दोन तासांत आणि 25 माणसांत लग्न कसे करावे?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
22 Apr 2021 - 5:16 pm
गाभा: 

फतवा:

https://www.tv9marathi.com/maharashtra/maharashtra-lockdown-regulations-...

हे सरकार आल्या पासून विविध प्रकारचे आदेश किंवा सुचना , साॅरी फतवे, निघत आहेत...

पण, हा फतवा मात्र खरोखरच विचार करायला लावणारा आहे...

आम्ही आमच्या परीने ह्या फतव्याचे पालन, माझ्या मुलाच्या लग्नाच्या दिवशी, करणार आहोतच. त्यासाठी काही नियमावली पण आखून ठेवणार होतो.. पण जालावर खालील नियमावली मिळाली....
--------------

दोन तासात लग्न समारंभ आटपायची नियमावली...

1.आता मामाचे आणि विहिणबाईंचे रुसणे यावर बंधन घालण्यात आले आहे.

2. नवरीने मेकअप आटोपता घ्यावा व मॅगी नूडल्स प्रमाणे झटपट तयार व्हावे.

3. लग्न विधी लवकर आटोपण्याची ब्राम्हणांची जबाबदारी असेल.10ऐवजी 3मंत्र म्हणण्याची अट.

4.वधू वरांना वरमालेच्या वेळेस उचलण्यासाठी फक्त 2मिनिटे दिली जातील.

5. जमलेल्या 25 लोकांनी ठरलेल्या वेळात आशिर्वाद द्यावा, सगळ्यांच्या एकदाच दुरून सामुहिक पाया पडले जाईल.

6. जेवण पार्सल दिले जाईल व आग्रहाचे 2 गुलाबजाम आधीच पॅक केलेले असतील.

7. दोन तासांचा कालावधी होण्याआधी नवरी मुलीच्या रडण्याच्या कार्यक्रमा साठी 10मिनिट दिले जातील... त्यात तिला प्रत्येकाच्या गळ्यात पडून वेगवेगळे रडायची परवानगी नसेल, काय ते एकदाच रडायचे 10 मिनिट आणि लगेच नवऱ्या मुलाची ही जबाबदारी असेल की त्याने तिला गाडीत बसवून पटकन आपल्या घरी न्यावे..

*नियमावली संपली*
-----------

आपल्या मनांत देखील, ह्या कार्याला आणि ह्या फतव्याला अनुसरून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा...

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

22 Apr 2021 - 5:31 pm | Rajesh188

ज्यांना आत्ताच लग्न करायचे आहे.ज्यांना हे सुद्धा माहीत आहे covid व्हायरस क्रूर झाला असून सुपर spreadar आहे. तरुण सुद्धा ह्या मध्ये मृत्यू मुखी पडत आहेत.
तरी सुद्धा ज्यांना लग्न करायचेच आहे त्यांनी कोर्ट marriage करावे फक्त दोन्ही कडचे आई वडील बस.
ज्यांना पाचपन्नास माणसं जमा करायची आहेत,जेवणावळी उठवायच्या आहेत.dj वाजवायचा आहे,फोटो शूटिंग करायची आहे.
त्यांना सर्वांना एकत्र जमा करा एक बोटी मध्ये बसवा आणि खोल समुद्रात न्या .
आणि खोल समुद्रात पोचल्यावर पार्श्व भागावर लाथ मारून जल समाधी ध्या .
हाच रामबाण उपाय आहे.

मराठी कथालेखक's picture

22 Apr 2021 - 5:35 pm | मराठी कथालेखक

आता साधेपणाने आणि फक्त आवश्यक धार्मिक विधी (कारण ते टाळा म्हणालो असतो पण लोकांना पटणार नाही.. असो) आणि मग काही महिन्यांनी कोरोनाचं संकट टळल्यावर झकास रिसेप्शन करावं.

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 5:39 pm | मुक्त विहारि

मी कोर्ट मॅरेजचा पर्याय सुचवला आहे ...

बघू या, काय निर्णय ठरतो...

Rajesh188's picture

22 Apr 2021 - 5:39 pm | Rajesh188

संसार करायला नवरा ,नवरी जिवंत हव्या असतील तर कोर्ट मध्ये लग्न फक्त नवरा नवरी,आणि आई वडील.
बाकी कोणी नको.

प्रसाद_१९८२'s picture

22 Apr 2021 - 5:41 pm | प्रसाद_१९८२

इतके करण्यापेक्षा,
आता लग्न सरळ रजिस्टर पद्धतीने करा व ही कोरोना नामक पिडा टळली की एक छान पैकी रिसेप्शन द्या, पाहुण्या व मित्रमंडळीना.

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 5:48 pm | मुक्त विहारि

तसेच ठरवत आहोत

इरसाल's picture

22 Apr 2021 - 5:41 pm | इरसाल

मा. उद्धव ठाकरेंनी मला व्हाट्सप्वर एक मेसेज शेअर केलाय. त्यांनी जो २५ आकडा दिलाय त्याबाबत.

भटजी १
अंतरपाट धरणारे २
नवर्‍याचे आईबाबा २
नवरीचे आईबाबा २
नवर्‍याच्या करवल्या २
नवरीच्या करवल्या २
नवर्‍याचे करवले २
नवरीचे करवले २
नवर्‍याचे व्हि/फो. ग्रा २
नवरीचे व्हि/फो. ग्रा. २
नवर्‍याचे मामा/मामी २
नवरीचे मामा/मामी २
मंडप वाला १
डीजेवाला १

झाले टोटल - २५

पण पण पण...... नवरा नवरी ????????????? त्यांच काय. ज्यांच्यासाठी एवढी हायउपस चाललीय तेच नाही म्हणजे.....

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 5:47 pm | मुक्त विहारि

DJ आणि मंडपवाला कॅन्सल करून, तिथे नवरा-नवरी Adjust करणार आहोत...

पिनाक's picture

23 Apr 2021 - 2:07 pm | पिनाक

आधीच्या दोन बायका आणि 2 मुलांचं काय?

इरसाल's picture

22 Apr 2021 - 5:57 pm | इरसाल

ती दोन माणसं (डीजे नी मंडपवाला) मुख्यमंत्र्यांची असली म्हणजे ....बंगल्या वर नेताय तुम्हाला :))

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 6:34 pm | मुक्त विहारि

नगर सेवकाची माणसे पण , वाट्टेल ते करू शकतात.. लग्न लागो की न लागो, नगरसेवकांना खूष करायलाच हवे..

स्वधर्म's picture

22 Apr 2021 - 6:03 pm | स्वधर्म

अगदी शक्य आहे. आजच आमच्या बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये असे एक लग्न झाले. फक्त त्या मजल्यावरच्या कुटुंबातील प्रत्येकी दोन माणसे होती.

