाणी. दोन वेगळ्या स्त्रिया, वेगळ्या ठिकाणी राहणार्‍या... एकमेकांना भेटतात कारण त्यामागे एक डोर म्हणजे बंध... हा बंध भावनांचा आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गरजेचा.नागेश कुकनुर दिग्दर्शित २००६ सालचा हा चित्रपट असुन यात श्रेयस तळपदे ने सहज आणि सुंदर अभिनय केला असुन ज्या दोन मुख्य स्त्रियांची ही कहाणी आहे, त्या भुमिका आयेशा टाकिया आणि गुल पनाग यांनी साकारल्या आहेत.
आयेशा टाकिया ने देखील तिची व्यक्तिरेखा तितक्याच निरागसतेने साकारली आहे. ती या चित्रपटात फारच सुरेख दिसली आहे. :) तिला पहिल्यांदा मी Shake It Daddy Mix मधल्या Nahin Nahin या रिमिक्स गाण्यात पाहिले होते.
डोर हा मल्याळम चित्रपट Perumazhakkalam चा रिमेक आहे. राजस्थान, तिथले वातावरण आणि संगीत [ ज्याचा उल्लेख मी भाग ६ मध्ये केला होता, ज्यामुळे हा पाहिलेला चित्रपट मला परत आठवला. ] फार सुंदर वाटते.
हा चित्रपट निदान एकादा तरी पहावा असा असुन यात स्त्रियांच्या भाव-भावना अत्यंत सुंदरपणे चित्रित केल्या आहेत, ज्यामुळे मला तो अधिक आवडला.
---
--
-
या धाग्यात प्रतिसाद देणार्‍यांना माझी विनंती आहे की प्रतिसादात व्हिडियो देताना width="360" ठेवा म्हणजे धागा उघडण्यास जड होणार नाही.

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ७
मदनबाण.....

कलाचित्रपटप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

31 Jul 2021 - 7:55 pm | गॉडजिला

डोर हा मल्याळम चित्रपट Perumazhakkalam चा रिमेक आहे.

हे माहीत न्हवते... गुड ओल्ड डेज जेंव्हा फोन कॉल साठीच वापरला जाई... नागेश ची फुल हवा होती त्याकाळी नंतर चार्म गेला

मागच्या भागात मी युट्यूब चे बरेच व्हिडियो दिले आहेत, कारण वेब सिरीज आणि चित्रपट पाहुन कंटाळा आला होता त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर असलेले व्हिडियो पाहणे पसंत केले. असेच इकडचे तिकडचे व्हिडियो पाहत असताना एका व्हिडियोवर माझे लक्ष गेले, कारण त्यात मास्क घातलेली नन दिसली ! उत्सुकता वाढल्याने तो व्हिडियो पाहिला. तो व्हिडियो Nancy Ajram च्या Inta Eyh या गाण्याचा रिमिक्सचा होता पण या व्हिडियोत Nancy Ajram च्या जागी एका चित्रपटाचा रॉबरी सीन वापरण्यात आला आहे. तो चित्रपट The Town आहे. The Town (2010) चे IMDb रेटिंग 7.5/10 असल्याने आणि मुळात गाण्यामुळे रॉबरी सीन पाहण्यात आल्याने मी हा चित्रपट पाहण्याचे त्यावेळी ठरवले आणि आज हा चित्रपट पाहिला [ एक्स्टेंड व्हर्जन प्रींट ] आणि मला आवडला देखील.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nancy Ajram - Salamat (Official Music Video) / نانسي عجرم - سلامات (فيديو كليب)

Bhakti's picture

1 Aug 2021 - 4:36 pm | Bhakti

सर्वात आधी परमसुंदरी गाणं पाहिलं.रामलीला मधल्या दीपीकाची आठवण आली.पण सिनेमा नेहमीचा मारामारीचा असेल त्यातल आयटम गीत वाटलं.मग रिहाई दे गाणं पाहिल,काय कथा असावी प्रश्न पडला.काल हूतूतू

चूकून अर्धा प्रतिसाद प्रकाशित झाला.

