भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
25 Nov 2020 - 8:58 pm
गाभा: 

सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर गेला आहे. या दौर्‍यात भारत ३ एकदिवसीय सामने, ३ ट-२० सामने आणि ४ कसोटी सामने खेळेल. सामन्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे (सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळेनुसार) -

एकदिवसीय सामने

पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - शुक्रवार २७ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
दुसरा सामना (दिवस-रात्र सामना) - रविवार २९ नोव्हेंबर सकाळी ९:१० वाजता सिडने येथे
तिसरा सामना (दिवस-रात्र सामना) - बुधवार २ डिसेंबर सकाळी ९:१० वाजता कॅनबेरा येथे

ट-२० सामने

पहिला सामना - शुक्रवार ४ डिसेंबर दुपारी १:४० वाजता कॅनबेरा येथे
दुसरा सामना - रविवार ६ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे
तिसरा सामना - मंगळवार ८ डिसेंबर दुपारी १:४० वाजता सिडने येथे

कसोटी सामने

पहिला सामना (दिवस-रात्र सामना) - गुरूवार १७ डिसेंबर सकाळी ९:३० वाजता अ‍ॅडलेड येथे
दुसरा सामना - शनिवार २६ डिसेंबर पहाटे ५:०० वाजता मेलबर्न येथे
तिसरा सामना - गुरूवार ७ जानेवारी पहाटे ५:०० वाजता सिडने येथे
चौथा सामना - शुक्रवार १५ जानेवारी पहाटे ५:०० वाजता ब्रिस्बेन येथे

या व्यतिरिक्त भारतीय दोन सराव सामने सुद्धा खेळणार आहे.

या मालिकेत भारत प्रथमच गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र चालणारा कसोटी सामना खेळेल. तसेच कॅनबेरा येथे कदाचित भारत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.

भारताने दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रथमच कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. परंतु त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात प्रमुख फलंदाज स्टिव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर नसल्याने भारताला विजय काहीसा सोपा झाला होता. परंतु यावेळी दोघेही संघात आहेत. २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतील सर्व ४ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. नंतर २०१७ मध्ये भारतात झालेल्या मालिकेतील ४ पैकी ३ कसोटी सामन्यात स्मिथने शतक केले होते. यावेळीही स्मिथ व वॉर्नर भारताला त्रासदायक ठरणार हे नक्की. त्यांच्या जोडीला मागील वर्षीच पदार्पण केलेला जबरदस्त फलंदाज लाबूशेन व शॉन मार्श असतीलच. स्टार्क व फिरकी गोलंदाज नेथन लॉयन नेहमीच भारताविरूद्ध चांगली कामगिरी करतात. त्यांच्या बरोबर पॅट कमिन्स व हॅझलवूड हे दोन चांगले गोलंदाज आहेत.

ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण ताकदीनिशी असताना भारताची ताकद कमी असणार आहे. कोहली फक्त पहिल्या कसोटीपर्यंत असेल व नंतर तो भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत रहाणे कर्णधार असेल. रोहीत शर्मा व ईशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर उपलब्ध असतील. त्यामुळे भारतीय संघाची ताकद कमी असणार आहे. फलंदाजीचा बहुतांशी भार मयंक, पुजारा व रहाणेवर असेल, तर बुमराह, शमी व चहलवर गोलंदाजीचा सर्वाधिक भार असेल.

एकंदरीत भारताला हा दौरा सोपा नसणार हे नक्की.

यापूर्वी १९७८ मध्ये, १९८६ मध्ये व २००४ मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आली होती. परंतु ते जमले नाही. २०१८-१९ मध्ये मात्र भारताने कसोटी मालिका जिंकून दाखविली. यावेळी सुद्धा भारत जिंकावा अशीच इच्छा आहे.

२७ नोहेंबर पासूनच आफ्रिकेत इंग्लंडविरूद्ध व न्यूझीलंड मध्ये वेस्ट इंडीज विरूद्ध मालिका सुरू होत आहे.

प्रतिक्रिया

गोंधळी's picture

6 Jan 2021 - 3:01 pm | गोंधळी

मयांकच्या जागी रोहित. पण तिसरा गोलंदाज ??
नटराजन्, ठाकुर की सैनी?

सौंदाळा's picture

6 Jan 2021 - 3:04 pm | सौंदाळा

सैनी - आताच जेवताना बातम्यांमध्ये दाखवलं

गोंधळी's picture

9 Jan 2021 - 1:13 pm | गोंधळी

सैनी उमेश ची जागा भरुन काढतोय लय धावा देउन राहीलाय.
रोहीत व गील सुरुवातील खेळत असताला वाटत होते की दोघांपैकी एक तरी १०० करेल.असो..
ऑस्ट्रेलियन गोलंदाजिच्या तुलनेत आपली गोलंदाजी कमकुवत आहे. त्यामुळे फार अपेक्षा न ठेवलेलच बरं.
२/१.

श्रीगुरुजी's picture

6 Jan 2021 - 10:29 pm | श्रीगुरुजी

उद्या पहाटे ५ वाजल्यापासून तिसरा कसोटी सामना सिडने येथे सुरू होतोय.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Jan 2021 - 8:28 am | ज्ञानोबाचे पैजार

सिराज ने घेतली त्यांची विकेट
बुमराह पण चांगली बॉलिंग करतो आहे
पैजारबुवा,

प्रसाद_१९८२'s picture

7 Jan 2021 - 2:05 pm | प्रसाद_१९८२

आज, पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा ऑस्ट्रेलिया २ बाद १६६ वर आहे. त्या ऋषभ पंतला कश्याला घेतलेय टिम मधे काही कळायला मार्ग नाही. त्यांने आज विलो पुकोव्हस्कीचे दोन कॅच सोडले.

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2021 - 2:15 pm | श्रीगुरुजी

फिरकी गोलंदाज गोलंदाजी करत असताना पंतला यष्टीमागे चेंडू अडविण्यात व झेलण्यात अडचण येतेय. मागील कसोटीत सुद्धा पहिल्या डावात पंतने बऱ्याच बाईज दिल्या होत्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Jan 2021 - 2:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यष्टिच्याजवळ अंदाजपंचे विकेटकिपरिंग सुरुय त्यांचं, अकीबात आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू वाटत नाही. आजचा खेळ संपेपर्यन्त ५ विकेट्स तरी पड़ायला पाहिजे होत्या. असो. उद्या काही उजेड पडेल अशी अपेक्षा करूया...!

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2021 - 6:15 pm | श्रीगुरुजी

ESPNcricinfo's logs revealed that Pant has dropped nine of the 20 catches that have come his way off spin bowling in Test cricket.

https://www.espncricinfo.com/story/aus-vs-ind-3rd-test-r-ashwin-s-fortun...

