चाफा-पंचप्राण

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
17 Mar 2021 - 6:03 pm

चाफ्याच्या पाच पाकळ्यांनी एकत्रितपणे पंचप्राण पेलले आहेत.याचा गंध कोमलपणा ,बहरण्याची मुक्त छटा आपल्या पंचइंद्रीयांना अमूर्त आनंद देते.देवचाफा ,गुलाबी रंगाचा चाफा ,सोनचाफा या प्रकारच्या फुलांच्या सुगंधाच्या राशींनी परिसर घमघमला आहे.वसंतोत्सवामध्ये चाफ्याच्या फुलांची रेलचेल फांद्याफांद्यावर दिसते.दगडाला पाझर फुटणे जसे ओलावा देते,तसेच डहाळीवर चाफ्याची असंख्य फुललेली फुले ओबड धोबड फांद्यांची शोभा वाढवतात.

काहीसा पोपटी देठ मनामध्ये सुखाची नांदी सांगतो.तर अर्धोन्मिलित उमललेल्या अवस्थेतील सोनचाफा समाधिस्त भासतो.

चाफ्याच्या फुलांनी परसबागा ,उद्याने,मंदिरे राऊळे अगदी मनोहर केला आहे.सकाळच्या ,दुपारच्या आणि वेचून घेतलेल्या यां संध्याकाळच्या तिन्ही प्रहारेच्या या बहरलेल्या फुलांनीअनेकांच्या मनात कायमचा वसंत टवटवीत ठेवला आहे.ओंजळीत वेचून घेतलेल्या पंचपाकळ्यांनी पंचप्राण अलगद मिठीत घेण्याचे तत्व शिकवले आहे.
-भक्ती

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

17 Mar 2021 - 6:21 pm | कुमार१

चाफा बोलेना ....
छान

मुक्त विहारि's picture

17 Mar 2021 - 6:33 pm | मुक्त विहारि

मस्तच

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2021 - 10:37 pm | श्रीगुरुजी

चाफ्याचे फूल मला अतिशय आवडते. माझ्या घरी गुलाबी चाफ्याचे व सोनचाफ्याचे झखड आहे. आता देवचाफा लावणार आहे.

बापूसाहेब's picture

17 Mar 2021 - 10:42 pm | बापूसाहेब

देवचाफा कसा असतो?? गुलाबी रंगाचा का???

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2021 - 10:55 pm | श्रीगुरुजी

पांढराशुभ्र नसतो. मळकट पांढऱ्या रंगाचा असतो.

श्रीगुरुजी's picture

17 Mar 2021 - 10:37 pm | श्रीगुरुजी

झखड = झाड

बापूसाहेब's picture

17 Mar 2021 - 10:51 pm | बापूसाहेब

मुक्तक आवडले..

या निमित्ताने मला माझ्या लहानपणीची घटना आठवतेय. काही विज्ञानवादी लोकांना पटणार नाही पण मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे.. मी तेव्हा 10-11 वर्षाचा असेन.. आमच्या गावी एक आजोबा होते त्यांना चाफ्याची फुले खुप आवडायची.. कानात नेहमी चाफ्याचे फुल अडकावलेलं असायच.. त्यांनी घराच्या मागच्या बाजूस चाफ्याची 7-8 झाडे लावली होती.. रोज फुले गोळा करून आजूबाजूच्या लोकांना वाटायचे. मुलींना खेळायला द्यायचे.. बहुतांश वेळेला झोपायचे सुद्धा घराबाहेरच खाटेवर.. त्या झाडांचा सानिध्यात.

ते जेव्हा वारले तेव्हा त्याच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. बरेच प्रयत्न करून झाल्यावर कोणीतरी ओंजळीभर चाफ्याची फुले आणून त्या पिंडाजवळ ठेवली.. आणि पुढच्या काही क्षणातच एक कावळा येऊन काकस्पर्श झाला.. त्या कावळ्याने ती फुले विस्कटली आणि जाताना एक फुल घेऊन उडून गेला..

गामा पैलवान's picture

18 Mar 2021 - 12:55 am | गामा पैलवान

बापूसाहेब,

मी कट्टर विज्ञानवादी आहे. तरीपण मला ही गोष्ट शंभर टक्के पटली.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

18 Mar 2021 - 7:15 am | मुक्त विहारि

ही उदाहरणे ऐकली आहेत ....

Bhakti's picture

18 Mar 2021 - 11:42 am | Bhakti

_/\_
निसर्गाचे ऋणानुबंध म्हणाव काय याला..

बापूसाहेब's picture

18 Mar 2021 - 12:05 pm | बापूसाहेब

आयुष्याच्या शेवटी आलेल्या एकटेपणामध्ये त्यानीं कदाचित त्या चाफ्याच्या झाडांमध्ये आणि फुलांमध्ये आपले मन रमवले असावे..

मी लहान असल्याने त्यांची पूर्ण स्टोरी माहिती नाही. पण नाव कदाचित दिनेश किंवा दिनकर असे काहीसे असेल.. पण सगळे दीनदादा याच नावाने हाक मारायचे..
आमच्या घरापासून 3-4 घर सोडून ते राहायचे. त्यामुळे येता जाता ते दिसायचे. नेहमी चाफ्याच्या झाडांच्या आसपास रेंगाळत असायचे. मुलगा आणि सुन दोघेही लक्ष देत नव्हते.. कदाचित एकटेपणामुळे त्यांनी चाफ्याच्या फुलांशी नाते जोडले असावे, आणि मृत्यूनंतरदेखील ते नाते तुटले नाही..