तर हूतूतू रे गाणं पाहिलं,मग तर ठरवलंच सिनेमा नक्कीच पाहायचा.
कथा ठीक आहे.मराठीत उर्मिला कानेटकरचा असाच कोणतातरी सिनेमा पाहिला होता.सईने छान काम केलंय.डबिंगनंतर(शेवटी एक तास) मालिका पाहतोय असा फील येतो.क्रितीच्या कारकीर्दीसाठी चांगला सिनेमा.रेहमान सरांच्या गाण्यांमुळे नक्की लक्षात राहील.

मराठीत उर्मिला कानेटकरचा असाच कोणतातरी सिनेमा पाहिला होता.
मला आई व्हायचं आहे.
आई... भिकारी चित्रपटातील गाण्यामुळे काल चित्रपट पाहिला. चित्रपटाचा काही भाग [ फार छोटासा भाग सोडल्यास ] चित्रपट पाहत आहे असे अजिबात वाटले नाही. चित्रपटातील नायक आईसाठी भिकारी झालाय, पण त्याच वेळी नायिके बरोबरचं गाणं परदेशी लोकेश्न्सवर शूट करण्यात आलेलं आहे. [ सर्व लोकेशन्स मला आवडली पण हा विचित्र विरोधाभास वाटतो. ]
गाणं मात्र फार आवडतं असल्याने ते इथे देण्याचा मोह टाळता येत नाही...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessan

छान आहे चित्रपट. केसरीया गाणे यातले आहे हे माहित नव्हते.

साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद आहे त्यांना_/\_

गॉडजिला's picture

1 Aug 2021 - 11:48 pm | गॉडजिला

हम्मा गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीतील(एक हो गये हम ऑर तुम) एक नोट चुकीचा वाज (व)ला गेला, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरही मजेशीर भाव आला, बहुदा इतक्या मोठया लाईव्ह कार्यक्रमाची सवय नसल्याने ?

गॉडजिला's picture

2 Aug 2021 - 12:57 am | गॉडजिला

मी आत्ता तेलुगू तमिळ व हिंदी अशी तीनही व्हर्जन ऐकली व लक्षात आले की त्यांनी बरोबर वाजवले आहे फक्त त्यांनी तेलगू साँग वाजवले असल्याने व मला हिंदी ऐकायची सवय असल्याने कानाला फरक जाणवला... त्यांनी तेलुगू वर्जन मस्तच वाजवले आहे

गॉडजिला's picture

3 Aug 2021 - 10:34 pm | गॉडजिला

टोटल रिकॉल [२०१२ ] पाहुन झाला... ओके ओके वाटला...
आता भाऊ तोरेसेकरांना ऐकतोय...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Mahanubhavudu Full Video Song HD | Mahanubhavudu Video Songs | Sharwanand | Mehreen | Mango Music

गॉडजिला's picture

10 Aug 2021 - 6:18 am | गॉडजिला
मदनबाण's picture

10 Aug 2021 - 9:34 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : -jumbalaka jumbalaka... :- En Swasa Kaatre

मदनबाण's picture

13 Aug 2021 - 10:47 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"

सॉरी, व्हिडियोचा आकार बदलायचे राहुन गेले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - The Champs "Tequila"

गॉडजिला's picture

15 Aug 2021 - 10:57 pm | गॉडजिला
मदनबाण's picture

18 Aug 2021 - 9:01 pm | मदनबाण

Kingsman: The Secret Service पाहिला, ठीक ठाक वाटला.

============================================================================================

बंगाल मधील खेला होबे...

============================================================================================

लव्ह जिहाद सिरीज :-

============================================================================================
खतरनाक... रेगिस्तानियो का SEX OBSESSION !!!