Rajesh188's picture

22 Apr 2021 - 6:06 pm | Rajesh188

लग्न म्हणजे ६०० लोक तरी हवीतच,dj हवाच,फोटोशूट हवेच,जेवणावळी उठल्याच पाहिजेत,कमीत कमी हे तर पाहिजेच लग्नात.
विधी च्या नावाखाली चार तास गेलेच पाहिजेत.

कुंभमेळ्यात जाऊन लग्न होऊ दे.

पुण्य ते पुण्य,
सोय ती सोय,
पाहिजेत तेवढी माणसं बोलवा.
रिस्क वैगेरे तुम्ही विचारात घेतली असती तर हे प्रश्न पडले नसते.

बघा, आमचा खारीचा सल्ला. पटला तर ठेवा नाही तर सोडा.

चौकटराजा's picture

22 Apr 2021 - 6:31 pm | चौकटराजा

मला वाटते कोणत्याच वयोगटातील माणसाची शाश्वती नाही अशी या विषाणूंची लाईफ स्टाईल आहे ( लाईफ ... अं ... ? ) सबब आता लग्नाची घाई करू नये ! आणखी एक वर्ष थाबंल्याने काय फरक पडणार आहे ? एका वर्षात कदाचित औषध सापडेल , लसीकरण भरपूर प्रमाणात होईल व लग्नही ही त्यानंतर मानपानासह व मानापमानासह होईल !

अजून एक वर्ष उशीर म्हणजे, 30-35 वर्षांनी, किमान 3-4 कोटीचा फटका...

लवकर लग्न, म्हणजेच लवकर आर्थिक निवृत्ती...

चौकटराजा's picture

22 Apr 2021 - 6:33 pm | चौकटराजा

मुव्ही या दुकानातून नवी कोरी सी डी बाहेर पडली आहे !!! त्वरा करा ! ))))) )))))))))))))))))))))))))))

अमर विश्वास's picture

22 Apr 2021 - 6:38 pm | अमर विश्वास

त्यापेक्षा लग्न कारण्यांनो ... जरा सहा महिने धीर धरा .. लस वगैरे घ्या

नाहीतरी आत्ता लग्न केलेत तरी हनिमून ला जायचे वांधेच आहेत ..

तेंव्हा धीर धरा ...

पण ठाकरे सरकार नी जनहिताच्या निर्णय
घेतला आहे त्या विरूद्धध वागून आम्हाला अजून राज्याला संकटात टाकायचे आहे.

अमर विश्वास's picture

22 Apr 2021 - 6:43 pm | अमर विश्वास

अहो म्हणूनच धीर धारा सांगतोय ना ?

तुमच्या बाजूने बोललो तरी तुमचं चालूच ... गोल गोल राणी

प्रसाद_१९८२'s picture

22 Apr 2021 - 6:46 pm | प्रसाद_१९८२

पण ठाकरे सरकार नी जनहिताच्या निर्णय
घेतला आहे
--

ठाकरेंच्या नियमाला त्यांच्याच पक्षाचे नेते वाटण्याच्या अक्षता लावतात, तिथे इतरांचे काय ?
एक आठवड्यापुर्वी कल्याणमधे शिवसेना नगरसेवकांने हजार माणसे गोळा करुन अगदी थाटामाटात लग्न व हळद साजरी केली. अशी अनेक उदाहरणे आहेत.

काँग्रेसला जे बरोबर वाटते, ते जनतेच्या विरोधातच असते

असे माझे वैयक्तिक मत आहे

कोर्ट मॅरेज किंवा फक्त भटजी (इच्छा असेल तर), वधु, वधुचे कुटुंबिय घरी बोलवुन लग्न करा.
कोर्ट मॅरेज केले तरी कोर्टात गर्दी असणारच आहे, बंदोबस्तासाठी असलेले पोलीसच कितीतरी असतात. त्यापेक्षा घरी केलेले बरे.
झुम, गुगल, व्हॉटसअप व्हिडीओ कॉल करुन नातेवाईकांना सोहळा लाईव दाखवा. मोबाईल मधुन पण उत्तम दिसते. दोन-तीम वेगवेगळ्या एंगल्सने किमान दोन, तीन मोबाईल सेट करुन ठेवा.
ऑनलाईन किंवा जवळच्या दुकानातुन सुपारी, मका किंवा तत्सम पर्यावरणपुरक डिश, वाट्या, ग्लास, चमचे वगैरे मागवा आणि जवळच्या माहिती असलेल्या होटेलमधुन जेवण गोडासहीत मागवा.
आणि थोडा आगावू सल्ला - मधुचंद्रासाठी चिरंजीवांना तुमच्या शेतातील घरावर खाजगी वाहनाने (कारच) पाठवा.

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 7:17 pm | मुक्त विहारि

सगळे मुद्दे नोट केलेले आहेत..

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2021 - 7:31 pm | श्रीगुरुजी

मुलाच्या विवाहासाठी अभिनंदन व शुभेच्छा!

लाडू़ंंचे पार्सल नक्की पाठवा.

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 7:48 pm | मुक्त विहारि

आम्ही भडंग घेऊन येउच...

सुबोध खरे's picture

22 Apr 2021 - 7:49 pm | सुबोध खरे

माझ्या मुलीचे लग्न मागच्या वर्षी (२०२०) दसऱ्याच्या दिवशी ५० माणसांतच झाले. तेंव्हा करोना ऐन भरात होता आणि लससुद्धा उपलब्ध नव्हती

हॉलचे १ वर्ष अगोदरच आरक्षण केलेले होते आणि पूर्ण पैसे भरलेले होते त्यामुळे ते परत मिळण्याची शक्यता सुतराम नव्हती.
( ७ महिने हॉल बंद होता त्यामुळे त्याच्या मालकाची इच्छा असती तरी देणे कठीण गेले असते.)

मुळात हॉल मोठा असल्याने सामाजिक अंतर ठेवणे फार सोपे होते.

५० म्हणजे ५० च हा मंत्र मी कायम ठेवला होता. ( हॉल वाल्याने १०० पर्यंत बोलवा मी मॅनेज करतो) असे सांगितले होते पण मला नियमाच्या विरुद्ध अजिबात जायचे नव्हते.

सुदैवाने हा "२ तासात लग्न उरका" सारखा आचरट नियम नव्हता. दारूच्या दुकानात किंवा लस घेण्यासाठी लोक ४ तास रांगेत उभे असतात पण त्याबद्दल बोलायचे नाही. चार तास बस मध्ये किंवा लोकल मध्ये अत्यावश्यक सेवेतील माणसे रोज नव्या माणसांबरोबर प्रवास करतात ते चालते.

आम्ही सकाळी ८ वाजता हॉल वर गेलो आणि २ वाजेपर्यंत जेवणासकट सर्व कार्यक्रम उरकून घरी आलो.