तुषार काळभोर's picture

7 Jan 2021 - 3:00 pm | तुषार काळभोर

पावसाने मदत केली नाही तर भारतीय संघाचा दारुण पराभव.
पंत, पांड्या हे अती ओव्हर रेटेड खेळाडू आहेत.

श्रीगुरुजी's picture

7 Jan 2021 - 3:39 pm | श्रीगुरुजी

हे मर्यादित षटकांच्या सामन्यांचे खेळाडू आहेत. पंड्या तसा बराचदा चांगला खेळलाय. पण पंत क्वचितच खेळतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2021 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Aus ३१५/९ अजुन १० एक धावात गुंडाळले पाहिजे. नियमित गोलंदाजापेक्षा रवीन्द्र जडेजाने चांगली गोलंदाजी केली. चार विकेट्स मिळवील्या. अश्विनचा कुंबळे व्हायला लागला आहे, नुसते थकने. बुमरा आणि सैनीने दोन विकेट्स घेतल्या. सिराजला एक विकेट्स मिळाली. शेवटची जोड़ी, अधिक धावा जोड़तील आणि ते बादही होतील.

भारताची फलंदाजी बघण्यास उत्सुक आहे.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2021 - 9:27 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज स्मिथची फलंदाजी १३१ अतिशय उत्तम होती, जड़ेजाने त्यास जबरा धावबाद केले परंतु तो पर्यन्त Aus ला त्याने एका मजबूत स्थीतीत नेले आहे, लाबुशिंगी ९१ आणि पुकोवस्की ६१ या तिघांनी उत्तम स्कोर केला. संघाला ३३८ धावांवर पोहोचवले.

आता भारतीय फलंदाजी पाहणे आहे, भारताच्या पहिल्या तासात फलंदाजी कशी राहील त्यावर आपला स्कोर लक्षात येईल. पहिल्या तासात दोन-तीन विकेट्स गेल्या तर आपल्यावर प्रेशर राहील.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2021 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रोहित शर्मा आणि गिलने सुरुवात केलीय. चहा-पानाला दहा मिनिटे बाकी आहेत...

आज दोघे चांगले फलंदाजी करतील अशी अपेक्षा करतो, विशेष घड़ामोडीनंतर पुन्हा धाग्यावर हजर होईन.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2021 - 1:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजच्या दिवसाच्या खेळ संपला तेव्हा भारताने रोहीत शर्मा आणि गील अनुक्रम २६ आणि ५० वर गमावून ९६ धावा केल्या आहेत. खरं तर दोघेही चांगले खेळत होते, विकेट्स पडाव्यात असे ते चेंडू नव्हतेही असे वाटते. बाकी राहिलेली षटके पुजारा आणि राहणे यांनी कन्हत कन्हत काढली, उद्या किमान २०० धावा होईपर्यन्त हे दोघे टिकले तर आपण सामन्यात टीकू असे वाटते.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2021 - 2:11 pm | श्रीगुरुजी

सामना अनिर्णित होईल बहुतेक. फलंदाजांची खेळपट्टी आहे. खेळपट्टीकडून गोलंदाजांना फारशी मदत दिसत नाही.

प्रसाद_१९८२'s picture

8 Jan 2021 - 3:33 pm | प्रसाद_१९८२

आज ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनच्या ४० व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ,ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी अजिंक्य रहाणेविरोधात एक अपील केली. त्यावेळी पंचांनी राहाणे नाबाद असल्याचा निर्णय दिला, यावेळी डिआरएस घेण्याचा वेळ देखील संपला होता. तरिही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी डिआरस घेतला व त्यातही राहाणेला नाबाद घोषीत केले. असे वेळ संपल्यावर डिआरएस घेणे नियमाला धरुन आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2021 - 9:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, अशा त-हेने ७ गड़ी गमावून आपण २०७ धावा केल्या आहेत, आपलं शेपूट वळवळत आहे. आपण सव्वादोनशे अड़ीचशे पर्यन्त खेळतो म्हणजे १०० एक धावांची आघाडी त्यांना मिळेल. त्यांनी अजुन दोनशे धावा केल्या तरी आपल्याला आपलं मरण पाहणे आहे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2021 - 10:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारताचे तीन फलंदाज धावबाद झाले ही एक विषेश नामुष्की दिसली भारताने सर्वबाद २४४ अशी संख्या झाली. आता एकूण ९४ धावांची आघाडी ऑष्ट्रोलियाने घेतली आहे, आता अजून किती धावा करतात आणि भारताला फलंदाजी देतात ते पाहणे रोचक ठरणार आहे, मला पराभव धुसर धुसर दिसतोय.

विशेष घडामोडीनंतर धाग्यावर हजर असेनच.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

9 Jan 2021 - 10:35 am | प्रचेतस

कसोटी क्रिकेटमध्ये ३ फलंदाज धावबाद होणं हे अक्षम्य आहे. पराभव नक्कीच आहे, किती आणि कितीने लांबवतात हे फक्त बघणे आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2021 - 11:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धावसंख्या पुरेशी नसतांना जवाबदारीने खेळलं पाहिजे, गल्ली क्रिकेटमधे एकवेळ असे समजू शकते परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यांमधे असा बेजवाबदारपणा योग्य नाही असे वाटते, बाकी आपल्या मताचा पूर्वीपासून आदर आहेच. ऑस्ट्रेलिया २ बाद ४१.

वल्ली, हा बेजवाबदारपणा २०१४ नंतर फार वाढला आहे, असे माझे (खोडसाळ) मत आहे. ;)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

9 Jan 2021 - 11:30 am | प्रचेतस

तुमचे(खोडसाळ) मत असल्याने दुर्लक्ष केल्या गेले आहे :)

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2021 - 10:22 am | श्रीगुरुजी

पराभव होईल असं आता चिन्ह आहे.

पंतच्या जागी साहा यष्टीरक्षण करतोय. पंतला scanning साठी नेलंय. दुखापत बऱ्यापैकी गंभीर असावी.

किसन शिंदे's picture

9 Jan 2021 - 1:09 pm | किसन शिंदे

पंत ओव्हररेटेड खेळाडू वाटला नाही का कधी तुम्हाला?

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2021 - 1:32 pm | श्रीगुरुजी

तो ओवहररेटेडच आहे. त्याची फलंदाजी बरी आहे, पण यष्टीरक्षण कौशल्य फारसे चांगले नाही.

