wacom cinteq pro 13 ड्रॉइंग टॅब

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in तंत्रजगत
29 Jan 2021 - 2:52 pm

माझ्या मुलीने wacom cinteq pro 13 हा ड्रॉंईंग टॅब तिच्या मैत्रिणीकडून ५० हजाराला विकत घेतला. मैत्रिणीकडे तो मॅक वर चालू होता असे तिने सांगितले. मुलगी पंजाबमधे होती. मी तो आणून दिलेला टॅब तसाच पॅक मधे असल्याने जसाच्या तसा पाठवला. मला त्यातील तांत्रिक ज्ञान नसल्याने मी चेक केला नाही. मुलीकडे डेल चा विंडोज चा लॅपटॉप आहे. त्यावर विंडोज १० आहे. तिला वाटले हा जोडला कि लगेच चालू होईल. पण तसे झाले नाही. नेटवरुन माहिती घेतल्यावर त्याप्रमाणे इन्स्टॉलेशन केले. पण डिस्प्ले कॉंपिटिबिलिटी इश्यु येत आहे. ड्रायव्हरही अपडेट केलेत. पण कॉंपेटॅबिलिटी इश्यू येत आहे. पुण्यात आल्यावर वेकॊनच्या मंगळवार पेठेतील सेंटर ला गेल्यावर त्यांनाही तो चालू झाला नाही. त्यांच्या मते डिस्प्ले केबल खराब असावी. त्यांच्याकडे ती नव्हती. मग सुजाता कॉंम्पुटर हे एक कर्वे रोडला कंपनी आहे. त्यांनी वेगवेगळे डिस्प्ले केबल व स्प्लिटर वापरुन पाहिले पण तोच डिस्प्ले इश्यु येत आहे. डिस्प्ले चालू होउन वेकॉमचा लोगो येतो पण पुढे कॉंम्पिटीब्ल इश्यु येतो. मग तिच्या मैत्रिणीच्या मॅकवर जोडून पाहिला तर लॅपटॉपचा डिस्प्ले टॅब वर दिसू लागला पण पुढे सिक्युरिटी अलर्ट येउ लागला. म्हणजे डिस्प्ले इश्यु नाही. आता तो धड विकता येत नाही व वापरताही येत नाही. विकत घेणाराही कोणी मिळत नाही. ज्याला हा तांत्रिक प्रश्न सोडवता येईल असा समर्थही कोणी भेटत नाही.या बद्द्ला कुणी मार्गदर्शन करणारा वा आहे तसा टॅब विकत घेणारा असल्यास कळवावे.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jan 2021 - 3:02 pm | प्रकाश घाटपांडे

या टॅबला तीन सी टाईप पोर्ट आहेत . सोबत एक वेकॉम लिंक स्प्लिटर बॉक्स आहे .

मास्टरमाईन्ड's picture

29 Jan 2021 - 10:38 pm | मास्टरमाईन्ड

तिच्या mac प्रमाणे configuration असलेल्या mac ला जोडून बघणं शक्य झालं का?
जिच्याकडून घेतला तिच्याशी हा प्रोब्लेम discuss करणं शक्य झालं का?
तिच्याकडून घेताना तुमच्या मुलीनं तो व्यवस्थित चालत असल्याची खात्री केली होती का?
https://www.wacom.com/en-us/products/pen-displays/wacom-cintiq-pro-13
हाच असावा.
wacom शी email वर सम्पर्क साधून पहा.
https://www.wacom.com/en-us/support/contact-support
इथे सर्व माहिती व्यवस्थित भरुन पाठवा. मिळणारी माहिती ही थेट कंपनीकडून असल्याने अचूक असण्याची शक्यता.

अवांतरः
इथे https://www.flipkart.com/wacom-13-dth1320-k4-c-cintiq-pro-11-6-x-6-5-inch-graphics-tablet/p/itmeujyfgmswcwat वर तर ५५२०० किंमत दाखवली आहे. त्यामुळे जर तो ५०००० ला घेतलाय तर under warranty असण्याची शक्यता आहे (मूळ मालकाने / मालकीणीने विकत घेतल्यानंतर १-२ महिन्यातच तुमच्या मुलीला विकलाय असा अन्दाज करुन) .