जाता जाता :- अफगाणिस्तान मधील तालिबानची आपण चिंता करण्या पेक्षा हिंदूस्थानातील "जिहाद" वर अधिक चिंता करावी अशीच स्थिती आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vijanasurabhi | Bachelor Party |

Ujjwal's picture

20 Aug 2021 - 11:35 pm | Ujjwal
मदनबाण's picture

21 Aug 2021 - 9:55 pm | मदनबाण

@ Ujjwal तुम्ही दिलेले गाणं ऐकल... गाण्याच्या सुरवातीची धुन ऐकता क्षणीच खालील गाणं आठवलं

एक विंनंती, पुढच्यावेळी व्हिडियो देताना width="360" ठेवण्याचा प्रयत्न करा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella

काही दिवसांपुर्वी युट्यूबवरचे इकडचे तिकडचे व्हिडियो पाहताना खालील व्हिडियो पाहण्यात आला... यातील फार्मर सीआयए चीफ तिच्या स्वत:च्या नवर्‍यावर आधारीत आर्गो या चित्रपटा बद्धल बोलताना कळले, तेव्हाच मला या चित्रपटा बद्धल अधिक उत्सुकता निर्माण झाली. ६ अमेरिकन्स ची इराण मधुन सुटका करण्यात आली यावर आधारीत हा चित्रपट आहे. [ अधिक सांगत नाही कारण चित्रपट पाहुनच तो अनुभवणे उत्तम ठरेल. :) ] आज हा चित्रपट मी पाहिला आणि मला फार आवडला. कुठलाही भडकपणा नसलेला आणि अगदी वास्तविक चित्रण असणारा चित्रपट पहावा असाच आहे.
वरती उल्लेख केलेला व्हिडियो आणि चित्रपटाचा ट्रेलर देत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella

गॉडजिला's picture

21 Aug 2021 - 11:31 pm | गॉडजिला

....

मदनबाण's picture

25 Aug 2021 - 8:10 pm | मदनबाण
मदनबाण's picture

26 Aug 2021 - 8:16 pm | मदनबाण

सध्या अफगाणिस्तान हा हॉट टॉपिक आहे ! भारताची तिथली गुंतवणुक बुडाली पासुन आता आपल्या इथे तालिबान हल्ले होण्या पर्यंत बरेच काही ऐकाला आणि वाचायला मिळाले आहे. या सगळ्यात सगळे पाकिस्तानला मात्र कुठेतरी विसरुनच गेलेत की काय असे वाटते. पाकिस्तान आता त्याच्या विघटनाकडे वेगाने धावेल तसेच तालिबान पाकिस्तानातच अधिक धुडघुस घालेल यात तिळमात्र शंका नाही ! अफगाणिस्तान पाकिस्तान सीमा लागुन आहेत आणि तालिबान म्हणजे भस्मासुर आणि पाकिस्तानच्या डोक्यावर हात ठेवायला हा भस्मासुर काही काळाने येइल हे आपण नक्कीच पाहु.
मेजर गैरव आर्या यांनी या विषयावर सुंदर भाष्य केले असुन त्यानी पाकिस्तानची पार लाज काढली आहे ती नक्कीच ऐकण्या सारखी आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Nitin Gadkari Addressing News Nation's Conclave "Shahar Banaras"

Ujjwal's picture

26 Aug 2021 - 10:09 pm | Ujjwal
मदनबाण's picture

29 Aug 2021 - 10:06 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Aap Kiske Vanshaj Hain | Manoj Muntashir Live Latest | Hindi Poetry

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Aug 2021 - 10:14 pm | चंद्रसूर्यकुमार

एम.एक्स प्लेअरवर सध्या सुहास शिरवळकरांच्या कथेवर आधारीत समांतर ही वेबसिरीज बघत आहे. जबराट आहे. मी ती कथा वाचलेली नसल्याने अजून रोचक वाटत आहे.