सौंदाळा's picture

9 Jan 2021 - 4:38 pm | सौंदाळा

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जर चमत्कार केला किंवा पावसाची साथ मिळाली तर काही आशा आहेत.
माझ्यामते सामना गेल्यात जमा आहे.
स्मिथला शेवटी सूर गवसला ही चौथ्या सामन्यासाठी पण धोक्याची घंटा आहे. त्याला बाद करायला प्लॅन आणि विशेष प्रयत्न करायलाच हवेत.
हनुमा विहारी साठी पुढचा डाव शेवटची संधी असावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2021 - 4:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली सध्याची फलंदाजी देवभरोसे आहे, एकही फलंदाज रोहीतशर्मा आणि पुजारा सोडला तर खेळपट्टीवर चिकाटीने उभा राहणारा फलंदाज मला नावच घेता येणार नाही. गील आणि अजिंक्य राहणे आहेत पण त्यांच्यावर कोण विश्वास ठेवेल. बाकी, लॉटरी सारखं, लागली तर लागली. पण एकेकाने पन्नास पन्नास धावा केल्या आणि आणि एखाद्याने शतक केले तर वाचू, नाय तर, कर चले हम फिदा ऐ वतन साथीयो.

उद्या पहाटे, झोपेचं खोबरं करुन सकाळी सामना पाहणे आहे. देवा, माझा तुझ्या कार्यकर्तुत्त्वावर भारतीय फलंदाजीसारखा विश्वास नै, पण काही तरी चमत्कार कर आणि उद्या भारतीयांची इज्जत ठेव भो. १०० ग्राम पेढे वाटेन. ;)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

9 Jan 2021 - 5:02 pm | प्रचेतस

१०० ग्राम काय, १०००० ग्राम पेढे वाटले तरी कोणी कै चमत्कार करणार नै, तस्मात पहाटे उठून झोपेचं खोबरं करुन घेऊ नका. झोपा भो, उठल्यावर ऑस्ट्रेलियाची आघाडी ३५० पार झालेली दिसेलच ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2021 - 5:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली सर, आपल्या शब्दाबाहेर नाही. थेट आठवाजता स्कोर पाहीन. मग टीव्ही लावतो. आपण म्हणता तसे भला मोठा स्कोर दिसू नये असे मनोमन वाटते. सकाळी सकाळी मूड खराब होतो. तुम्ही बघा ना एखाद्या जागृत देवस्थान अथवा देवाला साकडं घालुन. आपल्याला फरक पडण्याशी मतलब.

-दिलीप बिरुटे
(क्रिकेट फॅन)

कपिलमुनी's picture

9 Jan 2021 - 7:08 pm | कपिलमुनी

फक्त दर्पण सुंदरी कडे चालतो

प्रचेतस's picture

10 Jan 2021 - 10:25 am | प्रचेतस

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2021 - 9:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऑष्ट्रेलियाने मजबूत आघाडी घेतली आहे, लाबूसेठ ७३, स्मिथ ८१ क्यामरॉन ७४ वर खेळतोय तर टीम ३९ वर खेळतोय ३०१ धावां३०१ धावांवर पाच फलंदाज बाद झाले आहेत एकूण ३९५ धावांची आघाडी घेतलीय आपला पराभव निश्चितच.....असे वाटत आहे. पण क्रिकेटमें कुछ भी हों सकता है.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2021 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चारशे सात धावांचं लक्ष्य पार करण्याचे आव्हान भारतास दिले आहे. आपल्या समोर संकटेच उभे आहेत. एक तर सामना ड्रॉ करणे हा पर्याय आहे, खेळपट्टी स्लो आहे, धावा येऊ शकतात. रोहीत शर्मा , गील, पुजारा, यांना धीटपणे उभे 'राहणे' आहे. गील आणि शर्मा खिंडीत उभे आहेत. भारताची धावसंख्या चार आहे. सामना मस्त मोडमधे आलाय सामन्याच्या घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही टीव्हीवर आणि मिपावर पडीक असू. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

10 Jan 2021 - 10:27 am | प्रचेतस

अजूनही तुम्ही आशेवर आहात?
मिपा आणि भारतीय संघाचं काहीच सांगता येत नाई, कधीही डाऊन होऊ शकतात :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2021 - 10:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मा.मिपा मालक आणि मिपाचं तांत्रिक काम बघणा-यांना विनंती की प्रचेतस आयडीस काहीकाळ डाऊन करण्यात यावं ही नम्र विनंती. वल्ली कोण बघतं रे हल्ली हे तांत्रिक काम.... ! ;)

भारतीय संघ चांगला खेळतोय. धपाधप चेंडु पायावर आदळत असले तरी धावाही होत आहेत, निव्वळ बचावात्मक पवित्रा घेतला आहे असे दिसत नाही. नैसर्गिक खेळी केली तर सामना वाचू शकतो. पंचांनी रोहीतला बाद दिल्यावर चहा घेता घेता जर चटका बसला होता, रिव्ह्यू घेतल्यामुळे वाचला बरं वाटलं. भारत बीनबाद २०.

धन्यवाद.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2021 - 10:11 am | श्रीगुरुजी

सामना वाचविणे अत्यंत अवघड आहे. वरूणराजाने कृपा केली तरच पराभव टाळता येईल.

तुषार काळभोर's picture

10 Jan 2021 - 10:50 am | तुषार काळभोर

रविवार किंचित ढगाळ
तापमान २७/१८
सोमवार स्वच्छ सूर्यप्रकाश
तापमान २६/१८
क्रिकेट खेळायला उत्कृष्ट!

आतापर्यंत तीनहून कमी धावगती होती.
शेवटच्या चार सेशन्स मध्ये चार धावगती शक्य नाहीये.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2021 - 1:50 pm | श्रीगुरुजी

उद्या विजयासाठी ९७ षटकांत ३०९ धावा हव्या. आवश्यक धावगती प्रतिषटक ३.१९ धावा.

तुषार काळभोर's picture

10 Jan 2021 - 10:56 am | तुषार काळभोर

रोहित, गिल, पुजारा, रहाणे, जडेजा, साहा, हनुमा/ मयंक/ पृथ्वी (!),
बुमराह, आश्विन, शार्दुल, सिराज

**
हनुमा/ मयंक/ पृथ्वी (!)
एकाला झाकावा आणि एकाला काढावा अशी स्थिती आहे. त्यातल्या त्यात मयंक बरा आहे का? के एल राहुल ची उणीव जाणवतेय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2021 - 11:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली सलामीची जोडी चांगली खेळत होती. एका आत येतोय असे वाटणा-या चांगल्या चेंडूवर गीलच्या ब्याटीचा हलकासा कीस घेऊन चेंडु विकेट किपरच्या ग्लोव्हज मधे स्थीरावला. प्रतिसाद लिहितच होतो की पुजाराला पायचितच्या निर्णयावर बाद देण्यात आलं पण रिव्हूमुळे वाचला. भारतीय संघ एक बाद ७१ या जोडीने किमान दीडशेपर्यंत संघाला घेऊन जावे. रोहीत ३९ धावावर चांगला खेळतोय. गीलही ३१ धावा काढून बाद झाला. पालथे आहेत साले, बाकी काय.