नात्यातील एक वरिष्ठ डॉक्टर आणि मी आणि माझा व्याही( हा पण डॉक्टर - स्त्रीरोग तज्ञ आहे) असे सल्ला मसलत करून आमचे जे नातेवाईक कोव्हीड होऊन बरे झाले होते अशानाच लग्नाला बोलावले.

वरिष्ठ नागरिक पैकी फक्त माझे आई वडील आणि सासरे एवढेच होते .

बाकी कोणत्याही वरिष्ठ नागरिकाला बोलावले नव्हते. त्यांना करोना झाला असता तर ते महाग पडले असते.

५० मध्ये एक फोटोग्राफर आणि गुरुजी एवढीच बाहेरची माणसे होती.

सर्वाना पत्रिका व्हाट्सअँप वर पाठवली होती आणि आग्रहाचे निमंत्रण करण्याची इच्छा असूनहि बोलावता येत नाही म्हणून त्यांची क्षमा मागितली.

उगाच बोलावल्यामुळे यायला लागेल या भीतीतून अनेक जण मोकळे झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून मला जाणवले. (डॉक्टर म्हणून आम्ही अनेक मित्र आणि नातेवाईकांना केंव्हा ना केंव्हा काहीतरी मदत केल्यामुळे हे बंधन( OBLIGATION) आणि भीड आल्यासारखे होते). यातून लोकांची सुद्धा मुक्तता झाली

हा कार्यक्रम त्याच फोटोग्राफर ने झूम वर प्रक्षेपित केला कारण माझ्या व्याह्याचे आईवडील आणि सासू सासरे ( सर्व ८० च्या वर वय) दिल्लीला असतात त्यांना विमान प्रवासात होणाऱ्या संसर्गाचा धोका घेणे इष्ट नव्हते.

माझी मुलगी आणि जावई माझी गाडी घेऊन सुला वाईन्सच्या येथे ४ दिवस मधुचंद्रासाठी सुद्धा जाऊन आले.

हॉटेल मध्ये सर्व तर्हेची काळजी व्यवस्थित घेतली गेली होती.

यानंतर ते दोघे माझ्या व्याह्याकडे कोचिनला गेले.

अनेक लोकांनी कार्यक्रम लांबणीवर टाकण्याचा सल्ला दिला होता मी त्याला सक्त विरोध केला.

कारण होणारे नवरा बायको रोज ३-४ तास फोन वर घालवत असतील तर त्यांना अजून काही महिने असेच ताटकळत ठेवणे हा निर्दयीपणे ठरला असता.

आज ६ महिन्यांनी हा निर्णय किती बरोबर ठरला हे स्पष्ट होते आहे. आज स्थिती अधिकच बिघडली आहे.

वर आणि वधू याना लग्नात होणाऱ्या कोणत्याही विधी किंवा जेवणात शष्प रस असतो. त्यांना सहजीवन केंव्हा सुरु करतो असे झालेले असते.

बाकी लग्नात हिंदू धर्मशास्त्र आणि हिंदू विवाह कायद्यात आवश्यक असे केवळ तीनच विधी केले आणि त्याचे थेट प्रक्षेपण पाहून जावयाच्या दोन्ही आजी आजोबाना जे समाधान मिळाले ते कोर्टाच्या आवारातील लग्नात कधीही मिळाले नसते.

तुमच्या लग्नाची आत्मीयता सरकारी कार्यालयात कुणालाही नसते.

जेथे तुमचे स्वागत होणार नाही अशा ठिकाणी आणि उलट हि पीडा कशासाठी आली असा चेहऱ्यावर भाव असलेल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लग्नासारखा मंगल समारंभ करणे हेच मला तिटकारा आणणारे वाटते.

आणि आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या अशा लग्नाच्या दिवशी वधू वरांना अशा टवके उडालेल्या आणि पोपडे निघालेल्या भिंती असणाऱ्या सरकारी कार्यालयात घेऊन जाणे हेच अत्याचार वाटतो.

असो.

लग्न कसेही करा. वधूवरांना त्यात फारसा रस नसतो.

आपण स्वतः आठवण करून पहा. गेल्या तीन वर्षात आपण उपस्थित झालेल्या लग्नाच्या सजावटीबद्दल आपल्याला काय आठवते आहे? काहीही नाही. तेथे वधू वर आणि त्यांच्या आईबापाना किती मिनिटे आपण भेटला होतात?

लक्षात काय राहते?

जेवण उत्तम असले तरच लग्न लक्षात राहते किंवा जेवण भिकार असेल तेवढेच लक्षात राहते.

बस, मग कशाला एवढा आटापिटा करायचा?

२५ माणसात सुखाने लग्न उरका.

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2021 - 7:58 pm | श्रीगुरुजी

उत्तम पायंडा!

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 8:14 pm | मुक्त विहारि

दोन तासांत लग्न कसे उरकायचे? हाच एक प्रश्र्न आहे...

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2021 - 9:23 pm | श्रीगुरुजी

पुरोहितांशी बोलून, काही फारसे आवश्यक नसलेले विधी टाळून किंवा अल्प वेळात उरकून, लग्न लावता येईल. कृपया लग्नात "कन्यादान" हा अनुचित शब्द न वापरण्यास पुरोहितांना सांगावे कारण आपली कन्या "दान" देणे ही कल्पनाच हीन आहे.

सतिश गावडे's picture

22 Apr 2021 - 9:26 pm | सतिश गावडे

विधी तसाच ठेऊन त्यासाठी वेगळे नाव, उदा परस्पर स्वीकार विधी चालेल का?

श्रीगुरुजी's picture

22 Apr 2021 - 9:48 pm | श्रीगुरुजी

कन्या दानात देत आहे अशा अर्थाचे श्लोक असतील तर हा विधीच रद्द करावा.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Apr 2021 - 11:11 pm | llपुण्याचे पेशवेll

कन्यादान वगैरे शब्दांना हीन म्हणणाऱ्या लोकांच्या बालिश पणाची कीव वाटते. ज्या श्रीगुरुजींचे नाव सदस्यनाम म्हणून घेतले असते त्यांचे विचार 2 टक्के जरी वाचले असते तरी असल्या विचारापासून मुक्तता मिळाली असती.

कपिलमुनी's picture

23 Apr 2021 - 1:45 pm | कपिलमुनी

कुठं हैस तू ?
आज एकदम बोर्डावर एन्ट्री ??

चौकटराजा's picture

22 Apr 2021 - 8:42 pm | चौकटराजा

मला मात्र वरील वर्णन वाचून डॉ खरेना आता संतूरच्या जाहिरातीत घ्यावे असे मी कंपनीला कळवू इच्छितो ! मुलीचे लग्न ..? काय मेनटेन्ड व्याही आहेत राव !!