गॉडजिला's picture

1 Sep 2021 - 7:42 am | गॉडजिला
मदनबाण's picture

2 Sep 2021 - 7:51 pm | मदनबाण

वेळात वेळ काढुन पहावी अशी मुलाखत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Manike Mage Hithe මැණිකේ මගේ හිතේ - Official Cover - Yohani & Satheeshan

Bhakti's picture

2 Sep 2021 - 7:55 pm | Bhakti
कुमार१'s picture

3 Sep 2021 - 3:05 pm | कुमार१

'कोशिश से कामयाबी तक' ही हिंदीतील मुलाखत मालिका छान आहे. ती 2018 ला सुरू झालेली दिसते. सध्या मी डीडी भारती वर तिचे काही भाग पाहत आहे.

यामध्ये किरण जुनेजा या हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकितांच्या मुलाखती घेत असतात. नुकत्याच मी रमेश सिप्पी आणि मधुर भांडारकर यांच्या मुलाखती पाहिल्या. छान होत्या. सिप्पीनी सांगितलेला शोले बद्दलचा एक मस्त किस्सा इथे लिहीला आहे:

https://www.misalpav.com/node/47815

काल "शेरशाह" हा कॅप्टन विक्रम बत्रा या कारगिल युद्धात वीरगतीस प्राप्त झालेल्या योद्ध्यावर आधारीत असलेला चित्रपट पाहिला. चांगला चित्रपट आहे [ हे म्हणताना खरे तर दु:ख होते कारण पाकिस्तानने आत्त्ता पर्यंत आपले इतके रक्त सांडले आहे आणि त्याची किंमत आपण त्या देशाला अजुनही मोजायला लावलेली नाही. ]
या चित्रपटात कॅप्टन कालिया यांचा ओझरता उल्लेख झालेला ऐकल्यावर मला विशेष वेदना झाल्या, त्यांना आणि त्यांच्या टिम ला पाकिस्तान ने माणुसकीलाही लाजवेल इतक्या भयानक यातना देउन ठार केलेले आहे आणि या बद्धल माझ्या मनात कमालीचा राग आणि उद्वेग साठलेला आहे.हा चित्रपट मला अतीशय जवळचा होता कारण कारगिल युद्धात विक्रम बत्राची मुलाखत मी त्या वेळीच पाहिली होती. यापुढे आपले जेव्हा केव्हा पाकिस्तान बरोबर युद्ध होइल तेव्हा आपण पाकिस्तान नावाची इस्लामी जिहादी किड चांगली भाजुन, चिरुडुन, ठेचुन कायमची नष्ट केली पाहिजे जेणे करुन आपल्या अगणित योद्धांनी दिलेल्या बलिदानाचे ऋण फेडले जाईल.

याच बरोबर जो पाहिला आणि आता पाहतोय असे २ व्हिडियो इथे देतो.

जाता जाता :- चीन ने आपल्या विरोधात पाकिस्तानला अणवस्त्र सज्ज केलेआणि इतर युद्ध सामुग्री पुरवलेली आहे, मग आपण तैवानला त्याच प्रमाणे घातक शस्त्रास्त्रे देउन चीन विरुद्ध सज्ज करण्यास का वेळ घालवतोय. ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Raataan Lambiyan – Official Video | Shershaah |

गुल्लू दादा's picture

4 Sep 2021 - 9:37 am | गुल्लू दादा

धागा कौतुकास्पद अपडेट ठेवताय. निवांत बघून प्रतिक्रिया देतो. धन्यवाद.

Bhakti's picture

4 Sep 2021 - 6:55 pm | Bhakti

मैडम चीफ मिनिस्टर
रिचा चढ्ढाने चांगल काम केलंय.
यानिमित्ताने भारतातल्या आतापर्यंतच्या महिला मुख्यमंत्रींचा आढावा घेतला.सध्या फक्त ममता दिदीच विद्यामन मुख्यमंत्री आहेत.

गॉडजिला's picture

4 Sep 2021 - 7:34 pm | गॉडजिला

यांनी तत्कालीन केंद्र सरकारवर व्यवस्थित अंकुश ठेवला होता

सिनेमामध्ये केवळ राज्यापुरते राजकारण दाखवले आहे.इतका प्रभावी नसला तरी रीचाचं काम चांगलं ,बाजिंद भूमिका आहे.