-दिलीप बिरुटे

ऑस्ट्रेलिया ची योजना सरळ दिसते आहे. त्यांनी लाईन ऑफ स्टंप वर ठेवली आहे. मारा पायावर चालला आहे. मधूनच अचानक बाहेर जाणारा आणि थोडा वर येणारा बॉल टाळून खेळत राहणे कठीण असतेच.. त्यात ते अगदी स्टंपला चिकटून बॉलिंग करताहेत. शिस्तबद्ध माऱ्याने दबाव निर्माण होत जातो. दबाव झुगारून खेळणे प्रत्येक खेळाडूला शक्य होत नाही.
राहूल खूप गरजेचा होता. पहिल्या चार पैकी दोघांनी मोठी खेळी खेळली तरच काही होऊ शकेल.

अशावेळेस सेहवाग सारखा माणूस एकटाच 100 धावांचा फरक करून टार्गेट जवळ आणून ठेवतो. :-)

तुषार काळभोर's picture

10 Jan 2021 - 1:34 pm | तुषार काळभोर

डिसेंबर २००८.
भारत - इंग्लंड कसोटी.
टार्गेट ३८७
सेहवाग ८३(६८ चेंडू)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2021 - 7:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रिकेट रंगतदार अवस्थेत पोहचला आहे, रोहीत, गील आणि राहणे च्या नंतर पंत आणि पुजाराने डाव सांभाळला आहे, ३ बाद २०२ धावा झाल्या आहेत जिंकायला २०५ धावा आहेत. पंत ७३ तर पुजारा ३७ धावावर खेळतोय. हार जीत होत राहील पण लढले पाहिजेत, सामना पहातांना मजा येत आहे.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

11 Jan 2021 - 8:35 am | तुषार काळभोर

पंत आणि पुजारा जोडीने भारतीय संघाला विजयाच्या वाटेवर आणला आहे. पण दुर्दैवाने पंत ९७वर बाद झाला.

२५०/४, पुजारा रॉक सॉल्लिड ५८
अजून अंदाजे 50 षटकात दीडशे धावा.
पुजराची जबाबदारी अजून वाढली आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2021 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय रोमांचकारी सामना होतोय. पंत, अजिबात वाटला नाही की बाद होईल. अतिशय उत्तम आत्मविश्वासाची फलंदाजी सुरु होती. पुजारा आणि पंतांनी आपल्याला विजयाचे स्वप्न दाखवले. काल पुजाराला बाद दिल्या गेलं तेव्हा त्याने जरासं चिडून रिव्हू घेतला तेव्हा असे वाटले की मुझे रन बनाना है असा त्याचा अ‍ॅटीट्युड वाटला होता आणि तो ते खरं करुन दाखवतोय. पुजारा ७० (आत्ता लागोपाठ तीन चौकार अहाहा जबरा) आणि हनुमा विहारी शुन्यावर खेळतोय. पन्नास षटकांचा सामना बाकी आणि जिंकायला हवे १४५ धावा. थँक्स पंत उत्तम फलंदाजीबद्दल....मजा आग गया.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

11 Jan 2021 - 9:16 am | तुषार काळभोर

अजून १३४
दॅट्स इट फॉर द डे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2021 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता परिस्थिती पाहता आपण सामना ड्रॉ जरी केला तरी आपला विजय झाला असेच म्हणू या. आता मागे फक्त जडेजा उरला आहे. अश्विन आणि विहारी हे किती टाइमपास करतात माहिती नाही. अजून ३७ षटकांचा खेळ बाकी आहे. एकवेळ जिंकण्याकडे वाटचाल सुरु होती असे वाटत होते. आता मॅच ड्रॉ जरी झाला तरी आपण जिंकलो असे म्हणू.... फोकलीचे पीचवर उभे राहीले पाहिजेत.

चहापानाची वेळ झाली आहे. २८० / ५. आता फक्त सामना ड्रॉ करायची निती अवलंबील्या जाईल, दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे शिल्लक नाही.

-दिलीप बिरुटे
(किंचीत अपसेट भारतीय क्रिकेट फॅन)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2021 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Cricket

हनुमा विहारी आणि रविचंद्र अश्विनने चांगला किल्ला लढवला आहे, सामना येथून ड्रॉ होईल असेच दिसते आहे. चला एक पराभवापेक्षा ड्रॉचा आनंद आहे.एकवेळ. पराभव होईल असे वाटले, पंत पुजारा खेळत होते तर जिंकू असे वाटले, ते बाद झाल्यानंतर आता पराभव होईल असे वाटले. अश्विन आणि विहारीने ड्रॉ करु अशी खेळी केली. धन्यवाद. अधिकृत ड्रॉची वाट पाहणे आहे..

भारत २९९ / ५

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

11 Jan 2021 - 11:24 am | प्रचेतस

ड्रॉ होणे हे जवळपास जिंकण्यासारखेच आहे. ब्राव्हो टीम इंडिया.

तुषार काळभोर's picture

11 Jan 2021 - 1:26 pm | तुषार काळभोर

पण पाचव्या दिवशी , चौथ्या डावात ३३४/५ ही खुपमोठी गोष्ट आहे.
हा ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा पराभव आहे.

प्रचेतस's picture

11 Jan 2021 - 1:27 pm | प्रचेतस

भारतीय संघाचे अभिनंदन.
जिद्दीने खेळले.

टिम पेन काय ग्लोव्ह्स ला अमुल बटर चोळून आला होता काय :)

मॅच अतिशय रंगतदार झाली! खूप खूप अभिनंदन टीम ब्लू! जिद्दीनं लढले!!

आणि पंतचे खास कौतुक! त्यानं सेहवागची आठवण करून दिली.
लागोपाठ २ विकेट्स पडल्यानं जिंकण्याच्या आशा बाजुला ठेवाव्या लागल्या, नाहीतर पोरानं मॅच खेचली होती!
प्रतिपक्षाला पुढचे डावपेच आखतांना विचार करायला लावणारी खेळी! :-)

श्रीगुरुजी's picture

11 Jan 2021 - 1:52 pm | श्रीगुरुजी

अश्विन व विहारीने जवळपास ४३ षटके झुंझार फलंदाजी करून पराभव टाळला याबद्दल दोघांचे कौतुक करावे तितके कमीत आहे. या डावात रहाणे वगळता सर्वांनीच चांगली फलंदाजी केली. विशेषतः पुजारा व पंत खेळत असताना एक वेळ भारत जिंकण्याची बरीच शक्यता निर्माण झाली होती. पंतचे ३ व विहारीचा १ झेल सोडणाऱ्या पेनलाही श्रेय दिले पाहिजे.