तसे असेल तर wacom च्या website वर product register करुन warranty claim कदाचित करु शकाल.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2021 - 4:05 pm | प्रकाश घाटपांडे

तिने उत्साहाच्या भरात घेतला. तिला वाटले पेन ड्राईव्ह सारखा जोडला कि झाले. मुलगी पंजाब मधे व मैत्रिण पुण्यात त्यामुळे काहीच शक्य झाले नाही. आता पुण्यात आल्यावर तिच्या दुसर्‍या मैत्रिणीच्या मॅकवर तपासला तर डिस्प्ले दिसतो. जो विंडोज मधे दिसत नाही.

गामा पैलवान's picture

30 Jan 2021 - 1:44 am | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

एरर मेसेज गुगलून पाहिला का? स्प्लिटर नेमका कशासाठी आहे? ट्याबचे विंडोज ड्रायव्हर अद्यतन कसे केले? बरीच माहिती लिहिली नाहीये.

हा ट्याब वापर्यचा माझा अनुभव शून्य आहे. पण जमेल तितकं समस्योकल ( = ट्रबलशूटिंग) करेन.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2021 - 4:15 pm | प्रकाश घाटपांडे

मिनि डिस्प्ले टू एचडीएमआय अशी केबल अ‍ॅमेझॉनवरुन नवीन घेतली व वापरली. ओरिजिनल मिनि डिस्प्ले तो मिनि डिस्प्ले होती. पण डेल ला मिनि डिस्प्ले पोर्ट नसल्याने ही केबल घ्यावी लागली.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2021 - 4:18 pm | प्रकाश घाटपांडे

वरील दुव्यातील आकृती क्रं ३ नुसार कनेक्शन केले.

गामा पैलवान's picture

30 Jan 2021 - 4:29 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

डेल पीसी ला युएसबी - सी आहे का? नसल्यास इतर कुठले पोर्ट्स आहेत?

वेकॉम अन्यथा चालू आहे ना? फक्त पीसी ला जोडता येत नाहीये, इतकीच समस्या आहे. बरोबर?

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2021 - 4:35 pm | प्रकाश घाटपांडे

मिनिडिस्प्ले टू एचडीएमाय ही केबल स्प्लिटर मार्फत पीसीला जोडली आहे. पण टॅबवर पीसीचा डिस्प्ले दिसत नाही. फक्त वेकॉम लोगो येतो व पुढे डिस्प्ले कॉम्पिटिबिलिटी इश्यू

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2021 - 4:35 pm | प्रकाश घाटपांडे

डेलला युसबी सी नाही व मिनिडिस्ल्प्ले पण नाही

गामा पैलवान's picture

30 Jan 2021 - 6:56 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

स्प्लिटर कोणता आहे? 'वेकॉम लिंक' की 'वेकॉम लिंक प्लस'? ज्याअर्थी तुम्ही मिनीडिस्प्ले पोर्ट वापरताय त्यावरून बहुधा 'वेकॉम लिंक प्लस' हा स्प्लिटर असावा. फक्त खात्री करून घेतोय.

डेल च्या पीसीचं मॉडेल काय आहे? त्याची लिंक मिळाली तर उत्तम.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Jan 2021 - 4:48 pm | प्रकाश घाटपांडे

वेकॊम लिंक

How to connect वगैरे युट्युब विडिओ बरेच आहेत.त्यापैकी
हे पाहिले का?
https://youtu.be/BWIxjhAoUyc
By Timmy
https://youtu.be/wLNaC4iDmd0
By Sribbs
कुठेतरी अचूक माहिती मिळेल. दिलेल्या पायरीने करून पाहता येईल. कधीकधी आपण एखादी गोष्ट करायची विसरलेलो असतो.

हर्शरन्ग's picture

30 Jan 2021 - 12:38 pm | हर्शरन्ग

हि लिन्क try करुन बघा
https://www.youtube.com/watch?v=4yLXRDwlQic

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jan 2021 - 4:09 pm | प्रकाश घाटपांडे

या नुसार पाहिले होते. एक्स्टेंडेड डिस्प्ले वर गेल कि तो दिसत नाही.