प्रचेतस's picture

22 Apr 2021 - 8:50 pm | प्रचेतस

उत्तम केलेत.

शा वि कु's picture

22 Apr 2021 - 11:21 pm | शा वि कु

भारी प्रतिसाद

Bhakti's picture

23 Apr 2021 - 2:27 pm | Bhakti

आणि नवरा नवरी यांच्याबद्दल मनातील अवस्था छानच मांडली :) आवडलं.
अवांतर

तुमच्या लग्नाची आत्मीयता सरकारी कार्यालयात कुणालाही नसते.

हा विचार मी कधीच केला नव्हता.

विवाहसोहळा शक्य तेवढे, शक्य तसे नियम पाळून थाटात पार पाडा.

आम्ही घरचं कार्य समजून व्हर्च्युअल उपस्थिती लावू.

वधू-वरांना आमच्याकडून सुखी सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रचेतस's picture

22 Apr 2021 - 8:51 pm | प्रचेतस

आमच्या शुभेच्छा आहेतच.

फक्त आपल्या शब्दावर लग्न होऊ शकते.
साक्षीदार आणि कोण कुठे आणि नोटीस महत्त्वाची. नंतर नोंदणी. जी आता केवळ छप्पा मारून होत नाही. रजिस्ट्रारसमोरच होते.

मुक्त विहारि's picture

22 Apr 2021 - 10:27 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Apr 2021 - 11:08 pm | llपुण्याचे पेशवेll

सरळ 2 गुरुजी बोलवावे घरी, मुलीचे आणि मुलाचे आईवडील बास, ८ जणांमध्ये छान धार्मिक पद्धतीने लग्न लावावे. लोकडाऊन संपला की कोर्टात जाऊन रजिस्टर करणे, रिसेप्शन करणे वगैरे सगळे सोपस्कार करता येतील.

ज्या दिवशी लग्न, त्याच दिवशी फाॅर्मवर सह्या केल्या जातात...

लग्न रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी असेल तर, सरकारी कार्यालय उघडे असेल, त्या दिवशी फाॅर्म द्यायचा...

ही भानगड टाळणे आणि विशेषतः दोन तासांची वेळ पाळणे, हे जास्त महत्वाचे आहे, त्यामुळे लग्न रजिस्टर करणे, हे उत्तम ...
----------

दोन मिनिटे कार्यालयात उशीर झाला तर पन्नास हजार रूपये दंड ठोकणारच.... असे समारंभ, मिनीटा मिनीटाच्या हिशोबावर होत नाहीत...

साधी जेवणाची पंगत किमान अर्धा ते एक तास चालते...

मॅरेज सर्टिफिकेट नसले तर पुढे मुलगा-सुनेलाच काय पण त्यांच्या पुढील पिढीला सुद्धा - विशेषतः परदेशात रहाण्याच्या, स्थायिक होण्याच्या दृष्टीने - अडचणी येतात. सर्टिफिकेट इंग्रजीत असावे आणि प्रत्येक शब्दाचे स्पेलिंग व्यवस्थित तपासून घ्यावे. फक्त एका अक्षराच्या चुकीमुळे खूप त्रास झाल्याचे आमच्या घरातलेच उदाहरण आहे. (सर्टिफिकेट घेण्यासाठी दोघांचे पालक आणि लग्न लावणारे गुरूजी यांना जावे लागते. तसेच लग्नाची पत्रिका आणि फोटो वगैरे न्यावे लागते... अर्थात हे तुम्हाला ठाऊक असेलच तरी लिहीतो आहे कारण मला माहीत नव्हते त्यामुळे मुलाचे सर्टिफिकेट घेण्याचे वेळी उगाचच हेलपाटे पडले होते)
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि वधु-वरास अनेक उत्तम आशिर्वाद.

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 4:01 am | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

अभिजीत अवलिया's picture

23 Apr 2021 - 6:12 am | अभिजीत अवलिया

आपल्याकडच्या बर्याच नेत्यांना आणि सरकारी बाबूंना 'लोकांची जास्तीत जास्त गैरसोय कशी करता येईल व आपले उपद्रवमूल्य कसे दाखवता येईल' असे निर्णय घेण्यातच इंटरेस्ट असतो. आपण नेते झालो किंवा IAS वा IPS झालो म्हणजे आपल्यालाच सगळे कळते ह्या थाटात ही मंडळी वावरत असतात.
मग असले २ तासात लग्न लावण्याचे आचरट नियम काढले जातात. फक्त २५ लोक असावेत वगैरे ठीक. पण त्या २५ पैकी एकजण जरी करोना बाधीत असला तर, २ तासात लग्न लावले तरी उरलेल्या २४ पैकी काही जण बाधीत होतीलच. त्यामुळे इथे वेळेपेक्षा कमी उपस्थिती एवढेच करोना टाळण्याच्या दृष्टीने आपण करणे जास्त महत्वाचे ठरते. पण राजा बोले दल हाले ह्या प्रकारे कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून ही २ तासाची आयडिया आली असणार आणि सगळ्यांनी मान डोलावली असेल.
तसेच अत्यावश्यकच्या नावाखाली फक्त किराणा मालाची व मेडिकल दुकाने चालू वगैरे. बाकी वर्हाडी मंडळी जाऊदेत पण किमान लग्न करणाऱ्या जोडप्याला नवीन कपडे घेणे, मेकअप करणे वा अन्य काही खरेदी करणे गरजेचे असते. जुने कपडे अंगावर चढवुन लग्न करणे हे निश्चितच फारश्या लोकांना आवडणार नाही. पण कपड्याची दुकाने बंद म्हणजे बंद. बांधकामाला परवानगी पण बांधकामाचे साहित्य मिळणारी दुकाने बंद. ह्या भर उन्हाळ्यात चुकून एखाद्याच्या घरातील फॅन वगैरे खराब झाला किंवा घरातील पाण्याची मोटार वगैरे खराब झाली तर त्याने तसेच बोंबलत बसायचे. कारण इलेक्ट्रिक वस्तू अत्यावश्यक नाहीत. ४०-४५ डिग्री तापमानात फॅन शिवाय राहणे सहज शक्य आहे.
अन्न व औषधे सोडून पण अनेक गोष्टी जीवनाला आवश्यक आहेत हे ह्या मंडळींना खरेच कळत नसेल तर ह्यांच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडीच.

काही दिवसांपूर्वी तर एका जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या जिल्ह्यात प्रवेश करायचा असेल तर ७२ तासांपूर्वीचा करोना निगेटिव्हचा RT-PCR रिपोर्ट घेऊन यायचे असा
हास्यास्पद फतवा काढला होता. आता रोज कामानिमित्त हजारो लोक जिल्ह्यात येणार व जिल्ह्यातील मूळ रहिवासी पण रोज दुसर्या जिल्ह्यात जाऊन संध्याकाळी घरी येणार अशी परिस्थिती होती. त्यांना पण नियमात सूट न्हवती. लोकांनी सडकून टीका केल्यावर 'लोकांची गैरसोय होईल' असे कारण देऊन लगेच निर्णय मागे घेतला. पण नियम काढतानाच तो हास्यापद आहे हे डोक्यात शिरले न्हवते ह्यांच्या.