गोंधळी's picture

11 Jan 2021 - 2:26 pm | गोंधळी

१/१.
आता लक्ष पुढील सामन्यावर.जाडेजा पुढील सामन्यात नसेल. पंत वर पण ?..
साहा येईल पण जाडेजा च्या जागेवर कोण ?.. ते बघाव लागेल. सैनी च्या जागी नटराजनला संधी मिळावी असे वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- If You Had My Love... :- Jennifer Lopez

सौंदाळा's picture

11 Jan 2021 - 11:15 pm | सौंदाळा

भारताची जिगरबाज फलंदाजी.
पंतची आक्रमकता आणि विहारी, पुजारा, अश्विनचा संयम.
अजून काही वर्षांनी ही कसोटी आठवली की आपण याचे साक्षीदार होतो हे फीलिंग मस्त वाटेल एकदम.
दर्शकाची वंशभेदी टिप्पणी, जडेजा, विहारीची दुखापत, पहिल्या डावतील मोठी पिछाडी अशी अनेक आव्हाने असून सामना अनिर्णित राखला.
आजच राहुल द्राविडचा वाढदिवस, त्याला पण हा वाढदिवस चांगलाच लक्षात राहील. आणि आजच विराट कोहलीला कन्या रत्न झाले.
एकंदरीत भारतीय क्रिकेट संघासाठी जल्लोषाचा दिवस.

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2021 - 10:14 am | श्रीगुरुजी

जडेजा, विहारी पाठोपाठ दुखापतीमुळे बुमराह सुद्धा चौथ्या कसोटीतून बाहेर.

अरे कोणी उरणार आहे की नाही शेवटची टेस्ट खेळायला..??
माहित नाही कोणाला बोलवतील बुमराहच्या ऐवजी.. कमलेश नागरकोटी खरंतर मला खूप आवडलेला खेळाडू आहे. वाटलं होतं त्याला घेतील या टूर मधे सोबत म्हणून तरी.. बघू.

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2021 - 2:27 pm | श्रीगुरुजी

विहारीऐवजी मयंक आगरवाल आणि जडेजा व बुमराहच्या जागी कुलदीप, शार्दूल ठाकूर व नटराजन यापैकी कोणतेही दोघे येतील. कदाचित सैनीसुद्धा बाहेर असेल. शार्दूल बऱ्यापैकी फलंदाजी करतो. त्यामुळे तो संघात असेल तर फायदाच होईल.

गामा पैलवान's picture

12 Jan 2021 - 2:30 pm | गामा पैलवान

सामना कसोशीने अनिर्णीत राखल्याबद्दल बक्कीच्या संघाचं अभिनंदन. पण ही वेळ यायला नको होती. खूप खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. आयपीएल पण खेळा, एकदिवशीय सामनेही खेळा वर पाचदिवशीय कसोटीही खेळा. पुरेशी विश्रांती कोणी घ्यायची?

पाचव्या दिवशी अश्विनला तर सरळ उभंही राहता येत नव्हतं : https://www.loksatta.com/trending-news/india-vs-australia-3rd-test-ravic...

काय म्हणणार यावर ....!

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

12 Jan 2021 - 3:25 pm | श्रीगुरुजी

ज्या निर्धाराने अश्विन व विहारी तब्बल ४३ षटके उसळते चेंडू अंगावर झेलत पाय रोवून खेळपट्टीवर उभे राहिले व पराभव वाचविला, त्या प्रयत्नांना तोड नाही.

कालचा खेळ पाहून १९७६ मध्ये वेस्ट इंडीजमधील अंशुमन गायकवाडची खेळी आठवली.

तुषार काळभोर's picture

15 Jan 2021 - 6:32 am | तुषार काळभोर

ऑस्ट्रेलिया
१० षटकात २/२२
वॉर्नर अन हॅरिस माघारी परतले. शार्दुल अन सिराज टिच्चून मारा करताहेत.

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2021 - 8:38 am | श्रीगुरुजी

भालताचे प्रमुख गोलंदाज सैनी, सिराज, ठाकूर, नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर एकत्रित फक्त ६ कसोटी सामने खेळले आहेत. संपूर्ण गोलंदाजांचा चमू इतका नवोदित असणे बहुधा पहिल्यांंदाच घडले असावे (अपवाद म्हणजे १९३० च्या दशकातील भारतीय संघ).

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2021 - 9:22 am | श्रीगुरुजी

खरं तर ४ कसोटी सामनेच खेळलेत. या सामन्यापूर्वी सिराज २, सैनी १, ठाकूर १ व नटराजन आणि सुंदर शून्य कसोटी सामने खेळलेत.

तुषार काळभोर's picture

15 Jan 2021 - 9:01 am | तुषार काळभोर

स्मिथ गेला. सुदैवाने! सुंदरची पहिली टेस्ट विकेट. दीड तासापूर्वी त्याने शार्दुलला लागोपाठ चौकार ठोकले तेव्हा वाटलं, आज शतक, उद्या द्विशतक करतो हा.
३६ षटके, ३/९३. लबुशन चालू आहे अजून.

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2021 - 9:23 am | श्रीगुरुजी

रहाणेने लाबुशेनचा सोपा झेल सोडला. १०९/३.

तुषार काळभोर's picture

15 Jan 2021 - 12:16 pm | तुषार काळभोर

७६ षटके
५/२३६
लबुशेन शतक झाल्यावर लगेच आउट झाला ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट.
सैनीने त्याच्या आठव्या षटकाच्या पाचव्या चेंडूनंतर गोलंदाजी थांबवली. त्याच्या मांडीमध्ये वेदना होत होत्या. रोहितने एक चेंडू टाकून ते षटक पूर्ण केले.
शेवटचा फलंदाज टीम पेन खेळतोय. पण भारतीय संघाची गोलंदाजी कितीही भेदक झाली अन समोर कोणताही संघ असला तरी शेपूट वळवळतेच.

२७५-३००?

श्रीगुरुजी's picture

15 Jan 2021 - 1:24 pm | श्रीगुरुजी

४००+

मुक्त विहारि's picture

15 Jan 2021 - 8:47 pm | मुक्त विहारि

तसेच वाटत आहे.

गोंधळी's picture

15 Jan 2021 - 2:21 pm | गोंधळी

पहिल्याच दिवशी क्षेत्ररक्षण खुप लुज वाटले. अनुभव बघता गोलंदाजांची कामगीरी चांगली झाली.३५० च्या आत थांबवले पाहीजे.

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2021 - 8:46 am | श्रीगुरुजी

ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३६९. भारत ११/१. गिल गेला. पुढच्या चेंडूवर पुजारा थोडक्यात वाचला. ३६९ ही धावसंख्या आपल्याला झेपेल असे वाटत नाही.

