मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लहानपणी, मराठीतला एक सिनेमा, वारंवार बघण्यात आला आणि तो म्हणजे, "सामना" चित्रपटाचे आकलन फार उशीरा झाले. पण डायलाॅग मात्र कायमचे लक्षांत राहिले. शिक्षण नावाचा टाईमपास करत असतांना, हे डायलाॅग, खूप लोकांना ऐकवले .... स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस, तोंडघशी पडला की, खालील डायलाॅग ऐकवायचा ... "गर्व ही सुद्धा एक प्रकारची वस्तुस्थिति आहे." बेकार असतांना, कुणी विचारले की सध्या काय करतोस? तर खालील डायलाॅग ऐकवायचा .... "सध्या आम्ही फक्त दारूवादी." एखादा जर, गोल गोल राणी, करत, मुळ विषयाला, जाणून बुजून बगल देत असेल तर, खालील डायलाॅग ऐकवायचा.... "मारूती कांबळेचे काय झाले?" पण, सर्वात जास्त वापरलेला डायलाॅग मात्र एकच ..... एखाद्या गोष्टीला अनेक पैलू असतात. समस्येच्या मुळाशी न जाता, नेता सांगतो, तेच सत्य किंवा एखादे वर्तमान पत्र सांगत आहे, तेच सत्य, किंवा एखादे पुस्तक सांगतंय तेच सत्य, असे समजून चालणारी, एक जमात असते.... अशा जमातीतला, एखादा भेटतोच भेटतो.... सत्य नाकारणारा, मनुष्य भेटला की, एक डायलाॅग ऐकवावासा वाटतो ..... आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?

वाचन 9730 प्रतिक्रिया 0