मी पिंपळ

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
22 Apr 2009 - 11:58 am

मी पिंपळ...
एक शतक तरी मी उभा आहे..
अलिप्त, नि:संग, एकटा...
असंख्य चिमणी पाखरं
माझ्या फाद्यांवर बसुन गेली
वसंतातील कोकिळ कुंजने..
मी ही मनसोक्त ऐकली..
मी ऐकली प्रेमिकांची
लाजरी कुजबुज..
त्यांचे रुसवे फुगवे..
लटकी भांडणे..
अश्रुंचे सांडणे..
समजावणे..
अन गजरा माळणे..
अनेक पांथस्थ ,
माझ्या सांनिध्यात विसावली.
मी ही बनलो ,
त्यांच्या साठी सावली..
मी पाहिली माणसे ,
कोलमडलेली..
असंख्य वादळे ,
मी ही झेलली..
मी आहे अनेक लढ्यांचा ,
साक्षिदार...
अन ऐकल्या गप्पाही ,
खुमासदार..
पण आता सारच संपलं
या गावाचं म्हणे ..
शहर झालं...
आता पहिल्या सारख ,
नाही राहिलं...
इथे खुप सोइ आहेत ,
पायवाटांचे हामरस्ते
झाले आहेत...
पुर्वी मी पिंपळपार होतो..
आता पारनाका झालो आहे..
माझ्या फाद्यांखाली
बसथांबा झाला आहे..
पुर्वी लालमातीचा
धुरळा उडवित..
टांगा यायचा..
आता..काळाकुट्ट
धुर उडवित एस्टी येते..
मला गुधमरायला होते..
माझे सगे सोयरे त्यांनी तोडले .
माहित नाही त्यांनी ,
मलाच का सोडले..
मरण येत नाही
म्हणुन मी जगत आहे
कोणी येइल कु-हाड घेउन
म्हणुन वाट बघत आहे...
मी अजुनहीउभा आहे..
अलिप्त नि:संग पण..
एकटा......

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

जागु's picture

22 Apr 2009 - 1:58 pm | जागु

वा, छान मनोगत मांडल आहे.

विसोबा खेचर's picture

22 Apr 2009 - 2:21 pm | विसोबा खेचर

नेहमीप्रमाणेच जबरा कविता..!

आपला,
(फ्यॅन) तात्या.

चंद्रशेखर महामुनी's picture

22 Apr 2009 - 6:00 pm | चंद्रशेखर महामुनी

पिम्पळाची व्यथा...... सुंदर.. नेमके.. शब्द !

क्रान्ति's picture

22 Apr 2009 - 6:47 pm | क्रान्ति

सुरेख मुक्तक.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

जयवी's picture

22 Apr 2009 - 6:47 pm | जयवी

सुरेख !!

मराठमोळा's picture

23 Apr 2009 - 9:53 am | मराठमोळा

मुक्तक आवडले..
पिंपळाचे आत्मचरित्र छान मांडलेत..

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शरदिनी's picture

23 Apr 2009 - 10:15 am | शरदिनी

ही अद्वितीय कविता आहे.
पिंपळ तर एक निमित्त...
आपण सार्‍या विश्वाच्या व्यथेची मांडणी केली आहे...