गोंधळी's picture

16 Jan 2021 - 9:55 am | गोंधळी

गिल व रोहित दोघेही स्व. चुका करुन आउट झाले. मानसिक कमकुवतपणा यात दिसुन येतो.

मुक्त विहारि's picture

16 Jan 2021 - 10:01 am | मुक्त विहारि

नविन स्लोगन

तुषार काळभोर's picture

16 Jan 2021 - 3:10 pm | तुषार काळभोर

दुसऱ्या दिवसा अखेर पावसामुळे खेळ लवकर थांबवला.
उद्या पुजारा आणि रहाणे वर प्रचंड मोठी जबाबदारी आहे. दुखापती वाढत चालल्या आहेत. सैनी पुन्हा खेळेल असं वाटत नाही. त्यामुळे ३६९ च्या शक्य तितकं जवळ जाणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया ने डाव घोषित करून सामना निकाली होईल हे पाहिलं. पण एक वेळ भारत जिंकतो की काय अशी स्थिती होती. यावेळी पुन्हा ते अशी रिस्क घेतील?
त्यात आपल्याकडे एक गोलंदाज कमी.
उद्या सर्वबाद न झाल्यास , हार होणार नाही अशी आशा आहे.
नाहीतर ड्रॉ करण्यासाठी सुद्धा पावसाच्या धावा कराव्या लागतील.
त्यापेक्षा फलंदाजांनी धावा करणं जास्त चांगलं.

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2021 - 3:21 pm | श्रीगुरुजी

चौथ्या दिवशी सोमवारी दिवसभर पाऊस येण्याची शक्यता ६०% आहे, तर पाचव्या दिवशी मंगळवारी दिवसभर पावसाची शक्यता ५०% आहे. फक्त उद्याचा तिसरा दिवस संपूर्ण दिवस खेळून काढला पाहिजे. त्यामुळे भारत सामना वाचवू शकेल असं वाटतंय.

तुषार काळभोर's picture

17 Jan 2021 - 11:48 am | तुषार काळभोर

कालच्या दोन विकेट्स नंतर आज पुजारा, रहाणे, अगरवाल, पंत यांनी चांगल्या सुरुवातीनंतर मोठ्या खेळी केल्या नाहीत.
१८६/६ असताना सगळं संपलं असं वाटलं.
पण अनपेक्षित पद्धतीने शार्दुल आणि सुंदर यांनी अर्ध शतके करत १२३ धावांची भागीदारी केली.
हा प्रतिसाद लिहीत असताना शार्दुल ६७वर आऊट झाला आहे.
जिगरबाज भागीदारी.

भारत ३०९/७

अजून फार धावा होतील असं वाटत नाही. भारत तीस चाळीस धावा पिछाडी वर असेल. ऑस्ट्रेलियाला रिस्क घ्यायची असेल (जे ते घेण्याची शक्यता जास्त आहे) तर अडीचशे च्या आसपास घोषित करून २८०-३०० लक्ष्य ठेवतील. पण त्यासाठी ७०-८० षटके खेळावी लागतील. आणि त्यानंतर भारतीय संघाला पाचव्या दिवशी चौथ्या डावात सर्वाबाद करावे लागेल. पावसावर बरच काही असेल.

ऑस्ट्रेलिया बचावात्मक खेळेल असं वाटत नाही, पण सामना वाचवण्यासाठी खेळले तर ३५० च्या जवळ जातील, पण त्याला १२० षटके लागतील. तिसऱ्या डावात भारतीय गोलंदाज थकलेले आणि दुखापतग्रस्त असले तरी ऑस्ट्रेलिया ला ते कठीणच जाईल.

तुषार काळभोर's picture

18 Jan 2021 - 7:57 am | तुषार काळभोर

लंच
ऑस्ट्रेलिया ४/१४९
स्मिथ २८. जम बसला तर अवघड आहे.
एकूण आघाडी १८२.
अजून ११८ झाले तरी टार्गेट ३००.
अवघड असेल. पण आवाक्यात. ऑस्ट्रेलिया टार्गेट ३५० च्या आत असताना घोषित करणार नाहीत.

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2021 - 9:08 am | श्रीगुरुजी

१९६/५, स्मिभ ५५ वर बाद.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 9:27 am | मुक्त विहारि

महत्वाची भुमिका बजावणार

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2021 - 10:15 am | श्रीगुरुजी

ब्रिस्बेनवर ४ थ्या डावात धावा करणे फारसे अवघड नसावे. पूर्वी याच मैदानावर धावांचा पाठलाग करताना ४ थ्या डावात भारताने ३५५, इंग्लंडने ३७० तर २०१६ मध्ये पाकड्यांनी ४५० धावा केल्या होत्या. अर्थात हे संघ सामना हरले होते. भारताने १९७७ मध्ये ४ थ्या डावात ३२४ धावा केल्या होत्या, परंतु पराभव झाला होता.

या मैदानावर ४ थ्या डावात यशस्वी पाठलाग करून सामना जिंकलेली सर्वोच्च धावसंख्या २३६ आहे.

चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने २४३/७ धावा करून २७६ धावांची आघाडी घेतली आहे.

परंतु आता पाऊस आला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2021 - 12:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तर अशा त-हेने आपल्याला पुन्हा एकदा जिंकण्यासाठी ३२४ धावांची आवश्यकता आहे. बीनबाद चार धावा झाल्या आहेत. रोहीत शर्मा चार धावांवर तर गील शुन्यांवर खेळत आहेत. आता आपल्याला सामना वाचवणेच हातात आहे. सामना जिंकू असे वाटावी अशी परिस्थिती नाही. पीच गोलंदाजांना साथ देईल अशीच आहे, त्यामुळे उद्या आपले फलंदाज पीचमधे किती रुतून राहतील त्यावर आपलं उद्याचा सामना वाचवणे हातात राहील असे वाटते.

हे देवांनो, उद्या आपल्या भारतीय फलंदाजांना टीकून खेळण्याचं सामर्थ्य दे. आपली फलंदाजी तुझ्यासारखीच बेभरवशाची आहे तरीही काही चमत्कार होऊ दे अशी मनोमन प्रार्थना.

-दिलीप बिरुटे

प्रसाद_१९८२'s picture

18 Jan 2021 - 12:54 pm | प्रसाद_१९८२

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात २९४ धावा,
चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारताला हव्यात ३२८ धावा. शक्य आहे का हे ? आज एकही विकेट न टाकता, उद्याचा संपूर्ण दिवस खेळून काढावा लागेल भारताला.