चौकस२१२'s picture

5 Sep 2021 - 5:22 pm | चौकस२१२

सध्या मी काय पाहतोय ?
नेटफ्लिक्स वर चित्रपट
१) वर्थ , (मानवी जीवांची किंमत कशी ठरवायची!) ९/११ नांतर त्यात मृत्यू पडलेल्या किंवा जखमींना भरपाई देण्यासाठी सरकारने का व कशी एक सेप्शल मास्तर ची नेमणूक केली त्यावर
२) फौंडर्स , मॅक्डोनाल्ड ज्याने जगप्रसिद्ध केलं तो रे क्रोक च्या जीवनावर

Ujjwal's picture

8 Sep 2021 - 4:33 pm | Ujjwal
मदनबाण's picture

8 Sep 2021 - 11:53 pm | मदनबाण

THE YOGIS OF TIBET डॉक्युंमेंटरी पाहुन झाली आहे. Compassion and Technology ३५ मिनीटे पाहुन झाला आहे, वेळ मिळताच पाहुन पूर्ण करणार आहे.

जाता जाता :- चीन आपल्या विरोधी युद्धात तिबेटी लोकांना वापरु पाहत असुन हल्लीच शी जिनपिंग यांनी तिबेट दौरा केला होता.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Ani Choying Drolma - Namo Ratna (Great Compassion Mantra)

Bhakti's picture

12 Sep 2021 - 11:12 pm | Bhakti

१.सरदार का Grandson
फाळणीच्या काळ्या दिवसांवरचा पिंजर सिनेमा मनात घट्ट रुतलेला आहे,त्यानंतर फाळणी दिवसांवर हाच हलका फुलका सिनेमा पाहिला,एकदम सुमार आहे पण टाईमपास म्हणून बरा होता.
.एबीपीवर बस्तरचा गणपती छान बातमीपट पाहिला.

Ujjwal's picture

25 Sep 2021 - 9:24 pm | Ujjwal
मदनबाण's picture

29 Oct 2021 - 11:58 pm | मदनबाण

समीर वानखेडे ! एक अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी. रेकॉर्ड एकदम ए वन. त्यांच्यावर एका मंत्र्याकडुन चाललेली व्यक्तिगत पातळीची केली जाणारी बिनबुडाची चिखलफेक, आरोप, व्यक्तीगत आयुष्यात काड्य करणे इ.इ.इ. आणि अचानक फॅमेली मॅनचा दुसरा सिझन पहिल्या सिझन पेक्षा भारी झाल्याचे समजले.
आपल्या देशातले "भंगार" मोडीत काढायला असे आणि अजुन अनेक अधिकारी आजच्या काळाची गरज झाली आहे, नाहीतर हे असले भंगारवाले समाजातील प्रत्येक वस्तु भंगारात काढायला निघतील. तर... मी काय म्हणत होतो ? हं फॅमेली मॅन बद्धल आधी पासुन माहित होते पण आज पासुन पहायला सुरवात केली आहे. भाग १ सिझन १ पाहिला, मस्त वाटला.

दोन्ही भागांचे ट्रेलर देऊन ठेवतो:-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kitne Bhi Tu Karle Sitam... :- Sanam Teri Kasam [ Soundtrack Version ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masala

करेक्शन... ते इंडियन माव नसुन श्रीलंकन माव आहे ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Meenakshi Meenakshi... :- Masala