हर्शरन्ग's picture

30 Jan 2021 - 12:42 pm | हर्शरन्ग

Great product. But before buying please do check these okay. It will work on type C port only if it supports alternative display mode. Normal Windows laptops doesn't support these. So for them, they should buy few connectors to make it work. I'm having the issue. Everything except display on cinitq will work on normal type C. So check it before you buy.

मुक्त विहारि's picture

30 Jan 2021 - 7:08 pm | मुक्त विहारि

वाचत आहे...

व्हय's picture

2 Feb 2021 - 4:18 am | व्हय

बहुतेक अश्याच इश्शु बद्दल चर्चा करतायत...
href="https://www.reddit.com/r/wacom/comments/8756n9/how_to_connect_wacom_cint...">

व्हय's picture

2 Feb 2021 - 4:20 am | व्हय

प्रकाश घाटपांडे's picture

2 Feb 2021 - 9:59 am | प्रकाश घाटपांडे

अन्य दोन विंडोज लॅपटॉप पण ट्राय केले.

माझ्या मुलीने पण घेतला आणि सुरवातिला हा प्रोब्लेम आला. तर आम्हीhttps://www.wacom.com/en-in साईट्वर रजिस्टर करुन, डिटेल्स दिले आणि त्यानुसार विन्डोज साठीचे ड्राइव्हर्स डावुनलोड केले.... आता चालत आहे.

नक्की मॉडेल ची लिंक आणि मॅन्युअल ची लिंक मिळेल का?
नक्की मॉडेल ची लिंक आणि मॅन्युअल ची लिंक मिळेल का?

मुलीसाठी कोरा wacom cinteq १६ घेतला २/ अडीच वर्षा पूर्वी - तो मस्त चालू आहे
त्यामुळे रिसर्च करता येईल
तसेच ऑनलाईन काय काय शोधले ?

आपला लॅपटॉप / डेस्कटॉप कोणता आहे ? त्याला कोणते पोर्ट आहेत ?
मुली कडे १३ इंची डेल लॅपटॉप आहे - त्याला पहिल्या झटक्यात कनेक्ट व्हायला प्रॉब्लेम आला होता . आणि बायकोच्या गेमिंग लॅपटॉप ला आणिमाझ्याअ साध्या लॅपटॉप ला सरल कनेक्ट झाला

प्रकाश घाटपांडे's picture

3 Feb 2021 - 9:31 pm | प्रकाश घाटपांडे

LCD Tablet
Wacom Model DTH-1320
S/N 8CQ0061000977
DC 20V- 2.25A

http://101.wacom.com/UserHel

p/en/TOC/DTH-1620.html इथे मॆन्युअल आहे.

मुलीच्या डेल विंडोज १० वर किमान ड्रायव्हर तरी काम करत होते
माझ्या एचपी नोटबुक विंडोज ७ अल्टिमेट सर्विस पॆक १
वर ते पण होत नाहीत.
अशी ड्रायव्हरची त्रुटी दाखवतो

windows cannot verify the digital signature for the drivers required for this device. a recent hardware or software change might have installed a file that is signed incorrectly or damaged, or that might be malicious software from an unknown source. (code 52)

गामा पैलवान's picture

4 Feb 2021 - 9:07 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

स्प्लिटर कोणता आहे? 'वेकॉम लिंक' की 'वेकॉम लिंक प्लस'? ज्याअर्थी तुम्ही मिनीडिस्प्ले पोर्ट वापरताय त्यावरून बहुधा 'वेकॉम लिंक प्लस' हा स्प्लिटर असावा. फक्त खात्री करून घेतोय.

डेल च्या पीसीचं मॉडेल काय आहे? त्याची लिंक मिळाली तर उत्तम.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Feb 2021 - 2:43 pm | प्रकाश घाटपांडे

Dell laptop
windows 10 मॉडेल माहित नाही 6-7 वर्षांपुर्वीचा आहे.
युएसबी- सी पोर्ट नाहि. फक्त एचडीएमआय व युएसबी
वेकॊम लिंक आहे प्लस नाही

गामा पैलवान's picture

5 Feb 2021 - 9:52 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

मला वाटतंय की डेल पीसी चे ड्रायव्हर्स अपडेट करायला हवेत. वेकॉमच्या साईटवरनं ड्रायव्हर्स उतरवून घ्या. तरीही काम जमलं नाही तर युएसबी-सी ते युएसबी-ए असा अडाप्टर वापरून बघा. कदाचित काम होईल.