गोंधळी's picture

18 Jan 2021 - 1:25 pm | गोंधळी

सामना ड्रॉ होइल पण रोहीत व गील हे १००/१५० पर्यंत टिकले आपण जिंकुही शकतो अस वाटतय. निदान रोहीत ने तरी उभ रहाव मग मागे पंत आहेच.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 5:31 pm | मुक्त विहारि

80-90 षटकांत, 320 धावा हव्या आहेत

इतक्या रन्स तर आपण, 50 षटकांत काढतो

हरलो तरी हरकत नाही, प्रयत्न जिंकण्यासाठीच करायचा

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2021 - 5:58 pm | श्रीगुरुजी

कसोटी सामन्यात पॉवरप्ले, ३० यार्डांंच्या वर्तुळाबाहेरील क्षेत्ररक्षकांच्या संख्येवर मर्यादा, गोलंदाजांच्या षटकसंख्येवर मर्यादा असे फलंदाजांना अनुकुल असणारे नियम नसतात. वाईड चेंडूसाठी कडक नियम नसतो. नोबॉलवर मुक्त फटका मिळत नाही. त्यामुळे कसोटी सामन्यात इतक्या धावा करणे खूप अवघड असते.

मुक्त विहारि's picture

18 Jan 2021 - 6:53 pm | मुक्त विहारि

अशक्य नक्कीच नाही

शिवाय, आता गमावण्या सारखे काहीही शिल्लक नाही

सौंदाळा's picture

18 Jan 2021 - 8:04 pm | सौंदाळा

असहमत,
या कसोटी मालिकेबद्दल बरोबर आहे तुमचे
पण वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप चालु आहे. त्याचा विचार केला तर आपल्याला ही कसोटी अनिर्णित राहिली तरी चालेल (जिंकलो तर मस्तच होइल) पण हरलो तर फटका बसेल.

जवळपास ३.५ च्या रनरेटनं धावा कराव्या लागतील जिंकण्यासाठी. हे कसोटी सामन्यात अन् तेही चवथ्या डावात साधारणपणे कठीण असतं.
जिंकण्यासाठी प्रयत्न करणे योग्यच आणि ते आपल्या टीमलाही नक्कीच समजत असेल.
पण जोखीम किती आणि कोणी घ्यायची, पहिल्या चारनं किती रनरेटनं धावा गोळा करायच्या, पिचचा अंदाज... आणि जोडीला पाऊस. हे आणि असेच अनेक पैलू लक्षात घेऊन पुढची रणनीती राहील. अर्थात् जिंकलेले बघायला कधीही आवडेल, पण मॅच वाचवण्याची वेळ ६-७ व्या क्रमांकावर येणार्‍या फलंदाजांवर येऊ नये असं वाटतं.

कानडाऊ योगेशु's picture

18 Jan 2021 - 7:44 pm | कानडाऊ योगेशु

बरोबरै. आणि पहिल्या सामन्यातली नीचांकी धावसंख्या कसे बरे विसरु? एखादी दुसरी जम बसलेली विकिट पडली कि हगवण लागायची.

श्रीगुरुजी's picture

18 Jan 2021 - 10:08 pm | श्रीगुरुजी

सामना जिंकणे अत्यंत अवघड आहे. भारत सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल असे वाटत नाही. सामना अनिर्णित ठेवण्यासाठीच भारत प्रयत्न करेल. सामना अनिर्णित राहण्यासाठी पावसाची सुद्धा मदत होईल. सामना हरू नये हीच इच्छा.

कपिलमुनी's picture

18 Jan 2021 - 11:44 pm | कपिलमुनी

उद्या सकाळी पावसाची शक्यता जास्त आहे ,
दुपार नंतर हवेचा वेग वाढणार आहे .
म्हणजे उद्या ७० षटकांचा खेळ होइल , ड्रॉ करावी लागणार आहे

तुषार काळभोर's picture

19 Jan 2021 - 7:58 am | तुषार काळभोर

लंच
भारत १/८३
रोहित सकाळीच माघारी गेला.
सध्या पुजारा आणि गिल टिकून आहेत.
लक्ष्य साठ षटकात २४५.
इथून जिंकण्याची शक्यता कमी आहे किंवा नाहीच.
अनिर्णित राहण्याची शक्यता जास्त.
पण शेवटच्या दिवशी पडझड होऊन साठ सत्तर धावात नऊ बाद होणे, सामान्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 8:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामना अनिर्णीत राहील असेच डावपेच. पुजारा १०५ चेंडू १५ धावा तर गील १२८ चेंडूत ७३ धावा. गोलंदाजामधे काही ख़ास जादूही दिसली नाही. त्यामुळे विकेट्स पड़त नाही. चला ही मालिका चांगली झाली. मजा आली. उरलेला सामना बोल टू बोल पाहतोय धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 10:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारतीय फलंदाज सध्या आता आक्रमकपणे खेळत आहेत, शुभम गील ९१ वर बाद झाल्यानंतर आता १४५ धावा हव्या आहेत. धावांची गती पाहता टार्गेट जवळ जवळ पोहोचेल असे वाटत आहे. राहणे आणि पुजारा कितीकाळ उभे राहतात त्यावर निर्णय अवलंबून असेल. सामना अभीबी बाकी है. :)

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2021 - 9:33 am | श्रीगुरुजी

काही चमत्कार घडला तरच सामना निकाली होईल.

कोहली, राहुल, अश्विन, जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर, शमी, उमेश यादव व बुमराह असे ९ प्रमुख खेळाडू संघात नसताना सामना व मालिका न हरणे कौतुकास्पद आहे.

प्रसाद_१९८२'s picture

19 Jan 2021 - 10:43 am | प्रसाद_१९८२

३७ षटकात हव्यात १४५ धावा. सात विकेट बाकी आहेत. विजय कठीण आहे मात्र अशक्य नाही. भारताने आता जिंकायसाठी खेळायला हवे.

२१ षटकांत १०४ धावा. जवळपास ५ चा रनरेट हवा जिंकण्यासाठी. ३० एक रन्स उरलेले असतांना रिस्क घेऊ शकतात. सध्या तरी नाहीच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंडळी, आता १५ षटकात केवळ ६३ धावा हव्या आहेत. एक मोठा रेकॉर्ड मला येथून दिसत आहे. २६५ वर चार फलंदाज बाद झालेले आहेत आणि ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल आता खेळत आहेत, देहबोली सामना जिंकू असाच वाटत आहे. मला वाटतं सामना जिंकण्याची संधी येथून दिसत आहे. धावसंख्या कठीण नाही. आता येथून फलंदाज बाद होऊ नये. मग सामना आपलाच आहे. सपना कुछ बुरा नही.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 12:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मयंक अग्रवाल ९ धावांवर झेल देऊन परतला. आता वाशिंग्टन सुंदर वर भरवसा आहे. पण जिंकण्यासाठीच खेळावे. सामना अनिर्नित राखता येईल....पण जिंकण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, अशी संधी पुन्हा येणे नाही.