Ujjwal's picture

7 Nov 2021 - 3:12 pm | Ujjwal
कॉमी's picture

9 Nov 2021 - 7:26 pm | कॉमी

न्यायमूर्ती कॉम्रेड के. चंद्रू यांच्या वकिल म्हणून कारकिर्दीतल्या एका खर्‍या केस वर हा सिनेमा आधारित आहे, नुकताच पाहिला. सुंदर सिनेमा आहे.
जस्टिस चंद्रू जिथे गोरगरीबांचे हक्क हिरावून घेतले जात, त्या केसेस विनामूल्य लढत असत. तामिळनाडू मधल्या इरुलार या भटक्या/शिकार करुन पोट भरणार्‍या/ साप पकडणार्‍या समूहावर पोलिसांकडून अत्याचार होत असतात. जे गुन्हे दाखल झालेत पण तपासात काही सापडले नाही तिथे निष्पाप इरुलार लोकांवर गुन्हा दाखल होत असे.
राजकुमारन नावाचा एक इरुलार एका स्थानिक नेत्याच्या घरी साप पकडायला गेला होता. त्यानंतर घरात चोरी झाली, त्याचा आळ राजकुमारन वर आला. राजकुमारन पोलिस "तपास" चालू वेळेस विटभट्टीत काम करायला गावाबाहेर गेला होता. त्याने सोने कुठे ठेवले आहे म्हणुन त्याच्या खुप सार्‍या कुटुंबियांवर ( यात राजकुमारनची गरोदर पत्नी सुद्धा.) खुप वाइट अत्याचार पोलिसांनी केले. पुढे राजकुमारन स्वतः गावात परिवाराला भेटायला आला तेव्हा त्याला अटक झाली. त्याला, त्याच्या भावाला, आणि पुतण्याला पोलिसांनी खुप मारहाण केली. आणि, अचानक एक दिवस संगम्मा, म्हणजे राजकुमारनच्या पत्नीला सांगण्यात आले की तिचा नवरा आणि बाकि दोघेही पोलिस कस्टडीतून फरार आहेत, आणि सापडत नाहीत.

संगम्मानी मग कथानायक चंद्रूंची मदत घेतली. त्यांनी मद्रास हाय कोर्टात फाईल केलेली हिबियस कॉर्पस ऐतिहासिक आहे- त्याच्यावर सिनेमा बेतला आहे. नक्की पाहा. संवाद, पटकथा, अभिनय- भट्टी उत्तम जमली आहे. सिनेमा दु:खद घटनांनी भरला असला तरी आशादायी आहे.


मदनबाण's picture

10 Nov 2021 - 10:35 pm | मदनबाण

फॅमेली मॅन चे दोन्ही सिझन पाहुन झाले आहेत. दोन्ही सिझन मस्त आहेत. दुसर्‍या सिझन मध्ये संमथाचा अप्रतिम अभिनय पहायला आणि अनुभवायला मिळतो. काही गोष्टी पटल्या नाहीत आणि आवडल्या देखील नाही, पण हल्ली काहीही चालते म्हणुन चालवुन घेतले आहे.
याच बरोबर एक वेससिरीज अचानक माझ्या पाहण्यात आली, ती पाहण्याचे मुख्य कारण म्हणजे जालावर भटकंती करताना यातील मास्क घातलेल्या व्यक्तींचे चित्र समोर आले होते आणि काही काळाने तसेच चित्र पुन्हा पाहण्यात आल्याने याचा शोध घेतला असता ही Squid Game नावाची साऊथ कोरियन टिव्ही सिरीज / वेब सिरीज असल्याचे कळले. सिझन १ अधाश्या सारखा पाहिला... वेळात वेळ काढुन पाहण्या सारखी / चुकवु नये अशीच ही सिरीज आहे. [ मी हिंदीत पाहिली. ] बहुतेक याचा दुसरा सिझन येणार आहे.
P1

ट्रेलर :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दस्तक और आवाज तो कानों के लिए है...जो रुह को सुनाई दे उसे खामोशी कहते है...