असो, आता वेळेचे बंधन टाकलेच आहे तर करून टाका कसेतरी २ तासात. पण मला वाटते लगेच नियमात सुधारणा होऊन २ तासाचे ४ तास होतीलच. आचरट नियम बनवायचे आणि मग टीका झाली की सुधारित आदेश काढायचे हे होतेच आपल्याकडे.

माझ्या भावाचेच कोर्ट मॅरेज झाले आहे...

पण 2 तासांत लग्न कसे करावे? हे कोडे सुटत नाही ...

बघू या, काहीतरी मार्ग निघेलच...

कोरोनाच्या निमित्ताने विविध सरकारी यंत्रणा किती बेअक्कल आहे हे लोकांना समजत चालले आहे.

एक मूर्खपणाचा निर्णय म्हणजे रात्रीची जमाव बंदी. ह्याला काय अर्थ आहे ? आता रात्री सर्व बंद म्हटल्यावर लोक दिवसा प्रवास उरकण्याच्या नादांत जास्त गर्दी करतात. वॅक्सीन पुरावा घेतल्यास लोकांना बाहेर सूट असे किमान सांगितले असते तर लोक वॅक्सीन घ्यायला घाईने गेले तरी असते.

आम्ही काही तरी करतो आहोत असा आव आणण्यासाठी हि सगळी धडपड आणखी काही नाही.

सुबोध खरे's picture

23 Apr 2021 - 11:45 am | सुबोध खरे

वॅक्सीन घ्यायला घाईने गेले तरी असते.

सध्या लस घेण्यासाठी लांब रांग असते हे आपल्याला ठाऊक नसावे.

कित्येक केंद्रात अजूनही लस उपलब्ध झालेली नाही

बाकी सरकारी यंत्रणेच्या विचार न करता निर्णय घेण्याच्या वृत्तीबद्दल( NON APLICATION OF MIND) सहमत

साहना's picture

24 Apr 2021 - 11:42 pm | साहना

तसे असेल तर आनंदच आहे. गोव्यांत बहुतेक हेल्थ सेंटर मध्ये गर्दी नाही असे मित्र लोक सांगतात, आमची बागायत पाहणारे काही मजूर लस घ्यायला साफ नकार देत आहेत (अंधविश्वासामुळे).

फक्त रात्री बंद ठेवणे हे मूर्खपणाचेच होते. काही लॉजिक नाही.

आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे, हा लोकडावून लागण्यापूर्वी मॉल, थेटर, मार्केट, हॉटेल चालू होते, पण आठवड्याच्या भाजी बाजारास बंदी होती. म्हणजे गरीब भाजीविक्रेते आणि गरीब ग्राहक दोघांच्या पोटावर पाय. आमच्या गावात भाजीवाले पोलिसांपासून लपत लपत गल्लीबोळांमध्ये भाजी खाली न पसरता तसेच बसले होते, पोलीस आले की लगेच पळून जायला लागेल म्हणून. कोव्हिड काय फक्त गरिबांच्या आणि लोवर मिड्लक्लास जमावातच पसरतो काय अशी शंका यावी असा नियम. हे सगळीकडे होतं का माहित नाही.

चौकटराजा's picture

23 Apr 2021 - 1:46 pm | चौकटराजा

आपण ज्या वेळी पासपोर्ट काढायला जातो त्यावेळी आपल्याला नुसतीच तारीख देत नाहीत तर वेळ ही देतात तसे काहीसे सर्वच क्षेत्रात केले असते तर गर्दी टाळता आली असती .अर्थात लग्न समारंभ ,देवळातील आरती यात असले काही करता आले नसते. पण समजा व्यापार्याना हा पर्याय दिला असता की तुम्हाला जर व्यवसाय चालू ठेवणे असेल तर २४ तास दुकान उघडे ठेवावे लागेल व ग्राहकास मोबाइलवर बोलावून घ्यावे लागेल ! अर्थात भाजी मंडई ई बाबतीत हे भारत देशात किती शक्य झाले असते या बद्दल शंकाच आहे ! आता देखील काही तांत्रिकते च्या जोरावर आठवड्यात ठराविक लिटर पेट्रोल मिळेल असे सीलिंग टाकल्यास रहदारी कमी होऊ शकते . रात्रीचा कर्फ्यू म्हणजे एकादशीच्या दिवशी मासे मटन विकण्याचे दुकान बंद ठेवण्यासारखे आहे ! अतिशय अतार्किक निर्णय !

@ चौरा- रात्रीचा कर्फ्यू हा तुमच्या आमच्यासारख्यांना अतार्किक वाटत असला तरी ते नाईटलाईफ का काय म्हणतात त्यात गुंतलेल्या लोकांमुळे, रात्री इतर अनेक धंदे करणार्‍यांमुळे पोलिसांवर पडणार्‍या अतिरिक्त ताणामुळे आवश्यक आहे असे मला वाटते. माझा एक मित्र दिल्ली पोलिसात इन्स्पेक्टर असल्याने तो पोलिसांवर पडणार्‍या ओझ्याबद्दल - दबावाबद्दल सांगत असतो. त्यांना तसेच नेहमी अठरा अठरा तास काम करावे लागते. घरीसुद्धा वेळेवर येणे क्वचितच जमते. पगार अपुरा, जेवणाखाण्याची वेळ निश्चित नाही आणि वरून दबाव खूप असतो. एकादी आपल्याला किरकोळ वाटणारी घटना वा गुन्हा सुद्धा पोलिसांसाठी खूप गुंतागुंतीचा असतो. अर्थात हा मित्र संपूर्णपणे प्रामाणिक, भ्रष्टाचारापासून दूर, कर्तव्यनिष्ठ असा आहे. अशा लोकांवर जास्तच दबाव असतो.

पण सत्य जाणून घ्यायची इच्छा इथे काही लोकांना नसते ते टिंगल टवाळी करतात.
हे जे काही चालले आहे तो काविळ नियंत्रणात आणण्यासाठी च ना?
लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे अशा वेळी पण की दिसते समाजात अजुन पण लोक असेच समजतात lockdown त्यांच्या भल्यासाठी नाही तर सरकार स्वतःची खाज भागवण्यासाठी लॉक down करत आहे.
एकदम सहा सात दिवसांचे किराणा सामान आणि भाजी पाला घरात ठेवून सात दिवस घराच्या बाहेर पडणार च नाही असे लोकांनी ठरवले पाहिजे पण नाही.