-दिलीप बिरुटे

प्रसाद_१९८२'s picture

19 Jan 2021 - 12:24 pm | प्रसाद_१९८२

अशी संधी पुन्हा येणे नाही.
--

सहमत !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माय गॉड गोईंग टू अ न्यू रेकॉर्ड ! अरे बाप दिल की धडकने तेज.
फक्त २४ धावा हव्या आहेत.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता विजयासाठी केवळ दहा धावा हव्या आहेत, सुंदरचा बेजवाबदार फटका केला तरी २२ धावांच्या खेळीमुळे आपण विजयाच्या समीपजवळ आलो आहोत.
आता शार्दुल आलाय खेळण्यासाठी.... जिंकणार नक्की.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

19 Jan 2021 - 12:56 pm | तुषार काळभोर

पंत कडून ही अपेक्षा नव्हती!

अजून पंधरा!

अभी नाय तो कभी नाय!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 1:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकार ठोकलाय. आता फक्त सहा धावा. ये.......

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2021 - 1:00 pm | श्रीगुरुजी

१० हव्या

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2021 - 1:01 pm | श्रीगुरुजी

अजून ४ षटके आहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 1:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जिंकण्यासाठी तीन धावा आहेत. शार्दुल ठाकूर दोन धावा काढून बाद झाला आहे. सोपा आहे सामना. आता येथून काही हाराकिरी करु नये.

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2021 - 1:06 pm | कानडाऊ योगेशु

३ धावा हव्या आहेत.ठाकुर गेला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2021 - 1:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हिपीप हुर्रे हिपीप हुर्रे.....!

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

19 Jan 2021 - 1:08 pm | कानडाऊ योगेशु

जिंकलो बे आपण....

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2021 - 1:09 pm | श्रीगुरुजी

जिंंकलो. मस्त जिंकलो.

राघव's picture

19 Jan 2021 - 1:16 pm | राघव

३० धावांपर्यंत येईतोवर जिवात जीव नव्हता... मग मात्र जिंकणार असे वाटायला लागले.
हॅट्स ऑफ् टीम ब्लू! मालिका विजयाचा आनंद काही औरच!! :-)

संस्मरणीय विजय आणि दीर्घकाळ लक्षात राहणारी मालिका.
भारतीय संघाचे मनापासून अभिनंदन

तुषार काळभोर's picture

19 Jan 2021 - 1:22 pm | तुषार काळभोर

पहिली एकदिवसीय मालिका गमावली.
मग T 20 जिंकली.
मग पहिल्या कसोटीत दारुण पराभव.
मग दौऱ्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत मालिका विजय.
विराट नाही.
साडेतीन गोलंदाज - एक सैनी जखमी. त्यांच्यात एकूण दहापेक्षा कसोटीचा अनुभव.
बेभरवशाचा यष्टी रक्षक.

' अजिंक्य ' विजय.

प्रसाद_१९८२'s picture

19 Jan 2021 - 1:26 pm | प्रसाद_१९८२

अभिनंदन !

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jan 2021 - 1:56 pm | ज्ञानोबाचे पैजार

इंग्लंड विरुध्द च्या कसोटी मालिके साठी सगळ्या सिनियर लोकांना नारळ द्यावा आणि पंतला टिम मधे ठेवून दुस्रा विकेट किपर घ्यावा
पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2021 - 3:28 pm | श्रीगुरुजी

पंतचे यष्टीरक्षण सुमार आहे. संघात चांगला यष्टीरक्षक हवा.

गोंधळी's picture

19 Jan 2021 - 3:24 pm | गोंधळी

पहिल्या डावात नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ४०० च्या आत रोखल. नंतर सुंदर व ठाकुर च्या १२१ रन्स च्या भागीदारीमुळे आव्हान कायम ठेवल.
दुसर्या डावातही आपल्या गोलंदाजांनी जास्त धावा करु दिल्या नाहीत. ३२८ लक्ष्य गाठ्ण्यासाठी चांगली सुरुवात मिळणे गरजेचे होते.
रोहीत लवकर बाद झाला पण गील व पुजारा यांच्या ११४ धावांच्या भागीदारीने विजयाचा पाया रचला. अखेर सुंदरच्या साथीने पंतने अपेक्षे प्रमाणे खेळुन विजय मिळवला.
सुरुवातीला कोणालाही वाटले नव्हते की आपण ही मालिका जिंकु. पण युवा क्रिकेटपटुंनी चांगली कामगीरी करुन दाखवली.

श्रीगुरुजी's picture

19 Jan 2021 - 3:33 pm | श्रीगुरुजी

आता बहुतेक स्मिथ पुन्हा एकदा कर्णधार होईल. पेनला काढून त्याच्या जागी मॅथ्यू वडे यष्टीरक्षक होईल.

बेकार तरुण's picture

19 Jan 2021 - 3:43 pm | बेकार तरुण

याहू !!! लै म्हन्जी लैच खूष आज !!
ऑस्ट्रेलिया दौरा म्हणल की अनेक वर्षे एकटा सचिन लढत आहे, अन बाकी सगळे आजु बाजुचे हजेरी लावुन जात आहेत असच चित्र असायचं... २००० पासुन बदलाला सुरुवात झालेली पण तेव्हाही कधी अटीतटीच्या सामन्यात आपण कमी पडायचो किंवा वादग्रस्त पंच निर्णयाने कमी पडलो...
किती तास घालवले असतील हे सगळे पाहण्यात ह्याची काहीच गिनती नाही... अगदी पहाटे गजर लावुन ऊठुन मार खाल्लेले पाहिले आहे....
आज सगळा हिशोब परतरवुन दिला..... कमाल मजा आली... कप्तान अन बेस्ट बॅट्समन नाही, ६ ते ७ गोलंदाज जखमी.. तरी तिसर्‍या फळीतील गोलंदाज घेउन २० बळी घेण अन शेवटच्या दिवशी अन ४थ्या डावात ३०० + चेज करुन जिंकणे !!!! Cant get better than this !!!
Hats off to Team India and especially Pant, Gill and the Rock of Gibraltar MR CHEPU for today's performance !!!

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2021 - 3:15 pm | श्रीगुरुजी

सुरूवातीचे २ एकदिवसीय सामने भारत हरल्याने दौऱ्याची सुरूवात वाईट झाली, परंतु शेवट गोड झाला.

या धाग्याचे अवतारकार्य संपले. सर्व प्रतिसादकांचे आभार!

५ फेब्रुवारीपासून भारतात इंग्लंडविरूद्ध पहिला कसोटी सामना सुरू होतोय. त्या मालिकेसाठी कोणीतरी नवीन धागा काढा. कोणी न काढल्यास मी काढीन.