मदनबाण's picture

20 Nov 2021 - 12:14 pm | मदनबाण

काल जय भिम चित्रपट पाहिला, चांगला चित्रपट आहे. लिजोमोल जोस ने संगिनी ची भुमिका अप्रतिमपणे साकारली असुन तिचा अभिनय इतका प्रभावशाली आहे की डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही. चित्रपटाचे नाव दुसरे काहीही असते तरीही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असता. तसेच जितकी हाईप केली आहे तितकाही काही हा अगदी अफलातुन चित्रपट नाही. पण एकदा नक्की पहावा असा मात्र हा चित्रपट आहे.
याच बरोबर नव्हेंबर स्टोरी ही क्राईम थ्रिलर वेब सिरीज पाहिली, कथा अफलातुन आहे. पहिले २ भाग जरा हळु आणि गोंधळुन टाकणारे वाटतात...पण नंतर मात्र कथा पकड घेते.
तमन्ना यात फारच सुंदर आणि गोंडस दिसली आहे आणि तीने काम देखील उत्तम केले आहे, नव्हे यातील प्रत्येक पात्र उत्तम अभिनय करणारे आहे. ही वेब सिरिज नक्कीच पाहण्या सारखी आहे. बाकी तमन्ना म्हंटले की मला तरन्नुम ही बार डान्सर आठवते... याचे कारण त्याकाळी [ साल २००५] कोवळ्या तमन्ना चे फोटो तरन्नुम म्हणुन जालावर पसरवले गेले होते ! मला त्यावेळी तिचे फोटो कोणी तरी मेल मध्ये पाठवले होते, ते पाहुन ही बार डांन्सर लावण्याची खाण आणि म्हणुनच तिच्यावर एका रात्रीत ९० लाख उडवले गेले असले पाहिजे याची खात्री मला पटली होती. नंतर कळते की ती वेगळी आणि ही वेगळी. नव्हेंबर स्टोरी चा ट्रेलर, तरन्नुम ची कथा आणि त्या वेळचा तमन्ना चा व्हायरल झालेला एक फोटो इथे देऊन जातो.

P1
खवा-मावा पीस... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रफ़्तार कुछ इस कदर तेज़ हुई है जिन्दगी की, कि सुबह का दर्द शाम को पुराना हो जाता है।

मदनबाण's picture

28 Nov 2021 - 11:30 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shodhu Mee Kuthe... :- Naav Mothan Lakshan Khotan

मदनबाण's picture

4 Dec 2021 - 7:01 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ज़रूरी तो नहीं के शायरी वो ही करे जो इश्क में हो, ज़िन्दगी भी कुछ ज़ख्म बेमिसाल दिया करती है।

जेम्स वांड's picture

4 Dec 2021 - 9:48 pm | जेम्स वांड

image host image host

सध्या लेविसन वूड ह्या अफलातून ब्रिटिश भटक्याचे "फ्रॉम रशिया टू इराण - क्रॉसिंग द वाईल्ड फ्रंटीयर" पाहतोय. साऊथ रशिया - डागेस्तान - अझरबैजान - जॉर्जिया - अर्मेनिया - इराण , असा हा प्रवास आहे, अविस्मरणीय अनुभव, एक नंबर निसर्गसौंदर्य, दक्षिण रशियात लोकल लोकांसोबत पार्टी काय करतो, डागेस्तानमध्ये शूर कॉसॅक लोकांशी बातचीत, असं बरंच काही काही आहे त्यात, फारच बेस्ट सिरीज, प्राईमवर पाहू शकतो आपण प्राईम मेम्बरशिप असल्यास.

मदनबाण's picture

15 Dec 2021 - 6:50 pm | मदनबाण

Squid Game पाहिल्याचे वरती एका प्रतिसादात सांगितलेले आहे, जालावर जणु काही कोरियन वेब सिरीज ची लाट आली आहे असेच वाटु लागले आहे. मी लाटेत अजुन एक वेब सिरीज काही काळा पूर्वी पाहिली. सिझन १ ओक्के वाटला,या सिरीज चा दुसरा सिझन येइल असे वाटते आणि तसे झाल्यास तो पहिल्या सिझन पेक्षा अधिक उत्तम असेल असे देखील वाटते. ट्रेलर खाली देऊन ठेवतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jhimma - Title Song