कोणाला अमकीच भाजी हवी कोणाला हाच मासा हवा,कोणाला अमकेच फ्लेवर चे आइस्क्रीम हवं.
मग त्या साठी दुनिया फिरणार.
मुंबई च विचार केला तर संध्याकाळी सहा नंतर जत्रा भरते चौपाटी वर आजुन सुद्धा.
अगदी पोर बाळ घेवून.
गाडीत पण सरकार नी मास्क लावयला सांगितला आहे त्याची पण खिल्ली उडविली होती रात्री नवरा बायको एकत्र झोपणार आणि गाडीत मास्क कशाला.
सरकार ला हे माहीत नाही का ?
माहीत आहे चांगले माहित आहे पण सूट दिली तर बिन्धास्त मित्र मंडळी,प्रवासी घेवून लोक बिना मास्क फिरतील.
लोक शहणी नाहीत .

लोक शहाणी असती तर लॉक down ची पण गरज नव्हती.
आणि पोलिस ना रस्त्यावर यायची पण गरज नव्हती.

चौकटराजा's picture

24 Apr 2021 - 1:02 pm | चौकटराजा

मग दिवसाही कडक कर्फ्यू का लावत नाहीत ? बँका कधी कधी ४ ते ५ दिवस सलग बंद असतात त्याने काय देश बंद पडतो का ? आम्ही अतिशय कडाक लॉक डाऊन लावत असून येत्या तीन दिवसात ,किराणा,,मंडई , पेट्रोल जे काय साठवायचे ते साठवून घ्या असे का सांगत नाहीत. पेपर ८ महिने बंद होता काय अडले ? नाईट लाइफ साठी गाडीत पेट्रोल नसेल तर माणूस काय चालत पब मध्ये जाईल ..... ?

त्यामुळे जेवढे प्रयास करावेत तेवढे कमीच पडतील असे सध्याच्या स्थितीवरून वाटत आहे. ज्या लोकांच्या चरितार्थावर संकट आलेले आहे त्यांची स्थिती फार वाईट आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन पैसे देऊन मोठ्या प्रमाणावर हिंदूंना बाटवून खिस्ती बनवण्याचा धंदा जोरात चालल्याची बातमी समजली. कठीण आहे सगळे. आणखी किती वर्षे चालणार हे सगळे कुणास ठाऊक. सगळे काही बदलत आहे.

चौकटराजा's picture

25 Apr 2021 - 9:43 am | चौकटराजा

नुकतीच मुबंईत एक पाहणी मुंबईत झाली त्यात म्हणे ३६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या ! मागे पुणे परिसरात ही ४६ टकके लोकात अँटीबॉडी आढळलया होत्या ! १९१८ ते २० या काळात मोठा नरसंहार साथीने केला तरी आज जगाची लोकसंख्या ७५० कोटी च्य दरम्यान आहे ! याचा अर्थच असा की साथीत सर्वच जण मरत नाहीत तर औषध न घेता व लस न घेताही काही नक्की बरे होणार आहेत ! डॉ जॉन डोयार यालाच बायओलॉजिकल गिफ्ट असे म्हणतात ! चार पाच वेळा लिलावतीत जाऊन ९५ वर्षांचा दिलीपकुमार जगतोय त्याचे असेच काही दैवी कारण आहे !

निसर्ग हा अन्यायी नाही वा न्यायी ही नाही ! कोण जगेल कोण मरेल व कोण मारेल याचे गुपित तो कधीच फोडणार नाही ! त्याला हातावर पोट आहे यांच्याशी काही देणेघेणे नाही आहेरे माणसांनी नाहीरे ना मदत करणे एवढाच " मानवी " मार्ग आहे व तसा प्रयत्न चालू आहे पण तो अपुरा पडणार आहे ! आमच्या सोसायटी खाली झाडाखाली बसणार्या एका भाजीवालीला दोन दिवसाचा शिधा देत आहोत . चहाची दुकाने बंद असल्याने वाचमन लोकांना एक वेळचा चहा देत आहोत आमच्या वयक्तिक मिळकतीतून ! मदत अल्प आहे पण जाणीव होऊ लागली आहे हे नक्की !

साहना's picture

24 Apr 2021 - 11:47 pm | साहना

रात्रीच्या जमावबंदीने पोलिसांचा ताण कमी होत असेल तर बरे आहे पण वरून पाहता तरी हि जमाव बंदी एन्फोर्स करण्यासाठी आणखीन पोलिसांना रात्रपाळी करावी लागतेय असे दिसते. त्याशिवाय रात्रीच्या सामसुमीचा फायदा घेऊन इतर वाईट कृत्ये सुद्धा वाढू शकतात.

कंजूस's picture

23 Apr 2021 - 7:07 am | कंजूस

कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपली उपस्थिती अनावश्यक आहे.

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 7:12 am | मुक्त विहारि

ऐनवेळी साखरपुडा केल्याने, बरेचसे नातेवाईक नाराज आहेत...

आता, "आपली उपस्थिती अनावश्यक आहे."... असे लिहिले की सगळेच दोर कापल्या जातील

मुलीच्या मामाने, मुलीला स्टेज वर घेऊन या..
ह्यातच २ तास निघून जातात...

- वधू वरास अनेक शुभेच्छा...

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 8:48 am | मुक्त विहारि

धन्यवाद

दिगोचि's picture

23 Apr 2021 - 9:42 am | दिगोचि

यासाठी प्रसाद_१९८२ यांचा सल्ला आवडला. तसे करा. म्हणजे कोरोंनाच्या धोक्यापासून दूर राहाल. मी स्वत: लग्ने लावतो. या वर्षी चार लग्ने फक्त नऊ जणांच्या (नवरा-नवरी त्यांचे आई-वडील दोन साक्षीदार व मी) उपस्थितीत व त्यान्च्या घरीच लावली आहेत. कारण पोलीसानी एव्हढ्याना परवानगी दिली होती. काळजी घ्या.

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 9:45 am | मुक्त विहारि

व्यनी करतो

साहना's picture

23 Apr 2021 - 11:28 am | साहना

वधूवरांस आणि पालकांस लग्नाच्या शुभेच्छा !

खालील गोष्टी १००% कराव्यात :

- लग्नाचे कायदेशीर प्रमाणपत्र करून घ्यावे. (इतरांनी का व कसे ते सांगितले आहेच).
- लग्नाची तारीख असलेली आमंत्रण पत्रिका छापून त्याच्ये फोटो घ्यावेत.
- सात फेरे घेतानाचे फोटो नक्की घ्यावेत.
- वधुवर आणि त्यांचे पालक आणि गळ्यांतील हार आणि मेहंदी इत्यादींचे फोटो घ्यावेत.