युएसबी-सी ते युएसबी-ए अडाप्टर :
https://www.flipkart.com/peganorm-usb-type-c-otg-adapter/p/itm16767dd8dd59c

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Feb 2021 - 11:58 am | प्रकाश घाटपांडे

१) सध्या डेल लॅपटॉप माझ्याकडे नाही. मुलीकडे आहे व ती आता पुण्यात नाही. पण डेल लॅपटॉपवर वेकॉमचे ड्रायव्हर्स अपडेट केले होते.
२) हा युएसबी ए टू सी हा अ‍ॅडॉप्टर वापरला नाही. तो वापरला तर वेकॉम लिंकची पण गरज पडू नये असे आकृतीतून वाटते. तसा प्रयोग आता मला डेल नसल्याने करता येणार नाही. माझ्या एचपी नोटबुकवर तर ड्रायव्हरचेच प्रॉब्लेम आहेत

प्रकाश घाटपांडे's picture

23 Feb 2021 - 2:38 pm | प्रकाश घाटपांडे

हा प्रयोग करुन झाला. काहीही झाले नाही. मग मी माझा एचपी लॆपटॊप चे विंडोज अपडेट केले. तर अजूनच प्रॉब्लेम येउ लागला. तुम्ही चोर आहात अशा आशयाचा मेसेज दिसू लागला. तो जाता जाईना. टॅग रिमूव्हर सारखे टूल्स वापरुन ही ते जाईना.मग शेवटी अरली डेटला विंडोज रिस्टोअर केले. तेव्हा प्रॉब्लेम सुटला.

गामा पैलवान's picture

23 Feb 2021 - 3:52 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

ज्याअर्थी वेकॉम स्पर्शपाटी अगोदर व्यवस्थित चालू होती त्याअर्थी तिच्यात गडबड नसून डेल संगणकात असणार. असा माझा अंदाज आहे.

मला दूर बसून अधिक सूचना देणं शक्य नाही. त्यामुळे मी थांबतो. मी जर तुमच्या जागी असतो तर मकिंटॉशचा आभासी संगणक ( म्हणजे व्हर्च्युअल मशीन ) निर्माण करून त्यास वेकॉम जोडून पाहणे, या दिशेने पुढे प्रयत्न केले असते. अर्थात, हा अतिशय किचकट व कदाचित वेळखाऊ प्रकार आहे व सहजसाध्य नाही.

आपल्या चर्चेबद्दल धन्यवाद. तुमची समस्या दूर होवो.

आ.न.,
-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

4 Feb 2021 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

माझा भाऊ त्याच्या शैक्षणिक युट्युब चॅनेलसाठी वॅकॉम टॅब्लेटचा भरपूर वापर करतो. हा धागा त्याला पाठवला. परंतु त्याला अशी समस्या न आल्याने उपाय सुचला नाही. त्याला कुठे काही उपाय आढळल्यास तो मला कळवेल अन मी इथे डकवीन.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Sep 2021 - 6:46 pm | प्रकाश घाटपांडे

शेवटी मुलीने तिचा डेल लॅपटॉप बिघडल्यावर परवा HP Pavilion Gaming 15-DK2075TX (4A3K5PA#ACJ) Core i7 11th Gen Windows 10 Home Gaming Laptop (16GB RAM, 512GB SSD, NVIDIA GeForce GTX 1650 + 4GB Graphics, MS Office, 39.62cm, Shadow Black/Ultra Violet) हा घेतला. व्यवस्थित वेकॉमला मॅच होतो कि नाहि हे पाहून घेतला. डायरेक्ट सी पोर्टवर केबल लावून व्यवस्थित काम करु लागला. क्रोमा मधून घेतला. दुकानातून काँम्पिटिबिलिटी चेक करुन घेता येते.

गामा पैलवान's picture

7 Sep 2021 - 7:37 pm | गामा पैलवान

प्रकाश घाटपांडे,

स्पर्शपाटी व्यवस्थित चालू झाली हे वाचून आनंद झाला. याचाच अर्थ डेल ल्यापटापामधले वेकॉमचे ड्रायव्हर्स व्यवस्थित चालंत नव्हते.

आ.न.,
-गा.पै.