मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
आताच्या 'घडीची' सर्वात मोठी 'बातमी देणार्यांना' मराठी दिनाच्या शुभेच्छा!
मराठीची लक्तरं करणार्या जाहिरातदारांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
महाराष्ट्रात बरेच वर्षे राहणार्या हिंदीभाषिकाशी हिंदीत बोलून त्याची मदत करणार्या मराठी माणसालाही शुभेच्छा!
'या भाषिक अस्मितांमुळे देशाचे तुकडे होतायत.' असे म्हणणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
मराठी ही काय इंग्रजीसारखी ज्ञानभाषा आहे काय? इतकं महत्त्व द्यायला? असे विचारणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
कशाला करता ही मराठीची नसती उठाठेव? काय फायदा याचा? असे विचारणार्यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा!
प्रतिक्रिया
27 Feb 2021 - 11:47 am | मुक्त विहारि
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
27 Feb 2021 - 3:19 pm | मराठी_माणूस
उपहासात्मक शुभेच्छा आवडल्या.
27 Feb 2021 - 3:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
राजभाषा दिनाच्या सर्वाना शुभेच्छा..
ह्या दिवशी नेमके काय करायचे असते? असा प्रश्न पडणार्यानाही शुभेच्छा.
27 Feb 2021 - 6:20 pm | गामा पैलवान
घाटी भाषेमंदी बोलनाऱ्या लोकान्लाबी येक दिन भ्येटला पायजेल सरकारकडनं.
-गा.पै.
27 Feb 2021 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...! मराठी भाषेवर लेखन स्पर्धा वगैरे काही तरी उपक्रम व्हायला पाहिजे होता.
कोण पाहतं हल्ली हे सर्व उपक्रम वगैरे....! :)
-दिलीप बिरुटे
28 Feb 2021 - 9:52 am | अरविंद कोल्हटकर
वरील विषय मधूनमधून चर्चेमध्ये येत असतो. ह्यावर ऐसीमध्ये ९-१० वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता. तो येथे पुनः चिकटवत आहे.
28 Feb 2021 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रति्साद माहितीपूर्ण आहे, आभार. एकापेक्षा अधिक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागेल म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी टाळाटाळ होत असेल तर ते योग्य नाही असे वाटते. दुसरी गोष्ट अशी की, केंद्र सरकारला असे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार नसला तरी आता पर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे आपल्याही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मिळाला पाहिजे असे एक मराठी भाषिक म्हणून वाटते.
-दिलीप बिरुटे
28 Feb 2021 - 12:08 pm | सुक्या
माहीतीपुर्ण प्रतीसाद.
एक प्रश्न आहे ... जर एखाद्या भाषेला "अभिजात भाषेचा" दर्जा मिळाला तर त्याने नक्की काय मिळते? सरकार कडुन काही ठोस उपाय होतात का? म्हणजे मराठी सक्तीची होइल वगेरे. मला ही मागणी अस्मिता जागवुन पोळी भाजणे या पलीकडे जास्त काही नाही असे वाटते. कदाचीत माझी माहीती चुकीची असु शकते म्हणुन विचारले.
नक्की काय फायदा होतो?
28 Feb 2021 - 12:21 pm | श्रीगुरुजी
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषाप्रसारासाठी व अध्ययनासाठी जास्त निधी मिळतो. केंद्राकडूनही निधी मिळतो. भाषेला स्वतंत्रपणे महत्त्व मिळण्यास प्रारंभ होतो (सध्या समान लिपीमुळे हिंदीच्या तुलनेत मराठीकडे दुर्लक्ष होते).
1 Mar 2021 - 12:51 am | सुक्या
माहितीबद्दल धन्यवाद.
28 Feb 2021 - 10:55 am | श्रीगुरुजी
सुप्रभात
जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
1 Mar 2021 - 1:05 pm | चौथा कोनाडा
आमी शुभेच्छा देत बसण्यापेक्षा उपलब्ध संधीत जवळच्या मंडळात अभिवाचनात सहभागी होऊन मायबोलीअवरील प्रेम व्यक्त केले !