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2021 - 11:38 am | चौथा कोनाडा

.. .. ................ आणि नववधूचे नांव लग्नानंतर बदलले असल्यास नाव बदलाची कायदेशीर प्रक्रिया करुन गॅजेट डिक्लेरेशन ही करून घ्यावे !

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 12:08 pm | मुक्त विहारि

ह्या गोष्टी येतात

कपिलमुनी's picture

23 Apr 2021 - 1:48 pm | कपिलमुनी

लग्नानंतर बदललेले नाव वापरणार असेल तर पारपत्र काढताना गेजेट लागते, फक्त लग्नाच्या सर्टिफिकेटवर काम होत नाही

चौकटराजा's picture

23 Apr 2021 - 2:29 pm | चौकटराजा

मला पासपोर्ट काढताना लग्नाच्या सर्तीफेकेटची मूळ प्रत नाही म्हणून परत पाठवले ! बायकोचे नाव बदलले होते .त्यासाठी तिने प्रतिज्ञापत्र केले व मूळ सर्टिफिकेट सापडत नाही असा त्यात उल्लेख केला व दोन वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्याची कॉपी पासपोर्ट ऑफिसला सादर केली . त्यात गेझेट वगरे काही लागले नाही !

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2021 - 2:25 pm | श्रीगुरुजी

गॅजेट डिक्लेरेशनची गरज नाही. नाव बदलल्याचे प्रतिज्ञापत्र पुरेसे आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Apr 2021 - 7:44 pm | चौथा कोनाडा

प्रतिज्ञापत्र, लग्नाची पत्रिका, विवाह प्रमाणपत्र, पेपरमधील जाहिरात हे नाव बदलल्याचे वैध पुरावे नाहीत त्यामुळे नाव बदलाची कायदेशीर प्रक्रिया करुन गॅजेट डिक्लेरेशन करून घ्यायला लागेल असे पारपत्र काढताना सांगितले गेले होते.

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2021 - 7:58 pm | श्रीगुरुजी

माझ्या लग्नानंतर बरी अर्धीचे नाव बदलले होते. त्यावेळी पारपत्रासाठी फक्त प्रतिज्ञापत्र द्यावे लागले होते. आता नियम बदलले असल्यास माहिती नाही.

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 8:06 pm | मुक्त विहारि

मॅरेज सर्टिफिकेट जोडले होते

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 12:07 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

देशपांडे विनायक's picture

23 Apr 2021 - 12:18 pm | देशपांडे विनायक

काखेत  कळसा आणि गावाला वळसा . हल्लीच्या पिढीने तर लग्नाला पर्याय काढला आहे वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर लिव्ह इन सुरु करावे.  सर्वांच्या अनुमतीने योग्य वेळी सर्व हॊस मौज ,पाहिजे ते विधी, पाहिजे तितके लोक बोलावून लग्न साजरे करावे [ आमचे वय ७९ वर्षे असून वरील सूचनेस आमचा शुभाशीर्वाद आहे याची नोंद घ्यावी ]

चित्रगुप्त's picture

23 Apr 2021 - 1:08 pm | चित्रगुप्त

वर देशपांडे विनायक यांनी लिहीले आहे तेच मी पण लिहीणार होतो. असे करता आले तरी कायदेशीर सर्टिफिकेट मात्र जरुर घ्यायला हवे.

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 4:11 pm | मुक्त विहारि

सामाजिक कारणे योग्य आहेत...

शिवाय, मुलाला पण ते पटलेले नाही

सौ.ला विचारले नाही, पण विचारले तर, ती आधी मला घराबाहेर काढेल...आणि असे घडले तर ती मुलाला कुटून काढेल... नकोच ते ...

ब्रह्म, दैव, आर्य, प्राजापत्य, असुर, गन्धर्व, राक्षस आणि पिशाच -- असे आठ प्रकारचे विवाह पूर्वी हिंदुस्थानात प्रचलित होते. याबद्दल जरा अभ्यास करून सोयीचा असेल त्याप्रकारे विवाह करून टाकावा. कोरोना मुळे जी सामाजिक स्थित्यंतरे आगामी काळात येऊ घातली आहेत त्यात या अष्ट्विवाहांचाही समावेश व्हायला हवा असे आम्हास वाटते.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2021 - 8:48 am | मुक्त विहारि

प्राजापत्य विवाहच योग्य आहे

तो शास्त्र संमंत पण आहे

संदर्भ : कौटिल्याचे अर्थशास्त्र , पान क्रमांक 238

सुबोध खरे's picture

24 Apr 2021 - 10:19 am | सुबोध खरे

वेळ वाया जाऊ नये वाटत असेल तर लिव्ह इन सुरु करावे. सर्वांच्या अनुमतीने योग्य वेळी सर्व हॊस मौज ,पाहिजे ते विधी, पाहिजे तितके लोक बोलावून लग्न साजरे करावे

अव्यवहार्य पर्याय आहे. त्यापेक्षा घरच्या घरी हिंदू विवाह कायद्याप्रमाणे विवाह करावा

हौस मौज आणि विधी वगैरे इतर लोकांसाठी असतात त्यांना एवढे महत्त्व देण्याची काय गरज आहे.

कन्या वरेते रूपं माता वित्तं पिता गुणम
बांधव: कुलम इच्छन्ति मिष्टान्ने इतरेजन:

अर्थात
मुलगी मुलाचे रूप पाहते.

मुलीची आई मुलाच आर्थिक स्थिती आणि वडील मुलाचे गुण पाहतात

मुलीचे बांध मुलाचे कुळ पाहतात

बाकी सार्यांना फक्त लग्नात मिळणाऱ्या सुग्रास भोजनात रस असतो.

म्हणजेच त्यांना फाटा मारायली मुळीच हरकत नाही.

ज्याला कायद्याचे संरक्षण नाही कि समाजमान्यता नाही आणि मुलगा मुलगी एकमेकांशी वचनबद्ध ( commitment) होण्यास तयार नाहीत असला अचाट आणि अफाट पर्याय येथे कामाचा नाही सारे माझे मत आहे.

सुबोध खरे's picture

24 Apr 2021 - 10:28 am | सुबोध खरे

कुठल्या मुलीचे आई वडील अशा अफाट पर्यायाला तयार होतील?

मुक्त विहारि's picture

24 Apr 2021 - 10:46 am | मुक्त विहारि

नाही होणार ...

Bhakti's picture

24 Apr 2021 - 9:46 pm | Bhakti

बरोबर..
करोनाने खरच कुठपर्यंत शिरकाव केलाय..लिव इन..काहीपण , अशक्य पर्याय.