चाफ्याच्या फुलांशी नाते जोडले असावे, आणि मृत्यूनंतरदेखील ते नाते तुटले नाही.._/\_
संबंध नाही...पण तलाश सिनेमा आठवला... संवाद आठवले
तो-"ये कोनसी जगाह है?"
ती-"ये मेरी जगाह है,कही नहीं मिली तो यही मिलूंगी"

...अस म्हणत सिनेमातील गौप्य चाफ्याचा झाडाशी उलगडत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2021 - 9:04 am | ज्ञानोबाचे पैजार

चाफ्याचे फुल आणि त्याचा तो सुगंध मन प्रसन्न करुन टाकतो, पण वरीजनल ते वरीजनल चाफ्याच्या आगरबत्तीत, त्याच्या सेंट मधे फुलाची मजा नाही.

माझ्या घराच्या जवळच एक चाफ्याचे झाड होते, प्रभातफेरीला जाताना मुद्दाम त्याच्या जवळून जायचो आणि जमिनीवर पडलेले एखादे फुल उचलुन घ्यायचो.

पैजारबुवा,

कंजूस's picture

18 Mar 2021 - 10:22 am | कंजूस

पांढरा/ केशरी

सविता००१'s picture

18 Mar 2021 - 11:24 am | सविता००१

चाफ्याचं फूल अत्यंत लाडकं आहे
मग तो सोनचाफा असो की कवठी चाफा

सर्वांचे खुप खुप आभार.
श्रीगुरुजी हिरवा चाफा पण लावा ,तो सुगंध अप्रतिम!

पैजारबुवा हो की, वरीजनल ते वरीजनल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2021 - 2:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! छान. चाफ्याची मन की बाते आवडली. आता आमचं कथन. चाफ्यावर आमचंही खूप प्रेम. चाफ्याचा कोमलपणा नंबर एक. गंध पण खास, वेगळा, हटके. पहिल्याच क्षणात प्रेमात पडावं असं रुप त्याचं नक्कीच आहे. एकमेकांत गुंतलेल्या त्या पाकळ्या. लोक एकमेकांना प्रेमाची प्रतिकं म्हणून गुलाबाची फुलं देतात, आम्ही चाफ्याची फुलं द्यायचो. आजही चाफा पाहिलं की तिचीच आठवत येते. आठवण म्हणायचं काही कारण नाही. चाफ्यासारखी ती सतत र्‍हदयात विराजमान आहे, असते. त्यामुळे तिची आठवण करायची काही गरज नाही. चांगलं, आठवतं. तिच्या हातात हात घेऊन चालतांना, जरासं थबकून, लोकांच्या अंगणातली आम्ही चाफ्याची फुलं अनेकदा उचलली आहेत. एकदा ठरवूनच टाकलं, तुझ्या अंगणात चाफा फुलतो की माझ्या..... तिच्या अंगणातला चाफा तिच्यासारखाच, निघाला. बहरलाच नाही. माझ्या परसातला चाफा नेहमीच गच्च फुलतो, बहरतो, पूर्वीही आणि आत्ताही.....!
Chafa

-दिलीप बिरुटे
(चाफाप्रेमी)

पन्नासेक वर्षांपूर्वीचं ना हे सर्व? तुम्ही बोलला होतात मागे आपण एकत्र मसाला ताक घेत असताना. खूप तपशीलवार आठवतं तुम्हाला इतकं जुनं.

प्रचेतस's picture

18 Mar 2021 - 2:27 pm | प्रचेतस

आयला, तुम्ही दोघेही मसाला ताकाचे लै शौकिन होते वाटतं. अजूनही घेत असता काय?

गवि's picture

18 Mar 2021 - 2:40 pm | गवि

माझं कधीचंच बंद झालं.

त्यांचंही मला वाटतं बंद आहे पूर्ण गेले तीनेक तास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Mar 2021 - 2:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पन्नासेक वर्षांपूर्वीचं ना हे सर्व?

अहो, काका. आत्ताच्या आहेत या सर्व गोष्टी. काळ वगैरे काही नसतं.
चांगलं म्हणून काही बोलावच वाटत नाही, काही लोकांना. (नाक मुरडणारी वाट्सॅप स्मायली)

उठाकर देखी मैने आज यादो की पुरानी किताब
कई साल पह्ले इन्ही दिनों की बात कुछ और ही थी.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

18 Mar 2021 - 2:29 pm | Bhakti

तिच्या अंगणातला चाफा तिच्यासारखाच, निघाला. बहरलाच नाही. माझ्या परसातला चाफा नेहमीच गच्च फुलतो, बहरतो, पूर्वीही आणि आत्ताही.....!
बाकी सर हळवे झाले म्हणजे बातच और.. तुमच्या या आठवणींची मिपा २०२० दिवाळी अंकासाठी वाट पाहिली होती..पण तुमचा लेख नाही दिसला त्यात.. धन्यवाद! :)