मुलगा,आईवडील आमच्या ओळखीचा असेल आणि आमचा त्यावर विश्वास असेल तर चालू शकेल

आपल्याला आपलं मन क्लीयर असेल तर बाहेरच्या गोष्टींकडे किती लक्ष द्यायचे!
देवा ब्राह्मणाच्या आणि आई वडिलांच्या साक्षीने - आपल्या शपथा तयार करून- बोलून (घेऊन) लिव इन लग्नाला पर्याय म्हणून चालायला हरकत नाही

कुणीतरी ते ८ प्रकारचे विवाह दिले आहेत त्यातले जबरदस्ती वाले (उदा राक्षस) सोडून बाकीचे आता समाजमान्य करायला हरकत नाही!

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 1:45 pm | मुक्त विहारि

साधं मास्कचा वापर करता येत नाही, तिथे अशा गोष्टी न दिलेल्याच उत्तम ...

गॉडजिला's picture

23 Apr 2021 - 1:08 pm | गॉडजिला

साखरपुडा झाला अस्ल्यास कोरोना जाइ पर्यंत लिवीन अनुसरावे असा फतवा लवकरच येणार आहे ? अशी अफवा कानावर आली आली आहे.

आणि 25 माणसांत लग्न कसे करावे

आपणास बहुदा 25 उपस्थितांत लग्न कसे करावे हा प्रश्न पड्ला आसावा

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 4:06 pm | मुक्त विहारि

हो

गॉडजिला's picture

24 Apr 2021 - 9:19 pm | गॉडजिला

पण उत्तर अत्यंत सोपं आहे....

मुक्त विहारि's picture

24 Apr 2021 - 9:25 pm | मुक्त विहारि

आता फक्त दोन तासांत, हा समारंभ कसा उरकायचा? ह्यावरच गाडे अडले आहे ...

पण, पुढच्या आठवड्यात ही अडचण पण दूर होण्याची शक्यता आहे ...

भेंडी, मिपाकरांनाच राज्यशकट चालवायला द्यायला हवा... कारण, दोन्ही प्रश्र्नांना, तर्काला धरून उत्तरे मिळाली...

गॉडजिला's picture

24 Apr 2021 - 9:39 pm | गॉडजिला

रच्याकने भेंडी या शब्दाचा अर्थ जाणकार लोक एका हिण्दी स्लँगचा सब्सिट्युट म्हणुन घेतात...

मुक्त विहारि's picture

24 Apr 2021 - 10:08 pm | मुक्त विहारि

भेंडी, हा शब्द वापरतो ....

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 9:42 am | गॉडजिला

कॅजुअली ?

मुक्त विहारि's picture

25 Apr 2021 - 1:40 pm | मुक्त विहारि

आयला, च्यायला ... हे शब्द जितके सहज वापरल्या जातात, तितक्याच सहजतेने हा शब्द मी वापरतो ....

ह्या शब्दांना काहीही अर्थ नसतो

गॉडजिला's picture

25 Apr 2021 - 1:46 pm | गॉडजिला

हे बाकी भारी हं _/\_

अहो मुवि काका लग्न ठीक आहे हो , पण नंतर कसे करावे ? आधीच महामारी चालू है , त्यात घरात बसने ओघाने आले , मग कालौघाने बरेच सहन करणे आले . मला तर वाटत हे सर्व निवळल्यानंतर लग्न करावे . काय बोलता

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 4:06 pm | मुक्त विहारि

बघू या

लग्न झाल्या नंतर मुलीचे नाव बदलणे हा प्रकार च किळसवाणा आहे.
जुन्या रुढी सोडून दिल्या पाहिजेत.
नाव बदलून त्या मुलीची ओळख च पुसून टाकण्याचा हा गलिच्छ प्रकार आहे.

मात्र जन्म-प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्ट, घराची कागदपत्रे, वडिलांचे मृत्युपत्र वगैरेत असलेले माहेरचे नाव बदलून घेणे वगैरे फारच कटकटीचे वा अशक्यप्रायच असते. शिवाय हल्ली लग्न किती टिकेल, पुन्हा किती वेळा नाव बदलावे लागेल हेही सांगता येत नाही. म्हणूनच बहुधा परदेशात असली नाव बदलण्याची भानगडच नाही. किळसवाणे म्हणून नव्हे तर गैरसोयीचे आणि कटकटीचे असल्यामुळे मूळ नावच राहू देणे बरे.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2021 - 9:15 am | चौथा कोनाडा

किळसवाणा, गलिच्छ ... ?

काहीही हं श्री१८८ !

सतिश गावडे's picture

24 Apr 2021 - 8:34 pm | सतिश गावडे

तुमच्या मते लग्नानंतर मुलीचे नाव बदलणे योग्य आहे की अयोग्य आहे?

कंजूस's picture

24 Apr 2021 - 2:52 pm | कंजूस

आणि मुलींना ठेवलेले नाव नको असले तर हीच ती वेळ नाव बदलायची.

चौथा कोनाडा's picture

24 Apr 2021 - 4:11 pm | चौथा कोनाडा

बरोबर, कंजूसजी !

मलापण हा प्रकार नाही पटत.. माझ्या नावाने जमीन करताना सोपं पडाव म्हणून माझं नाव बदलाव लागणार आहे.मला तर इच्छाच नाही,पण कायद्यामुळे काही दिवसांनी बदलाव लागणार आहे.

विनायक प्रभू's picture

24 Apr 2021 - 1:45 pm | विनायक प्रभू

दोन तासानंतर चे नियम?

दोन तासात संपलं तर प्रश्न नाही.
दोन तासात लग्न संपलं नाही, तर लग्न कॅन्सल.

मुक्त विहारि's picture

24 Apr 2021 - 5:17 pm | मुक्त विहारि

पुरे पच्चास हजार ....

चेतन सुभाष गुगळे's picture

25 Apr 2021 - 11:03 pm | चेतन सुभाष गुगळे

वेळमर्यादेची अडचण नाही. माणसांचा आकडा मात्र चुकलाय. २५ नको एकतर २४ हवे नाहीतर २६. विषम संख्या असेल तर कोणीतरी एक व्यक्ति बिनलग्नाची राहील किंवा एका व्यक्तिला दोन व्यक्तिंसोबत लग्न करावे लागेल.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 5:47 am | मुक्त विहारि

25 होऊ शकतात ...

गॉडजिला's picture

26 Apr 2021 - 3:30 pm | गॉडजिला

चेसुगुंचा प्रश्न जरी योग्य असला तरी लग्न २४ माणसांचे व १ भटजी असे टोटल २५.

इरसाल's picture

26 Apr 2021 - 3:21 pm | इरसाल

टेंशन नका घेवु. आताच टीव्हीवर चालु असलेल्या बातमी नुसार कृषीमंत्र्याच्या मुलाच्या लग्नात २५ पेक्षा जास्त लोक असुन. आमदार खासदारच शासनाच्या नियमाला हरताळ फासत असल्याची चॅनेल बोंबाबोंब करत आहेत.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 4:18 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद